महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
साहित्य:- चण्याच्या डाळीचे पीठ २ वाट्या, हळद, तिखट, मीठ चवीनुसार लिंबाचा रस, साखर अर्धा चमचा, बारीक चिरलेला लसूण १ चमचा, खाण्याचा सोडा पाव चमचा, ओलं खोबरं 4 चमचे, कोथिंबीर, सोडा पाव चमचा, हिंग पाव चमचा, मोहरी १ चमचा.
कृती:- चण्याच्या डाळीच्या पिठात सोडा, मीठ, तिखट घालून चाळून घ्यावे. नंतर यात थोडे कोमट पाणी व लिंबाचा रस घालून एकत्र मळून घ्यावे. त्यात १ चमचा तेलही घालावे. नंतर साच्यात याची शेव पाडून ही शेव वाफेवर उकडून घ्यावी. तोपर्यंत एका छोट्या कढईत तेल घालून त्यात मोहरी, हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर व लसूण घालून परतावे. गॅस बंद करून यात थोडी साखर, मीठ व हळद घालावी. शेव वाफवून झाल्यानंतर त्यावर ही फोडणी घालावी. वरून खोबरं, कोथिंबीर पण घालू शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
साहित्य : तीन वाट्या उपवासाचे भाजणीचे पीठ, एक मोठा बटाटा, चवीपुरते तिखट मीठ, दाणेकूट दोन टे.स्पून, थोडे तूप.
कृती : बटाटा साल काढून धुवा आणि त्याचा कीस करून तो पाण्यातून काढून पिळून ठेवा. ताटात पीठ, बटाटा कीस, दाणे कूट, तिखट, मीठ घेऊन चांगले मळून घट्ट गोळा बनवा. आचेवर तवा ठेवून त्यावर थोडे तूप सोडा. नेहमी प्रमाणे त्यावर थालीपीठ लावा. कडेने तूप सोडा. थालीपीठ उलटून भाजा व गरम गरम खा.
एका वाड्यातली गोष्ट.चार पिढ्या आधीची हं.नऊवारी सासू आणि नऊवारी सून असलेल्या काळातली.घरातभ पैपाव्हणे,द्विपदचतुष्पदसहितं असं म्हणताना खरोखर ते असायचे घरात त्या काळातली. घरात कुळधर्म कुळाचार अगदी जसंन् तसं पाळणारं घर ते,आणि पापभिरू सासवासुना!
एका कुळाचाराच्या दिवशी सूनबाई देवाचे नैवेद्य वाढत होत्या केळीच्या पानावर.तेवढ्यात सासूबाईंची हाक आली आणि पाठोपाठ सूचना!'सूनबाई,मांजरीची पोरं टोपलीखाली झाक हो.आणि मगच नैवेद्य ठेव देवापुढे' सूनबाई त्या काळातल्या होत्या.खालमानेने फक्त मान हलवून हो म्हणणार्या.दरवर्षी हीच सूचना!
पुढे सूनबाई सासूबाई झाल्या.त्यांच्या सूनबाई घरी आल्या.कुळधर्म कुळाचार तेच होते.सासूबाईंनी छान तयार केलं होतं सूनबाईंना!त्याही सूचना द्यायच्या.'नैवेद्य देवापुढे ठेवण्याआधी मांजरीची पोरं टोपलीखाली झाक हो!'
पुढे या सूनबाईंना पाचवारी सून आली.नोकरी करणारी.पण कुलाचार तेच होते.आणि सूचनापण तीच.सूनबाईसुद्धा ऐकायच्या.मांजरीची पोरं टोपलीखाली झाकायच्या नैवेद्य देवापुढे ठेवण्याआधी.
आता तो वाडा पडला.तिथे मोठा टॉवर झाला.मंडळी ब्लॉकमधे रहायला गेली.घरातले द्विपद होते पण चतुष्पद नाहीसे झाले.आता काय करायचं!प्रश्न पडला!तोवर पाचवारी सूनबाई सासूबाई झाल्या होत्या आणि त्यांची पंजाबीड्रेस सूनबाईपण आली होती.कुळाचाराच्या दिवशी त्या हळूच म्हणाल्या,"माझ्या सासूबाई सांगत असत,मांजरीची पोरं टोपलीखाली झाकून मग नैवेद्य दाखवायचा.आता गं?मांजरच नाही तर पोरं कुठली आणायची झाकायला.काहीतरी बाई पूर्वजांच्या पद्धती एकेक!'
पंजाबी सूनबाई हुशार!ती म्हणाली ,"आहो सासूबाई,काळजी कशाला करता?आहे ना आपली ट्रेडिशन मग करूया की आपण.तुळशीबाग कशाला आहे मग!"
सूनबाई तुळशीबागेत जाऊन चिनीमातीची मांजरं आणि छानशी डेकोरेटेड टोपली घेऊन आल्या.आणि टोपलीखाली चिनीमातीची मांजरं झाकून ट्रेडिशनली नैवेद्य दाखवायला लागल्या!
संपली गोष्ट!
आता आपण विचार करूया.वाड्यात रहाणारी मांजर,दारातली कुत्री ही घरातले सदस्य होते तेव्हा.मांजरीची पोरं नैवेद्याच्या ताटात लडबडायला येणार हे नक्की. म्हणून आधी ती टोपलीखाली झाकायची आणि मग पान देवापुढे ठेवायचं!आता हेतू लक्षात घेतलाच नाही नुसती मान डोलवली!मग पुढे त्यातला हेतू लोप पावून त्याची रूढी झाली!अशा पडतात रूढी!पूर्वजांचे हेतू नीट समजून न घेता आचरले की!
म्हणून आपण जी परंपरा जपतो तिचा हेतू,अर्थ लक्षात घेऊन भावपूर्णतेने ,आर्थपूर्णतेने आचरली की काही झुगारावं लागणार नाही इतकी छान आहे आपली संस्कृती!
‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असल्याने उरलेलं अन्न टाकून देण्याची पद्धत भारतीय संस्कृतीत नाही. त्यातूनच उरलेल्या पदार्थामधून नवीन पदार्थ तयार करण्याच्या पद्धती रूढ झाल्या आहेत.
महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणचे पेढे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यात कोल्हापूरचे फिक्के पेढे, कुंथलगिरीचे पेढे, वाडीचे पेढे व खूप काही. मात्र इतर पेढ्यांच्या तुलनेत सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात. कमी साखर हे या पेढ्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. परिणामी हा पेढा सहा ते आठ दिवस सहज टिकतो.
साहित्य: ३ वाट्या कणीक, १/४ वाटी बारीक रवा, मीठ, १/२ तेल, ओवा.
सारणाच साहित्य: १/४ वाटी प्रत्येकी तूर, चणा, मसूर, हरभरा डाळ, १ टे.स्पून आले-लसूण-मिरची पेस्ट, तिखट मीठ, अनारदाणा/आमचूर पावडर.
कृती: कणीक, रवा, मीठ व तेल घालून भिजवून १ तास ठेवावे.
नंतर मळून एकसारखे गोळे करावे. डाळी भिजवून २-३ तासांनी रवाळ वाटाव्यात.
तेल तापवून ओव्याची फोडणी करावी. डाळीचे मिश्रण घालून परतून २ वाफा आण्याव्यात. त्यात आले-लसूण-मिरची पेस्ट, तिखट, मीठ, कोथिंबीर, ग. मसाला घालून परतावे.
आमचूर पावडर घालून उतरावे. कणकेचे व सारणाचे सारखे भाग करुन पराठा करुन लाटावे.
हे पराठे पौष्टिक व चवदार होतात.
कृती- कणीक थोडेसे मोहन (तेल) घालून जराशी घट्ट भिजवून घेणे. ती चांगली मळून तिच्या लांब काडय़ांप्रमाणे आकार बनवून घेणे. कडबोळी करताना सुरुवातीला करतो त्याप्रमाणे त्या तेलात तळून घेणे. नंतर त्याचे अर्धा ते पाऊण इंचाचे तुकडे करून ते गुळाच्या पाकात टाकणे (जिलबी तळल्यावर जशी पाकात टाकतात त्याप्रमाणे). ते लगेच पाकातून काढून खावेत. पटकन करायचं आणि गटकन गिळायचं असं हे गडगिळं.
- पद्मा कऱ्हाडे, जोगेश्वरी, मुंबई.
साहित्य: पाव किलो मध्यम आकाराची सोललेली कोलंबी ,1 मोठा कांदा बारीक चिरलेला ,१ छोटा चमचा गरम मसाला ,अर्धा चमचा हळद ,१ तमालपत्र ,१ चमचा लिंबाचा रस ,५ ते ६ पाकळ्या बारीक चिरलेला लसूण
हिरवं वाटण :एक खोबऱ्याची भाजलेली वाटी , ७ ते ८ पाकळ्या लसूण ,५ ते ६ हिरव्या मिरच्या , कोथिंबीर , अर्धा चमचा जिरे , अर्धा तुकडा आलं (आवडीनुसार 4 ते 5 पुदिन्याची पाने) मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या .
कृती :
सोललेली कोलंबी स्वच्छ धुवून त्यावर १ चमचा गरम मसाला ,अर्धा चमचा हळद आणि १ चमचा लिंबाचा रस टाकून 15 ते 20 मिनीटे चांगलं मॅरीनेट करून घ्या .
दोन पळी तेल गरम करून घ्या , त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि तमालपत्र लालसर होईपर्यंत परतवा.
आता भांड्यामध्ये म्यारीनेट केलेली कोलंबी आणि तयार हिरवं वाटण तसेच ५ ते ६ पाकळ्या बारीक चिरलेला लसूण
टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करा . आपल्या चवीनुसार मीठ आणि अर्धा ग्लास पाणी टाकून मंद आचेवर १० ते १५ मिनिटे ठेवून सतत ढवळत राहा .
मस्तपैकी गरम गरम हिरव्या वाटणातील सुक्की कोलंबी तय्यार .
the chocolate chip
9869437168
अर्धी वाटी तूप घालून दोन वाट्या रवा चांगला भाजून घ्यावा. दुसऱ्या पातेल्यात तीन वाट्या पाणी उकळत ठेवावे. पाणी उकळल्यावर दोन वाट्या चिरलेला गूळ घालून तो विरघळल्यावर त्यात वेलची पूड व भाजलेला रवा घालून शिऱ्याप्रमाणे शिजवून घ्यावे. हा सांजा भरून पुरणपोळीप्रमाणे पोळी बनवावी. वरून साजूक तूप घालुन खायला द्यावी.
साहित्य :- १ वाटी बारीक रवा, १ वाटी साय किंवा सायीचं दही, प्रत्येकी दोन टे.स्पू. बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, एकत्रित अर्धी वाटी बारीक चिरलेल्या किंवा किसलेल्या मिक्सच भाज्या- फ्लॉवर, पत्ताकोबी, फ्रेंच बिन्स, २/३ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, बॅटर पातळ करण्यासाठी लागेल तसे ताक किंवा पाणी, तेल, तूप किंवा बटर.
कृती :- रवा, साईचं दही, मीठ आणि ताक घालून सरसरीत बॅटर बनवा. वेळ असेल तर १५-२0 मिनिटे झाकून ठेवा. नाही तर लगेच त्यात सगळ्या भाज्या घाला. नीट मिक्स करून नेहमीसारखे उत्तप्पे घाला. (भाज्या पिठात मिक्स् न करता पिठाचा उत्तप्पा घालून वरूनही भाज्या पेरता येतील) झाकण घाला. तेल सोडून उलटवा. खमंग झाल्यावर थोडं तेल सोडून कोणत्याही चटणीबरोबर खायला द्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Copyright © 2025 | Marathisrushti