कथा

शुक्रवारची कहाणी (आजच्या काळातील)

Category:

 

आटपाट नगर होतं तिथं एक गरीब कुटुंबातील पाच जण कसे बसे दिवस काढत होते. पौरोहित्य आणि चार पाच ठिकाणी देवपूजा यातून जे मिळायचे ते समजून घेऊन आनंदात रहात होते. मोठय़ा मुलीला असेच खातेपिते घर बघून लग्न करून दिले. गावातील लोकांनी थोडा हातभार लावला होता. एक जबाबदारी आणि खायचे तोंड कमी झाले. नतंरचे दोन मुलगे सरकारी शाळेत शिकत होती. अचानक वडिलांना आजार झाला आणि त्यातच ते देवाघरी गेले. मोठा यंदा दहावीत होता. म्हणून कशी बशी परीक्षा दिली. पास झाला. मग पौरोहित्य करु लागला पण आता पहिल्या सारखे वातावरण राहिले नाही. त्यामुळे दुकानात हिशेब लिहिण्याची नोकरी करु लागला. अशीच एक गरीब घरातील मुलगी सांगून आली. सणवार. आणि सवाष्ण म्हणून काही बाही मिळायचे याची सोय होईल म्हणून लग्न करणे आवश्यक होते ते झाले. उमा नावाप्रमाणेच सगळे काही निमूटपणे समाधानाने करत होती. आणि आता आजुबाजुला असलेल्या ग्रामीण भागातील लोक सदाशिवला पौरोहित्य करण्यासाठी बोलावू लागले होते. आणि बायकोला घेऊन या शिधा घेऊन जायला सांगत. एकदा श्रावणात सूनबाईनी पाटलांच्या घरी पुरणवरणाचा स्वयंपाक करुन पाचपंचवीस लोकांना जेऊ घालून सगळ्यांना आश्चर्यचकित केले. पाटील व पाटलोण बाई एकदम खुष. जातांना भरपूर शिधा. साडी चोळी ओटी भरली. सासूबाई म्हणाल्या तुझ्या या स्वयंपाकानेच एक दिवस तुझ्या घरी लक्ष्मी चालत येईल….

  February 4, 2026


कथा

आवडीचे गैरसमज

Category:

 

बाहेर पाऊस पडून आभाळ मोकळे झाले तसेच घरातही नंणद भावजयीच्या बोलण्याने. तोपर्यंत आज्जी नातवंड रानमेवा संपवून आले. आणि आलं घालून केलेला गरम गरम वाफाळता चहा.

  February 4, 2026


कथा

मधल्या मधे

Category:

 

आम्हीच माघार घेतली पाहिजे बरोबर आहे घर त्यांच राज्यही त्यांचेच आम्ही आश्रीत तेंव्हा बोलायचे नाही गप्प गुमान बंद करा आणि बसा शांत. आता नानांची पण काही चूक नाही. आर्थिक परिस्थिती मुळे सिनेमा नाटक सहली काहीही जमले नाही व्यवसाय. कामाचा व्याप मुलांच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी पैसा व वेळ गेला. आत्ता कुठे सगळे स्थिरस्थावर झाले आहे.

  February 4, 2026


कथा

घरटं छोटं

Category:

 

पशुपक्ष्यांचे शिक्षण, लग्न वगैरे काही नाही तर ते एकमेकांना समजून सांभाळून घेतात. कदाचित भांडण करत असतील. मात्र घर सोडून एकमेकांना सोडून देत नाहीत. कारण त्यांचे घरटं छोट आहे पण मन मात्र खरंच खूप मोठे आहे. दोघेही उच्च शिक्षित. आर्थिक स्वावलंबन. जबाबदारी नाही. बंधन नाहीत सगळ्या सुखसोयी. अजून काय हवं असतं सुखी संसारासाठी ते सगळे काही आहे तरीही असे का व्हावे? हे समजत नाही. पण माणसा परीस… हेच खरं आहे….

  February 4, 2026


अवर्गिकृत

बांगड्या

Category:

 

संक्रांतीचा सण आला की कासाराच्या दुकानात किंवा डोक्यावर बांगड्यांचा मोठा हारा घेऊन घरोघरी जाऊन बांगड्या भरणारी कासारीण आठवते अजून. आठ पंधरा दिवस ही धामधूम सुरू असते. पाटल्या बिलवर घेऊन दुकानात गेल्यावर आपल्या मापाच्या बांगड्या भरवल्या की कासाराच्या पाया पडून निघायचे अशी पद्धत होती.

  May 18, 2023


अवर्गिकृत

टिकवाल तर टिकेल

Category:

 

डिसेंबर महिन्यात शेवटच्या दिवशी सरत्या वर्षाला निरोप देण्यात येतो. त्यामुळे ज्यांना जसे जमेल तसे हा दिवस साजरा केला जातो. खर तर जमेल तसे नाही तर जमवूनच आणतात. कुणी सिनेमा. कुणी नाटक. कुणी सहलीला. कुणी कुठे कुणी कुठे रमतात. तर काही ठिकाणी सोसायटीचे सगळेच घरातील एकत्र येऊन नाच गाणी खेळ गप्पा आणि नंतर जेवण किंवा अल्पोपाहार.

  May 15, 2023


अवर्गिकृत

जाणिव

Category:

 

एका सूनबाईने सासूबाईंना. पगार वाढ झाली आहे म्हणून फोन करून सांगितले. आणि सासूबाईंनी अभिनंदन केले. पण ईथेच संपले नाही खरा भाग वेगळाच कारण सून बाईंनी याच श्रेय सासूबाईंना दिले नातवाला सांभाळले होतेम्हणून ती नोकरी करु शकली व बढती मिळाली यावर काही तरी सांगायच आहे मला.

  May 11, 2023


अवर्गिकृत

कुरकुर

Category:

 

रमा सकाळची कामे भरभरा उरकून. मशीन वर शिवायला बसली होती. लग्न सराई. संक्रात आणि इतर अनेक कारणाने शिलाईचे काम भरपूर आहे म्हणून ती लवकरच आवरुन मशीन वर शिवायला बसली होती पण आज मशीनचा मूड वेगळाच. खट खट असा आवाज आला आणि मशीन चालू होत नाही.

  May 8, 2023


अवर्गिकृत

सक्तीचे

Category:

 

लहानपणी आई बाळाला जोजावते. अंगाईगीत गाते. पाळण्यात. मांडीवर झोपवते. धपाधपा पाठीवर डोक्यावर थोपटून. कारण ते लवकर झोपावे म्हणून. सक्तीने. पुढे लेकरानं चार घास जास्त खावेत म्हणून काऊ चिऊची गोष्ट. घरातील एकेका व्यक्तीचे नाव घेऊन त्याचा घास असे म्हणत खाऊ घातले जाते.

  May 4, 2023