महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
साहित्य: २ बटाटे, १/२ चमचा हळद, १ टीस्पून लाल मिरची पावडर, १/२ चमचा मिरपूड पावडर, पाव चमचा जिरे पूड, अर्धा कप ब्रेड क्रम्ज, मीठ चवीनुसार, चीज क्यूब्ज, कॉर्न फ्लॉवर.
कृती: एका बाउलमध्ये, उकडलेले आणि कुस्करलेले बटाटे करा, ब्रेड क्रम्ज व बाकी साहित्य एकत्र करा.
गोल गोळे तयार करताना आत एक चीज क्यूब्ज ठेवा व कॉर्न फ्लॉवर मध्ये घोळवून घ्या. नंतर ब्रेड क्रम्ज मध्ये घोळवून घ्या. २०० अंश से वर ५ मिनिटे प्रिहिट करा. बास्केटला थोडे तेल लावा गोळे बास्केट मध्ये घालून त्यात ठेवा. थोडेसे तेल ब्रश करा, १० मिनिटे एअर फ्राय करा. चीज बॉल्स तयार.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
साहित्य:- एक कप वरीचा तांदूळ, दोन टेबलस्पून तूप, दोन लवंगा, जिरे, दोन- तीन मिरच्यांचे तुकडे, अर्धा इंच आले, साखर व मीठ चवीनुसार, अर्धा कप दाण्याचा कूट, दहा-बारा बेदाणे, अर्धा कप रताळ्याच्या फोडी, कोथिंबीर, दहा-बारा काजूचे तुकडे
कृती:- वऱ्याचे तांदूळ धुवून ठेवावेत. एका मोठय़ा भांडय़ात तूप गरम करून त्यात जिरे, लवंग, मिरचीचे तुकडे घालावेत. वरी तांदूळ घालून अंदाजे पाणी घालावे. त्यात बटाटय़ाच्या फोडी आणि रताळ्याच्या फोडी घालाव्यात. दाण्याचा कूट, मीठ आणि साखर घालून शिजवून घ्यावे. दुसऱ्या पॅनमध्ये थोडे तूप घालून काजू आणि बेदाणे परतून घ्यावेत. हे त्या वरीवर घालून छान मिसळून घ्यावे. कोथिंबीर घालून छान वाफ द्यावी. टीप- सुरणाच्या फोडी, रताळ्याच्या फोडी वेगळ्या शिजवून तुपात थोडय़ा परतून शेवटी वऱ्याच्या तांदळात मिसळल्या तरी चालतात.
तांदूळ धुवून १० मिनीटे निथळत ठेवणे. नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये २ चमचे तेल गरम करून मोहोरी, हळद, काजू घालून तांदूळ परतून घ्यावे. तांदूळ परतताना दुसर्या गॅसवर २ कप पाणी गरम करत ठेवावे. तांदूळ चांगले परतले गेल्यावर त्यात गरम केलेले पाणी घालावे.
उपवासासाठी साबूदाण्याचे थालीपीठ
साहित्य :- दोन वाट्या साबूदाणा, दोन उकडलेले बटाटे, एक वाटी दाण्याचे कूट, बारीक मीठ, जिरेपूड, बारीक चिरलेल्या चार हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, चमचाभर लिंबाचा रस, तूप अथवा रिफाइंड शेंगदाणा तेल.
कृती :- साबूदाणा चार तास भिजवून घ्यावा. उकडलेले बटाटे साल काढून कुस्करून मऊ झालेल्या साबूदाण्यात मिसळावेत. त्यात दाण्याचे बारीक कूट, मीठ, मिरची, जिरेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर व लिंबाचा रस घालून सर्व मळून घ्यावे. मिरचीऐवजी लाल तिखट पूडही घालता येईल. प्लॅस्टिकच्या कागदावर थालीपीठ थापून तापलेल्या तव्यावर तूप सोडून त्यावर घालावे. मध्ये भोक पाडून त्यातही तूप वा तेल सोडावे. मंद विस्तवावर दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत भाजून घ्यावे. उपवासाच्या हिरव्या चटणीबरोबर खाण्यास द्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
उपवासाच्या भाजणीचे थालीपीठ
भाजणी करण्याची कृती :- राजगिरा, साबूदाणा व वऱ्याचे तांदूळ समप्रमाणात घेऊन भाजावेत. त्यात थोडे जिरे घालावेत व सर्व एकत्र दळून पीठ करावे. ही भाजणी बरेच दिवस टिकते.
साहित्य :- जितकी थालीपिठे बनवायची त्याप्रमाणे भाजणी घ्यावी. एक वाटी भाजणी असल्यास अर्धी वाटी दाण्याचे कूट, चवीनुसार मीठ, बारीक वाटलेली वा चिरलेली मिरची, थोडे जिरे, कोथिंबीर, तूप.
कृती :- भाजणी, दाण्याचे कूट, मीठ, मिरची (अथवा लाल तिखट), जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर- सर्व एकत्र करून थोडे पाणी घालून मळून घ्यावे. तव्यावर तूप सोडून थालीपीठ लावावे. मंद विस्तवावर भाजावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
साबुदाणा लिची पुडिंग
साहित्य :- अर्धी वाटी साबुदाणा, अर्धा कप साखर, एक लिटर घट्ट दूध, 5-6 लिची बिया काढून, दोन चमचे बदामाचे काप (भाजून), अर्धा चमचा वेलचीपूड.
कृती :- साबुदाणा धुऊन भिजवत ठेवावा. लिची साखरेत शिजवून घ्यावी व गार करावी. दूध आटवत ठेवावे. त्यातच साबुदाणा घालून घट्ट खीर बनवावी व गार करावी. आता त्यात लिची घालावी व वेलचीपूडही घालावी. हे मिश्रण बाऊलमध्ये सेट करायला ठेवावे. वरून भाजलेले बदामाचे काप घालून सजवावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
मावा हाताने कुस्करून घ्यावा. नंतर कढईत मावा टाकावा व पाच मिनिटे मंद आचेवर परतून घ्यावा. आता त्यात पिठीसाखर टाकून व्यवस्थित मिसळावे.
सहा क्लटब सॅन्डविच बनविण्यासाठी सहा पांढऱ्या ब्रेड स्लाईस आणि तीन ब्राऊन ब्रेडच्या स्लाईस घ्याव्या. तीन पांढऱ्या स्लाईसवर हिरवी चटणी लावावी. तर उरलेल्या तीन पांढऱ्या स्लाईसना टोमाटो सॉस लावावा.
तूप गरम करून त्यात उडीद डाळ, काजू, कांदा, हिरवी मिरची हे वेगवेगळे खरपूस भाजून घ्या. बेबी कॉर्न घालून 3-4 मिनिटे परतून घ्या. त्यात दूध घालून नंतर मीठ व साखर घाला. मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. कोथिंबीर, शेव घालून सजवा व गरमागरम सर्व्ह करा.
थोडे तूप घालून खवा तांबूस भाजून घ्यावा. खवा गार झाल्यावर त्यात पिठीसाखर, वेलची पूड, खसखस पूड घालून मळून गोळा बनवावा. हे सारण भरून पोळ्या लाटाव्यात. सोपी पद्धत म्हणजे पेढे आणून ते कुस्करून मळून त्याचा गोळा बनवून ते भरुन भरून पोळ्या कराव्यात.
साहित्य:- ४ वाट्या पोहे (पातळ ), तिखट, मीठ, हिंग, धने -जिरे पूड सर्व चवीनुसार, ३ टेस्पून मोहन , तेल तळण्यासाठी.
कृती:- पोहे निवडून स्वच्छ धुवावे. अर्धा तास ठेवून कुस्करून सर्व साहित्य घालून कडकडीत मोहन घालावे. चांगले मळून तळाव्या. या चकल्या गरम गरमच चांगल्या लागतात. नंतर मऊ पडतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Copyright © 2025 | Marathisrushti