(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • राजा

    तुझा व्याप खरच खुप मोठा आहे. तुझे उंच सिहासन, तुझा मोठा लोकसंग्रह, तुझे ऐश्वर्य सारं काही आश्चर्यचकित करणारं आहे. या सर्वांपलीकडे पाहता, तुझ्या सुंदर, उदार, भारावून टाकणार्‍या जबरदस्त आकर्षक अशा प्रभावी व्यक्तीमत्वाचे दर्शन होते. तुझी गुणग्राहक वृत्ती, स्पष्टवक्तेपणा, सर्वसमावेशक उदार प्रवृत्ती आध्यत्मिक तेज, ...धार्मिक मन या सर्वांनी तुझे लोभस व्यक्तीमत्त्व एससंघ सुसूत्र होते. वरवरचा अतिशय साधा, तरल स्वभाव त्यामागे दडलेले काटेकोर, अचूक, सखोल तत्वज्ञ व्यक्तीचे विशाल मन, कुणाच्याही मनाला जादूचा स्पर्श करून जाते. तुला अत्यंत देखण्या तारुण्याचे वरदान असूनही तुझ्या वागण्या बोलण्यात एक जबाबदारपणा व पितृत्त्वाचा जिव्हाळा दिसून येतो. त्यामुळे संपर्कात येणारी व्यक्ती तुझ्यात कायमची गुंतून पडते. तुला ओझरते पाहणाराही कधी विसरू शकत नाही. रुबाबदार राजपुत्रासारखे तुझे वागणे, चालणे, चमकता, पूर्ण चंद्रासारखा चेहरा, मोठे, भावूक बोलके डोळे आणि अत्यंत सात्विक प्रेमळ वागणूक, या सगळ्या मोहपाशातून एखादी विरक्त-योग मार्गी व्यक्तीदेखील अलिप्त राहू शकणार नाही.
    तुझ्या स्वभावात, तुझ्या व्यक्तीत्वात विरोधभास नाही असे मुळीच नाही; पण उन्हासोबत सावली असा रमणीय विरोधाभास कुणालाही आवडेल कधी तुझे बोलणे तलवारीसारखे धारदार, वार करणारे असते. तर कधी तुझ्या संतप्त नजरेत ज्वलंत निखारे दिसून येतात. अशावेळी ऐन उन्हाळ्यात बहरलेल्या, अग्नीफुलांचा साज घेतलेल्या पळसासारखा दिसतोस तू।
    दुसर्‍याच्या हळव्या दुसऱया मनावर कधी प्रेमाने तर कधी समजूतीच्या सुरात `उपचार' करीत असतांना तुझे कधी पित्यासारखे शिस्तीचे तर कधी मोठ्या भावासारखे धाकाचे बोलणे मनाला कायमची हुरहूर लावून जाते. तुझ्या धाकातही प्रेमाचे आश्वासन असते. अशा हिरव्यागार बहारदार गुलमोहराची ही रम्य सावली सोडून कुणाला जावेसे वाटेल?

    समोरच्या व्यक्तीमध्ये एकदम गुंतून गेल्यासारखे, समरस होणे तुला सहज जमते. मात्र एका

    क्षणात निघून जाताना तू कधीही विचलीत होत

    नाहीस. हृदयाची भाषा बोलून, दुसऱयाचे `विधीलिखीत' लिहिण्याची कला तू कुठे शिकलास?

    तुझ्या व्यक्तीमत्त्वाचे हे असंख्य पैलू उलगडण्यात माझे संपूर्ण आयुष्यही सरून जार्सल तरीही माझे मन अतृप्तच राहण्याची शक्यता आहे. तुझ्या नजरेतील उपेक्षा, तिरस्कार, अलिप्तपणा हे भाव मात्र असहनीय आहेत.
    तू रागवशील, बोलशील, प्रसंगी एखादे प्रायश्चित्त सांगशील इतपत सारे ठीक आहे; पण उपेक्षा मात्र मरण याताना देतील.
    तुझ्या अस्तित्वाने येते, रत्नमाणकाचे मूल्य.तुझ्या नसण्याने मनी, रित्या आकाशाचे शल्य.
    तुझ्याशिवाय माझे सारे आयुष्य, माझा संघर्ष, माझे अस्तित्व, गुण-अवगुण सारे काही व्यर्थ आहे. माझ्या आयुष्यात शिशिर असला तरी तुझा उत्कर्ष पाहून मला तृप्त वाटते. माझ्या दीपपूजनात, गायत्रीमंत्रात, शिवपूजनात तुलाही ...वाटा आहे. एकदा तुला ग्रहण लागले होते; पण तू त्यातून सहीसलामत, सुरक्षित निघालास आणि पुन्हा सर्वांग सुंदर बहरलास हे कळले तेव्हा मनात आलेल्या मिश्रभावना शब्दातीत आहेत. तुझे सारे दुःख, प्रारब्ध भोग मला मिळावे. व माझे आयुष्य तुला मिळावे. असेच मी प्रार्थनेत नेहमी मागीन.
    पारिजात नावाच्या राजकन्येने, सूर्याच्या प्रेमविरहात देहत्याग केला होता. तेव्हा त्याचा `प्राजक्त'झाला. रात्रीच `उमलून' हा वृक्ष पहाटेस सूर्याला पाहून अश्रूपात करतो. व `निषेध' व्यक्त करीत सारी फुले गळून पडतात. माझेही तुझ्याशिवाय `संपून जाणे' असेच रमणीय असावे. माझ्याही राखेतून असा बहारदार वृक्ष व्हावा व त्याच्या सुगंधाने तुला मंत्रमग्ध करावे.
    मला मृत्यूपंथी नेई, स्वैर दिशाहीन वाटमाझ्या प्रेमाची पुण्याई, तुझे चिरंजीव पद।आता नको अग्नीसाक्षी, नको वेदमंत्र थोरतुझ्या दिव्य अस्तित्वात, माझे शाश्वत सौभाग्य।

    -- किशोर कुलकर्णी

      May 21, 2006


  • अविस्मरणीय क्षण

    आयुष्यात अशा काही घटना घडून गेलेल्या असतात, ज्यांची पुन्हापुन्हा उजळणी करावीशी वाटते. काही हक्काची ठिकाणे असतात_ मनाला उभारी देणारी, जगण्याची नवी उमेद देणारी… ज्यांच्या आठवणीत आपण रमून जातो, कधी अभिमानाने उर भरून येतो..प्रसंगी हळवेही होतो. माझ्यासाठी माझी बँक ही त्यापैकीच एक.

      April 24, 2023


  • समाजातील जड़णघडणीत संत साहित्याचे योगदान

    संतसाहित्यवाङमयनिश्चितच सामाजिक स्तरावर , समाजाच्या जडणघडणीवर तसेच समाज कल्याणाच्या विचारांनी प्रेरित असून सत्य मानवी धर्माची! मानवी नीतिमूल्यांची! जाणीव करून देणारी अवीट अविरत प्रवाही वांग्मयीन गंगोत्री आहे.

      November 22, 2021


  • सावज (कथा)

    सोसायटीच्या वॉचमननं झोपेनं तारवटलेले डोळे अर्धवट उघडून एक कडक सॅल्युट ठोकला.. सिक्युरिटी कॅबिनच्या दाराजवळ अंगाचं मुटकुळं करून पडलेलं कुत्रं उठलं .. शेपूट हालवित त्यांच्याकडे आशाळभूतपणे पाहू लागलं.. मराठेंनी खिशातून एक बिस्कीटचा पुडा काढला.. त्यातील काही बिस्कीटं.. त्याच्यासमोर धरली.. त्यानं पुढील पाय किंचीत उंचावून ती तोंडात धरली.. एका बाजूला ठेवून खाऊ लागलं.. उरलेल्या बिस्कीटांचा पुडा त्याच्या जवळ ठेवून म्हणाले..

      January 26, 2023


  • कठोर शिक्षा – भाग २

    “ही मी त्याला दिलेली कठोर शिक्षा” रजनीने कथा संपवली. रजनीने कथा संपवली खरी, पण कथा संपली नाहीं !

      February 23, 2018


  • सत्यकामाची गोष्ट

    सत्यकाम अगदी एकटा पडला. त्याचे सर्व खेळगडी त्याला सोडून गेले होते. त्यांच्या आईबापांनी त्यांची उपनयने करून त्यांना विद्याध्ययनासाठी गुरुगृही पाठवून दिले होते

      November 15, 2025


  • बोरोली पिकली गांडोली शेकली

    एका बोरगाव नावाच्या खेड्यात सारजा नावाची एक आजी राहायची. ती गरीब होती पण कुणाकडे हात पसरायची नाही. परसात अळू, मेथी, काकडी लावायची. बाजारात विकून चार पैसे मिळवायची. शेंगदाणे, हरभरे भाजायची. कागदाचे कोन करून त्यात भरायची व शाळेतल्या मुलांना दहा- वीस पैशात विकायची. अंगणाला बोरीचे, वेलाचे कुंपण घालायची. हंगामात फळं आली की ती विकायची. चिमणी एकेक दाणा टिपते तशी संसार करायची. तरुणपणी नवरा गेला तरी ती हरली नाही. कष्ट करून आनंदाने जगत होती. गावातली उनाड मुलं कधी तिची बोरं चोरायची. पोरंच ती! खायची गोष्ट खाणारच, म्हणून ती कानाडोळा करायची. गावाबाहेरच्या जंगलातला कोल्हा तिच्या परसातली काकडी, बोरं खायला यायचा. आजीची नजर चुकवून तो काकडी फस्त करायचा.

      October 22, 2025


  • अभंग

    तुमचे नाम संकीर्तन ।
    हेचि माझे संध्या-स्नान ।।
    तुमच्या पायाचे वंदन ।
    हेचि माझे अनुष्ठान ।।
    तुमच्या पायाचा साक्षेप ।
    हा चि माझा काळ क्षेम ।।
    तुमच्या प्रेमे आली निद्रा ।
    हीच माझी ध्यान-मुद्रा ।।
    एका जनार्दनी सार ।
    ब्रह्म रुप हा संसार ।।

      June 11, 2026


  • आनंदी आनंद गडे !

    इकडे तिकडे चोहिकडे,
    वरती खाली मोद भरे,
    वायुसंगे मोद फिरे,
    नभात भरला, दिशात फिरला, जगात उरला
    मोद विहरतो चोहिकडे । आनंदी आनंद गडे ।

    सूर्यकिरण सोनेरी हे,
    कौमुदि ही हसते आहे,
    खुलवी संध्या प्रेमाने
    आनंदे गाते गाणे
    मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले,
    इकडे तिकडे चोहिकडे । आनंदी आनंद गडे ।

    नील नभी नक्षत्र कसे
    डोकाऊनि हे पाहतसे,
    कुणास बघते? मोदाला
    मोद भेटला का त्याला ?
    तमामधें तो सदैव असतो, सुखे विहरतो
    इकडे तिकडे चोहींकडे ! आनंदी आनंद गडे !

    वाहति निर्झर मंदगती,
    डोलति लतिका वृक्षतती.
    पक्षी मनोहर कूजित रे
    कोणाला गातात बरे?
    कमळ विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले
    इकडे तिकडे चोहिकडे ! आनंदी आनंद गडे !

    स्वार्थाच्या बाजारात
    किती पामरे रडतात,
    त्यांना मोद कसा मिळतो ?
    सोडुनि स्वार्था तो जातो
    द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला
    इकडे तिकडे चोहीकडे ! आनंदी आनंद गडे !

      June 16, 2026


  • प्लीज येवू दे ना !

    बाहेरच चमकदार निळसर आकाश,त्या खाली नुकताच पिंजलेल्या कापसासारखे पांढरे शुभ्र ढग,सुनीलला विमानाच्या खिडकीतून दिसत होते. खिडकीशेजारचा विमानाचा पंखा,त्या मावळतीच्या सोनेरी सूर्य प्रकाशात तळपत्या तलवारीच्या पात्या सारखा भासत होता. ‘विरोध करणाऱ्याला कापून काढीन ‘ असा त्याचा अविर्भाव होता.

      January 1, 2019