महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
साहित्य : बर्फाचे चार तुकडे, चार अननसाचे तुकडे, एक केळे, एक कप अननसाचा ज्यूस किंवा सफरचंदाचा ज्यूस.
कृती : सर्व एकत्र करून ब्लेंडरमध्ये ब्लेंड करणे. ऑरेंज गाजर स्मूदी साहित्य : एक कप ऑरेंज ज्यूस, अर्धा कप दही, अर्धा कप ओट्स, एक केळे. कृती : सर्व एकत्र करून ब्लेंडरमध्ये ब्लेंड करणे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
ज्वारीच्या लाहय़ांमध्ये कचकच असते म्हणून त्या पाण्यातून काढून घ्याव्यात. म्हणजे त्यातील वाळू पाण्यात निघून जाते.
गुजराथी लोक हे खाण्यापिण्याचे शौकीन लोक. कुठेही जातील तेथे अगोदर जेवण्याखाण्याची काय सोय आहे हे पाहून जातील. ऑफिसातदेखील लंच साठी भक्कम पाच सहा कप्प्यांचा डबा नेतील. त्यात त्यांचा मधल्यावेळेतला नाष्ता देखील असेल. बस मध्ये रेल्वे मध्ये गुजराथी लोक त्यांच्या घरचे पदार्थ खाताना दिसतील, त्यांचे आतिथ्य आगदी भारावून टाकणारे असते. घरातच नव्हे तर अगदी हॉटेलात सुद्धा. गुजराती पदार्थ म्हटले की, सगळ्या आधी आठवतो तो ‘ढोकळा’. तसेच गुजराती पद्धतीने बनवलेली अळुवडी म्हणजे ‘पात्रा रोल’ आणि बनवायला कठीण पण अत्यंत मऊ असा चवदार पदार्थ म्हणजे ‘खांडवी’. गुजराती खाद्यपदार्थाची एक वेगळीच लज्जत असते. गुजराती पदार्थामध्ये डाळ, तांदूळ, भाज्या, चपाती, भाज्यांचं सॅलड, पापड आणि दही यांचा मुख्य समावेश असतो. गुजराती जेवण हा समतोल आहाराचं एक चांगलं उदाहरण समजलं जातं. ढोकळा, खांडवी हे गुजराथी पदार्थ प्रसिद्ध आहेत.
काही गुजराथी पदार्थ कृती
लीलवा नु भात
साहित्य:-२ टेबलस्पून चिरलेली कोथिबिंर, २ टेबलस्पून वाटलेली हिरवी मिरची, २ लाल मिरच्या, २ कप तांदूळ, २ टेबलस्पून तेल, १ टेबलस्पून मोहरी, लसणाच्या ४- ५ पाकळ्या बारीक करून, अर्धा टेबलस्पून आल्याची पेस्ट, चवीसाठी मीठ, एक चिमूट हिंग, पाव किलो मोड आलेले वाल
कृती:- तांदूळ धुवून अर्धा तास निथळत ठेवा. कढईत तेल घाला. फोडणी तयार करून घ्या. फोडणी तडतडल्यावर त्यात वाल, आलं आणि वाटलेली मिरची घाला. एखादे मिनिटभर तसेच ठवून नंतर त्याल धुतलेले तांदूळ घाला. थोडा वेळ परता. आता त्यात चार कप उकळते पाणी घाला. मंद आचेवर शिजवा. सगळे पाणी आटले, भात आणि वाल शिजला की गॅस बंद करा. कोथिंबिरीने सजवून गरमगरम खायला द्या.
मकाई ना भरता
साहित्य:- १ टीस्पून कोथिंबीर पावडर, १ टीस्पून हळद, १ किलो फ्रेश मका, १ टीस्पून तिखट, १ टेबलस्पून तेल, ३ मध्यम आकाराचे टोमॅटो, अर्धा टीस्पून गरम मसाला, मध्यम आकाराचे तीन कांदे, अर्धा टीस्पून मोहरी, ६-७ हिरव्या मिरच्या, चवीसाठी मीठ, चिरलेली कोथिंबीर
कृती:-मक्याचे कणीस अख्खे उकडून घ्या. मग त्याचे दाणे काढा आणि मिक्सरमधून वाटून घ्या. कांदा चिरून घ्या. टोमॅटो धुऊन चिरून घ्या. मिरची धुऊन चिरून घ्या. कढई गॅसवर तापत ठेवा. तेल घाला. मोहरी घाला. ती तडतडल्यावर कांदा घाला. त्याचा रंग बदलेपर्यंत तो परतून घ्या. मिरची घाला. दोन-तीन मिनिटे परता. लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ घाला. थोडा वेळ परता. टोमॅटो घाला. टोमॅटो चांगला शिजल्यावर कॉर्न, थोडं मीठ आणि पाणी घाला. आणखी ५-१० मिनिटं परता. कोथिंबिरीने सजवून गरमगरम खायला द्या.
सुकावनी
साहित्य:- तळणीसाठी तेल, २० हिरव्या मिरच्या, १ कप दही, अर्धा टीस्पून मोहरी, पाव टीस्पून लाल तिखट, १ कप श्रावणघेवडा, अर्धा टीस्पून कोथिंबीर पावडर, दीड कप गवार, चवीपुरते मीठ
कृती : भाज्या धुऊन घ्या. त्या सुकवा. दह्य़ात पाणी घालून घुसळून ताक बनवा. या भाज्या त्या ताकात घाला आणि दोन दिवस ठेवा. त्यानंतर त्या ताकातून त्या भाज्या काढून घेऊन कडक उन्हात वाळवा. तळून घ्या. एका डिशमध्ये घेऊन त्यावर मीठ भुरभुरा. कोथिंबीर, लाल तिखट, घालून सजवा आणि गरमगरम खायला द्या.
रसपात्रा
साहित्य:- अळूच्या उकडलेल्या वड्या ५ – ६, चिंचेचा कोळ अर्धी वाटी, गूळ एक मोठा - लिंबा एव्हढा खडा, तिखट १ चमचा, हळद पाव चमचा, मीठ चवीप्रमाणे, कोथिंबीर, कढीपत्त्याची ४ -५ पाने, तेल २ चमचे, जिरे अर्धा चमचा, पाणी अर्धा कप
कृती: - पातेल्यात तेल टाकून तापत ठेवा. त्यात जिरे टाका. जिरे तडतडले की त्यात कढीपत्ता टाका. हिंग टाका. तिखट, हळद, मीठ टाका. आता त्यात चिंचेचा कोळ टाका. गूळ टाका. पाणी टाका. कोथिंबीर टाका. एक उकळी आली, गूळ नीट विरघळला की त्यात अळूच्या वड्या सोडा. उकळी आली की झाकण ठेऊन २ -४ मिनिटं शिजवा. तयार आहे झणझणीत रसपात्रा.
गुजराथी डाळ खिचडी
साहित्य:- एक वाटी साला सकट हिरव्या मुगाची डाळ,अर्धी वाटी पिवळी मुगाची डाळ,दीड वाटी बासमती तांदूळ, अर्धी मूठ शेंगदाणे, टोमॅटो, फ्लावर, बटाटा ,तोंडली, बीन्स,१“दालचिनीचा तुकडा,तीन वेलदोडे,३-४ लवंगा,दोन हिरव्या मिरच्या,एक चमचा काळी मिरीपूड ,एक टेबलस्पून तेल, ९-१० वाट्या पाणी(तुम्हाला हवे असेल त्याप्रमाणे कमी-जास्त),चवीनुसार मीठ,एक तमालपत्र,अर्धा टेबलस्पून जिरे,१२-१५ कढीपत्त्याची पाने.चिमूटभर हिंग,अर्धा चमचा हळद.
कृती:- हिरव्या सालीची मुगाची डाळ स्वच्छ धुवा आणि अर्धा-पाऊण तास आधी भिजत घालून ठेवा. अशाच प्रकारे पिवळी मुगाची डाळसुद्धा स्वच्छ धुवा आणि अर्धा-पाऊण तास आधी भिजत घालून ठेवा. गॅसवर एका मोठ्या जाड बुडाच्या पातेल्यांत फोडणीसाठी तूप+तेल एकत्र गरम करून घेऊन त्यात जिरे टाका. जिरे चांगले तडतडले व सोनेरी-ब्राऊन झाले की त्यात तमालपत्र,दालचीनी,लवंगा,वेलची आणि मिरीपुड घालून या कच्च्या मसाल्यांचा चांगला सुवास येईपर्यंत परता. परतून मस्त वास सुटल्यावर त्यात कढीपत्त्याची पाने,हिरव्या मिरचयांचे तुकडे,हळद व हिंग घालून पुन्हा दोन मिनिटे परता. आता त्यात शेंगदाणे, टोमॅटो, फ्लावर, बटाटा ,तोंडली व बीन्स घालून परता व पातेल्यावर झाकण ठेऊन ५-१० मिनिटे नुसत्या वाफेवर शिजवून घ्या. नंतर दोन्ही डाळींमधील पाणी निथळून घेऊन त्या पातेल्यात शिजत असलेल्या भाज्यात टाकून पुन्हा २-३ मिनिटे परता. मग त्यात पाणी घालून दोन्ही डाळी शिजू द्या. दरम्यान बासमती तांदूळ धुवून घ्या व १५-२० मिनिटे भिजत घालून ठेवा.
जेंव्हा डाळी अर्धवट शिजतील तेंव्हा त्यात भिजत घातलेले तांदूळ घालून ढवळून चांगले मिक्स करून घ्या. मध्यम आंचेवर दोन्ही डाळी व तांदूळ शिजू द्या. जेंव्हा तांदूळ शिजत आला असे वाटेल तेंव्हा त्यात मीठ घालून हलकेच खिचडी ढवळून मिक्स करून घ्या. खिचडी जेव्हढी हवी तेव्हढी घट्ट झाली असे वाटेल तेंव्हा उरलेले तूप घाला व एखादे मिनिट शिजवून घेऊन गॅस बंद करा. कढी, पापड व रायता सोबत सर्व्ह करा.
या खिचडी चे रेडिमिक्स तयार करता येईल सगळ्या गोष्टी तेल तुपावर फक्त परतून घ्यायच्या शिजवायच नाही पाणी घालून भाज्यावगैरे मग सगळे मसाले घालून रेडिमिक्स तयार
पाहिजे तेव्हढे राईस कुकर मध्ये शिजवून जास्तीचे फ्रिज मध्ये हवाबंद डब्यात पिशवीत ठेवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
भारतीय संस्कृतीत वृक्ष,वनस्पतींना अतिशय मानाचे स्थान दिलेले आढळते. वृक्षांचे संवर्धन, पालनपोषण, इतकेच नाही, तर त्यांचे पूजन करण्याचीही पद्धत आपल्या संस्कृतीत आहे. तसेच कार्तिक महिन्यात एकादशी ते पौर्णिमेच्या काळात आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. पूजा झाल्यावर आवळ्याचा औषधासाठी वापर करण्यास प्रारंभ करायचा असतो. आवळा हे फळ गुणवत्तेमध्ये सर्व फळांमध्ये श्रेष्ठ आहे. आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहार आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग करता येतो. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं. आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानलं आहे. हिंदी मध्ये आँवला, संस्कृतमध्ये आमलकी, इंग्रजीमध्ये ‘एम्ब्लिका मायरोबेलान’ या नावाने परिचित आहे. आवळा पोषणाचं काम करतो. म्हणून आयुर्वेदात त्याला धात्री असंही म्हणतात. वार्धक्य अवस्था टाळून चिरतरुण राहण्यासाठी मदत करतो. म्हणून त्याला वयस्थाही म्हटले जाते. चरकाचार्य, वाग्भट, सुश्रूत या सर्व श्रेष्ठ ऋषींनी औषधामध्ये आवळ्याचा वापर करावयास सांगितलं आहे. आवळ्याचे पांढरे आवळे व रान आवळे असे दोन प्रमुख प्रकार आहेत. सुकलेल्या आवळ्यापेक्षा हिरवा ताजा आवळा आधिक गुणकारी असतो. आवळ्याचा छुंदा, मुरंबा, लोणचे, चटणी, अवलेह, कँडी, सरबत, सुपारी करून वर्षभर आवळा सेवन करता येतो. आवळा रक्तदोषहारक, पित्तशामक, सारक व रुचकर आहे. आवळा हा आम्लमधुर रसाचा, शीतवीर्यात्मक व मधुर विपाकी असल्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करतो. यामध्ये शोधनाचा गुण असल्याने रक्तात साचलेली विषद्रव्ये दूर करून रक्त शुद्ध करतो. अशाच प्रकारे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र या सप्तधातूंमध्ये जाऊन प्रत्येक धातूतील विषद्रव्ये दूर करून सर्वच धातूंना शुद्ध बनवतो. या त्याच्या गुणांमुळेच शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणूनच नियमितपणे आवळा सेवन करणे आवश्यक आहे. औषधात आवळ्याचे फळ, पाने आणि बिया वापरल्या जातात. आवळा पोटात घेतला जातो, तसेच शरीराला बाहेरून लावण्यासाठीसुद्धा वापरला जातो. वाळवलेल्या आवळ्यांचाही औषधात वापर करता येतो. मात्र च्यवनप्राशसारखे रसायन बनवताना किंवा ज्या ठिकाणी आवळ्याचा रस वापरायला सांगितला आहे आवळकाठी म्हणजे वाळवून ठेवलेले आवळे. आवळा हा औषधात वापरला जातोच, पण तो स्वयंपाकातही महत्त्वाचा असतो. "अम्लफलेषु श्रेयम्' म्हणजे सर्व आंबट फळांमध्ये आवळा श्रेष्ठ सांगितला असल्याने चटणी, लोणचे, सुपारी करण्यासाठी आवळ्यासारखे दुसरे उत्तम फळ नाही. मोरावळा तर सर्वांच्याच परिचयाचा असतो. खरं तर आम्लधर्मी पदार्थाने पित्ताची वृद्धी होते, परंतु आवळा आम्लधर्मी असला तरी त्याचा विपाक मधुर असल्यामुळे त्याच्या मधुर व शीतल गुणांमुळे त्याच्या सेवनाने पित्त वृद्धी न होता पित्तप्रकोप कमी होतो. त्यामुळे शरीराचा दाह होत असेल तर अशा अवस्थेत आवळ्याचा रस प्यावा.
रक्त विकारांमध्ये उदा. नाकाचा घोळणा फुटला असेल, शौचामधून रक्त पडत असेल, आवळा, हिरडा, बेहडा ही द्रव्ये समप्रमाणात घेऊन त्याचं चूर्ण बनवावं यालाच त्रिफळा चूर्ण असं म्हणतात. हे चूर्ण रोज पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी वस्त्रगाळ करून गाळलेल्या पाण्याने डोळे धुवावेत. असं केल्याने डोळ्यांचं तेज वाढतं. तसंच रात्री झोपताना गरम पाण्यातून एक चमचा त्रिफळा चूर्ण घेतलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी शौचास साफ होतं. जर डोकंदुखीचा त्रास होत असेल तर आवळ्याचं चूर्ण, तूप व खडीसाखर समप्रमाणात घेऊन एकत्र करावं. सकाळच्या वेळी उपाशी पोटी हे मिश्रण सेवन केल्याने डोके दुखीचा त्रास नाहीसा होतो. केसांच्या तक्रारींवर उदा. केस गळणं, पांढरे होणं, कोंडा होणं, केस निस्तेज होणं या सर्वावर आवळा, शंखपुष्पी, ब्राम्ही, जास्वंद यांनी युक्त तेल केसांना लावावं. काही दिवसांमध्येच केसांची वाढ चांगली होते. केस गळणं थांबतं. केसांचा रंग टिकून राहतो व रात्री शांत झोप लागते. तोंड बेचव होऊन मळमळ किंवा उलटी होत असल्यास आवळ्याचा रस व मध यांचं चाटण करावं. तोंडास रुची प्राप्त होते. गर्भारपणात स्त्रीला उलटी व मळमळ वारंवार होत असते. अशा वेळी आवळा सुपारी, कँडी व सरबत यांचा वापर करावा. यामुळे तोंडास रुची निर्माण होऊन मळमळ कमी होते. नियमित आवळा सेवनाने शरीरातील रसरक्तभिसरण क्रिया सुरळीत चालू राहते व त्यामुळे कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होऊन हदयविकार टाळता येतो. नियमितपणे आवळा सेवन केल्यास त्यात असणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे हृदय, केस, मांसपेशी व शरीरातील अनेक ग्रंथींना बळ मिळतं व त्यामुळे तारुण्यावस्था जास्त दिवस टिकून ठेवता येते. म्हणूनच वार्धक्यावस्था टाळण्यासाठी च्यवनऋषींनी आवळ्यापासून बनविलेला च्यवनप्राशावलेह सेवन केला व तारुण्यप्राप्त करून घेतलं. म्हणूनच बाराही महिने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यासाठी व त्यातून आरोग्य टिकण्यासाठी नियमितपणे च्यवनप्राश सेवन करावा. आवळकाठी पाण्यात वाटून अंगाला उटण्याप्रमाणे लावून ठेवली व काही वेळाने स्नान केले तर कांती उत्तम राहते, त्वचा सुरकुतत नाही. आवळकाठी व पांढरे तीळ रात्रभर पाण्यात भिजत घालावे. सकाळी बारीक करून तयार झालेला कल्क डोळे बंद करून पापण्यांवर लावल्यास डोळ्यांची आग शमते, डोळे थंड राहतात. उष्णता वाढल्याने नाकातून रक्त पडते, त्यावर तुपात परतलेली आवळकाठी कांजीत वाटून टाळूवर लावल्यास फायदा होतो.
अंगावर पित्त उठते, त्यावर आवळकाठी रात्रभर गोमूत्रात भिजत घालावी, सकाळी वाटून घ्यावी व नारळाच्या दुधात मिसळून अंगावर चोळावी. याने पित्ताच्या गांधी येणे बंद होते. ताप वाढल्याने डोके फार तापले असता आवळकाठी दुधासह बारीक करून लेप करण्याने डोके शांत राहते. वाढत्या वयामुळे शरीराची झीज होणे स्वाभाविक असते. पण ही झीज कमीत कमी व्हावी, धातूंची संपन्नता टिकून राहावी यासाठी मदत करणारी द्रव्ये म्हणजे वयःस्थापन द्रव्ये. शतावरी, गोक्षुर, अश्वगंधा अशी अनेक द्रव्ये वयःस्थापन करणारी असतात, मात्र यात आवळा सर्वश्रेष्ठ सांगितला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
पेस्टोसाठी दिलेले साहित्य एकत्र करून वाटून घ्यावे. अगदी गरज लागली तरच थोडे पाणी घालावे. पेस्टो घट्टच असावा. चार ब्रेड स्लाइसना बटर लावून घ्यावे. त्यावर कांद्याच्या चकत्या ठेवाव्या. वर मॅश केलेले काबुली चणे पसरवावे व पेस्टो लावावा. टॉमेटोच्या चकत्या आणि त्यावर किसलेले चीज असे ठेवून वर ब्रेड स्लाइस ठेवावा. सँडविच तयार करावे. हे सँडविच असेच खाता येते किंवा तव्यावर बटर घालून दोन्ही बाजू भाजून घ्यावे. यामुळे अजून छान चव येते.
सुरणाच्या फोडी कराव्यात. हिरव्या मिरच्या उभ्या अर्धवट कापून कोरड्या ठेवाव्यात. पातेलीत लिंबाचा रस, मीठ, मोहरीची पावडर, हळद यांचे मिश्रण चांगले ढवळाचे.
फ्लॉवर-मटार करंजी
साहित्य:- २५० ग्रॅम फ्लॉवर बारीक चिरुन , २५० ग्रॅम ताजे कोवळे मटार , फोडणीसाठी तेल,मोहरी,तिखट,हळद चवीनुसार मीठ,वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबिर,ओला नारळ अर्धी वाटी,तीन वाट्या कणीक, एक वाटी बेसन, एक चमचा जीरे.
कृती:- गॅसवर एका कढईत फोडणीसाठी दोन टेबलस्पून तेल तापवून मोहरी टाकावी. मोहरी तडतडली की त्यावर बारीक चिरलेला फ्लॉवर आणि मटार घालावे. त्यात चवीनुसार तिखट, हळद, मीठ घालून, बेताचे पाणी घालून भाजी शिजवून घ्यावी. मटार नीट शिजले की ओला नारळ घालून परतावे. भाजीतील सर्व पाणी आटले पाहीजे. मग त्यावर भरपूर (आवडी नुसार) कोथिंबीर घालून, नीट मिसळून, भाजी खाली उतरवावी. कणीक व बेसनात हळद, जीरे व चवीनुसार तिखट, मीठ, घालून पाणी घालून पीठ भिजवावे. गॅसवर एका कढईत तळणीसाठी तेल तापत ठेवावे.
कणीक-बेसनाची एक पुरी लाटावी.. त्यात २ टेबलस्पून फ्लॉवर मटारची भाजी भरून पुरीच्या दोन्ही कडा जुळवून घ्याव्यात. त्याची कडा नीट बोटाने चेपून सीलबंद करून कातण्याने काताव्या.
आता ही करंजी मध्यम आंचेवर तळून घ्यावी. ह्या करंज्यांबरोबर इतर काही लागत नाही. थोडा बदल हवा असेल तर सारणात उकडलेला बटाटा कुस्करून घालता येईल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
पातीकांदा बटाटा करंजी
साहित्य:- ६ ते ८ पातीकांद्याच्या काड्या, १ मध्यम बटाटा, १ चमचा तेल फोडणीसाठी, १/४ चमचा जीरे, १/४ चमचा हिंग, १/२ चमचा चाट मसाला, १/२ चमचा धणेपूड, १/४ चमचा जिरेपूड, १/२ चमचा लाल तिखट, २ चिमटी गरम मसाला, २ हिरव्या मिरच्या बारीक चीरून, चवीपुरते मीठ, किसलेले चीज, तळण्यासाठी तेल,
पारीसाठी:- १ वाटी मैदा, १ चमचा कणिक, १ चमचा तेल मोहनासाठी, २ चिमटी मीठ.
कृती:- बटाटा उकडून सोलून घ्यावा. सुरीने अगदी बारीक तुकडे करावे. कांद्याची पात आणि त्याचा कांदा दोन्ही बारीक चिरून घ्यावे. पारीसाठी मैदा, कणिक आणि मीठ एकत्र करावे. त्यात १ चमचा गरम तेलाचे मोहन घालावे. पाणी घालून घट्ट भिजवून झाकून ठेवावे. कढईत तेल गरम करून त्यात जीरे आणि हिंग फोडणीस घालावे. त्यात मिरची घालून परतावे. नंतर पाती कांदा आणि मीठ घालावे. परतून मंद आचेवर २-४ मिनिटे वाफ काढावी. नंतर बटाटा घालून मिक्स करावे. आच बंद करून त्यात चाट मसाला, धणे-जिरेपूड, लाल तिखट, गरम मसाला घालून मिक्स करावे. पारीच्या दिड इंचाचा गोळ्या बनवाव्यात. लाटून त्यात अर्धा ते एक चमचा सारण घालावे. १ चमचा चीज घालावे. पारी बंद करून करंजीचा आकार द्यावा. तेल गरम करून त्यात करंज्या मध्यम आचेवर तळून घ्याव्यात. टॉमेटो केचप बरोबर सर्व्ह कराव्यात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
ब्रेडची करंजी.
साहित्य : १ वाटी खोवलेला ओला नारळ, पाव वाटी साखर, पाव वाटी बारीक चिरलेला खजूर, चिमुटभर वेलची पावडर, १ चमचा काजू-बदामाचे तुकडे, ६-७ ब्रेडच्या स्लाइस, १ चमचा मैदा, तळण्यासाठी तेल किंवा तूप. (प्रत्येकी पाउण वाटी तेल आणि तुपाचं मिश्रणही छान लागतं.)
कृती : नारळात साखर घालून मिश्रण ढवळून ठेवावं. १०-१५ मिनिटांनी जाड बुडाच्या पातेल्यात मिश्रण दोन मिनिटं मोठ्या गॅसवर ठेवावं. नंतर गॅस बारीक करावा. अधून मधून मिश्रण ढवळत राहावं. साखरेचा पाक होऊन मिश्रण सैलसर झालं की वेलची पावडर, काज-ूबदाम, खजुराचे तुकडे घालून मिश्रण ढवळून घ्यावं. मिश्रण थोडं कोरडं वाटलं की गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्यावं. मैद्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची घट्टसर पेस्ट बनवून ठेवावी. ब्रेडच्या कडा काढून टाकाव्यात. ब्रेड किंचित ओलसर करून घ्यावा. त्यावर मधोमध दोन चमचे सारण ठेवावं. कडांना मैद्याची पेस्ट लावून ब्रेड त्रिकोणी आकारात दुमडून (फोल्ड करून) कडा जुळवून व्यवस्थित दाबून घ्यावं. तयार करंजी लगेच गरम तेला-तुपाच्या मिश्रणात लालसर रंग येईपर्यंत तळून व्यवस्थित निथळूृन घ्याव्यात. करंज्यांचं सारण आदल्या दिवशीही करून ठेवता येऊ शकतं. सारण तयार असलं तर करंजी खूपच झटपट होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
प्रथम उकळून घेतलेले कॉर्न जाडसर बारीक करून घ्यावे. त्यात कुस्करलेले बटाटे, पालक, भात, पनीर, कोथिंबीर, मिरची, तिखट, धने-जिरे पूड, मीरे पावडर टाकावी. ब्रेड स्लाईस मिक्सरमधून फिरवून बाजूला काढून ठेवावे.
साहित्य:- १/२ किलो दुधी भोपळा, अर्ध्या नारळाचे दूध, १/४ किलो साखर, १५-२० काजू, १/२ वाटी बेदाणे, किंचित मीठ, तूप.
कृती:- दुधी भोपळ्याची साल काढून त्याच्या लहान लहान चौकोनी फोडी करून घ्याव्यात. नारळाचे दूध काढून घ्यावे. काजूच्या पाकळ्या तुपावर बदामी रंगी तळून घ्याव्यात. भोपळ्याच्या फोडी परतून व वाफेवर शिजवून घ्याव्यात. त्या फोडींवर नारळाचे दूध, मीठ, साखर व बेदाणे घालून परतावे व शिजवून घ्यावे. सर्व्ह करताना वरून तळलेले काजू घालावेत. हा पदार्थ जेवणात गरम वाढावा अथवा फ्रीजमध्ये ठेवून थंड करून जेवणानंतर स्वीट डिश म्हणून सर्व्ह करावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
धान्यफराळ म्हणून भाजलेल्या धान्याचे पदार्थ केले जातात. अशा वेळी या भाजणीचा उपयोग करता येतो. ही भाजणी वापरून खमंग पदार्थ तयार करता येतात.
Copyright © 2025 | Marathisrushti