वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
गुरु आणि सदगुरु यातील भेद न समजल्यामुळे परमार्थात अनेक चांगले साधक वाया जातात असे दिसून येते. विद्यागुरु , कलागुरु , मंत्रगुरु आणि मोक्षगुरु असे गुरुंचे स्थुलमनाने चार प्रकार आहेत . विद्या आणि कला शिकविणारे विद्यागुरु आणि कलागुरु होत .
December 6, 2017
चवीला कडू असली तरी आपल्या कडू चवीने काही पदार्थांना वेगळीच चव आणते.अशी ही मेथी आपण फोडणी मध्ये वापरतो.डाळ शिजवताना त्यात थोडी मेथी घालतात,तसेच गोवा कारवार भागात माशांची अथवा कैरी,अंबाड्यांची उडीदमेथी हि आमटी बनवतात तसेच गोव्यात बारशाला बाळंतीणिकरीता खास उकडे तांदूळ व मेथी घालून खीर बनवितात जिला मेथीची पेज म्हणतात.
अशी हि मेथी आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात असतेच असते.आपण मसाल्या मध्ये वापरतो त्या मेथीच्या बिया होय.मेथीचे लहान क्षूप असते त्याची पाने भाजी मध्ये वापरतात.
मेथी चवीला कडू असते आणी उष्ण असते.ती शरीरातील वात आणि कफ दोष कमी करते पण पित्त वाढवू शकते.
हि मेथी देखील ब-याच घरगुती औषधांमध्ये उपयुक्त आहे.
१)शरीरात वात भरल्याने हाता पायांना कळा येत असल्यास मेथ्या तूपात भाजून पीठ करावे व ह्याचे अगदी लहान लाडू वळावेत आणि रोज एक लाडू खावा साधारण पणे आठ दिवसात फरक पडतो.
२)संडासातून आव पडत असल्यास १/२ चमचा मेथी चुर्ण दह्यात मिसळून खावे.
३)प्रसुतीनंतर अंगातील दुःख कमी होण्यास आणि अंगावरचे दुध वाढण्यासाठी ४ चमचे मेथी रात्री पाण्यात भिजत घालाव्यात आणि सकाळी बारीक वाटून त्यात नारळाचा रस व गूळ घालून शिजवावे आणि थोडे तूप घालून बाळंतीण बाईला रोज खायला द्यावे.
४)मधुमेहात रोज सकाळी उपाशी पोटी १ चमचा मेथी चुर्ण गरम पाण्यासह घ्यावे.
५)६ महिन्यानंतर लहान मुलांना त्यांच्या तीन वेळच्या खाण्यामध्ये रात्री मेथी भिजत घातलेले पाणी एक एक चमचा घालावे ह्या मुळे कडू चव पोटात जाते आणि बाळाला पोटाच्या तक्रारी देखील वारंवार होत नाहीत.
मेथी खाण्याचा अतिरेक केल्यास एॅसीडीटी,संडासला पातळ होणे,अंगावर उष्णतेचे फोड येणे अशा तक्रारी होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
September 23, 2016
मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस “पत्रकार दिन” म्हणून साजरा केला जातो.
सुधारकांच्या पहिल्या पिढीने पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करुन नवी जीवनमूल्ये वृत्तपत्र माध्यमाव्दारे रुजविली. त्या परंपरेचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी घातला.
बंगालमध्ये राजाराम मोहन रॉय यांनी सुधारणांचे नवयुग आरंभिले तेच कार्य बाळशास्त्री जांभेकरांनी महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात नवविचारांची लाट निर्माण करण्यासाठी केले.प्रयत्नशिल व वैचारिक चळवळ सुरु करुन त्यांनी समाज सुधारणा व शिक्षणाची अभिवृध्दी हेच आपले जीवनकार्य मानले. त्या निमित्ताने हा विशेष लेख . . . .
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी अल्पावधित महाराष्ट्राच्या जीवनावर विलक्षण छाप टाकली आणि राष्ट्रीय विकासासाठी पोषक अशा बहुविध क्षितिजाचा विकास केला. त्यामुळे त्यांना पश्चिम भारतामधील प्रबोधनाचे प्रवर्तक म्हटले जाते. मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी त्यांनी बजावलेले कार्य हे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदविण्यासारखे आहे.
मराठी पत्रकारितेचा पाया श्रेष्ठ दर्जाच्या संपादकाने घातला. त्यामुळे परंपरेचा सुवर्णप्रवाह विकसित झाला. प्रथम श्रेणीचे आद्य वृत्तपत्र म्हणून “दर्पण” पत्राची कामगिरी लक्षणीय अशी ठरली आहे. दर्पण हे वृत्तपत्र १८३२ मध्ये काढून मराठी वृत्तपत्रव्यवसायाचा त्यांनी पाया घातला. त्यांनीच १८४० मध्ये दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक काढले. बाळशास्त्री जांभेकर यांचा लोकशिक्षण व ज्ञानप्रसार हाच हेतू ,या उपक्रमांमागे होता.
सुधारकांच्या पहिल्या पिढीने पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करुन नवी जीवनमूल्ये वृत्तपत्र माध्यमाव्दारे रुजविली. त्या परंपरेचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी घातला. बंगालामध्ये राजाराम मोहन रॉय यांनी सुधारणांचे नवयुग आरंभिले तेच कार्य बाळशास्त्री जांभेकरांनी महाराष्ट्रात केले.
विलक्षण जीवन कहाणी -
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावी १८१२ मध्ये बाळशास्त्रींचा जन्म एका पुराणिकाच्या घरी झाला.. अज्ञान,दारिद्रय आणि रुढीप्रिय समाजाच्या अंध:कारातून बाहेर पडण्यासाठी सन १८२५ मध्ये ते मुंबईत आले. मुंबईत बापू छत्रे यांच्या निवासस्थानी राहून त्यांनी अध्ययन सुरू केले. आपल्या विलक्षण बुध्दीचातुर्याने व तल्लख स्मरण शक्तीने त्यांनी त्या वेळच्या मुंबईतील सार्वजनिक जीवनावर विलक्षण छाप टाकली. सन १८३० मध्ये हिंद शाळा पुस्तक मंडळाचे सेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि एक नवे क्षितिज त्यांच्यासाठी खुले झाले. सन १८३१ मध्ये त्यांनी ग्रंथ रचनेस प्रारंभ केला. त्यानंतर वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या पत्राची मुहूर्तमेढ रोवली.
मराठी पत्रकारितेच्या विचार विश्वात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरासारखी विलक्षण कामगिरी बजावणारे बाळशास्त्री जांभेकर हे त्यामुळे युगप्रवर्तक पत्रकार ठरले. सन १८३४ मध्ये भारतातील पहिले प्राध्यापक ( “प्रोफेसर”) होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. एलफिस्टन निधीतून त्यांच्यासाठी स्वतंत्र अध्यासन निर्माण करण्यात आले. सन १८४५ मध्ये राज्यातील शिक्षण विभागाचे संचालक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. प्राध्यापक या नात्याने अध्ययन, अध्यापन संशोधन व विस्तार ही कार्ये पार पाडण्यात त्यांनी धन्यता मानली. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात नवविचारांची लाट निर्माण करण्यासाठी वैचारिक चळवळ सुरु केली. समाज सुधारणा व शिक्षणाची अभिवृध्दी तेच त्यांनी आपले जीवनकार्य मानले.
अष्टपैलू व्यक्तिमत्व -
आचार्य बाळशास्त्रीं जांभेकर यांच्या समग्र जीवनाकडे पाहिले असता त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे विलोभनीय दर्शन घडते. त्यांना देशी व विदेशी ९ भाषा अवगत होत्या. मराठी, इंग्रजी, संस्कृत प्रमाणेच बंगाली, कन्नड इत्यादीप्रमाणे त्यांनी विदेशी भाषांचाही अभ्यास केला होता. त्यांच्या अभ्यासविषयात भाषाशास्त्रे, इतिहास व संस्कृती, गणित, पदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र, पुरातत्वविद्या इत्यादीचा समावेश होता. या सर्व विषयात त्यांनी मराठी भाषेत ग्रंथरचनाही केली.
त्यांच्या कार्याबद्दल तत्कालीन वृत्तपत्रांमध्ये प्रामुख्याने बॉम्बे टाईम्स, कुरियर, ज्ञानोदय, ओरिएंटल स्पेक्टेटर इत्यादी पत्रांनी वारंवार प्रशंसा केलेली आढळते व त्यांच्या समाजकार्याची नोंदही घेतलेली दिसते. तत्कालीन शाळा खात्याने त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. मुंबई न्यायालयाचे त्यावेळचे न्या. सर टी. ई. पैरी यांनी त्यांचा गौरव केला होता. रे.डॉ. विल्सन, न्या. चंदावरकर या तत्कालीन विद्वानांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या लोकाभिमुख विदवत्तेचा गौरव केला होता.
भारतीय राष्ट्रवादाचे पितामह दादाभाई नौरोजी हे जांभेकरांचे विद्यार्थी होते. त्यांनी गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले आहे, ते पश्चिम भारत खंडातील अर्वाचीन विव्दान मुकुटमणी, प्रख्यात पं. अव्दितीय विव्दान होते. “मुंबईना समाचार” या गुजराथी पत्राने या शिक्षण महर्षींची स्मृती भारतीयांनी सतत जागृत ठेवावी असे आवाहन केले होते. १७ मे १८४६ रोजी जांभेकरांचा आकस्मिक मृत्यू झाला. पण अल्पावधित त्यांनी बजावलेले कार्य महाराष्ट्र जीवनाचा कायापालट करणारे ठरले.
समाजसुधारक चळवळीचा आदर्श -
प्राध्यापक या नात्याने केवळ अध्यापन व संशोधनात ते व्यग्र होते असे नाही तर त्यांनी राष्ट्रीय जीवनात अनेक प्रागतिक चळवळींना गती दिली. सामाजिक प्रबोधनासाठी वृत्तपत्रासारखे दुसरे साधन नाही हे ओळखून त्यांनी बंगाली वृत्तपत्रांपासून प्रेरणा घेतली !
राजाराममोहन रॉय यांचे कार्य आणि बंगाली पत्रांनी केलेला झंझावाती प्रचार यामुळे ते भारुन जाऊन जांभेकरांनी नव्या पत्राचा संकल्प केला व तो कृतीत आणला. ध्येयवादी बंगाली पत्राचा वस्तुपाठ जांभेकरांनी गिरविला व त्यातून नवीन लोकचळवळ महाराष्ट्रात सुरु झाली. गंगा - जमनी व्दैभाषिक पत्र ही परंपरा बंगालातून महाराष्ट्रात पुढे आली. अशा या थोर आद्य पत्रकारास आपले लाख, लाख प्रणाम !
January 6, 2017
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
September 10, 2018
गावागावागणिक प्रत्येक तळ्याला, लेकला त्या गावाची परंपरा व इतिहास जोडलेला आहे, कोल्हापूरचा रंकाळा, नागपूरचा शुक्रवार, हैदराबादचा हुसेनसागर, नैनितालचा नैनी या व अशा अनेक तलावांच्या सुंदर आठवणी मनाला आगळा वेगळा आनंद देतात. काही सरोवरे मात्र माझ्या अंतर्मनाला विलक्षण आनंद देत गेली ती त्यांच्या निर्मितीचा छाती दडपून टाकणारा इतिहास, त्यांची अती भव्यता व निसर्गाच्या वैविधतेमुळे ! सरोवरांच्या भटकंतीची मजा औरच आहे.
April 15, 2019
पर्यावरण या विषयात ‘पर्यावरणप्रेमी’ ही पदवी मिळवण्या करता पदवैच्छुक जमले होते. आचार्यांनी सगळ्या पदवैच्छुकांना बोलावले व सुरुवात केली. “माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, परीक्षेत एकच प्रश्न असणार आहे. पण आधी तुम्हाला एक गृहपाठ देत आहे. तुम्ही त्याचा नीट अभ्यास करून मग परीक्षे करता यायचे आहे.
October 20, 2019
_ ळी या अक्षराने संपणारे दोन अक्षरी शब्द
(१) फूल उमलण्याआधीची अवस्था - कळी
(२) पिकावर पडणारी किड -- आळी
(३) गालावर पडणारा खड्डा -- खळी
(४) साखर बनवल्यावर उरते- मळी
(५) बंदूकीला असते -- नळी
(६) पंचपात्राची सोबतीण -- पळी
(७) एका हाताने वाजत नाही -- टाळी
(८) साडी सोबत असते -- चोळी
(९) बागेचा देखभाल करतो -- माळी
(१०) भांड्याचा एक प्रकार --
(११) तूर /मुगाच्या करतात -- डाळी
(१२) करवंदांची असते -- जाळी
(१३) भाजी चिरण्यासाठी वापरतात -- विळी
(१४) फाल्गुन महिन्यातील एक सण- होळी
(१५) आठ पाय असलेला किडा -- कोळी
(१६) भिक्षा मागण्यासाठी उपयोगी -- झोळी
(१७) चोरांची/ दरोडेखोरांची -- टोळी
(१८) होळीेला केला जाणारा पदार्थ - पोळी
(१९) लाकडाची बांधतात -- मोळी
(२०) पुस्तकात शब्दांच्या असतात -- ओळी
(२१) फांद्या नसलेली वनस्पती --V केळी
(२२) एक पाळीव प्राणी -- शेळी
(२३) एकत्र जन्माला आलेली -- जुळी
September 3, 2016
मी “बाबासाहेबांवर” काही लिहिले.. लाेकांनी मला फोन करून विचारले “तुम्ही बौध्द किंवा दलित आहात का…?” मी आपल्या ” शिवछत्रपतींवर”काही लिहिले.. लाेकांनी मला फोन करून विचारले “तुम्ही मराठा आहात का…?”
September 4, 2017
चपात्या करताना ओट्यावर कागदाचा अवश्य वापर करावा. कारण चिकट कणिक, तेल, तूप, सांडून ओटा मेणचट होतो. मग तो धुतल्याशिवाय स्वच्छ होत नाही.
July 31, 2024
गुणधर्म म्हणजे आपल्यातलीच एक विशेषता…….मानवाचा खरा गुणधर्म म्हणजे मानवता, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, ही मानवियता … जसे जलाचा धर्म आहे तहान भागवणे व्याकुळता दुर करणे, सुर्याचा धर्म आहे सुष्टीला प्रकाश देणे. सजीवांकरीता जीवनसत्त्व निर्माण करणे. वायुचा धर्म आहे प्राण़वायु देणे, अग्निचा धर्म आहे उष्णता देणे.
August 2, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti