महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
ब्रेडच्या कडा कापून घ्या. त्यावर जॅम किंवा मार्मलेडस लावून घ्या. त्यावर किसलेले चीज घाला. आता दुसऱ्या ब्रेडलाही जॅम लावून घ्या. हा ब्रेड पहिल्या ब्रेडच्या वर व्यवस्थीत ठेऊन घ्या
साहित्य : २ वाटया खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, ६-७ चहाचे चमचे भरून पिठी साखर, पाव चमचा वेलदोडा पूङ
कृती : दाण्याचे कूट, साखर व वेलदोडा पूड एकत्र करून घ्या व नीट कालवून घ्या. मुठीने लाडू वळा. दाण्याचे कूट जर खूप भरभरीत असेल तर त्याला किचिंत ओले हात लावून मळा व मुठीने लाडू वळा.
टीप : काहीजणांना साखरेऐवजी गूळ आवडत असेल तर ४-५ चमचे बारीक चिरलेला गूळ घेऊन हाताने तो बारीक करून त्यातले सगळे खडे काढून टाकावेत.
साहित्य :- १५० ग्राम टोफू, १ चमचा कॉर्न स्टार्च, ४ चमचे तेल, १ चमचा लसूण पेस्ट, १ चमचा आले पेस्ट, २ चमचे रेड चिली गार्लिक पेस्ट, १/४ वाटी पाती कांद्याचा हिरवा भाग, बारीक चिरून, १/४ वाटी कांदा, मध्यम आकाराचे तुकडे (कांद्याच्या पाकळ्या विलग करा.), १/४ वाटी भोपळी मिरची, मध्यम तुकडे, १ चमचा सोयासॉस, १/२ चमचा व्हिनेगर, चवीपुरते मीठ.
कृती :- टोफू हलक्या हाताने प्रेस करून त्यातील थोडे पाणी काढून टाकावे. खूप जास्त प्रेस करू नये त्यामुळे टोफू कुस्करला जाऊ शकतो. टोफूचे १ इंचाचे तुकडे करावेत. त्यावर कॉर्न स्टार्च भुरभुरावा आणि हलकेच मिक्स करावे. एक मध्यम पॅन घेऊन त्यात १ चमचा तेल घालावे. त्यात टोफू शालोफ्राय करून घ्यावा. सर्व बाजू थोडय़ा ब्राउन करून घ्यावात. शालोफ्राय करून झाले की टोफू प्लेटमध्ये काढून ठेवावा. त्याच पॅनमध्ये अजून १ चमचा तेल घालावे. त्यात आले-लसूण पेस्ट परतावी. सोया सॉस, भोपळी मिरची आणि कांदा घालून एक मिनिटभर परतावे. मीठ घालावे. कांदा आणि भोपळी मिरची क्रिस्पी राहिल्या पाहिजेत. १ चमचा कॉर्न स्टार्च आणि ३ ते ४ चमचे पाणी घालून मिक्स करावे. हे मिश्रण पॅनमध्ये घालावे. चिली गार्लिक पेस्ट आणि व्हिनेगर घालावे. मिक्स करावे. आता शालोफ्राय केलेला टोफू घालावा. हलकेच मिक्स करून मिनिटभर शिजवावे. प्लेटमध्ये सव्र्ह करावे. सव्र्ह करताना पाती कांद्याची चिरलेली पात घालून सजवावे.
टिपा :- वरील रेसिपी ड्राय टोफूची आहे. थोडी ग्रेव्ही हवी असेल १ चमचा कॉर्न स्टार्च १/२ वाटी पाण्यात घालून मिक्स करावे. चिली गार्लिक पेस्टसोबत हे मिश्रणही घालावे. बाकी सर्व कृती सेम. या ग्रेव्हीबरोबर थोडा साधा पांढरा भातही सव्र्ह करू शकतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
साहित्य:- तीन बटाटे, शेंगदाणे तेल किंवा साजूक तूप, एक टीस्पून जिरे, एक टेबलस्पून आलं-मिरची पेस्ट, मीठ चवीनुसार, कोथिंबीर, राजगिरा, शिंगाडा, साबुदाणा किंवा केळ्याचे पीठ अर्धा कप.
कृती:- बटाटे उकडून कुस्करून घ्यावेत. कढईत तेल किंवा तूप घेऊन त्यात जिऱ्याची फोडणी करावी. त्यात आलं मिरची पेस्ट, मीठ आणि कोथिंबीर घालून स्मॅश केलेला बटाटा परतून घ्यावा. वर दिलेले कोणतेही पीठ घेऊन नेहमीसारखे बटाटेवडे तळावेत
आख्खा मसूर.. ( यालाच आम्ही मसुरीची आमटीही म्हणतो ) वास्तवीक अनेक जण मसूर डाळ वापरतात म्हणून या आमटीला डाळ नसलेली या अर्थाने आख्खा मसूर हे नाव हॉटेल वाल्यांनी फेमस केलं. असो... मुळ मुद्याकडे वळूयात.
साहित्य : भिजवलेले मसूर, कांदा, खवलेला नारळ, आलं लसूण पेस्ट, जिरे, मिरे, लवंग, दालचिनी, शहाजीरे, हिरवा वेलदोणा ( याला अनेक जण हिरवी वेलचीही म्हणतात ), मिठ, हिंग, मोहरी, कोथिंबीर, आमसुलं.
कृती :
कांदा उभा चीरुन तेलावर डार्क ब्राऊन होईपर्यंत परतुन घ्या, नंतर खवलेला नारळ आय मिन ओलं खोबरंही परता. यात,जिरे,मिरे,दालचिनी,लवंग, जीरे, शहाजीरे टाकून अगदी बारीक वाटण तयार करुन ठेवा.
जिरे मोहरीची फक्कड फोडणी करा, यात कांदा टाका मस्त तपकीरी होऊद्या... आलं लसुण रेस्ट टाका आता त्यात हळद हिंग टाका, आणि मग मसूर फोडणीत टाका, यावर आवडीप्रमाणे तिखट टाका, परतुन घ्या, छान खमंग अरोमा आल्यावर यात थोडंसं पाणी टाका, मिठ टाका आणी उकळी येऊ द्या. मसूर चटकन शिजते. उकळी आल्यावर केलेलं वाटण टाका, स्वछ धुवून आमसुलं टाका... दणकुन उकळी आणी वाफ येऊ द्या. आंच बंद करा. कोथिंबीर टाका, आख्खा मसूर तयार आहे.
- संजय वैद्य
एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्या आधी दुसर्या महायुद्धाच्या काळात अन्नधान्याचा तुटवडा पडल्याने रेशनिंगवर अन्नधान्य विकण्याचा प्रयोग करण्यात आला होता. मध्यम आणि निम्नमध्यमवर्गीयांना त्याचा होणारा फायदा लक्षात आल्यावर स्वातंत्र्योत्तर काळातही आजतागायत रेशनच्या दुकानात धान्य मिळत आले आहे. किंबहुना रेशनकार्ड हा महत्वाचा दस्तऐवज गणला जातो.
साहित्य:
तीन कप - मटार दाणे
चार चमचे - टोमॅटो सॉस
पाव कप - वाटलेला कांदा
दोन कप - तळून घेतलेले पनीरचे चौकोनी काप
एक चमचा - गरम मसाला पावडर
दोन चिमूट - तिखट
एक चमचा - आलं लसणाची पेस्ट
चवीपुरते मीठ
कृती:
एका पातेल्यात तेल गरम करुन त्यात वाटलेला कांदा, आले-लसणाची पेस्ट घालून चांगले परता. चांगले परतून झाल्यावर त्यात टोमॅटो सॉस व तिखट घाला. जरुरीइतके पाणी घालून त्यातच गरम मसाला पावडर व मीठ घाला.
मटार शिजवून घ्या. व शिजवलेले मटार यात घाला. एक उकळी आली की तळलेल्या पनीरचे काप त्यात घाला. मंद आचेवर थोडा वेळ ठेवून पातेले खाली उतरवून ठेवा.
अशाप्रकारे लज्जतदार मटार पनीर करी तयार. गरमागरम रोटीबरोबर सर्व्ह करा.
24 कॅनपीज, 1 कप उकडलेले स्वीट कॉर्न,1 बारीक चिरलेली सिमला मिरची, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 चिरून घेतलेली हिरवी मिरची, अर्धा कप चिरून घेतलेली कोथिंबीर, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा लिंबाचा रस, 1 कप किसून घेतलेले मोझरेला चीज, 2 चमचे तेल आणि चवीनुसार मीठ.
काहीशा विस्मृतीत गेलेल्या किंवा धावपळीच्या जीवनशैलीत मागे पडलेल्या अनेक पारंपरिक पदार्थांना सणावारांच्या निमित्ताने स्वयंपाकघरात पुन्हा मानाचे स्थान मिळते. घारकुटाचे वडे हे त्यापैकीच.
श्रावणात शनिवारी मारुतीला व शनीला ह्या वड्यांची माळ करून घालण्याची प्रथा आहे. श्रावणी सोमवारी शंकराच्या नैवेद्याला हे वडे व दही आणि घारगे करण्याची पद्धत आहे. काळाच्या ओघात आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात ती खरंच विस्मृतीत गेलेली दिसते.
साहित्य :
तांदूळ, हरभर्याची डाळ, उडीद डाळ, ज्वारी, मेथीचे दाणे, धणे, तीळ, मीठ, तिखट, हळद आणि तळण्यासाठी तेल.
कृती :
तांदूळ, डाळी, मेथी, धणे व ज्वारी सर्व एकत्र करून किंचित जाडसर दळून आणावेत. पुरेसे पीठ परातीत घेऊन त्यात हळद, चवीनुसार तीळ, मीठ, तिखट घालावे व हाताने मिसळून घ्यावे. नंतर त्यावर गरम तेलाचे मोहन घालावे. पुन्हा मिसळून घ्यावे. गरम पाण्यात पुरीच्या पीठाइतपत भिजवून १५ मिनिटे ठेवावे.
नंतर तेल गरम करून पाण्याच्या हाताने पीठ मळून घेऊन वडे थापून मध्ये भोक पाडून तळावेत. नंतर तिखद, मीठ, चाट मसाला घातलेल्या दह्यासोबत किंवा लोण्याबरोबर खाण्यास द्यावेत.
-- सौ. निलिमा प्रधान
सर्वप्रथम बीट उकडवून, सोलून व किसून घेणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे.
Copyright © 2025 | Marathisrushti