(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भाऊबीज

    आटपाट नगर होतं, तिथं एक भाऊ रहात होता. त्याला एकुलती एक बहीण होती. दोघांचा एकमेकांवर भारी जीव असायचा. तर एकदा काय झालं की, ह्या भावाच्या घरी त्याची ही बहीण माहेरपणाला आली, भावाला मोठा आनंद झाला. फार दिवसांनी बहीण भेटली म्हणून तो हारखून गेला. बहिणीसाठी काय करू नि काय नको असं त्याला झालं. म्हणून तो आपल्या बायकोला म्हणाला कसा, “अग, आज चांगल्या पोळ्या कर पुरणाच्या. माझ्या पंक्तीला माझी बहीण बसू दे.” तशी ती त्याच्या तोंडावर “बराय’ म्हणाली. पण ती पडली मुलखाची द्वाड. तिनं नवऱ्याचं ऐकलं नाही. त्याच्या एकट्यापुरत्या व आपल्यापुरत्याच तेवढ्या पुरणाच्या पोळ्या केल्या. आणिक बहिणीसाठी कणकीच्या कोंड्याच्या रोट्या केल्या.

      November 25, 2025


  • नकोशी (कथा)

    मी जेमतेम पाच वर्षांचा होतो. शेजारपाजारच्या काकू, आजी, आत्या म्हणायच्या, ‘या वक्ताला पोर्गी होऊ दे मंजी शिवा ले राखी बांधाले भन भेटल.’ मलाही ते ऐकून वाटायचं की आपल्या घरात लहान बाळ आलं की किती मज्जा येईल. मला ती राखी बांधेल, भाऊबीजेला ओवाळेल, असा विचार मनात आला की सतत आईभोवती फिरायचो.

      May 11, 2022


  • अविस्मरणीय गांधीजयंती सप्ताह

    आठवणींमध्ये रमण्याचा छंद सगळ्यांनाच असतो. 'गुजरा हुआ जमाना' आपल्याला नेहमीच वर्तमानापेक्षा अधिक रमणीय भासतो, कारण त्यात आठवणींचे गहिरे रंग भरलेले असतात. सुख-दुःखाचे प्रसंग, जुनी माणसं आठवताना आपलं मन भरून येतं.पण अप्रूप वाटावं त्या उत्सवाचं अर्थात हुतात्मा बाबू गेनू यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या घोडपदेव विभागातील श्रीकापरेश्वर मंदिराच्या प्रांगणात होत असलेल्या महात्मा गांधी जयंती सप्ताहाचं. मराठी मातीत वाढलेल्या, रुजलेल्या माणसासाठी *"महात्मा गांधी जयंती सप्ताह’* म्हणजे निव्वळ शब्दात व्यक्त न करता येणारा जिव्हाळ्याचा विषय. *‘वसुधैव कुटुंबकम‘* हे मानणारी आपली भारतीय संस्कृती. अशाच काही व्रतस्थानी,मराठमोळी माणसं या भागात राहतात. त्यातल्याच काही उत्साही आणि रसिक लोकांनी एकत्र येऊन सुरु केलेला हा सप्ताह म्हणजे ‘आकाशी झेप घेरे पाखरा ....!’ समस्ताना प्रेरणा देणारा गांधी सप्ताह. बापुजींना मानणारे आणि न मानणारे दोन ही घटक होते. मलाही महात्मा गांधीविषयी आणि त्यांच्या आडमुठ्या हट्टापायी भारताला जे सोसावे लागत आहे त्या विषयी घृणा आहे. पण मला त्यात आत्मीयता नाही म्हणून इतरांची मते वेगळी असतात. असे काही अहिंसेच्या मार्गावरचे पुजारी या विभागात राहत होते. त्यांच्या योगदानामुळे हा सप्ताह मुंबई शहरात नावारूपाला आला. एक दिवशीय औपचारिकता म्हणून गांधी जयंती साजरी करणारे शासनासहित विविध सामाजिक संस्था किंवा पक्ष आदिंनी गांधी सप्ताह कधी केला नाही. असो माझा विभाग या मध्ये आघाडीवर होता. याचा मला अभिमान आहे.

    मला आठवतय लहान असताना सप्ताहात एक दर्जेदार नाटकातील एक संवाद आठवतोय ‘"गेले ते सुखाचे दिवस, आता ते परत कधीही येणार नाहीत‘. एक खिन्न आर्तता त्याच्या त्या सुस्कारा टाकून काढलेल्या उद्‌गाराचे प्रतीत आज मला कळतंय. खरोखर गेले ते गांधी सप्ताहाचे दिवस. किती सामर्थ्य ! किती चैतन्य ! तो सप्ताह म्हणजे बालमनावर सुसंस्कार करणारा उत्सव....! हुंदडण्याबरोबर ज्ञानार्जन देणारा उत्सव...! याच उत्सवात गीतगायन,नाटक, वकृत्व स्पर्धा होत होत्या. विविध नाट्यमंडळे नाटक सादर करीत असत. दर्जेदार सादरीकरण .... त्या लाकडी फळ्यांच्या धडधडणाऱ्या रंगमंचावर धमाल यायची. पाहतच रहायचं.

    भारतीय बेकरीच्या बाजूला राहणाऱ्या एक हांडे नावाच्या मुलीने मधुर आवाजात गायलेले ‘दो आँखे बारह हाथ’ मधील ‘ए मालिक तेरे बंदे हम’ गीतांनी समस्ताना रडविले होते. ‘गवताला जेव्हा भाले फुटतात’ या ऐतिहासिक नाटकात यशवंत तळेकर नावाच्या कलावंताने व्यासपीठावर यवनांशी लढाई करणाऱ्या प्रसंगात अशी गोल उडी जागच्या जागी मारली ते पाहून टाळ्यांचा कडकडाट कितीतरी वेळ चालला होता. या प्रसंगाचे वर्णन करायचं म्हणजे त्या कलाकाराला रसिक प्रेक्षकातून ५ रुपयाचं बक्षीस दिले. त्यावेळेचे ५ रुपये कमी नाहीत.तेव्हा मिल कामगारांना महिना ६० रुपये पगार होता. दुर्लक्षित ऐतिहासिक आणि काव्यमय असे वेगळे विषय अतिशय कल्पकतेने हाताळणारी नाट्यमंडळे आणि त्यांचा नाटक दर्जा, उत्कृष्ट अभिनय व्यावसायिक नाटकांना देखील मागे टाकत असे.वकृत्व स्पर्धेत अरुण पवार नावाच्या विद्यार्थ्याने इंग्लिश मध्ये भाषण करून नवा पायंडा पाडला होता. विशेष म्हणजे घराघरातून माणसं या स्पर्धकांना प्रोत्साहन द्यायला यायची. बक्षीसही देऊ करीत होती.

    या सप्ताहात सात दिवस दारूबंदी असायची. सतत काहींना काही कारणास्तव होणाऱ्या राडेबाजीला मज्जाव म्हणजे गांधी सप्ताह. जेथे दारूचे धंदेच बंद तेथे मारामारी होत नसे. भांडण तंटे नव्हते. तरीही काही जन घराघरात भूश्याच्या गोणीतून दारू आणून विकायचा प्रयत्न करीत पण पोलीस ठाणे अशा मंडळींची वरात काढीत होते. नशाबंदी मंडळाचे दर्जेदार कौटुंबिक, राष्ट्राभिमान जागृत करणारे चित्रपट पाहायला मिळत होते. यामुळे बाल्यावस्थेतील दैनंदिन वर्तनात परिवर्तन घडून येत होतं. मुलांना त्यावेळेस शाळा एके शाळा... कोचिंग क्लास नाहीत आणि घरी शिकवणी नाही कारण घरातलेच शिकलेले नव्हते त्यामुळे ते अभ्यास काही घेत नसत. मग आपल्याला मस्त उंडारण्याशिवाय दुसरं काम काय...! त्या उंडारण्यात मजा होती. विविध प्रकारचे खेळ खेळायला मिळत. अशा वेळी बालकांचे विविध कलागुण गांधी सप्ताहात पहायला मिळत. आपल्यातला कलावंत, बुद्धिवंत विभागात दिसू लागला.

    ते अहिंसेचे मार्गावरचे पुजारी पिकल्या पानाप्रमाणे गळून पडू लागले आणि या उत्सवाची शान हळूहळू लोप पावत गेली. आज गांधी सप्ताह होत नाही. पण धाकु प्रभुजी वाडी सार्वजनिक मंडळाने महात्मा गांधी जयंती अव्याहतपणे सुरु ठेवली आहे. खरं तर या गांधी सप्ताह बंद होण्यामागे राजकारण आहे . कुटनीती रचली गेली.पण त्या फंदात मला पडायचे नाही.

    त्या मान्यवरांचे कष्टाचे,योगदानाचे, कौशल्याचे, आंनद देणारे क्षण अविस्मरणीयच म्हणजे अंधार फार झाला असतना पणती जपून ठेवतो त्याप्रमाणे माझ्याच नव्हे तर आजही क्रित्येकांच्या हृदयात तेवत आहेत.

    अशोक भेके

      March 27, 2017


  • भाऊ भाऊ

    अमेरिकेत ट्राफिकची शिस्त पाहून आपण अक्षरश: थक्क होऊन जातो. अमेरिकेतील सर्व शहरे परस्परांना हायवेनी जोडलेली आहेत. अनेकदा इप्सित ठिकाणी जाण्यासाठीही हायवेंचाच आधार घ्यावा लागतो. या हायवेंवर जाणाऱ्या आणि येणाऱ्या बाजूने प्रत्येकी किमान तीन लेन्स उपलब्ध असतात. सर्वात डावीकडची लेन वेगाने धावणाऱ्या वाहनांसाठी, मधली लेन कमी वेगाने जाणाऱ्या वाहनांसाठी, आणि उजवीकडची लेन हायवेवरुन बाहेर पडण्यासाठी अथवा पुन्हा हायवेवर येण्यासाठी व पोलिसांची गाडी, आगीचे बंब, रुग्णवाहिका यांच्यासाठी असते. त्या लेनवरुन विनाकारण कोणतीही गाडी जात नाही.

      July 30, 2022


  • लग्नाची बेडी – Part 1

    “कसले? अरे लग्नाचे आणि कसले? तू तिकडे लांब एकटा, परदेशात, आता शिक्षणही पुरे झाले, चांगला जॉब आहे, घर आहे. चांगला सेटल झाला आहेस मग आता लग्नाचे कधी मनावर घेणार आहेस? अरे सगळ्या गोष्टी कशा वेळच्या वेळी झाल्या म्हणजे बरं. आम्हाला इकडे खूप काळजी वाटते, बरं. चटकन येता पण येत नाही. आता एकाला दुसरा जोडीदार हवाच, शिवाय परका मुलूख म्हणून म्हणते. आपलं माणूस हवं.खाण्यापिण्याचेही खूप हाल होत असतील.”

      March 14, 2022


  • इमारतींचं सौंदर्य

    अमेरिकेत सॅन फ्रॅन्सिस्को येथे एका बागेत फिरत असताना अचानक समोर एक दिमाखदार इमारतींची रांग दृष्टीपथात आली आणि ते दृश्य पाहून मी अक्षरशः भारावून गेलो. बागेतल्याच एका बाकावर बसून मी त्या इमारतीचं सौंदर्य शांतपणे न्याहाळू लागलो. बागेच्या समोरच्याच फुटपाथवर पाचसहा इमारतींचीं रांग दिसत होती. रांगेतल्या प्रत्येक इमारतीचं सौंदर्य खरोखरोच अप्रतिम होतं. युरोपियन पठडीतल्या बैठया घरांच्या शैलीतल्या त्या इमारतींमध्ये साम्य बरंच होतं आणि स्वतःचं खास वैशिष्टयही. प्रत्येक इमारत वेगळ्या रंगात, वेगळ्या ढंगात सजली होती. एका इमारतीची रंगसंगती नजर खिळवत होती तर दुसरीचं नक्षीकाम मनाला भूरळ पाडीत होतं. नंतर एका ब्रोशरमध्ये त्या इमारतींचा फोटोही मी पाहिला व मोस्ट फोटोग्राफ्ड बिल्डिंग्ज असं त्यांचं वर्णनही मी वाचलं. माझ्या स्वतःच्या कॅमेऱ्यात मी त्या इमारतींचं सौंदर्य टीपलंच होतं. साहजिकच त्यांचं ते अचूक वर्णन मनोमन पटलं. त्या इमारतीत राहणाऱ्या भाग्यवान रहिवाशांचा मला खरोखरीच हेवा वाटला.

    अमेरिका म्हणजे गगनचुंबी इमारती असं समीकरण आपल्या मनात रुजलेलं असतं. प्रत्यक्षात अमेरिकेत गगनचुंबी इमारती केवळ शहरातील एखाद्या भागातच सिमित असतात. बाकी राहत्या वस्तीतली घरं ही बैठी, जुन्या पठडीतली. सुरुवातीला हे वास्तव स्वीकारणं आपल्याला कठीण जातं मात्र बैठया टुमदार घरांचं सौंदर्य नजरेत भिनलं की गगनचुंबी इमारतींच्या बाजाराचं अप्रूप रहात नाही. एकमेकींशी स्पर्धा करणाऱ्या गगनचुंबी इमारतींची स्काय लाईन मात्र आपल्याला थक्क करुन जाते. शहराचं, देशाचं वैभव, सुबत्ता अशा स्काय लाईनमुळे अधोरेखित होते. संध्याकाळी अशा इमारती दिव्यांच्या रोषणाईने सजल्या की त्यांना कॅमेऱ्यात टिपणं अनिवार्य होऊन जातं.

    इमारतींचं सौंदर्य टीपणं हा एक छंद आहे. हा छंद जडला की नजरेसमोर येणारी प्रत्येक इमारत आपण बारकाईने न्याहाळू लागतो. त्यानंतर आपल्या मनात नकळत इमारतींचं वर्गीकरण सुरु होतं. कुठली इमारत सामान्य आहे, कुठली इमारत केवळ राहण्याच्या दृष्टीने ठीक आहे आणि कुठली इमारत खरोखरच देखणी आहे अशी विभागणी करण्यात वेळ मजेत निघून जातो. देखणी इमारत समोर आली की त्या इमारतीच्या रचनाकाराविषयी मनात आदराची भावना दाटून येते. इमारत उभी करण्याचं काम उरकताना त्या रचनाकाराने कलात्मक दर्जा गाठलेला असतो. अशा इमारती मग आपल्या कायम स्मरणात राहतात. रस्त्यातून जात असताना -आता ती इमारत येईल- हे आपल्याला आधीच जाणवतं. ती विशिष्ट इमारत समोर आली की भान हरपून आपण पुन्हा त्या इमारतीचा रुबाब न्याहाळू लागतो. अमुक रस्ता म्हणजे अमुक इमारत ही खूणगाठ मनात घट्ट रुजते.

    इमारतींचं सौंदर्य प्रथम मनात भरलं ते गोव्यामध्ये. गोव्यातील मंगेशी, शांतादुर्गा, अशा देवळांच्या परिसरात पाऊल ठेवलं की मन प्रसन्न होऊन जातं. देवळाची मुख्य इमारत, समोरील दीपमाळ, सभोवतालची धर्मशाळेची वास्तू, पायथ्याशी असलेलं छोटंसं तळ या सर्वच गोष्टी मनावर प्रसन्नतेचा शिडकावा करुन जातात आणि आपण सहजरित्या नतमस्तक होऊन जातो देवळाच्या परिसरांप्रमाणेच गोव्यातील चर्चेसही हृदयात ठसतात. ओल्ड गोवा परिसरातील चर्चेस पाहताना धर्मभेद विसरुन आपण लीन होऊन जातो. गोव्यात सर्वच रस्त्यांतून डोकावणारी छोटी छोटी घरं पहात रहावी अशीच असतात. अनेक जुन्या घरांच्या समोरच्या ओसरीवर 'बल्काव' ही आढळतात. बल्काव म्हणजे बसण्यासाठी बांधलेला छोटासा ओटा. या बल्कावांवर बसलं की समोरच्या रस्त्यात काय चाललंय याची खबर लागते. बल्कावावर बसून रस्त्यातून येणाऱ्याजणाऱ्यांशी गप्पा मारणं हा सुशेगत गोवेकरांचा आवडीचा छंद.

    पूर्वी पुण्यात औंध परिसरात छोटे बंगले दिसत. टूमदार बंगला आणि सभोवताली पसरलेली बाग हे औंध परिसराचं वैशिष्टय गणलं जात असे. आता या बंगल्याच्या जागी बहुमजली इमारती उठत आहेत. बंगल्यांची संस्कृती मागे पडून आता इमारतींचं विश्व आकार घेत आहे. अशा इमारतींमध्ये फ्लॅटस आलीशान असतात. इथे अद्ययावत सुखसोयी दिमतीला हजर असतात. मात्र या इमारती पाहात असताना परिचितांच्या मनात जुने बंगलेच समोर येतात. इमारतींचं सौंदर्य एकदा मनावर ठसलं की ते कधीच पुसलं जात नाही हे अगदी खरं.

    मुंबईत व्ही.टी. फोर्टमधील जुन्या इमारतींचं सौंदर्य अद्यापही अबाधित राहिलं आहे. आता अशा इमारतींची गणना हेरिटेज मध्ये होत असल्याने पुढेही या इमारतींना धोका उरलेला नाही. एकेकाळी २६ जानेवारीच्या निमित्ताने या इमारतींवर रोषणाई केली जात असे. ही रोषणाई पाहण्यासाठी सलग तीन दिवस जनसागर लोटत असे. ट्रकमध्ये बसून दक्षिण मुंबईचा फेरफटका मारणं आणि गेटवे ऑफ इंडिया, ताजमहाल हॉटेल परिसराला अभिवादन करुन पहाटे घरी परतणं हा शिरस्ताच बनून गेला होता. पुढे वीजेच्या टंचाईमुळे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून या सोहळ्याला पूर्णविराम द्यावा लागला. मात्र त्यावेळचा मुंबईकरांचा उत्साह आजही अनेकांच्या स्मरणात असेल. इमारतींचं सौंदर्य उपभोगण्याची ही प्रथा मागे पडली याचं खरोखरच दुःख होतं. आज या भागातून फिरणारा सामान्य माणूस पोटाची खळगी भरण्याच्या विवंचनेतच हिंडताना आढळतो आणि आलीशान गाडीतून जाणारा धनिक सभोवातलचं सोंदर्य टिपण्यऐवजी लॅपटॉपवरील कामकाज उरकण्यात गर्क असतो. एकेकाळी आमचं सौंदर्य अनुभवायला अख्खी मुंबापुरी लोटत असे असं या मंडळींना सांगण्याचा मोह या इमारतींनाही होत असेल, कुणी सांगावं? नाही म्हणायला या इमारतींचं सौंदर्य कॅमेऱ्यात टिपण्यात काही परदेशी मंडळी गर्क असल्याचं आजही पाहवयाला मिळतं. या मंडळींच्या कॅमेऱ्यासमोर ताठ मानेने उभं राहताना या इमारतींनाही आनंद होत असावा.

    इमारत आणि सभोवतालचा परिसर यांचं सौंदर्य खुलविण्यासाठी वास्तूरचनाशास्त्रात आता लॅन्डस्केप डिझाईनिंग ची शाखा उदयाला आली आहे. बांधकामाचे अनेक नवे प्रकल्प राबविण्याआधी या मंडळींचा सल्ला घेतला जातो. इमारतीच्या सभोवताली बाग कुठे असावी, या बागेत कुठली झाडं लावावीत, कुठल्या फुलांची रोपं लावावीत, पायाखालच्या वाटेचं · डिझाईन कसं असावं असा सारा तपशील ही मंडळी पुरवतात आणि त्या बरहुकूम मग कॉम्प्लेक्स आकार घेतो. इमारतींचं सौंदर्य खुलविण्याच्या कलेला प्रशिक्षणाची जोड लाभते आहे. नवी पिढी खरोखरच भाग्यवान म्हणायला हवी.

    - सुनील रेगे

      October 1, 2022


  • काडी इतकीही चूक नाही

    एकदा एका सरदाराने नाना फडणिसांना भोजनाचे निमंत्रण दिले. नानांना खूप करण्यासाठी त्या सरदारने भोजनाचा खास राजेशाही थाट ठेवला. आपण सरदार असल्यामुळे त्या कार्यक्रमात कसलीही कसर ठेवायची नाही हे त्यांनी आधीच ठरविले होते.

      November 6, 2017


  • नागांवची श्री दक्षिणाभिमुखी महाकाली

    अतिशय श्रध्देय असणारे जागृत देवस्थान आहे. देऊळ चौसोपी असून भक्तांच्या वंदन पूजन, अर्चन, भजन, किर्तन, पादसेवन आदि सेवांच्या परिपूर्तीसाठीच मुख्यत्वे बांधलेले असल्यामुळे त्याची रचना, उभारणी अतिशय साधी आहे. देवळाचा अलिकडेच जिर्णोध्दार करण्यात आला आहे. हे करताना देवळाच्या मूळ धाटणीत बदल करण्यात आलेला नाही. देऊळ आंग्रे कालीन (वा कदाचित त्या पूर्वीपासून) अस्तित्वात असावे असे पुरावे उपलब्ध आहेत.

      May 18, 2024


  • गुगल आजी

    गुगल आजी

    व्यास क्रिएशन्स 
    व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी - महिला विशेषांकातून साभार

    आमच्या घराशेजारी देशमुख आडनावाचे नवीनच कुटुंब राहायला आले. देशमुख पती-पत्नी, त्यांचा सातवीत शिकणारा मुलगा आर्यन आणि आर्यनची आजी… राधाआजी.

    घरात इनमीन चारच माणसं. आर्यनच्या आजीने घरात लागणारे किराणा सामान इथे जवळ कुठे मिळते याची आमच्याकडे चौकशी करताच आईने त्यांना आमचा दूधवाला, पेपरवाला, किराणावाला, इस्त्रीवाला, केबलवाला यांचे संपर्क नंबर आणि पत्ते दिले. त्यामुळे त्यांचं काम खूपच सोपं झालं. त्यांना ह्या गोष्टींसाठी विनाकारण धावाधाव करावी लागली नाही. पोळ्या लाटण्याच्या कामासाठी आजी जेव्हा बाई शोधत होत्या तेव्हासुद्धा आईनेच आमच्याकडच्या घरकाम करणाऱ्या रखमाबाईंना त्यांच्याकडे काम करण्यासाठी राजी केले. आईमुळे रखमाबाई आढेवेढे न घेता लगेच त्या घरी कामासाठी तयार झाल्या. आजीला किती हायसं वाटले. सगळ्या गोष्टी कशा जुळून आल्यासारख्या झाल्या. आईला तर त्या कितीतरी वेळ धन्यवाद देत होत्या. आर्यनच्या नवीन शाळेच्या प्रवेशासाठीसुद्धा बाबांनीच मदत केली. बाळूच्याच शाळेत प्रवेश मिळवून दिला.

      July 3, 2025


  • छडी रे छडी

    वसुधाला, वसंतरावांच्यात झालेला हा अचानक बदल सुखावत होता.. त्यांनीही वसंतरावांना, मनापासून साथ देण्याचे ठरविले.

      January 17, 2022