(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ‘आर्चिज’ चा स्पेशल संवाद

    समर्थ रामदासांनी त्यांच्या एका समासात दासबोध ग्रंथात म्हटलेलं आहे की, पतीला पत्नी आणि पत्नीला पती उत्तम गुणाचे मिळणं ही पूर्वजन्म पुण्याईच असते.’ अगदी त्याच भावनेतून आजच्या प्रत्येक व्यक्तीला निःस्पृह, निःस्वार्थी वगैरे शब्द सोडा, परंतु वाजवी दरात औषधोपचार करणारा डॉक्टर मिळणं हीदेखील पूर्वजन्माची पुण्याईच म्हणावी लागते. असा डॉक्टर अनुभवायला मिळाला तर खरंच त्याला कलियुगातील ईश्वरच म्हणावेसे वाटते. असाच एक डॉक्टर… डॉ. प्रताप सी. रेड्डी.

      August 28, 2024


  • कोणत्याही गोष्टीत पॅशन कसं अनुभवाल

    आपल्या संस्कृतीत एक मोठा गैरसमज आहे की पॅशन हे (Spontaneeu) च बसतं तुम्हाला तुमचं काम आवडतं किंवा आवडत नाही. तुम्हाला व्यायाम करायला आवडतो किंवा आवडत नाही. तुम्हाला पुस्तकं वाचणं आवडत किंवा कंटाळवाणं वाटतं. पॅशन ही गोष्ट निर्माण केली जाऊ शकत नाही.

      April 1, 2022


  • पाकिस्तानमधला प्रवेश

    पाकिस्तानमधला प्रवेश

    अमेरिकेत पुन्हा जायला मिळेल न मिळेल, पण पाकिस्तानात पुन्हा जायला मिळालं तर मला ते आवडेल, असं मी पहिल्यांदा पाकिस्तानात जाऊन आलो तेव्हा म्हणालो होतो. त्यानंतर मी दोनदा पाकिस्तानात गेलो. गेलो हेही स्वप्न आणि परत आलो तेही स्वप्नच कारण एकाहून एक प्रसंगच जिवावर बेतणारे होते. पाकिस्तानातून परतलो हे सत्य, अगदी निखळ सत्य. अन्यथा पाकिस्ताननामा लिहायला माझी लेखणी शाबूत राहिली नसती.

      July 2, 2025


  • किरणांची किमया

    कोणत्याही वस्तूवर जेव्हा प्रकाशकिरण पडतात तेव्हा ते त्या वस्तूच्या आरपार निघून जाऊ शकतात. अशी वस्तू पारदर्शक असते. साहजिकच तिचा वापर आरशासाठी होणं शक्य नसतं. इतर काही वस्तू अशा असतात की त्यांच्यावर पडणारे प्रकाशकिरण त्यांच्याकडून संपूर्णतया शोषले जातात. अशा वस्तू संपूर्ण अपारदर्शक असतात. त्यांच्या पाठी त्या वस्तूंची छाया पडते. आपलं शरीर अशा वस्तूंमध्ये मोडतं. म्हणून तर सूर्यप्रकाशात किंवा रात्रीच्या वेळी दिव्याच्या प्रकाशात आपली छाया ठळकपणे पडते.

      June 24, 2011


  • सकारात्मक दृष्टीकोन

    जेव्हा आपला दृष्टिकोन सकारात्मक असतो तेव्हा आपण तक्रारी न करता, आहे त्या परिस्थितीचा आपल्या ध्येयाप्रती सदुपयोग करून घेऊ शकतो. कितीही कठीण काळ असला तरी त्यावर मात करून आपण आपलं भविष्य घडवू शकतो. जेव्हा आपण सकारात्मक लहरी आपल्या जीवनात निर्माण करतो तेव्हा आपण सकारात्मक घटना आपल्या आयुष्यात आकर्षित करतो आणि त्याचा आपल्या ध्येयाप्रती उपयोग होतो.

      March 12, 2019


  • याला जीवन ऐसे नाव भाग ३०

    पाणी शुद्धीकरण भाग दहा

    ज्या भागातील पाणी पचायला खूप जड असते, अशा भागात पाणी खूप उकळावे लागते. एक सोळांश करावे. देश ऋतु, रोग यानुसार पाण्याची शुद्धी किती करायची हे ठरवून पाणी एक अष्टमांश, एक चतुर्थांश, किंवा तीन भागातील एक भाग आटवून दोन शिल्लक ठेवावे, वा निम्मे आटवावे.
    या प्रकारे शुद्ध केलेले पाणी वेगवेगळ्या गुणाचे असते.

    पाणी आटवत असताना त्या फेस आला तर समजावे त्यात अशुद्धी आहेत. त्या अशुद्धी जाईपर्यंत म्हणजे फेस नष्ट होईपर्यंत पाणी उकळावे.

    पाणी उकळून गाळून लगेच गरम गरम प्यायल्याने पचनशक्ती लगेचच सुधारते. आम नाहीसा होतो. म्हणून असे पाणी पिणे, हे कफामुळे होणारे अजीर्ण आणि वाता मुळे होणाऱ्या अजीर्णावरील मुख्य औषध आहे.

    केवळ याच दोन आजारात तहान लागली नसेल तरीदेखील असे गरम पाणी सांगितले आहे. पण ते देखील एवढेच प्यावे की खाल्लेल्या अन्नाचा पोटात ओलसर गोळा होईल. त्यापेक्षा जास्ती पाणी क्लेद म्हणजे चिकटपणा निर्माण करते.

    दगड, लाख, कोळसा, गारगोटी, सोन्या चांदीचा गोळा, ( किंवा असेल बिस्कीट पण चालेल.) लाल होईपर्यंत तापवून त्या पाण्यात विझवली तरी देखील पाणी शुद्ध तर होतेच पण या द्रव्यांचे गुणधर्म पण पाण्यात येतात.

    गर्भिणीला डोहाळे काळातील उलटी थांबत नसेल तर मातीचे घट्ट ढेकुळ किंवा मातीचा गोळा, लाल होईपर्यंत तापवून पाण्यात विझवावा. ते पाणी गाळून तिला चमचा चमचा द्यावे. खूप फायदा होतो.

    लहानपणी लोखंडी पळीत फोडणी करून ती ताकावर ओततानाचा आणि नंतर ती पळी ताकात बुडवतानाचा चुर्रऽऽऽऽ हा आवाज ऐकायला किती मज्जा यायची नं ! धावत स्वयंपाकघरात यायचो.

    या लोखंडी पळीतील लोखंडाचा औषधी अंश फोडणीतून ताकात कधी आणि कसा उतरायचा, हे आजीला आणि आईला पण कधी कळलेच नसेल.....

    "फोडणी" ही फक्त भारतातच ! पाश्चात्य तंत्रात फोडणी कुठली नि कुठलं काय. त्यांचे मुख्य अन्न काय तर शिळा पाव त्यात मासाचा तुकडा किंवा शिळ्या मासाचा तुकडा आणि त्याच्याबाहेर पाव ! आत्ता आत्ता त्यांना समजतंय कोशिंबीर वगैरे खावी ते ! रोजच्या रोज जेवण बनवणं, विविध चविष्ट प्रकार बनवणं, आणि मुख्य म्हणजे सर्व आरोग्यदायी बनवणं हे फक्त आजी नि आईच करू शकते. मम्मी नाही. जाऊदे, मोठा विषय नंतर येईल चर्चेला....

    उकळून गार झालेले पाणी (शृतशीत जल ) परतपरत गरम करू नये. ते नीट झाकून ठेऊन, दिवसभरात संपवावे. परत गरम केले तर त्यातील औषधी गुण संपतात. तसेच हे पाणी रात्र उलटून गेली तर हे पाणी नंतर पित्तासह अन्य दोषांना वाढवणारे होते. अजिबात वापरू नये.

    पाण्याच्या शुद्धिकरणाचे एवढे सखोल आणि शास्त्रीय ज्ञान देणारा आयुर्वेद शासन स्तरावर मात्र दुर्लक्षिला जातोय, आणि सामान्यापर्यंत पोचतोय तो विकृत पाश्चात्य स्वरूपात.

    भगिरथाने तप करून पृथ्वीवर आणलेली ही "गंगा" ही शुद्ध होती, तिला आम्ही वैद्यच शुद्ध करणार, त्यात मिसळलेली पाश्चात्य तंत्राची भेसळ, आम्हीच भगिरथाचे वंशज, काढून टाकणार !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021

    06.01.2017

      January 6, 2017


  • श्री गणेश खमेर – काम्पुचिया

    खमेर येथील विघ्नहर्त्याची ही गणेश-मूर्ती १२ व्या शकतील असून आजही त्याच स्थितीत आढळून येते. या मूर्तीचा अभ्यास करताना मूर्तीकाराने इतरत्र आढळणार्‍या मूर्तीचा सखोल अभ्यास करून एक वैशिष्टपूर्ण मूर्ती तयार केलेली आहे.

      June 11, 2012


  • बाळाचं नाव निवडतांना.

    घरात नवीन बाळ जन्माला आलं की त्याच्या नावाची निवड करावयाचा सर्वांचा अुत्साह ओसंडून जात असतो. बाळासाठी योग्य नाव निवडण्यासाठी थोडं मार्गदर्शन येथे केलं आहे.

      March 12, 2011


  • प्रदूषण – एक मुलाकात धुळीच्या आंधी सोबत

    मी निरुत्तर झालो, माझ्याच घरात काय, दिल्लीतल्या ८० टक्के घरांत आंगण नाही किंवा कुठले झाड हि नाही. रस्त्यांवरची झाडे हि दुकानदारांनी, आपले दुकान वाढविण्यासाठी केंव्हाच तोडून टाकली. मोठ्या-मोठ्या कोठीवाल्यांना हि त्यांच्या महागड्या कारांवर पडणारा झाडांच्या पानांचा कचरा सहन झाला नाही. त्यांनी हि झाडांना तोडून टाकले. आता धुळीच्या आंधीला विसाव्यासाठी कुठलीच जागा उरली नाही. थेट लोकांच्या घरात शिरणे तिची हि मजबुरी.

      May 4, 2018


  • आणि जगण्याचा अर्थ गवसला

    आणि जगण्याचा अर्थ गवसला

    २००५ सालचा बालश्री पुरस्कार विजेता ओंकार वैद्य याच्या जीवनावर प्रत्येकाने आवर्जून पाहावा असा एक स्फूर्तिदायक लघुपट. ओंकार वैद्य याचे कौतुक A.P.J. अब्दुल कलाम आणि सचिन तेंडुलकर यांनी केले आहे.

    ..आणि जगण्याचा अर्थ गवसला

    https://youtu.be/9XHJEJmwV3k

      January 11, 2017