वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जो शेजेला घेतो, तो शेजवर जे करेल ते निमुटपणे सहन करायचं असतं हे ओघानंच येतं. आपण आपल्यामुळेच लोकप्रतिनिधींच्या शेजेवर चढवले गेलो आहोत आणि वेळीच जागे झालो नाही, तर अनैसर्गिक बलात्कार अटळ आहे..
April 5, 2018
कालिदास प्राचीन नाही, मध्ययुगीन नाही. तो ‘होऊन गेलेला’ नाही, तो ‘आहे तसाच’ आहे. तो काल होता, आज आहे आणि उद्याही राहील. तो एका प्राचीन भाषेच्या नागमंडलात खिळलेला नाही, तो कालनिरपेक्ष आहे. ‘मेघदूत’ निर्माण करणार्या कालिदासाची पदवी तरी कशी ठरवावी ? तो निसर्गाकडून पाठ घेणारा आणि पाठ देणारा नाही. तो केवळ प्रेमिकही नाही. मग त्याचे सृष्टीशी नाते तरी काय ? सर्व नात्यांपलीकडचे त्याचे नाते अवघ्या आसमंताशी आहे. तो आणि निसर्ग असे द्वैत मुळातच मावळलेले आहे. उरले आहे फक्त तादात्म्य.”
June 29, 2022
"आहीस्ता चल जीन्दगी,
अभी कर्ज चुकाना बाकी है..!
कुछ दर्द मिटाना बाकी है,
कुछ फर्ज्ञ निभाना बाकी है..!"
आज इसवी सन २०१६ चा शेवटचा दिवस..
वर्षाचे दिवस, महिने व शेवटी आख्ख वर्षच कधी आलं आणि कधी सरलं हे कळलही नाही एवढा आयुष्याचा वेग वाढलाय..
एखादी गोष्ट प्राप्त व्हावी म्हणून धडपड करून ती मिळवावी तोच आयुष्य सर्रकन पुढं सरकत आणि मेहेनतीने प्राप्त केलेल्या त्या गोष्टीचा नीटसा आस्वादही घेता येत नाही..
"रफ्तारमे तेरे चलने से,
कुछ रुठ गये, कुछ छुट गये..
रुठोंको मनाना बाकी है,
रोतोंको हसाना बाकी है..!"
तसच दु:खाचही..! एखादं खुप जवळचं माणूस हरवावं पण त्याच दु:ख करायलाही वेळ नसतो हल्ली आपल्याकडे..
"कुछ हसरते अभी अधुरी है,
कुछ काम भी जरूरी है..
ख्वाईशें जो घुट गयी इस दिल मे,
उनको दफनाना बाकी है..!"
वर्षाच्या सुरुवातीस नविन वर्षात आपण काय काय करायचं हे ठरवत असतो..त्यातल्या काही गोष्टी होतात, काही अर्धवट होतात तर काहींवर पाणी सोडांव लागतं..तरीही दर नविन वर्षाच स्वागत आपण त्याच उत्साहानं करत असतो कारण नविन वर्षात काहीतरी आणखी चांगलं घडेल ही उमेद असतेच..
आयुष्याबरोबर चालावंच लागतं..तु पुढे चल, मी येतो मागून असं म्हणून नाही चालत..
"तू आगे चल, मै आता हूॅं
क्या छोड तुझे मै जी पाऊंगा?
आहीस्ता चल जिंदगी
अभी कई कर्ज चुकाना बाकी है..!!"
अलविदा २०१६..!!
-- नितीन साळुंखे
December 31, 2016
आता यापुढे रॉसने फक्त अनोफेलेस डासाच्या मादीच वरच पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. डासांचे विच्छेदन करीत असताना मायक्रोस्कोप खाली डासांच्या प्रत्येक अवयवाचा अभ्यास करण्यात तो तासनतास मग्न असे. सिकंदराबाद मधील प्रचंड उन्हाळ्यात 45 डिग्री 47 डिग्री तापमान असताना विच्छेदन केलेले डास जराशा वाऱ्याने सुद्धा उडून जाऊ नयेत म्हणून खोलीतील एकमेव झुलता पंख आई हलवता येत नसे. विच्छेदन केलेल्या डासांवर जमा झालेले असंख्य किडे रॉसच्या व सहाय्यकांच्या डोळ्यात स्वल्पविराम कानात शिरण्याचा प्रयत्न करीत. काही गुणगुणगुणारे डास आपल्या मेलेल्या जातभाईंना पाहून जणू रागाने त्यांच्यावर हल्ला करीत.
मायक्रोस्कोप लेन्स हलविण्याचे स्क्रू रॉसच्या शरीरावरील टप टप पडणाऱ्या घामाच्या धारांनी गंजून गेले होते. त्यातच त्याच्या जवळील मायक्रोस्कोप ची एकमेव लेन्स निकामी झाल्याने रॉस हतबल झाला होता. त्याच्या मनावर इतके दडपण होते की दुपारच्या वेळी सुद्धा त्याला स्वतःचे घर सापडणे कठीण होत असे. सतत त्याला डोळ्यासमोर काळोखातील हॉस्पिटलचा व्हरांडाच दिसत असे.
१५ ऑगस्ट १८९७ रोजी रॉसच्या मदतनीसानेत्याला अभिप्रेत असलेल्या जिवंत पिंगट डासांची फौज पकडून आणून दिली. रॉसने हुसेन खान नावाच्या एका मलेरिया ग्रस्त रुग्णास मच्छरदाणीत झोपून त्याच्या अंगावर हे नवीन डास सोडले. रुग्णाचे रक्त शोषून डास टरटरुन फुगले. हुसेन खानचा रक्तातील क्रिसेंट स्थितीतील परोपजीवी डासांचा शरीरात पसरले. हुसेन खान ला प्रत्येक डासामागे एक आणा याप्रमाणे दहा आणे बक्षिसी मिळाली. १७ तारखेला यातील दोन डासांच्या विच्छेदनात कोणताही बदल दिसला नाही. १९ तारखेला केलेल्या दुसर्या दोन डासांच्या विच्छेदनात डासांच्या जठर आवरणाच्या पृष्ठभागावर पारदर्शक बुडबुड्यासारख्या पांढऱ्या पेशी अंदाजे ( 10 Micron size )दिसत होत्या. साधारणतः एखाद्या बारीक टिंबा एवढ्या आकाराच्या !
२० ऑगस्ट हा अतिशय उकाड्याचा दिवस होता. रॉसने वॉर्ड मध्ये जाऊन हुसेनला तपासले. तो आजारातून पूर्णपणे बरा झाला होता. नाश्ता करून रॉस थेट उरलेल्या काही डासांच्या विच्छेदनाकडे वळला. या डासांच्या विच्छेदनात जठर आवरणावरील नवीन तयार झालेल्या पेशी या डासाच्या जठर पेशींपेक्षा ठळकपणे वेगळ्या आहेत असे लक्षात आले. तास तास निरीक्षण करताना त्याला या प्रकारच्या अनेक पेशी दिसू लागल्या व या पेशींमध्ये काळ्या रंगाचे कणांचे पुंजके दिसत होते. या सर्व पेशींची चित्रे आपल्या वहीत नोंदवून थकलेला रॉस रात्री घरी गेला.
या काळ्या रंगाच्या पुंजक्याने तो चक्रावून गेला. हेच ते वाढलेले मलेरियाचे परोपजीवी आहेत की काय आणि जर तसे असेल तर पुढील २४ तासात त्यांचा आकार उरलेल्या व पकडून जिवंत ठेवलेल्या डासांमध्ये नक्कीच वाढेल. या विचारांच्या कल्लोळात रॉस रात्रभर तळमळत होता. त्यातूनही उरलेले डास जर मरून गेले तर त्यांची शरीरे कुजतील आणि आणि नंतर विच्छेदनातून काहीही शोधणे अशक्य होईल अशीही एक जर आणि तरची भीती मनात डोकावत होती.
२१ ऑगस्ट चा दिवस उजाडला. रॉस घाईघाईने प्रयोगशाळेत गेला आणि त्याने शेवटच्या काही डासांचे विच्छेदन सुरू केले. या डासांच्या जठरपेशीत नवीन तऱ्हेच्या २१ पेशी तयार झाल्या होत्या व प्रत्येक पेशीत काळ्या कणांचा पुंजका दिसत होता. ही प्रत्येक पेशी म्हणजे मलेरियाच्या परोपजीवाची डासाच्या शरीरातील महत्त्वाची अवस्था होती.
रॉस आनंदाने नाचू लागला. अखेर त्याच्या जीवनातील सोनेरी पहाट उजाडली होती. ती रोमहर्षक बातमी रॉसने ताबडतोब मॅन्सनला कळविली व सोबत या आनंदी क्षणाच्या अनुभूतीची कविताही पाठवली. तेव्हापासून २० ऑगस्ट हा डास दिवस (mosquito day) म्हणून साजरा केला जातो.
चार सप्टेंबरला सिकंदराबाद मून थेट आपल्या बंगलोरच्या घरी आला. शांत चित्ताने या संशोधनातील आपली निरीक्षणे व चित्रे व्यवस्थित उतरवुन त्याने तो उल्लेख इंग्लंडला पाठवून दिला. लेखाचे शीर्षक होते डासाच्या जठार पेशीत आढळलेले मलेरिया परोपजीवी या स्थितीचे काळे पुस्तके(black Pigments) हा लेख British Medical Journal december 18, 1897 च्या अंकात प्रसिद्ध झाला.
डॉ. अविनाश वैद्य
May 3, 2019
आपल्या गरजांना आपण इतकं मोठं करून ठेवलंय की आवश्यक आणि गरजेचं यामधील दरी दिवसेंदिवस अगदी बारीक होत चाललीय. साऱ्या अनावश्यक गोष्टी आज आपल्याला गरजेच्या आणि आवश्यक वाटू लागल्यायत , इतकंच नव्हे तर या गरजांच्या वाढत्या भारापुढे आपण अक्षरशः गुढगे टेकून शरण येत चाललो आहोत.
December 23, 2021
गणेशोत्सवात आणि स्पर्धेतही भाग घ्यायची, दोघींची ती पहिलीच वेळ होती! आमच्या सोसायटीमध्येच कार्यक्रम होता. प्रेक्षक म्हणून बसलेले सगळे चेहेरे तसे ओळखीचे होते, तरीही ह्यांच्यासाठी हातात माईक धरून, सर्वांसमोर उभं राहून काही करून दाखवण्याचा अनुभव तो पहिलाच होता.
January 30, 2022
वांद्रे पूर्व हा तसा गर्दी आणि दाटीवाटीच्या वस्तीमुळे गजबजलेला भाग. कारण याच भागात महत्वाची कार्यालयं, कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि न्यायालय वसली आहेत. या अति महत्वपूर्ण ठिकाणांपैकी आपण कुठेही जाणार असाल किंवा पूर्वेला जर काही कामा निमित्त आले असाल तर इथल्या गणेश मंदिराला अवश्य भेट द्या;
July 17, 2013
५ पॅरा कमांडोंनी मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान केलेल्या या धाडसी कारवाईत, तब्बल ४० ते ५० दहशतवाद्यांचा निप्पात केला होता.
September 29, 2021
त्याच्याबरोबरच भारतीय चित्रसृष्टीतले प्रणयाचे पर्व अस्ताला गेले. अल्लड, खोडकर, बालीश ,धीरगंभीर , उत्कट,मनस्वी,अस्सल हे सारे प्रणयाचे, रोमँटिझमचे रंग हा जादूगार जाताना बरोबर घेऊन गेला. सतत भव्योदात्त असे काहीतरी पाहणारे निळ्या डोळ्यांचे मायाजाल आवरते घेऊन हा अवलिया आपला खेळ संपवून गेलाय. फार कमी नजरांना असे वरदान असते आणि पडलेली स्वप्ने खरी करण्याचे सामर्थ्य असते.
November 27, 2022
एकूण कचऱ्यातील धूळ आणि इतर अंश सोडता जवळजवळ ८० ते ८५ टक्के भागावर परत काहीना काही प्रक्रिया करून तो पुन्हा वापरात आणता येतो. अगदी वर वर्णन केलेला ओला कचरासुद्धा. भाजी मंडईत रोज पडणारा भाज्या आणि खराब झालेल्या फळांचा भागही वापरात आणता येतो तर हॉटेलात उरलेले अन्नही खाण्याच्या नव्हे पण इतर प्रकारे उपयोगात आणता येते.
May 30, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti