साहित्य: ६-७ मध्यम आकाराचे लाल टोमॅटो, १ गाजर, १ कांदा, अर्धा टी स्पून किसलेले आले, १ टे. स्पून अमूल बटर, १ टी स्पून मैदा, १ कप दूध, ४-५ कप चिकन स्टॉक, मीठ, मिरे पावडर चवीनुसार, मिळाल्यास थोडी पार्सलेची पाने. सजावटीसाठी: ब्रेड स्टिकस, किसलेले चीज.
कृती: वेळ: १५ मिनिटे सर्व भाज्या धुऊन चिरून चिकन स्टॉकमध्ये शिजवून घ्याव्यात.
शिजलेल्या भाज्या थंड झाल्यावर स्टॉकसह मिक्सरमध्ये फिरवून एकजीव कराव्यात. मोठ्या गाळणीने गाळून स्टॉक तयार करावा. एका मोठ्या पातेल्यात बटर गरम करून त्यात मैदा परतावा. लगेच त्यात दूध घालावे आणि सतत ढवळत मिश्रण शिजवून घ्यावे. थोडे घट्ट झाले की त्यात मीठ, मिरे पावडर घालावी. या मिश्रणावर तयार केलेला स्टॉक ओतावा. पुन्हा चांगले उकळवावे. थोडे दाटसर झाले की गॅस बंद करावा.
प्रत्येक बाऊलमध्ये गरम सूप ओतून त्यावर थोडे किसलेले चीज घालावे. थोडी पार्सलेची पाने चिरून घालावी. सोबत ब्रेड स्टिक द्यावा.