(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्रदूषण २०- हळू-हळू रोज मरतो मी

    ५0 लाख वाहने दिल्लीत रोज हवेत विष ओकतात. जीवाणू नाशक आणि विषाणू नाशक विष पाण्यात / थंड पेयांत टाकले जाते, जेणे करून ते कधी खराब होऊ नये. जेवणात हि आपण अन्नाच्या माध्यमातून किटनाशक, जीवाणू नाशक आणि विषाणू नाशक रसायने घेतोच. रोज रोज विष पिण्याचा परिणाम भोगावाच लागेल, त्यातून कुणाचीही सुटका नाही.

      March 27, 2018


  • का घडतात अत्याचार आणि बलात्कार?

    नुकताच लोणावळा येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची आणि नंतर तिचा नराधमांनी केलेल्या खुनाची बातमी वाचून मन सुन्न झाले. आज राज्यात आणि देशात असे कित्येक गुन्हे घडत आहेत.

      March 9, 2015


  • बुद्धिवाद आणि सिद्धी ( एक निष्पक्ष वैचारिक मंथन )

    • प्रास्ताविक :
    • विसाव्‍या शतकात विज्ञानाने आश्चर्यकारक प्रगति केली आहे. काल ज्‍या गोष्‍टी अशक्‍य वाटत होत्‍या, त्‍या आज अस्तित्‍वात आलेल्‍या आहेत. याचाच अर्थ असा की, आज अशक्‍य वाटणार्‍या गोष्‍टी उद्या शक्‍य वाटूं लागतीलही, आज चमत्‍कार अथवा सिद्धी म्‍हणून गणल्‍या जाणार्‍या गोष्‍टींबद्दल कदाचित् उद्या वैद्यकीय स्‍पष्‍टीकरण सापडूंही शकेल.
    • अनेकदा दोन विरुद्ध बाजूच्या लोकांमध्ये वैचारिक वाद होत असतात. म्हणून, आपण याबद्दल निष्पक्ष विचार करण्याचा प्रयत्न करूं या.
    • पहिली बाजू :
    • काही शतकांपूर्वी लोकांना विमान म्‍हणजे एक कविकल्‍पना वाटणे साहजिकच होते, पण आता ती एक सामान्‍य आणि सर्वमान्‍य गोष्‍ट झाली आहे. ज्‍यूल्‍स व्‍हर्न ची, ‘फ्रॉम अऽर्थ टू दि मून’ या नांवाची एक सुरस कादंबरी होती. पण आज ‘चंद्रावर माणूस पोचणें’ ही एक सुरस कथा नसून सत्‍य घटना झालेली आहे. तसें प्रत्‍यक्षात घडतांना आपण पाहिलेलें आहे. ‘क्ष-किरण’, ‘इन्‍फ्रा- रेड किरण’, ‘मायक्रोवेव्‍हज्’ वगैरे अदृश्‍य लहरींमुळे शरीरावरील कातडीला अपाय न होता, आंतील अवयव दिसू शकतात , आंतील रोगही बरा होऊं शकतो. ही गोष्‍ट कांहीं शतकांपूर्वी चमत्‍कारात जमा झाली असती. एवढेंच काय, शंभरएक वर्षांपूर्वी जर कुणी म्‍हणाला असता की ‘माणसाची हुबेहूब जीवित प्रतिकृति कृत्रिमरीत्‍या तयार करणें शक्य आहे’, तर त्‍यावर किती लोकांनी विश्वास ठेवला असता ? परंतु तशी वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे. वैज्ञानिकांनी या क्रियेला ‘क्‍लॉनिंग’ असें नाव दिलेलें आहे. यावर गेली काहीं दशकें बरेंच संशोधन चालू आहे व क्‍लॉनिंगने ‘घडवलेले’ गिनीपिग्‍ज अस्तित्‍वातही आलेले आहेत.
    • आजही शरीरशास्‍त्रज्ञांना अथवा मानसशास्‍त्रज्ञांना मेंदूतील सर्व भागांचे कार्य समजलेलें नाही. माणूस त्‍याच्‍या मेंदूच्‍या क्षमतेच्‍या फक्‍त एक दशांशाचाच उपयोग करतो असे शास्‍त्रज्ञ म्‍हणतात. तर मग उरलेल्‍या नव्वद टक्‍के भागाचा उपयोग काय? आणि निरुपयोगी भाग उत्‍क्रांतीवादाच्‍या सिद्धान्‍ताप्रमाणे कालांतराने अस्तित्‍वातून गेला नसता काय ? हिप्‍नॉटिझम अथवा संमोहनविद्या, टेलीपथी, टेलीकायनेसिस या गोष्‍टींची उदाहरणे बरेचदा वाचनात येतात. कांहीं लोकांना त्‍यांचा प्रत्‍यक्ष अनुभवही आलेला आहे. पण अजून कोणीही त्‍याबद्दल सर्वमान्‍य व सिद्ध होऊ शकणारे स्‍पष्‍टीकरण देऊ शकलेले नाही. साधारण- विज्ञानाच्‍या कक्षेबाहेरील अशा प्रकारच्‍या, मेंदूशी संलग्‍न अभ्‍यासास ‘पॅरासायकॉलॉजी’ (परामानसशास्त्र) म्‍हणतात व त्‍याचा अभ्‍यास भारतात आणि पाश्चिमात्त्य देशातही सुरू आहे.
    • थोडक्‍यात काय, तर मानवाचें ज्ञान हें कधीच परिपूर्ण असूं शकत नाही , व अजूनही , विज्ञानाला अनाकलनीय अशा अनेक गोष्‍टी आहेत, हें मान्य करायला हवें.
    • दुसरी बाजू :
    • परंतु , अतींद्रीय शक्ति अथवा सिद्धी प्राप्‍त असल्‍याचा दावा करणारांनी हें ध्‍यानात ठेवायला हवें की आजच्‍या विज्ञानयुगात अंधश्रद्धेला जागा नाहीं . इथें परीक्षण आवश्‍यक आहे. त्‍यांना माहीत असल्‍यास, त्‍यांनी आपल्‍या शक्‍तीची उपपत्ती सांगायला हवी. विद्या दिल्‍याने वाढते, कंजूषपणामुळे, कोषात साठवून ठेवल्‍याने अंती तिचा नाश होतो. सिद्धी प्राप्‍त असणार्‍यांना किंवा तसा दावा करणार्‍यांना मानवजातीचें खरें हित साधायचें असेल तर त्‍यांनी स्‍वतः होऊन पुढाकार घेऊन याविषयी वैज्ञानिकांना सक्रिय मदत करायला हवी.
    • पण असें होत नाही. मागे डॉ. कोवूर यांनी एका सुविख्‍यात बाबांना दिलेले आव्‍हान त्‍यांनी स्‍वीकारलें नाही. प्रख्‍यात जादूगार पी. सी. सरकार यांचाही असाच अनुभव आहे. बाबांच्‍या आश्रमात ‘दर्शना’चा कार्यक्रम चालू असतांना, बाबांनी दाखवलेल्‍या चमत्‍कारासारखाच दुसरा ‘चमत्‍कार’ श्री. सरकार यांनी लागलीच तिथल्‍या तिथेच करून दाखवला. श्री. सरकार यांना तात्‍काळ आश्रमाबाहेर काढण्‍यात आले. ‘सिद्धी’ हा श्रद्धेचा विषय नाही, अभ्‍यासाचा विषय आहे, हें या आधुनिक सिद्धांना वा बाबांना कधी समजणार ? आणि तशा अभ्‍यासाला त्‍यांनी सक्रिय मदत न केल्‍यास, त्‍याला ‘बुवाबाजी’ असें बुद्धिवादी जर म्‍हणाले, तर त्‍यांना दोष कसा देता येईल ?
    • एक ‘क़ाबिले तारीफ़’ उदाहरण :

    वैज्ञानिक अभ्‍यासाला सक्रिय मदत करण्‍याचें हल्लीच्या काळातलें उदाहरण म्‍हणजे अमेरिकेचे माजी अध्‍यक्ष रेगन यांचें . रेगन यांना ‘अल्‍झायमर’ हा दुर्धर रोग झाला होता. या रोगाच्‍या प्रादुर्भावाबद्दल फारच थोडी माहिती जगास उपलब्‍ध आहे व रोगमुक्‍तीसाठी एकही रामबाण औषध नाही. अल्‍झायमर हा मेंदूचा रोग असल्‍यामुळे रोग्‍याची आकलनशक्ति कमी कमी होत जाते, मेंदूचे शरीरावरील नियंत्रणही कमी होत जाते. या रोगातून सुटण्‍याचा एकच उपाय आहे, आणि तो म्‍हणजे मृत्‍यू .

    पण रेगन यांनी आपल्‍याला हा रोग झाल्‍याचे लपवलें नाही. उलट त्‍यांनी तें जगासमोर उघड केले व स्‍वतःला या रोगाच्‍या अभ्‍यासासाठी डॉक्‍टरांपुढे उपलब्‍ध करून दिले. विज्ञानाची किती मोठी सेवा रेगन यांनी केली ! आजचे ‘बुवा’ किंवा ‘सिद्ध’ अशा अभ्‍यासाची संधी वैज्ञानिकांना कधी देणार ?

    • ‘सिद्दी म्हणजे बुबाबाजी’ , असें दर वेळी असेलच कां ? :

    मात्र, बुद्धिवादी लोकांनीही एक अभ्‍यास म्‍हणून हा विषय हाताळला पाहिजे. कांहीं ‘गुरु’, ‘बुवा’ व ‘स्‍वामी’ चमत्‍कारांच्‍या व सिद्धींच्‍या झगमगाटाने भोळ्या भक्‍तांची दिशाभूल करतही असतील. त्‍यांचें थोडा वेळ बाजूला ठेवूं. पण यूरी गेलर या इस्त्रायली व्‍यक्‍तीच्‍या ‘टेलिकायनेसिस’ शक्‍तीचे काय ? एडगर कायसी (Cayce) या अमेरिकन माणसाने संमोहनावस्‍थेत दिलेल्‍या ‘डेड सी स्क्रोलस्’ बद्दलच्‍या पूर्वसूचनांचे काय , ज्‍यानुसार नंतर खरोखरच कांहीं उपयुक्‍त माहिती उजेडात आली. टेलीपथी किंवा उत्‍स्‍फूर्तपणे भविष्‍यकथन करणार्‍या व्‍यक्‍तींची उदाहरणे आपण वाचतो, ऐकतो. त्‍यातली कित्‍येक तर साधीसाधी माणसे असतात. त्‍यांना व्‍यक्तिशः कुठलाही धनलाभ होत नाही. ते कुठलेही मठ वा पंथ स्‍थापत नाहीत. मग तिथें बुवाबाजीचा प्रश्न कुठें येतो ?

    • माझा स्वत:चा एक अनुभव :

    माझ्या स्वत:च्या ओळखीच्‍या एक वृद्ध आजीबाई पुण्‍याला रहात असत. त्‍यांना काहीतरी आगळी अशी ‘शक्ती’ प्राप्‍त आहे असे अनेक परिचित सांगत. बाई संसारी होत्‍या. या शक्तीपासून कसलाही व्‍यक्तिगत लाभ त्‍यांनी होऊ दिला नाही. आर्थिक लाभ तर दूरच, पण त्‍यांनी आपल्या शक्तीचें कसलेही भांडवल केलें नाही, स्‍तोम माजवलें नाही. स्‍वतःच्‍या सिद्धीचा त्‍यांनी कधी उल्‍लेखही केला नाही. ‘ते म्‍हणतात’ अशा शब्‍दांनी सुरुवात करून त्‍या काय तें सांगत. ‘ते’ म्‍हणजे त्‍या वृद्ध बाईंचे दिवंगत गुरु. अशी कुठलीही वेळ ठरवलेली नव्हती ( उदा. , गुरुवार संध्याकाळीं ) , की ज्या वेळी बाईंना भेटायला येऊन लोक त्यांना कांहीं प्रश्न विचारताहेत, पायाशी फूल-नारळ वगैरे ठेवताहेत . छे: ! त्या आजी तर कुणालाही असें भेटतच नसत. अगदी जवळच्या परिचितांनाच त्या काय तें सांगत असत, अन् तेंही आधी ठरवून असें नव्हेंच . आपण प्रश्न विचारायचेच नाहींत. पण अगदी अचानक, उत्स्फूर्तपणें त्यांना जें कांहीं सुचे, व त्या तें सांगत .

    त्‍या आजींच्‍या सिद्धीचा मला स्‍वतःला एकदा नव्‍हे तर दोन वेळा अनुभव आलेला आहे. पण त्‍यामागील वैज्ञानिक स्पष्‍टीकरण मात्र मला माहीत नाही. जर इतर कुणी मला अशा प्रकारचा अनुभव सांगितला असता, तर त्यावर विश्वास ठेवणें मला स्वत:लाही जड गेलें असतें. असा अनुभव फक्त ‘प्रत्‍यक्षप्रमाण’ च्‍या सूत्राप्रमाणेंच पटूं शकतो.

    • एक शक्यता , एक आशा :

    मी अंधश्रद्ध नाहीं, रूढिवादी नाहीं. कसलीही अंधश्रद्धा न बाळगतां, मला असें वाटतें की अशा प्रकारच्या कांहीं शक्‍ती माणसाच्‍या मेंदूत सुप्‍त स्थितीत असतात आणि फक्‍त काही व्‍यक्‍तींच्‍या ठिकाणीच त्‍या जागृत होत असतात. त्‍यांचा पद्धतशीर अभ्‍यास झाला , व त्‍यांचें रहस्‍य थोडें जरी उलगडलें तर , न जाणो, त्‍यातून मानवाच्‍या प्रगतीसाठी कांहीं नवीन सूत्र सापडूंही शकेल.

    • एक विचार : ‘खरा महात्‍मा’ व ‘ढोंगी बुवा’ यांच्‍यातील फरक :

    अखेरीस एक विचार मांडावासा वाटतो, आणि तो म्‍हणजे, ‘खरा महात्‍मा’ व एखादा ‘ढोंगी बुवा’ यांच्‍यातील फरक.

    आज अनेक लोक ‘बुवाबाजी’ करत आहेत ही गोष्‍ट नाकबूल करता येणार नाही. अंधश्रद्धेचे उच्‍चाटन झालेले नाही व तथाकथित ‘बुवा’ वा ‘स्‍वामी’ त्‍याचा फायदा घेतात, हे स्‍वाभाविकच आहे. म्‍हणून ‘खरा महात्‍मा’ व ‘ढोंगी बुवा’ यांच्‍यात फरक करायला एकच कसोटी लावायला हवी. अतींद्रिय शक्ति अथवा सिद्धि किंवा चमत्‍कार, ही ती कसोटी नव्‍हेच ! ती कसोटी आहे ‘प्रत्‍यक्ष आचरण’ . ज्‍या व्‍यक्ती स्‍वतःच्‍या सुखदुःखाची पर्वा न करता, निःस्‍वार्थ बुद्धीनें निरलसपणें परहितासाठी झटतात, तेच खरे महात्‍मे ; मग ते चमत्‍कार दाखवोत वा न दाखवोत, त्‍यांना सिद्धी प्राप्‍त असो वा नसो. आणि जे खर्‍याखोट्या चमत्‍कारांनी लोकांना भुलवून स्‍वतःची तुंबडी भरतात, ते बुवाबाजी करतात, असेंच म्‍हणायला हवें . समजा, त्‍यांच्‍या अतींद्रिय शक्‍ती पुढेमागे अगदी सिद्ध झाल्याच , तरीही ते ढोंगी बुवाच !

    • भारतात ‘टॉलरन्स्’ तसेंच ‘सत्यान्वेषण’ यांची दीर्घकालीन परंपरा आहे. त्या मार्गानें, ‘ओपन-माइंडेड्’ बुद्धिवादी व इतर विचारवंत हंसाप्रमाणें नीरक्षीरविवेक वापरून, हा फरक जाणून घेऊ शकतील अशी आशा करावी कां ?

    + + +

    [ पूर्वप्रसिद्धी : ‘कीर्तिस्तंभ’ पाक्षिक, वडोदरा ( बडोदा) , आवृत्ती दि. ०१.०७.१९७६.

    बदल : दि. १५.०२.२०१८ ]

    + + +

    - सुभाष स. नाईक Subhash S. Naik
    मुंबई.
    M- 9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in
    Website : www.subhashsnaik.com , www.snaehalatanaik.com

      February 19, 2018


  • हेलन केलर

    मुलांच्या संदर्भातल्या समस्या म्हणजे मुले स्क्रीन टाईमचा वापर खूप करतात, त्यासाठी पालक हतबल आहेत.

    एखाद्या वस्तूच्या अतिवापरामुळे आपणच एखादं व्यंग निर्माण करतो. व्यंगावर मात करण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत. यापूर्वीही अनेकांनी व्यंगावर मात केली आहे हे आमच्या मुलांना कळायला हवं. अनेकांनी व्यंगावर मात तर केली आहेच, पण यशश्रीही खेचून आणली आहे.

      June 13, 2026


  • किचन क्लिनीक – कंदभाज्या – गाजर

    किचन क्लिनीक – कंदभाज्या – गाजर

    गाजर हा कंद आपल्या सर्वांच्याच परिचयाचा व फारच आवडीचा.गाजर हे लाल व नारंगी अशा दोन प्रकारची असतात उत्तरेकडचे लालाबुंद गाजर उत्तम प्रतिचे असतात.

    गाजराचाहलवा,गाजराची,खीर,कोशिंबीर,
    लोणचे असे एक ना अनेकरूचकर पदार्थ आपण ह्या गाजरापासून बनवित असतो.तसेच ह्यात मुबलक प्रमाणात जीवन सत्व अ असल्याने हे त्वचा व डोळे ह्यांचे आरोग्य उत्तम राखते.तसेच कर्करोगाच्या रूग्णांना देखील कच्च्या गाजराचा रस प्यायला दिला जातो.

    जसे हे स्वयंपाकात वापरतात तसेच ह्याचा वापर घरगुती उपचारात देखील केला जातो.गाजराचे रोप हे हातभर उंचीचे होते व गाजर हे जमीनी खाली वाढणारे कंद आहे.

    गाजर हे चवीला गोड कडवट असून उष्ण असते त्यामुळे ते शरीरातील वात व कफ दोष कमी करते पण पित्त मात्र वाढविते.

    चला आता गाजराचे उपयोग पाहूयात:

    १)इसब,गळवे,फोड ह्यात गाजर थोडे मीठ घालून पाणी न घालता वाफवून घ्यावा व त्याचा पोटीस बांधावा.

    २)गाजराचे बी हे मासिक पाळी येण्या करिता ५ दिवस पाण्यात वाटून घ्यावे.

    ३)वारंवार भरपूर गढूळ लघ्वी होत असल्यास १ कप गाजराचा रस +१/२ चमचा जीरे +१चमचा धणे हे मिश्रण सकाळ संध्याकाळी उपाशी पोटी घ्यावे.

    ४)मधुमेहामुळे झालेली जखम नसेल व ती चिघळली असेल तर गाजराच्या रसाच्या घड्या
    दिवसातून ४ वेळा जखमेवर ठेवाव्या.

    ५)कच्चे गाजर चावून खाल्ल्यास तोंडास रूची येते,जीभ साफ होते व हिरड्या देखील मजबूत होतात.

    गाजर खायचा अतिरेक केल्यास पित्त वाढते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      November 22, 2016


  • धावणारा काळ

    आपली घड्याळं ही दिवसाच्या या चोवीस तासांच्या कालावधीवर आधारलेली आहेत. पृथ्वीच्या प्रदक्षिणा काळातील बदलामुळे आपली घड्याळं ही अधूनमधून पृथ्वीप्रदक्षिणेशी जुळवून घ्यावी लागतात. पृथ्वीचा वेग बहुधा कमी होत असल्यानं, दिवसाचा कालावधी वाढत असतो. दिवस चोवीस तासांचाच असण्यासाठी आपल्याला आपली घड्याळं मागे न्यावी लागतात. यासाठी घड्याळ किंचितसं थांबल्याचं मानलं जात.

      November 9, 2021


  • शिक्षणाचे मानसशास्त्र : परीक्षार्थी शिक्षण – जमेची बाजू

    चीनच्या सुई घराण्याच्या राजवटीने सातव्या शतकात जगातली पहिली सरकारी राजपत्रित (गॅझेटेड) अधिकारी पासून कारकुना पर्यंतच्या भरतीसाठी सार्वजनिक परीक्षा आयोजित केली (आजची IAS, MPSC, UPSC परीक्षा). पाश्चिमात्य देशात एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमधे शालांत परीक्षा पद्धत राबवली गेली आणि ओघाने भारतातही आली. इतिहास मनोरंजक तर आहेच पण आजही अशाच पद्धतीने राष्ट्र / राज्य प्रशासकीय यंत्रणेची निवड प्रक्रिया अशीच आहे.

      January 10, 2021


  • जागतिक लग्न दिवस

    ज्या जोडीदाराशी भावनिक, वैचारिक जवळीक असेल त्याच व्यक्तीशी लग्न करायला पाहिजे, तरच समाजमान्य आणि तरीही मनपसंत पद्धतीने शारीरिक संबंध शक्य आहेत. भावनिक, वैचारिक जवळीकीसाठी बराच वेळ लागतो. त्या काळात दोन-तीन भावी जोडीदारांशी एकाच काळात चर्चा-भेटी चालू असल्या तरी काही बिघडत नाही.

      February 13, 2022


  • १६ डिसेंबर १८५४ – महाराष्ट्रातील पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना

    १६ डिसेंबर १८५४ रोजी “अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे” या महाराष्ट्रातील पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना झाली

      December 16, 2017


  • मायक्रोवेव्ह ओव्हन

    मायक्रोवेव्ह  ओव्हन हे स्वयंपाकघरात अन्न शिजवण्यासाठी वापरले जाणारे यंत्र आता फारसे नवीन राहिलेले नसले तरी त्याचा वापर मात्र अजून कायम आहे. विसाव्या शतकातील तो एक महत्त्वाचा शोध मानला अर्थवेध असते. जातो. प्रगत देशात तर प्रत्येक घरात त्याचा वापर केला जातो. मायक्रोवेव्ह ओव्हन उष्णतेने अन्न शिजवण्याच्या ऐवजी प्रारणांच्या मदतीने अन्न शिजवते, रडार तरंगांचे तंत्र यात वापरलेले असते.

      February 7, 2023