महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
तुपावर कणीक खमंग भाजावी. गॅस बंद करून गूळ घालावा. एकजीव झाल्यावर खसखस बडीशेप पेरून थापावं, कापावं. तिखट पदार्थ (देशी – विदेशी) खमीरी रोटी कणकेच्या घरगुती केकमध्ये दिल्याप्रमाणे, कणीक आंबवून घ्यावी.
चिरलेल्या केळफुलाला कुकरमध्ये हळद व मीठ घालून छान वाफ आणावी. वाफवल्यावर पाणी काढून टाकावे. वाफवलेले केळफूल हाताने बारीक करून त्यात गाजर व उकडलेला बटाटा कुस्करून घालावा. आले, मिरची, लसूण पेस्ट, मीठ, धने-जिरे पूड घालावी. ब्रेडचा बारीक चुरा घालून मळून घ्यावे.
साहित्य – 1 लिटर दुध ( मलाई न काढता ), 300 ग्राम साखर, 2 लिंबाचा रस.
कृती – एक स्वच्छ भांडे घेऊन त्यात दूध उकळून घ्यावे. जेवढा लिंबूचा रस आहे तेवढेच त्यात पाणी घाला व लिंबाचा रस हळूहळू उकळत्या दुधात , दुध फाटे पर्यन्त टाका आणि दुध हलवत रहा जेव्हा दुध चांगल्या प्रकारे फाटेल तेव्हा लिंबाचा रस टाकणे बंद करा , ह्या फाटलेले दुध एका सूती कपड्यात ओतून गाळून घ्या व ( तयार झालेल्या पनीरला ) कपड्यातच थंड पाण्याने धुवून घ्या जेणेकरून त्यातील आंबटपणा निघून जाईल.नंतर कपडा चारही बाजूंनी एकत्र गुंडाळून हाताने दाबून पाणी पूर्णपणे निथळून घ्यातयार झालेला गोळा एका ताटात काढा आणि हाताने एकजीव होईपर्यंत मळून घ्या व त्याचे लाडूसारखे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या.नंतर एका पातेल्यात साखर व 4 कप पाणी टाका आणि उकळून घ्या, उकळी आल्यानंतर त्यात तयार केलेले गोळे एक एक करून सोडा.व पातेले झाकून ठेवा , 10 -15 मिनिट रसगुल्ले शिजवून घ्यातयार झालेले रसगुल्ले पाकासहित एका भांड्यात काढून घ्या व थंड होऊ द्या, 5- 7 तासानंतर हे रसगुल्ले तुम्ही सर्व्ह करू शकता.
१ चिकन ब्रेस्ट (त्याचे ६ तुकडे करावेत), पेस्तो सॉस, अर्धी वाटी कोथिंबीर, २ चमचे ऑलिव्ह ऑइल/गोडं तेल, २ चमचे भाजलेले शेंगदाणे, ५० ग्रॅम पनीर, २ हिरव्या मिरच्या, १० लसणीच्या पाकळ्या, ३ पातीचे कांदे (पातीसह), अर्ध्या लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ.
मुंबईत थंडीत पातीचा लसूण मिळतो, पण तो घरी करणे अगदी सोपे आहे. नाहीतरी या दिवसात घरातल्या साठवणीच्या लसणाला कोंब येतातच. अशा पाकळ्या सुट्या करुन मातीत खोचल्या, कि ते कोंब वाढू लागतात. या साठी अगदी करवंटीचा उपयोग केला, तरी चालतो
रंगाने सफेद व चमकदार दिसणारी पापलेट ताजी असतात. पापलेट घेताना त्यांच्या डोळ्याखालील भाग दाबून पाहावा. सफेद पाणी आल्यास ती ताजी असतात, लाल पाणी आल्यास ती पापलेट शिळी असतात.तसेच पापलेट शिळी व खराब होत आल्यास त्याना पिवळसर रंग येऊ लागतो.
साहित्य :- पाव किलो भेंडी, प्रत्येकी अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो, एक चमचा आले-लसूण पेस्ट, एक चमचा धने-जिरे पावडर, लाल तिखट एक चमचा, अर्धा चमचा आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस, मीठ, साखर, चवीप्रमाणे, अर्धा चमचा गरम मसाला, ओले खोबरे अर्धी वाटी, कोथिंबीर, तेल.
कृती :- भेंडीचे डोके व खालचा बाग कापावा. मधे उभी चीर द्यावी. कांदा, टोमॅटो बारीक चिरून चमचाभर तेलावर परतावे. आले-लसूण पेस्ट, धने - जिरे पूड, तिखट, हळद, आमचूर पावडर, मीठ, गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ साखर हे सगळे थोड्या तेलावर परतावे. ओले खोबरे, कोथिंबीर घालून पुन्हा एकदा हलवावे. खाली उतरवावे. थंड झाल्यावर हा मसाला भेंडीत भरावा. कढईत दोन मोठे चमचे तेल घालून फोडणी करावी. त्यात भरलेल्या भेंड्या घालून मंद आचेवर परताव्यात, वाफ आणावी. वरून खोबरे कोथिंबीर भुरभुरावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
रामायण काल म्हणजे अन्नसमृद्धीचे युग होते असे वर्णन वाङमयात आहे.
आपल्याकडील पदार्थ खूपच व्यनंज मिश्र. त्यांचा इतिहास कुठे सापडेल? इतर प्रांतांतले पदार्थ पाहिले तरी हेच प्रश्न पडतील. पश्चिमेकडे यीस्ट वापरून पाव बनवला गेला तर इकडे इडली- डोशाचे पीठ रात्रभर आंबवले गेले. ते प्रथम कधी आंबवले गेले, इडली-डोशाचे पीठ आंबवण्याची प्रक्रिया पहिल्यांदा कशी घडली असेल? असे असंख्य प्रश्न राहतात.
साहित्य:- वाटीभर शिंगाडा पीठ, तिखट, मीठ एकत्र करावे. त्यात पाणी घालून शेवेच्या पिठाप्रमाणे भिजवावे. त्यात 2 चमचे गरम तूप घालावे. तूप लावून मळून घ्यावे. तापल्या तुपात मंद गॅसवर सोऱ्याने कढईत शेव पाडून खमंग तळावी.
भिजलेला साबुदाणा दीड वाटी, मीठ, साखर, चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर.
कृती:- कढईत तूप घालून साबुदाणा टाकावा. मीठ, साखर, हिरव्या मिरचीचे तुकडे घालून मंद गॅसवर परतावे. कोथिंबीर घालावी. प्रथम शिंगाड्याची शेव, त्यावर उकडलेल्या बटाट्याचा कीस, दाण्याचे कूट, चिमूट मीठ, तयार साबुदाणा, बटाटा सली, ओले खोबरे, काजू, बेदाणे, 2 चमचे दही घालावे. वरून कोथिंबीर व चाट मसाला भुरभुरून इंदुरी उपवासाचे चॅट सर्व्ह करावे.
Copyright © 2025 | Marathisrushti