वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
वनखात्याला पाचारण केलं तर त्यांच्याकडे तुला पकडण्यासाठी साधनसामग्री देखील नव्हती…. ती उपलब्ध झाल्यानंतर प्रशिक्षित कर्मचारी नव्हते…. त्यांनी गुंगीचे दोनच बाण पुरेसे असताना जादा डोस असलेले तीन बाण निर्दयीपणे तुला मारले.
December 2, 2022
नुकताच व्हॉटसऍपवरुन एक लेख वाचायला मिळाला. आपल्या डोळ्यावरील झापडं उघडणारा हा लेख कोणी लिहिलाय ते माहित नाही. मात्र ज्याने कोणी तो लिहिला असेल त्याला तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असं नक्कीच वाटत असणार. त्यामुळेच आमचाही खारीचा वाटा म्हणून हा लेख मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी शेअर करतोय.
एक ऑगस्टला आम्ही तुमचे पुण्यस्मरण केले टिळक महाराज!
ती शेंगांच्या टरफलांची गोष्ट पुन्हा आठवली.
सध्या लोक काहीही खातात आणि शेंगा खाल्ल्यावर टरफले इथे तिथे नाही टाकत, तर ती ही खाउनच टाकतात. शेंगा खाल्ल्याचा कुठलाच पुरावा ठेवत नाहीत मागे.
संत शब्द तुम्ही तीन प्रकारे लिहिलात.
आता संत शब्द कुठल्याच प्रकारे लिहावा लागत नाही फारसा.
संत व्हायचा प्रयत्न तर कुणीच करत नाही, कुणालाच तेवढी उसंत नसते.
स्वातंत्र्यासाठी तुम्ही तुरुंगवास भोगलात टिळक, स्वतंत्र भारतात आता तुरुंगवास "उपभोग"ता येतो.
मंडालेहून निघालेला स्वातंत्र्याचा "रोड" आता "आर्थर रोड" पाशी येऊन थांबलाय. तिथं देशद्रोह्याना मिळणार्या सुखसोयींचा हेवा बाहेरच्या देशप्रेमी, कायदापालक सज्जनांनाही वाटू लागलाय.
तुम्ही लिहिलंत गीतारहस्य.
गीतेतली बरीच रहस्ये आता नव्याने उलगडू लागली आहेत. कौरवपांडव उगीच राज्यासाठी लढत बसत नाहीत, तर युती करुन सत्ता भोगतात.
"आप्तस्वकीयांशी कसा लढू" हा प्रश्न पडत नाही कुठल्याच अर्जुनाला.
बाप, भाऊ, मामा, काका, गुरू - कुणाच्याही पाठीत सहज खंजीर खुपसतो आजचा अर्जुन.
वस्त्रहरण तर नित्याचंच झालं आहे,
पण कृष्णानं पाठवलेली वस्त्रं कधीच पोचत नाहीत कुठल्याच द्रौपदीपर्यंत.
टिळक, आता "केसरी" शब्दाचा अर्थही कळत नाही कुणाला.
डरकाळ्या फोडणार्या कुठल्याच सिंहाचा आता भरवसा उरला नाही.
सांगता येत नाही कधी कुणाच्या ताटाखालचे मांजर बनून जातील.
चिंतन, मनन आणि हवापालट करायला तुम्ही सिंहगडावर जाऊन रहायचात ना टिळक?
तिथली हवासुद्धा आता खूप पालटली आहे.
गडाच्या पायथ्याशी आता रेव्ह पार्ट्या चालतात.
सिंह तर तेव्हाच गेला, गड राखणंही आता कठीण झालं आहे.
तुम्ही सार्वजनिक केलेला गणपतीउत्सव खूप लोकप्रिय होतो आहे. दिवसेदिवस प्रत्येक गल्लीचे, बोळाचे स्वतंत्र गणपती झालेत.
आता गणपती बुडवायला समुद्रही अपुरे पडणार बहुतेक.
"सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" असा प्रश्न तुम्ही केला होतात
आता सरकारचे डोकेच काय, सरकारच ठिकाणावर नसते.
सरकार अस्थिर ठेवण्याचे फायदे कळून चुकलेत सगळ्यांना.
आठवडी बाजारासारखा घोडेबाजार भरलेला असतो तेजीत.
इंग्रजांना हाकलल्यानंतर आम्ही मुलांना आता इंग्रजी शाळेत घातले आहे.
त्यांना विलायतेला धाडायची खूप धडपड चालली आहे आमची.
एकदा ती विलायतेला गेली की भारतदेश, मराठी भाषा, मराठी आईबाप, सारंच परकं होईल त्यांना.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची तशी त्यांना फारशी माहितीही नाही,
मग कुठले टिळक, कुठला एक ऑगस्ट आणि कुठलं काय?
एक ऑगस्टला तुमचं पुण्यस्मरण करणारी ही आमची शेवटचीच पिढी बहुतेक टिळक. पुन्हा एकदा तुम्हाला विनम्र श्रद्धांजली!
August 4, 2016
गेल्या काही काळात माध्यमांचं गारुड समाजमनावर वाढत चाललं आहे. या माध्यमामध्ये सर्व प्रकारचा सोशल मीडिया आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, टीव्ही माध्यम अन् त्यातही बातम्या.. टीव्ही माध्यमात खरंतर मनोरंजन वाहिन्यांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. पण काही महत्त्वाचं घडत असेल किंवा निवडणुका असतील तर वृत्त वाहिन्यांचं महत्त्व अचानक वाढतं. ते स्वाभाविक आहे.
August 21, 2023

खदिराचा मध्यम उंचीचा वृक्ष असतो. खदिर चवीला कडू, तुरट असून थंड गुणाचा व हल्का व रूक्ष असतो.हा कडू, तुरट व थंड असल्याने पित्तशामक व थंड सोडुन अन्य गुणांनी कफशामक आहे.
January 2, 2018
संगणकाचा जमाना जुना होऊन आता मोबाईलचा जमाना आलाय. सहाजिकच आहे. हातात आणि खिशात मावणार्या मोबाईलवरुन संगणकाची सगळी कामं होऊ लागली तर संगणक हवाय कशाला?
May 14, 2016
समाज कल्याणाकरता प्रत्येक देशामध्ये आरोपीला शिक्षा दिली आहे. परंतु बदलत्या परिस्थितीत शिक्षा शास्त्रज्ञांचे विचार पण सुधारित झाले आहेत. प्राचीन काळातील शिक्षा आधुनिक नवीन विचाराचा परिणाम होऊनदेखील मुख्यत: पुढील प्रकारच्या शिक्षा मान्य झाल्या आहेत.
October 25, 2018
आज ३१ ऑक्टोबर.. आज 'संगीत शाकुंतल' या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला १३६ वर्षे झाली.
ज्याला अस्सल मराठी संगीत नाटक म्हणून संबोधिता येईल अशा नाटकाचे आद्य प्रवर्तक अण्णासाहेब किर्लोस्कर (१८४३-१८८५) हे होत. १८८० साली पुणे मुक्कामी अण्णासाहेब किर्लोस्करांनी 'इंद्रसभा' नावाचे पारसी नाटक - उर्दू भाषेतील - पाहिले आणि तशा प्रकारचे नाटक मराठी रंगभूमीवर का होऊ शकत नाही, या ईर्ष्येने एकटाकी 'संगीत शाकुंतल' या नाटकाचा पहिला अंक लिहून काढला. किर्लोस्करांनी कवी कुलगुरू कालिदासाच्या अजरामर शाकुंतलाचे मराठी रूपांतर १८८० साली केले. आणि त्या मराठी `शाकुंतला'चा पहिला प्रयोग म्हणजे (नंतरच्या काळात लोकप्रिय झालेल्या) संगीत नाटकाची गंगोत्री होय. या प्रयोगात जवळपास शंभर पदे होती. आणि या पदांची रचना ओवी, लावणी, साकी, दिंडी इ. रूढ छंदांना अनुसरणारी होती.
१३ ऑक्टोबर १८८० रोजी पुण्याच्या तंबाखू आळीत दसर्याच्या मुहूर्तावर 'शाकुंतल'च्या पहिल्या तीन अंकांची रंगीत तालीम झाली. आणि रविवार ३१ ऑक्टोबर १८८० रोजी बुधवार पेठेतील भांग्या मारुतीसमोरच्या तांबेकरांच्या वाड्यात असलेल्या आनंदोद्भव नाटकगृहाच्या गच्च भरलेल्या तिन्ही मजल्यांसमोर शाकुंतलाचा पहिला प्रयोग झाला. व्यावसायिक मराठी संगीत नाटकाची मुहूर्तमेढ इथे रोवली गेली.
भारतीय नाटशास्त्राचा पाया भरतमुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्राच्या ग्रंथात सापडतो. रंगमंचावरील नेपथ्य, संगीत, नृत्य, वेषभूषा, रंगभूषा, अभिनय, दिग्दर्शन इथपासून रंगमंच जिथे असतो त्या रंगमंदिराचे बांधकाम कसे करावे, त्यासाठी भूमीची निवड, बांधकाम साहित्य, आकारमान इथपर्यंत नाटकाचे संपूर्ण नियम, पथ्ये भरताच्या नाट्यशास्त्रात सापडतात. त्यामुळेच नाट्यशास्त्राला पाचवा वेद मानलं जातं. भरताच्या नाट्यशास्त्राप्रमाणे जेव्हा इतिहासकाळात नाटके होत असत, तेव्हा वातावरणनिर्मितीसाठी सुरुवातीला धृवागीतं वाजवली जात असत - ती वाद्यांवर वाजवली जात. त्यांत दोन प्रकार होते - निःशब्द धृवागीत आणि सशब्द धृवागीत. प्रथम निःशब्द धृवागीत वाजवले जात असे, जेणेकरून लोकांना कळावे, की आज इथे काहीतरी नाटक आहे. निःशब्द धृवागीताने एकप्रकारे सुरांचे गूढ असे वातावरण निर्माण होत असे. पण नाटक म्हणजे शेवटी शब्दसृष्टी. त्यामुळे निःशब्द धृवागीतानंतर सशब्द धृवागीत होत असे. त्यालाच आपण आज नांदी म्हणून ओळखतो.
नाट्यशास्त्राप्रमाणे नांदी हा एक पडद्यामागे होणारा विधी असे. त्यानुसार 'संगीत शाकुंतल' नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला स्वतः अण्णासाहेब सूत्रधार, बाळकोबा नाटेकर, मोरोबा वाघोलीकर आणि शेवडे या पारिपार्श्वकांसह पडद्यामागे नांदी म्हणण्याकरता सज्ज झाले. 'पंचतुंड नररुंडमालधर' ही नांदी म्हणण्यास सुरुवात करणार, तोवर जणू पडदा ओढणार्यास तेवढाही विलंब सहन न होऊन त्याने एकदम पडदा वर उचलला. आणि पडद्यामागे नांदी म्हणून नटेश्वराला फुले अर्पण करून नाट्यप्रयोगाला सुरुवात करण्याचा संकेत असा अचानकपणे बदलून गेला. ती ही 'संगीत शाकुंतला'ची नांदी.
(राग : खमाज, ताल : धुमाळी, चाल : जय श्री रमणा भयहरणा)
पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधी नमितो ॥
विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मग तो ॥ ध्रु.
कालिदास कविराज विरचित हें, गाती शाकुंतल रचितों
जाणुनिया अवसान नसोनि महकृत्यभर शिरिं घेतो
ईशवराचा लेश मिळे तरि मूढ यत्न शेवटि जातो
या न्याये बलवत्कवि निजवाक्यपुष्पिं रसिकार्चन करितो ॥
नांदीनंतर सूचकपद असे. शाकुंतलाच्या नांदीच्या सूचकपदाची झलक ही अशी.
अष्टमुर्ती परमेश सदाशिव तुम्हां शिव देवो
यदृपाविण विश्वचि हा भास हृदयी ठसवो
सूचकपदातून नाटकाचं साधारण कथानक हे नटेश्वराच्या आयुष्यावर बेतून सांगितले जायचे. जणू काही नटेश्वराच्या जीवनामध्ये या घटना घडल्या आहेत, असे समजून त्याला उद्देशून हे सूचकपद म्हणायचे कारण ती असायची त्या नाटकाच्या एकूण कथासूत्राची सुरुवात.
नाटकाचा मूळ उद्देश हा मनोरंजनाचा असल्याने नाटकाचे कथानक सूचकपदातून सांगितल्याने काही रसभंग होत नसे. उलट जमलेल्या लोकांना आज आपण कुठल्या कथानकावरचे नाटक पाहण्यासाठी जमलो आहोत, हे कळल्याने नाटकाचा आणि पदांचा आनंद लुटायला मदतच होत असे. जसे एखाद्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत गायक माहितीतलाच राग सादर करणार असेल, तरी त्या-त्या दिवशीचा रसाविष्कार वेगळा असतो, तसेच कथानक आधी माहीत असले, तरी त्या दिवशी नाटक आणि मुख्य म्हणजे पदे कशी होतील याची उत्सुकता प्रेक्षकांत असेच.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मा.वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातील संगीत शाकुंतल मधील नांदी.
October 31, 2016
मुंबई म्हटले की पहिल्यांदा आठवते ते गेटवे ऑफ इंडिया. ही वास्तु ह्या वैभवशाली शहराचा मानबिंदू ठरली आहे.
December 4, 2021
परवा निवडणुकीच्या निमित्ताने एका संस्थेशी संबधित एक सज्जन संचालक गृहस्थ आम्हाला म्हणाले, संचालक म्हणजे लांडगे आहेत. लांडग्यांचा कळप... एक लांडग्याला जमिनीत पुरतात.फक्त मुंडके वर ठेवतात. ते पाहण्यासाठी बकऱ्या जातात तेव्हा लांडगा त्याला हव्या असलेल्या बकऱ्यांचा तोंडात पाय करकचून पकडतो. त्यामुळे अन्य बकऱ्या पळून जातात. मग पकडलेल्या बकरीचा समाचार घ्यायलाl लांडगे लक्ष्याच्या ठिकाणी एकत्र येतात. तेव्हा सज्जन गृहस्थाला आम्हीच सांगितले, बाबारे ....! बकऱ्यासाठी सापळा रचताना कधी काळी वाघ सिंह आले तर जमिनीत पुरलेल्या लांडग्याचे कसे होईल. ते निरुत्तर झालेच,पण उलट त्यांनी हसून दाद दिली.
तात्पर्य सांगायचे झाले तर नुकत्याच पार पडलेल्या विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत केवळ एका माणसामुळे निवडणुकीला सामोरे जावे लागल्यामुळे लाखो रुपयाची धूळधाण झाली. हा अनर्थ कसा झाला, कुणामुळे झाला, याला जबाबदार कोण ...? याचं आत्मपरीक्षण संबधितांनी करणे गरजेचे आहे. खरं तर ते या लाखो रुपयाचा चुराडा वाचवू शकत होते, परंतु आपली मनसबदारी कोणी सोडायला कबूल नव्हते. निवडणूक आहे कोणी तरी निवडणुकीला उभे राहणार , त्यात काही गैर नाही. कारण त्यांचा तो हक्क आहे. आता कोणी उभे राहायचे, यावर ढोबळमनाने विचार केला तर उमेदवार हा सामाजिक बांधिलकी जपणारा, चारचौघात उठणारा बसणारा, त्या संस्थेशी आस्था असणारा, त्यांच्या कार्यात योगदान करणारा असावा, हे साधे सरळ गणित आहे. परंतु अती सामान्य वकूबाची माणसं नेतृत्व हातात घेण्याचा प्रयत्न करतात. हे चुकीचे वाटत असले तरी सभासद आहे. त्यांना डिवचण्याचा किंवा यापुढे कधीही निवडणूक लढवू नका, असा सल्ला देत नाही. आपला तसा हेतू नाही. बरेच लोक निवडणुकीच्या रिंगणात उतरतात पण माघार घेतात कारण संबधित संचालक समूह रूपाने त्या त्या माणसाला काही तरी गाजराचं आमिष दाखवितात. त्यामुळे त्यांना आकाशाला गवसणी घातल्यासारखी वाटते, राजकारणात, सहकार क्षेत्रात अशा गोष्टी होत असतात. सर्वसामान्य माणूस निवडणुकीच्या विचारात पडत नाही. समोर येईल त्याचा तो बुद्धीपेक्षा भावनेने आदर करतो.
ही विशाल जुन्नर नावारूपाला आलेली संस्था आहे समस्त सभासदांना त्याचा सार्थ अभिमान आहे. जुन्नर तालुक्यात पुणे, मराठा सारख्या अनेक संस्था होऊन गेल्या. भोंगळ आणि भ्रष्ट कारभारामुळे बुडाल्या. आजही ज्यांचे पैसे गेले ते टाहो फोडत आहेत. विशाल जुन्नरच्या सभासदांना असे वाटत होते की, लोकांना संस्थेविषयी आस्था आहे. प्रेम आहे, जिव्हाळा आहे. त्यामुळे आता पर्यंत चांगले चालले आहे ना ....! चालू द्या म्हणून डोळेझाक करीत होते. परंतु विशाल जुन्नर संचालकांविषयी प्रचंड नाराजी आहे. हे झालेल्या मतदानावरून सिद्ध होते. जेव्हा इतके मतदान कमी प्रमाणात होते., तेव्हा संस्थेवरची विश्वासार्हता गमावलेली आहे. त्यांच्या विषयी मनात असलेली ओल आटत चालली आहे. असा अर्थ होतो की, काही दिवसांपूर्वी आम्हाला घरोघर निनावी पत्र पाठविली गेली. हे अनेक वेळा झाले पत्रे येतात चर्चा होतात. सभासदांना ठाऊक नसलेल्या घटनांचा पाढा पत्रात वाचलेला असतो. पण ही पत्रे पाठविणारे आपल्या संचालकांशी संबधित आहेत. छुप्या पद्धतीने नाराजी व्यक्त करताना कोणी संस्थेला बदनाम करीत असतील तर आतापर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल का केली जात नाही...? यामुळे सत्शील,सद्प्रवृत्त माणसाला नालायक म्हणून संबोधत असतील तर कायदेशीर कार्यवाही केली जावी. जर संस्था करायला धजावत असेल तर सभासदांनी याला आळा घालावयास हवा. यामुळे संस्थेची विश्वासार्हता धुळीस मिळत आहे. हे समस्ताना सांगणे आवश्यक आहे. विशाल जुन्नर विषयी किंवा त्यांच्या गौरवास्पद कामगिरीविषयी मी काही वर्षापूर्वी आपला वार्ताहर या दैनिकात लेख लिहिला होता. (संचालकांना विसर पडला असेल ) जे चांगले काम त्याचा आवर्जून उल्लेख करावा , असे मला वाटते. निवडणुकीच्या कालावधीत उमेदवार एका खोलीत बसले होते. संरक्षणात्मक व्यूह रचना सुरु असावी. मला पाहिले अन त्यांचे डोळे भिरभिरले. चटकन दार बंद झाले. पारदर्शकता नको. आत्मविश्वास आणि त्यातून निर्माण होणारी संरक्षणात्मक आणि प्रतिकाराची शक्ती गमावली की, माणसं अशी वागतात. निवडणुकीला कोणीही उभे राहावे, ज्यांच्या त्यांच्या मनाचा प्रश्न आहे. आमची मित्रमंडळी त्या समूहात असल्यामुळे निवडणुकीचा विचारही मनात शिवत नाही.
या संस्थेत संस्थापक सदस्य सुभाष शिंदे यांचे योगदान फार मोलाचे आहे. ते हयात नाहीत. संस्था विस्तार होत आहे. रौप्यमहोत्सवी वर्षात सभासदांना काय वाटायचे, या विषयावर काळाचौकीतील महानगरच्या कार्यालयात सभा होती. वक्त्यांनी अनेक सूचना केल्या. आम्ही त्यांना एक सूचना केली. तितक्या रक्कमेचे बोनस रुपी शेअर वाटावेत जेणे करून भविष्यात जो पर्यंत लाभांश मिळत राहील तो पर्यंत सभासदांना रौप्यमहोत्सवी वर्षाची आठवण येत राहील. त्यावर अनेकांनी सभेत विरोध केला पण नंतर देताना मात्र बोनस दिला. आपले सारे सत्य, बाकीचे सारे मिथ्या...! ही भावना जडलेली आहे. आताही या निमित्ताने एक सूचना करावीशी वाटते की, विशाल जुन्नर समूहातील सभासद ज्याची कामगिरी अत्युत्तम आहे. योगदान मोलाचे आहे. अशा सर्वसामान्य सभासदाला *कै.सुभाष शिंदे* यांच्या नावे *विशाल जुन्नर गुणवंत सभासद* हा पुरस्कार संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिला जावा. जेणे करून या संस्थापक सदस्याला खरीखुरी श्रद्धांजली अर्पण केली जाईल. प्रस्ताव आहे. विचार करणे वा न करणे हे संस्थेनी ठरवायचे आहे. लिहिण्यासारखे बरेच काही आहे हल्ली स्पष्ट बोलल्याने अथवा लिहिल्याने बरेच जन नाराज होतात. निवडून आलेल्या सर्व संचालकांचे घोडपदेव डी पी वाडी समूह हार्दिक अभिनंदन करीत आहे.
March 25, 2017
विद्यार्थ्यांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याचा कायदा नुकताच करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्यातील साखर कारखान्यांच्या परिसरात सुरू असणार्या साखरशाळा बंद करुन त्या जागी नियमित शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. हा निर्णय चांगला असला तरी अंमलबजावणीतील गोंधळामुळे ऊसतोडणी कामगारांच्या हजारो मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.
November 17, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti