वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
गुगलवर हवं ते सापडत नाही? वापरा या 10 ट्रिक्स
अनेकदा आपल्याला हवा सर्च रिझल्ट गुगलवर मिळत नाही. मग ते फोटो असो वा गाणी, एखादी विशिष्ट माहिती. सर्च करताना हजारो रिझल्ट्सची यादी समोर येते. असं आपल्यासोबत नेहमीच घडतं. अशावेळी कुठल्या वेबसाईटवर आपणास अचूक माहिती मिळेल हे सांगणे कठीण जातं आणि प्रत्येक वेबसाईट उघडून पाहण्याशिवाय पर्याय उरत नाही. बर्याचवेळा निरनिराळ्या प्रकारची माहिती गुगलवर आपण शोधतो आणि आपल्याला हव्या असलेल्या माहितीसाठी महत्त्वाचा वेळ वाया जातो. अशावेळी कंटाळा येऊन काम लांबत जातं. पण आपणच जर आपली माहिती शोधण्याची पद्धत बदलली तर योग्य ती माहिती लवकर शोधायला गुगल आपल्याला मदत करतं आणि परिणामी आपला वेळही वाचतो.
गुगलवर माहिती शोधताना काही इंटरेस्टिंग ट्रिक्स अर्थात कि-बोर्डवरील काही विशिष्ट चिन्हांचा वापर केल्यास गुगलला आपला प्रश्न व्यवस्थित कळतो. त्यासाठी:
1. आपल्या प्रश्नामध्ये ' + ' चिन्हाचा वापर करावा : समजा गुगलवर आपणास मोबाईलची हिस्ट्री (उदा: विन्डोज 8 चा इतिहास) शोधायचा असल्यास गुगलवर ' Windows8 + History ' असे सर्च केल्यास गुगलवर हे दोन्ही शब्द असलेलीच पाने समोर दाखवितो.
2. आपल्या प्रश्नामध्ये ' - ' चिन्हाचा वापर करावा : समजा जर आपणास गुगलवर 'sachin' असे शोधायचे असेल. पण येणार्या यादीमध्ये 'sachin tendukar' च्या माहितीची पाने सहाजिकच जास्त असतील. अशावेळी गुगलला खास एखादा शब्द शोधू नकोस असे जर सांगायचे असेल, तर 'sachin -tendukar' असे टाईप करुन सर्च करावे. म्हणजे मग गुगल येणार्या उत्तरामध्ये 'tendukar'' हे नाव नसलेल्याच वेबसाईटची यादी दाखवेल.
3. आपल्या प्रश्नामध्ये ' ~ ' चिन्हाचा वापर करावा : गुगलवर एखादी माहिती शोधताना येणार्या उत्तरामध्ये त्या शब्दाचा समानार्थी शब्द असल्यास ती पाने देखील गुगल दाखवितो.
4. एखाद्या ठराविक वेबसाईटवर शोधायचे असल्यास : सध्या बर्याच वेबसाईटवर सर्चची सेवा उपलब्ध असते तरीही एखाद्या वेबसाईटवर सर्च करण्याची सोय उपलब्ध नसल्यास गुगलवर त्या वेबसाईटचे नाव आणि आपणास शोधायची माहिती दिल्यास गुगल फक्त त्याच वेबसाईटवर ती माहिती शोधून उत्तर देतो.
उदा. ' www.facebook.com mobile ' असे दिल्यास गुगल फक्त www.facebook.com वर mobile हा शब्द शोधेल.
5. एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असल्यास : आपणास जर फक्त एखाद्या शब्दाचा अर्थ हवा असल्यास गुगल त्या शब्दाच्या आधी ' define: ' असे दिल्यास गुगल त्या शब्दाची माहिती असलेल्याच वेबसाईटची यादी दाखवितो. उदा. 'Define: Hard Disk ' असे शोधल्यास गुगल ' Hard Disk ' या शब्दाचा अर्थ सांगणार्या वेबसाईटची यादी देईल.
6. मिळती-जुळती वेबसाईट शोधण्यासाठी : बर्याच वेळेस आपणास एखादी वेबसाईट त्यावरील छान आणि उपयोगी माहितीमुळे आवडते. परंतू त्या वेबसाईट प्रमाणेच इतरही त्या विषयीच्या आणि त्याच प्रकारची माहिती असलेल्या वेबसाईट आहेत का ते शोधण्यासाठी ' related: ' या शब्दाचा उपयोग करावा. उदा. ' related:http://www.gmail.com/ ' असे शोधल्यास गुगल 'www.gmail.com ' प्रमाणेच माहिती असणार्या वेबसाईटची यादी देईल.
7. जसाच्या तसा शब्द शोधायचा असल्यास : जर एखादा शब्द गुगलवर जसाच्यातसा शोधायचा असल्यास असल्यास त्या शब्दाच्या पुढे आणि मागे अवतरण चिन्हाचा (Double Inverted Commas) म्हणजेच " " याचा वापर करावा. उदा. गुगलवर "contact us" असे शोधल्यास ज्या पानावर हे दोन्ही शब्द एकत्र असतील त्याच पानांची यादी समोर देईल.
8. आपल्या प्रश्नामध्ये ' * ' चिन्हाचा वापर करावा : गुगलवर एखादा शब्द शोधताना तो शब्द पूर्ण माहित नसल्यास अथवा त्या शब्दाच्या संबंधित इतरही शब्द सापडल्यास ती देखील दाखवावी असे आपणास जेव्हा हवे असेल तेव्हा ' * ' चिन्हाचा वापर करावा. उदा. गुगलवर 'friend* ' असे शोधल्यास friend ह्या शब्दासोबत friends, friendship या त्याच शब्दाशी संबंधीत शब्दांचादेखील उत्तरामध्ये विचार करतो.
9. आपल्या प्रश्नामध्ये ' ? ' चिन्हाचा वापर करावा : एखाद्या शब्दाची पुर्ण स्पेलिंग माहित नसल्यास ' ? ' चिन्हाचा वापर करावा. उदा. 'fri??d' असे सर्च केल्यास गुगल त्या प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य ती अक्षरे घेऊन त्या माहितीची पानं दाखवितो.
10. आपल्या प्रश्नामध्ये ' AND अथवा OR ' शब्दाचा वापर करावा : एखाद्या वेळेस आपल्याला दोन शब्दांना मिळून एकत्रित सर्च करायचे असते अशा वेळी 'AND अथवा O ' शब्दाचा वापर करावा. उदा. जर गुगल मध्ये सर्च करताना ' Mobile or Books ' सर्च केल्यास गुगल ज्या पानावर या दोन्ही शब्दांपैकी एखादा जरी शब्द असल्यास ती पाने दाखवितो तर या उलट ' AND ' शब्दाचा वापर केल्यास ती दोन्ही शब्द असलेलीच पाने दाखवितो.
- तुषार भामरे
August 16, 2017
आंबा आवडत नाही अशी व्यक्ती जगात सापडणारच नाही. आंबा अस्सल भारतीय आहे. अगदी वेद, पुराण, उपनिषदात त्याचा उल्लेख आढळतो. भागवतात मंदार पर्वतावर आंब्याचे झाड आहे असे वर्णन आहे. बुद्ध चरित्रात गौतम बुद्ध आंब्याच्या झाडाखाली विश्रांती घेत होते याच्या कथा आहेत.
September 21, 2023
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग 35
नैवेद्यम् समर्पयामी - भाग नऊ
देवाचे जेवण पूर्ण झाल्यावर ताम्हनात तीन पळ्या पाणी सोडायला सांगितले जाते. जर भटजींनी म्हटलेले मंत्र नीट ऐकलेत, तर यातील अर्थ लक्षात येतील. नाहीतर एकाबाजूने भटजी मंत्र म्हणताहेत, आणि दुसऱ्या बाजूला पूजा करताना यजमान मोबाईल वर बोलाताहेत, आणि यजमानीण आपला मेकअप करतेय, असे असेल तर हे केवळ कर्मकांड होते आहे असे समजावे. मग कावळे काव काव करायला टपलेले आहेतच. "अशी कर्मकांडे करण्यात वेळ कशाला घालवा ? जो नाहीच आहे त्याला नैवेद्य तरी कशाला दाखवा." वगैरे वगैरे.
तर भटजी असं म्हणतात, तीन वेळा ताम्हनात पाणी सोडा.
नैवेद्यान्तरेण आचमनीयम् समर्पयामि ।
हस्तप्रक्षालनम् समर्पयामि ।
मुखप्रक्षालनम् समर्पयामि ।
जेवणानंतर एक वेळा आचमन करावे. देवाचे नाव घेऊन एक पळी पाणी तळहातावर घेऊन पिणे म्हणजे आचमन करावे.
खरंतर प्रत्येक घासच देवाचे नाव घेत तोंडात घालायचा असतो. निदान तसा भाव तरी ठेवायचा. "आतले अन्न पचवायला मी आता देवाला सांगितलेले आहे, आता मला काळजी नाही, त्यातील गुणदोष तो बघेल."
खाताना भीती नसावी आणि खाल्ल्यानंतर आठवण न यावी. या दोन्ही गोष्टी देवाच्या स्मरणाने साध्य होतात. म्हणूनच भगवंत म्हणतात, "तुझा अधिकार फक्त कर्म करण्यापुरता. ( फक्त माझे स्मरण करत अन्न गिळायचे...) म्हणजेच केलेले कर्म तू मला अर्पण करणे. मी तुला त्याचे योग्य ते फळ, वेळ आल्यावर देणार आहे. यावर विश्वास ठेवायचा. म्हणजे पचन सुलभ होते.
आचमन करण्याने, अन्ननलिकेला आतील बाजूला लागलेले अन्न पुढे ढकलून अन्न नलिका धुतली जाते. एवढंच पळीभर पाणी जेवणानंतर घ्यावे, हा पण एक सोयीस्कर अर्थ.
जेवणानंतर देवाचे हाय धुवायला पाणी दिले जाते, तोंड धुवायला, चूळ भरायला, त्याच्या हातावर पाणी घातले जाते. केवढी एकरूपता साधली जाते. आपल्याकडे जेवायला आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना सुद्धा आपण असाच उपचार करावा. ( केवळ व्हीआयपी पाहुण्यांना नको )
त्याही आधी जेवल्यानंतर हात धुवायचे असतात आणि खळखळून चूळ भरायची असते, एवढे तरी सांगितले गेलंय.? कोणासाठी सांगितले असेल हे कर्मकांड ? देव जो स्वतः निर्लेपी, निर्मोही, निर्गुण निराकार आहे त्याच्यासाठी ???
जे जे देवासाठी ते ते देहासाठी.
वीतभर वाटीत बोटं बुचकळली आणि टीचभर पेपरला तोंडं पुसली की झालं हस्तमुख प्रक्षालन ! काय चाललं आहे ? कुठे भारतीय संस्कारातील दोन्ही हात स्वच्छ धुणे, खळखळून चुळा भरणे आणि कुठे पाश्चात्य प्रकारातील वाटीभर पाण्यात फक्त एका हाताची बोटे बुडवणे आणि ओठावरून कागद फिरवणे ?
नियमितपणे जर पाण्याने खळखळून चुळा भरल्या जात असतील तर दात किडत पण नाहीत, चुळ भरण्याने दातात अडकलेले अन्नकण बाहेर निघून जातात. आणि दाताला किड लागण्यापासून वाचवले जातात, म्हणून काही खाल्ल्यानंतर तोंड धुवावे, हात धुवावेत, हे देवपूजेच्या माध्यमातून दररोज सांगितले जाई.
पाश्चात्य देशात हस्त, मुख प्रक्षालन कसे करावे हे माहितीच नव्हते, वेळ मिळेल तेव्हा, पावासारखे सुके पदार्थ फिरत फिरत खायचे, आमटी भाजी, चटणी लोणचे असे ओले पदार्थच त्यांच्या ताटात न आल्याने, हाताला अन्न चिकटत नव्हते. त्यामुळे तोंड, हात धुणे हा संस्कार त्यांच्या संस्कृतीमध्येच नव्हता.
अन्न हातानी मुरडणे, कालवणे, एका हातानी त्याचे घास करणे, एका हातानीच खाणे, खाल्ल्यानंतर हात उष्टे होतात, म्हणून ते धुणे, हे त्यांच्या संस्कृतीमध्येच नव्हते. त्याचा परिणाम म्हणून या सर्व पाश्चात्य लोकांना दात आणि हिरड्यांच्या मोठ्या समस्या निर्माण होतात. आणि या समस्या निवारणासाठी दंततज्ञ !! आपल्या गावात, तीस वर्षापूर्वी किती डेन्टीस्ट होते, आणि आता गावामधे दंततज्ञ किती आहेत ? ओझरता सर्व्हे केलात तरी, यांची वाढलेली संख्या लक्षात येते. या दातांच्या रोगाची मूळ कारणे कुठे आहेत, कशात आहेत, याचा एकदा शोध घेतला पाहिजे.
ज्या पाश्चात्य देशात एकेकाळी दात घासणे, चुळ भरणे, गुळण्या करणे कधी माहितीच नव्हतं, त्यादेशातील लोकांनी, ज्या भारत देशातील वयोवृद्धांचे बत्तीस दात स्मशानामधे सुद्धा मोजून घेतले जात... अश्या आमच्या भारत देशातील लोकांचे, "मौखिक आरोग्य कसे चांगले राहील?" यावर चर्चासत्रे घ्यावीत, यापेक्षा मोठा विनोद नाही.
........पण आज जमाना बदल गया है। यालाच "कलियुग" असे नाव. दुसरं काय म्हणणार ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
28.06.2017
June 28, 2017
पूर्वी आपल्या मुलांकडून बाराखड्या म्हणून घेतल्या जात असत. त्याचा एक उद्देश आरोग्य हाही असावा. हल्ली इंग्रजी मिडीयम मध्ये शिकणाऱ्या मुलांनी मराठी मुळाक्षरे म्हणणे पालकांना कमीपणाचे वाटते!!
November 4, 2019
गिरगावतल्या ठाकुरद्वारचं हॉटेल विनय इथं GST लागू झाल्यापासून खाद्यपदार्थांचे दर कमी करण्यात आलेले आहेत... या हॉटेलमध्ये १ जुलै २०१७ पासून नवे रेट कार्ड आले आहे... हॉटेलच्या मेन्यू कार्डवर नवे आणि जुने दर स्पष्टपणे लिहिलेले आहेत... या नव्या दराचे परिणाम बिलात दिसतात. बिल ५ ते १०% कमी झालेले आहे... हा बदल झालाय तो GSTमुळे..
हे काही काल - परवाला टाकलेलं उडुपी हॉटेल नाहीए... एका मराठी कुटुंबाचे ७७ वर्षं जुने हे हॉटेल आता चौथ्या पिढीच्या ताब्यात आहे. इथली मिसळ तर प्रसिद्ध आहेच... पण, पाव पातळ भाजी म्हणजे सोवळा तांबडा पांढरा रस्साच जणू..! GSTनंतर विनयच्या या दोन्ही लोकप्रिय डिशेस स्वस्त झाल्यात ही सुद्धा खवैय्यांसाठीची आनंदाची बातमी... दोन्ही प्लेट ६० रूपयाला होत्या त्या ५५ ला झाल्यात.सोबतचे सुट्टे पाव मात्र ३ रूपयालाचआहेत. कारण, तो हॉटेलात बनणारा पदार्थ नाही मागणीनुसार त्याच्याऑर्डरचे आकारमान बदलत असते.
मराठी माणसाने स्थापन केलेल्या आहार संघटनेवर आज शेट्टयांचं वर्चस्व आहे... मुंबईची भूक आणि चव त्यांच्या ताब्यात आहे. यातले बहुतांश लोक सरसकट जुन्या दरावर GSTचा अतिरिक्त बोजा लादत असताना एका मराठी व्यापाऱ्याने सर्वप्रथम चाकोरी बाहेरची वाट चोखाळली आहे... त्यांचं कौतुक यासाठी की, त्यांनी नव्या कररचनेचं खरं गुपित उघड केलंय...
आतातरी आपण आपली बिलं भरताना काळजी घेऊ का.? मोदी सरकारने आणलेल्या नव्या कररचनेला अभ्यासणार का.? वस्तू विकताना त्यावर जुन्या-नव्या किंमती स्पष्ट लिहाव्या लागणार असल्याचा सरकारी फतवा यायच्या आधी हॉटेल विनयने ते प्रामाणिकपणा दाखवत करून दाखवलं आहे. धंद्यातली सचोटी हीच मराठी माणसाची खरी ओळख..
August 17, 2017
प्रचंड उत्साहात आणि गर्दीत निघालेली साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी. उत्साह, उत्सुकता, अभिमान आणि साहित्य संमेलनाच्या वेळी असणारे चैतन्य , दिंडीच्या वेळी जाणवत होते. माऊलींची प्रतिमा ठेवलेली पालखी विविध फुलांच्या गजऱ्यांनी , फुलांच्या माळानी सजवलेली . अवघा आसमंत सुगंधाने , अभंगांच्या गजराने आणि कोकणी गीतांनी भारून गेलेला .
August 9, 2025
आज नवरात्रीचा रंग हिरवा
आजचा विषय हिरव्या रंगाची ब्रोकोली
'स्प्राऊटिंग ब्रोकोली' हे जरी या भाजीचे नाव असलेतरी 'ब्रोकोली' या नावाने आपण ओळखतो. ब्रोकोली मुळातंच अनोळखी आणि विदेशी भाजी. ब्रोकोली ही भाजी हिरव्या फ्लॉवरसारखी दिसते. ही भाजी कुरकुरीत व चविष्ट आहे म्हणून या भाजीचा प्रामुख्याने सॅलडमध्ये वापर केला जातो. ब्रोकोलीच्या रॉयल ग्रीन, एव्हरग्रीन, युनिव्हर्सल, डॅन्यूब, अव्हेला, युग्रीन, सलीनास, पिलग्रीम, ग्रँडर वगैरे जाती आहेत. ब्रोकोली फ्लॉवरसारखी दिसणारी एक हिरव्यागार रंगाची भाजी आहे पण तो फुलकोबीचा हिरवा प्रकार नाही. ब्रासिका ओलेरेसिया (इटालिका ग्रुप) अस शास्त्रीय नाव असलेल्या ब्रोकोलीचा उगम इटलीतला मानला जातो.
जगात ब्रोकोली उत्पादनात चीन अग्रस्थानी आहे. भारतात हि बऱ्याच ठिकाणी उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात ब्रोकोलीची लागवड लहान क्षेत्रात केली जाते. ब्रोकोलीमध्ये खूप प्रमाणात क जीवनसत्व आणि के जीवनसत्व, चांगल्या प्रमाणात ब जीवनसत्वाचे अनेक प्रकार आणि कॅलशियम, लोह, मॅग्नेशियम, मँगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त ही खनिजं व चोथा असतात. ब्रोकलीमध्ये बीटा केरोटीनच्या स्वरुपात अ जीवनसत्वही असतं. आणि काही प्रमाणात ओमेगा 3 देखील असतं, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रोकोलीत उत्तम प्रमाणात क्रोमियम असतं. ब्रोकोलीमध्ये सर्वात जास्त क्रोमियम असतं. ब्रोकोलीत सेलनियमही असतं. ब्रोकोली गड्ड्याचा रस काढून शरीर आरोग्य जपण्यासाठी पेय म्हणून वापर करतात. भारतात मुख्यत्वे करून ब्रोकोलीचा हिरवे सॅलेड या स्वरूपात आहारात उपयोगात करतात. ब्रोकोलीत पाणी, कॅलरीज, कर्बोदके, साखर, तंतुमय तसेच स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे व विविध खनिजे असतात. ब्रोकोलीच्या गड्ड्यांत महत्वाची अँटी-ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे विविध प्रकारचे कर्करोग रोखणे शक्य होते. ब्रोकोलीतील प्रचंड प्रमाणात असलेल्या क जीवनसत्वामुळे तिच्यामध्ये उच्च अॅन्टिऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे शरीराचं एकूण आरोग्य उत्तम राहण्यासाठी ब्रोकोली आहारात असणं चागलं असतं. ब्रोकोली वाफवली की तिच्यातील चोथ्याशी संबंधित घटक अशा प्रकारे काम करतात ज्यामुळे रक्तातील कोलोस्टेरॉलची पातळी कमी होते. ब्रोकोलीमध्ये असे काही फायटोन्यूट्रिअन्टस् आहेत ज्यामुळे शरीरात नको असलेल्या टाकाऊ गोष्टींचा निचरा होतो. ब्रोकोलीतील अ जीवनसत्व आणि के जीवनसत्व हे ज्यांना ड जीवनसत्वाची कमतरता असल्यामुळे ते बाहेरुन घ्यावं लागतं अशासाठी संयुक्तपणो उत्तम काम करतात. ब्रोकोलीत केम्पफेरॉल हे फ्लेव्हनॉइड भरपूर प्रमाणात असतं. हल्ली झालेल्या संशोधनातील निष्कर्षाप्रमाणो याचा उपयोग अॅलर्जीदायक घटकांचा परिणाम कमी करण्यासाठी होतो. गेल्या पाच वर्षातील संशोधनामधील निष्कर्षाप्रमाणो ब्रोकोलीमध्ये कर्करोगाला प्रतिबंध करणारे घटक आहेत. हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास होतो. तसेच त्यातील क्रोमियममुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित रहाण्यास मदत होते. हाडांचे आरोग्य चांगले राहून ऑसियो पोरॅसिस होण्यापासून प्रतिबंध होतो. ब्रोकोलीमुळे मलोत्सजर्नाला फायदा होतो. तसेच त्यातील अ जीवनसत्वामुळे ब्रोकोली डोळे व त्वाचा यासाठीही अगदी उत्तम असते. ब्रोकोली कच्ची खाणंही चागलं असतं. पण त्यासाठी ती पूर्णपणो नीट चावून खायला हवी.
आपल्या नेहमीच्या भाज्या घेतांना त्या भाज्यांचे आपल्याला माहित असलेले बारकावे बाजारातल्या टोपलीतल्या भाजीत आहे की नाही याची आपण खात्री करून घेतोचं.
ब्रोकोली विकत घेतांना त्यावरचे तुरे ताजे आणि घट्ट आहेत हे बघून घ्यावं. सर्व तु:यांचा रंग एकसारखा गडद हिरवा किंवा जांभळट हिरवा असला पाहिजे. त्यात कुठेही पिवळेपणा असता कामा नये. तु:यांचे देठ आणि मुख्य देठ घट्ट असले पाहिजेत. बाजारातून ब्रोकोली विकत आणल्यावर न धुता प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून तिच्यातील शक्य तेवढी हवा काढून घेऊन पिशवी फ्रीजमध्ये ठेवल्यास ब्रोकोली दहा दिवस चांगली राहू शकते. ब्रोकोलीचे तुरे एकदा कापले की लगेच संपवावे लागतात नाहीतर त्यातील क जीवनसत्वाचा नाश होऊ लागतो. शिजवलेली ब्रोकोली उरली तर हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवल्यास दोन तीन दिवस चांगली राहते.
ब्रोकोली शिजवतांना.
- ब्रोकोली शिजवण्याआधी थंड पाण्यात स्वच्छ धुवावी. मग तिचे तुरे वेगळे काढावेत.
- मुख्य देठावरली साल काढून त्याचे तुकडे करावेत. मग हे सगळं दहा पंधरा मिनिटं तसचं ठेवावं. त्यामुळे ब्रोकोलीतील कार्यक्षम होतात.
- ब्रोकोली शिजवण्याची उत्तम पद्धत म्हणजे ती कुकरमध्ये वाफवावी. पाण्यात शिजवू नये. पाण्यात शिजवल्यानं तिच्यातील ब आणि क जीवनसत्वांचा नाश होतो. देठ शिजायला वेळ लागतो म्हणून देठ आधी वाफवण्यास ठेवावे मग तीन चार मिनिटांनी तुरेही वाफवण्यास ठेवून सर्व एकत्र पाच मिनिटं वाफवावं. ब्रोकोली कधीही जास्त शिजवू नये. ती जरुरीपेक्षा जास्त मऊ झाली तर तिच्यातील ब आणि क जीवनसत्वांचा नाश झाला असं समजावं.
ब्रोकोलीचे काही पदार्थ
ब्रोकोली चीझ बॉल्स
साहित्य : पाव किलो ब्रोकोली बारीक चिरूलेली, मिरची व लसूण पेस्ट दोन टेबल स्पून, एक कांदा बारीक चिरूलेला, अर्धा कप शिजवलेला बटाटा, मोझरेला चीझ १ टीस्पून, मिक्स हर्ब, , एक कप ब्रेड क्रम्प्स, एक टेबल स्पून कॉर्नफ्लोअर, तळण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ.
कृती : गॅसवर फ्राईंग पॅनमध्ये थोडे तेल घालून कांदा, मिरची, लसूण परतून घ्या. त्यात ब्रोकोली घाला. पुन्हा परतून घ्या. हे सगळं थंड करून घ्या. मग त्यात उकडलेला बटाटा घाला. थोडे कॉर्नफ्लॉवर घालून एकजीव करा. मग त्याचे लहान लहान गोळे करून घ्या. त्यात प्रत्येकात चीझचा तुकडा घालून ब्रेड क्रम्प्समध्ये घोळून परत कॉर्नफ्लोअरमध्ये घोळून तळून घ्या.
चायनीज चिली ब्रोकोली फ्राय
साहित्य : १ कप ब्रोकोलीचे तुकडे, १ कप उभा चिरलेला कांदा, १ कप उभी चिरलेली सिमला मिरची, १/२ कप उभे चिरलेले गाजर, १ टीस्पून चिली सॉस, २ टीस्पून सोया सॉस, १ टीस्पून व्हिनेगर, २ लाल मोठ्या मिरच्या, ६ लसुण पाकळ्या, १ टीस्पून बारीक चिरलेले आले, मीठ आणि मिरपूड चवीनुसार, २ टीस्पून तेल.
कृती : एका बाउल मध्ये सर्व सॉस आणि मीठ व मिरपूड एकत्र करावे. त्यात ब्रोकोलीचे तुकडे टाकून १५ मिनिटांसाठी मुरत ठेवावेत. एका प्यान मध्ये तेल गरम करून त्यात वरील ब्रोकोली, बारीक चिरलेला लसुण, आले, मिरच्यांच्या चकत्या व उर्वरित सर्व भाज्या टाकून ८-१० मिनिटे परतावे. फ्राईड राइस किंवा नूडल्स सोबत गरमागरम वाढावे.
ब्रोकोली सॅलड
साहित्य : १ मध्यम आकाराचा ब्रोकोलीचा गड्डा, १ बारीक तुकडा आले, बदाम, १ पुदिना, १/२ कोथिंबीर, १/२ लिंबाचा रस, १ चमचा ऑलिव ऑइल, मीठ व काळी मिरी.
कृती : ब्रोकोलीची देठे काढून ब्रोकोलीचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. ब्रोकोली स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. जास्तीचे पाणी काढून टाका. पुदिन्याची अर्धी पाने न कापता बाजूला ठेवा. अर्धी पाने सुरीने बारीक चिरून घ्या. चिरलेली पाने एका भांड्या मध्ये ठेवा. एका मोठ्या भांड्यात दीड दोन भांडी घालून गरम करत ठेवा. भांडे झाकून ठेवा. म्हणजे पाणी लवकर गरम होईल. आता एका चाळणीत ब्रोकोली आणि बदाम घाला. पाणी निघून गेल्यावर त्याच्यावर झाकण ठेऊन बाजूला ठेवा. ब्रोकोली मध्ये आले, बारीक चिरलेली पुदिन्याची पाने, अख्खी पुदिन्याची पाने, कोथिंबीर, लिंबाचा रस, ऑलिव ऑइल, मीठ आणे काळी मिरी घालून एकत्र करा. ब्रोकोली सॅलड जेवणाबरोबर खा.
जर ब्रोकोली सॅलड थोडेसे गोडसर बनवायचे असेल तर सॅलड मध्ये १ चमचा मध घाला आणि ढवळून एकत्र करून घ्या.
काबुली चणे आणि ब्रोकोलीचे कटलेट
साहित्य : अर्धी वाटी भिजवलेले आणि प्रेशर कुकरमध्ये शिजवलेले काबुली चणे, अर्धी वाटी ब्रोकोलीची फुले, १ लहान बारीक चिरलेला कांदा, मीठ चवीनुसार, १ लहान चमचा बारीक चिरलेली मिरची, १/४ लहान चमचा धणेपूड, चाट मसाला - १/४ लहान चमचा, ताजी कोथिंबीर - १ लहान जुडी, लिंबाचा रस - १ मोठा चमचा.
कृती : काबुली चणे नरम होईपर्यंत किंवा हाताने कुस्करता येतील इतके शिजवा. याला मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. ब्रोकोलीच्या फुलांना पुरेशा पाण्यात थोडावेळ उकळवून घ्या, नंतर त्याला थंड पाण्यात घाला, ज्यामुळे त्यांचा हिरवा रंग कायम राहील. नंतर किसणीने ब्रोकोलीला किसून घ्या आणि चण्याच्या मिश्रणात मिसळा. नंतर या मिश्रणात चिरलेला कांदा, मीठ, धणेपूड, चाट मसाला, चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घाला.
सर्व एकत्र केल्यानंतर याचे गोल किंवा लंबगोलाकार पॅटीस बनवा. एअर फ्रायर वापरणार असल्यास १८० अंश सेल्सियस तापमानावर १५ मिनिटे ऐअर फ्राय करा. १० मिनिटांनंतर त्यांना पलटवा. तळणार असल्यास सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळा.
ब्रोकोली सूप
साहित्य : दीड कप ब्रोकोलीचे तुरे, १ टेस्पून बटर, ३/४ कप कांदा चिरलेला, १ मध्यम गाजर चिरून, १ टे स्पून मैदा, २ कप व्हेजिटेबल स्टॉक किंवा पाणी, १/४ कप क्रीम, तळलेले ब्रेडचे तुकडे चवीनुसार मीठ आणि मिरपूड.
कृती : नॉनस्टिक पॅनमध्ये बटर गरम करावे. त्यात ब्रोकोली, कांदा, आणि गाजर घालावे. थोडे मीठ आणि मिरपूड सुद्धा घालावी. मध्यम आचेवर कांदा साधारण ५ ते ६ मिनिटे थोडा पारदर्शक होईस्तोवर परतावे..
यामध्ये मैदा घालून दोनेक मिनिटे परतावे. पाणी घालून उकळी काढावी. मध्यम आचेवर १० मिनिटे उकळी काढावी. क्रीम घालून ढवळावे. मिक्सरमध्ये प्युरी करावी. मीठ मिरपूड अड्जस्ट करावे. १ ते २ मिनिटे गरम करून सूप सर्व्ह करावे. सर्व्ह करताना बरोबर तळलेले ब्रेडचे तुकडे द्यावे.
ब्रोकोली पराठा
साहित्य : सारणासाठी. १ मध्यम आकाराचा ब्रोकोलीचा गड्डा, दीड चमचा आलं-लसूण पेस्ट, १ चमचा गरम मसाला, १/२ चमचा आमचूर पावडर, १ बारीक चिरलेला कांदा, १ चमचा मिरची पेस्ट, चवीपुरतं मीठ
आवरणासाठी. १ कप गव्हाचं पीठ, पाव चमचा हळद, मीठ, अर्धा चमचा जिरे, १ चमचा तेल
कृती : गव्हाचं पीठ, हळद, जिरे, मीठ, तेल आणि पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यावं. ब्रोकोलीचे लहान तुकडे करून मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावेत. त्यात चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट, गरम मसाला, मिरची पेस्ट, आमचूर पावडर आणि मीठ घालून एकत्र करावं. पिठाच्या गोळ्यात हे सारण भरून याचा पराठा लाटावा. तव्यावर शेकून घ्यावा. हा गरमागरम पराठा दह्याबरोबर सव्र्ह करावा.
टीप : ब्रोकोलीचे सारण आधीच बनवून ठेवलं तर त्याला पाणी सुटतं. त्यामुळे पिठाच्या गोळ्यात हे सारण भरताना जास्त ओलाव्यामुळे पीठ चिकटही बनतं आणि पराठे लाटले जात नाहीत. त्यामुळे जेव्हा पराठे बनवायचे असतील तेव्हा हे मिश्रण तयार करावं आणि लगेच याचे पराठे बनवावेत.
ब्रोकोलीची भाजी
साहित्य : पाव किलो ब्रोकोली, १ लहान कांदा, १-२ हिरव्या मिरच्या, ३ टीस्पून उडदाची डाळ, १ टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ.
कृती : ब्रोकोलीचे तुरे काढून घ्यावेत. दांडे कोवळे असतील तर साधारण १/२" जाडीचे तुकडे करून घ्यावेत.
कांदा बारीक चिरुन घ्यावा. मिरच्यांचे उभे २-२ तुकडे करून घ्यावेत. तेल तापवायला ठेवून त्यात उडीदडाळ घालून गुलबट रंगावर परतावी. त्यात मिरच्या घालून किंचीत परताव्यात. बारीक चिरलेला कांदा नीट गुलबट रंगावर परतून घ्यावा. त्यात आता ब्रोकोली घालून नीट परतावे. ब्रोकोली अगदी किंचीतच शिजू द्यावी. जास्ती शिजवल्यास अजिबात चांगले लागत नाही. मीठ घालून हलवावे. गॅस मंद करून झाकण घालून एक वाफ काढावी.
एकदा नीट मिसळून मग कढई गॅसवरून खाली उतरावी.
येते.
ब्रोकोलीची पचडी
साहित्य : ब्रोकोलीचा दांडय़ासकट किसलेला जाड कीस दोन वाटय़ा, अर्धी वाटी किसलेलं गाजर, अर्धी वाटी चण्याची डाळ, एका हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे, चवीला मीठ, साखर, फोडणीसाठी एक मोठा चमचा तेल, मोहरी-हिंग-हळद, दोन तीन चमचे लिंबाचा रस, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : चण्याची डाळ दोन तास भिजत घालावी आणि धुऊन भरड वाटून घ्यावी. ब्रोकोलीचा कीस, गाजराचा कीस, वाटलेली डाळ, चवीला मीठ, साखर एकत्र करावं. तेलाची मोहरी-हिंग-हळदीची फोडणी करावी. त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून परतावे. पचडीवर फोडणी घालून लिंबाचा रस मिसळावा, तसंच कोथिंबीर घालावी. फोडणीत हिरव्या मिरचीऐवजी लाल सुकी मिरची किंवा तळणीची एक मिरची चुरडून घातली तर वेगळा स्वाद येतो.
डाळ घालायची नसल्यास भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालावं.
ब्रोकोलीची भजी
साहित्य : ब्रोकोली ३०० ग्राम, बेसन, बेकिंग पावडर, आले-लसूणाची भरड पेस्ट, तळण्यासाठी तेल,अर्धा लिंबू, मीठ चवीनुसार, हिरवी मिरची, कोथिंबीर, जीरे, ओवा, हिंग.
कृती : ब्रोकोलीचे एक इंचांचे तुकडे करून, धुऊन घ्या. नंतर, मीठ आणि लिंबाचा रस लावून १० मिनिटे ठेवून द्या.
बेसनामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून पातळसर भिजवा. त्यामध्ये, बारीक चिरलेली कोथिंबीर, ओवा, जिरे, मीठ, हिरवी मिरची, हिंग आणि २ छोटे चमचे तेल घालून मिश्रण एकजीव करा. वरील ब्रोकोलीला आले-लसूण पेस्ट लवून आणखी १० मिनिटे ठेवा. हे ब्रोकोलीचे तुकडे एक एक करून बेसनच्या मिश्रणात बुडवून तेलामध्ये तळून घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
October 4, 2019
गरज ही शोधाची जननी म्हटली जाते. अगदी आदिम अवस्थेत असल्यापासून माणूस त्या अर्थाने ‘गरजवंत’च होता. संरक्षण आणि उपजीविका या दोन गरजांनी माणसाला त्याच्या नैसर्गिक क्षमतेपेक्षा अधिक काहीतरी मिळविण्यासाठी प्रेरित केले.
December 31, 2006
या विद्यापीठाचे वैशिष्ट्य असे, की बहुजन समाजातील मॅट्रिक पास तरुणांना नोकरीसाठी जाणीवपूर्वक संधी दिली. आणि तालमीच्या कट्टयावर बसणारी ही पोरं विद्यापीठात काय गुण उधळणार? अशा अर्थाने त्या काळातही टीका सुरू झाली. पण विद्यापीठाच्या या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाची शान आणि मान उंचावली.
November 18, 2021

ह्याची वृक्षावर चढणार वेल असते.पाने १२-१५ सेंमी लांब व तीक्ष्णाग्र असतात.फुल लहान एकलिंगी व गुच्छात उगवते.फळ गोल मिरी प्रमाणे दिसते.पण ते गुळगुळीत व तांबूस रंगाचे व ६-८ मिमी व्यासाचे असते.त्याला वर एक छोटा देठ असतो व ते सुगंधी असून तोंडात धरले असता गार वाटते.
ह्याचे उपयुक्त अंग आहे फळ व तेल.कंकोळ चवीला तिखट,कडू असते व हे उष्ण गुणाचे असून हल्के रूक्ष व तीक्ष्ण असते.हे कफ व वातशामक असते.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)सुज व वेदना युक्त अवयवांवर कंकोळचा लेप करतात.
२)मुखरोगात कंकोळाचे फळ चघळायला देतात.
३)जखमेवर कंकोळाचे तेल लावतात.
४)कंकोळाने घामामुळे येणारी दुर्गंध नष्ट होते.
५)बायकांच्या मासिक पाळीच्या तक्रारीत कंकोळ उपयुक्त आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©️Dr Swati Anvekar
February 9, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti