Salad-300
खाद्ययात्रा

सॅलडची कोशिंबीर

Category:

 

सर्वप्रथम सॅलडची पाने मिठाच्या पाण्यानी धुवून घेणे. कोरडी झाल्यावर (वाळल्यावर) बारिक चिरणे. नंतर त्यात कांदा चिरुन घालणे. त्यात दाण्याचे कुट, साखर, मीठ व लिंबाचा रस घालून मिश्रण एकत्र करुन अर्धा तास ठेवणे. त्यानंतर तेल तापवून ते तापल्यावर मोहरी घालणे. मोहरी तडतडल्यावर हिंग घालून गॅस बंद करणे. व ही फोडणी सॅलॅडवर ओतून हवा असल्यास नारळाचा चव घालून ढवळणे.

  November 9, 2016


puranpoli-300
खाद्ययात्रा

पुरणाची पोळी

Category:

 

डाळ २ तास भिजत घालावी. कुकरमध्ये चांगली शिजवून घ्यावी. शिजलेली डाळ चाळणीत ओतून त्यातील पाणी (कट) काढून उरलेले पाणी निघून जाईपर्यंत चांगली परतावी. नंतर त्यात किसलेला गूळ घालून त्याचे पाणी होऊन ते आटेपर्यंत कोरडी करावी व पुरणयंत्रात घालून वाटावी.

  October 26, 2016