(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सजीवांचे शरीर आणि आत्मा

    आत्मा म्हणजेच पिंडात सर्वठायी असलेले चैतन्य. आत्मा म्हणजेच शरीरात सर्वठायी असलेली ऊर्जा. आत्मा म्हणजेच सजीवांचा लाईफ फोर्स…जीवनबल. आत्मा म्हणजेच डीएनए आणि जनुकांच्या स्वरूपात असलेले आनुवंशिक संकेत आणि या संकेतांचे उलगडीकरण आणि विस्तार पावण्याची क्रिया सुरू होणे म्हणजेच सजीवाचा जन्म होणे आणि ही क्रिया बंद पडणे म्हणजेच सजीवाचा मृत्यू होणे. सजीवाच्या प्रत्येक पेशीत, आनुवंशिक तत्व, जेनेटिक मटेरियल असते आणि तोच पेशीचा आत्मा. सजीवांचा आत्मा प्रत्येक पेशीत म्हणजे सर्व शरीरातच असतो.

      February 4, 2011


  • पळस/पलाश

    पळसाला पाने तीन हि म्हण मराठी मध्ये फारच प्रचलित आहे.म्हणी मध्ये जसा हा पळस वापरला जातो तसाच ह्याचा उपयोग आयुर्वेदीय उपचारात देखील केला जातो.

    ह्याचे १३-१५ मीटर उंचीचे व १.५-२ मीटर रूंद बुंधा असलेला वृक्ष आहे.ह्याचे काण्ड खडबडीत,साल फाटलेली व भुरकट रंगाची असते.पाने संयुक्त,गोलाकार,तीन दिले असलेले १०-२० सेंमी लांब असते.फळ १५-२० सेंमी लांब व ४ सेंमी रूंद असून शेंगेच्या स्वरूपात असते ज्यात चपट्या गोल,तांबूस व काळसर बिया असतात.उन्हाळ्यात त्वचेवर भेगा पाडल्यास त्यातून पाझरणारा रस घट्ट होऊन त्याचा डिंक होतो.

    ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा,फुले,निर्यास व बीज आणी क्षार.चला आता ह्याचे गुणधर्म पाहूयात.
    पलाश चवीला कडू,तिखट,तुरट व उष्ण गुंणाचा असतो हा हल्का व रूक्ष असतो.फुले थंड व निर्यास स्निग्ध असतो.पलाश कफवातनाशक व पित्तकर आहे.

    आता आपण पळसाचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:

    १)जखम धुवायला पळसाच्या सालीचा काढा उपयुक्त आहे कारण तो रक्त स्त्राव थांबवितो.

    २)सुज व वेदना असलेल्या भागावर पळसाची पाने गरम करून बांधतात.

    ३)जुलाब होत असल्यास व आव पडत असल्यास पळसाच्या निर्यासाचे चुर्ण गरम पाण्यासह प्यायला देतात.

    ४)कृमींमध्ये पळसाच्या बियांचे चुर्ण हिंगासोबत देतात.

    ५)गजकर्णामध्ये लिंबाच्या रसात पळसाचे बी उगाळून लावतात.

    ६)पळसाच्या फुलांचा काढा कफज प्रमेहात उपयोगी आहे.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      September 13, 2017


  • ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम

    पूर्वीच्या काळी अरब लोक आकाशातील ग्रहताऱ्यांवरून दिशा ओळखायचे व त्यामुळे ते बरोबर योग्य त्या ठिकाणीच पोहोचत असत. आता तंत्रज्ञानाची एवढी प्रगती झाली आहे की, गुगल अर्थवर सगळे काही सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ दिसते आहे. पृथ्वीवरील कुठल्याही देशातल्या रस्त्यावरून चाललेल्या मोटारीची नंबर प्लेट उपग्रहाला दिसत असते.

      August 25, 2023


  • कोकोनट ऑइल

    गेली तीस वर्षे नारळाच्या खोबर्‍याला, खोबरेल तेलाला आरोग्यबाधक ठरवल्यावर त्याचे ग्रह पालटले आहेत. दिवसागणिक वाढत असलेल्या अल्झायमर या रोगावर जालीम उपाय म्हणून खोबरेल तेलाला आता महत्त्व आलेले आहे.

      May 30, 2017


  • निरंजन – भाग ४० – पाऊले श्रीमहालक्ष्मीची

    श्रीमहालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधूकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंद्रा, गिरीजा, पद्मा, मालती आणि सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मीमाता ओळखल्या जातात. अशा या सर्वांभूती असलेल्या श्रीमहालक्ष्मी मातेचे ध्यान लागावे अशी ही कथा आहे.

      December 31, 2020


  • फस्ट क्लास’ डब्यातली ‘अक्कल’ आणि ‘सेकंड क्लास’ माणूसकी

    मुंबईच्या लोकल ट्रेनमधला फर्स्ट क्लासचा डब्बा हे विशेष प्रकरण आहे. इथे सर्वजण आपापला सेंट (परफ्युम हो) आणि आब राखून असतात..जरा कोणाशी बोललो तर आपल्या इभ्रतीचं काय होईल या भयंकर काळजीने इथे एकमेकांशी फारसं कोणी बोलतही नाही.

      November 21, 2016


  • ताण-तणावांचे विषाणू

    ताण-तणाव हे आपले पूर्वापार साथीदार आहेत. पिढ्यानपिढ्या ही भावना आपली सांगाती आहे. त्यांच्याशी जसे जमेल तसे जुळवून घेणे हळूहळू अंगवळणी पडते आहे. मात्र ताण-तणाव आता अधिक गंभीर, रौद्ररूप धारण करीत आहेत. आता ते वयोगटांवर अवलंबून नाही की आर्थिक परिस्थितीशी ताण-तणावांना काही देणे-घेणे नाही. ही समस्या आता विश्वव्यापी बनली आहे त्यामुळे त्यावर आता सर्वंकष लसीची गरज कधी नव्हे ते निर्माण झाली आहे.

      March 20, 2022


  • कल्याणवृष्टिस्तव – १६

    ह्रींकारत्रयसंपुटॆन महता मन्त्रॆण संदीपितं
    स्तोत्रं यः प्रतिवासरं तव पुरॊ मातर्जपॆन्मन्त्रवित् ।
    तस्य क्षॊणिभुजॊ भवन्ति वशगा लक्ष्मीश्चिरस्थायिनी
    वाणी निर्मलसूक्तिभारभरिता जागर्ति दीर्घं वयः ॥ १६ ॥

    कल्याणवृष्टिस्तवाच्या या शेवटच्या श्लोकात फलश्रुती वर्णन करतांना आचार्यश्री म्हणतात,

    ह्रींकारत्रयसंपुटॆन- तीन ह्रींकार संपुटित.

    कोणत्याही मंत्राच्या मागेपुढे एखादी गोष्ट लावले जाते तेव्हा त्याला संपुट असे म्हणतात. ह्रीं या बीजाक्षराच्या आधी ओंकार आणि नंतर श्री लावला जातो. अशा संपुटाने त्याला मंत्रत्व प्राप्त होते.

    आई जगदंबाच निर्गुण-निराकार परब्रह्म आहे आणि तीच परमशक्ती आहे.हे सांगण्यासाठी आधी ओंकार आणि पुढे श्री लावला जातो. त्याचवेळी हे तिन्ही जणु काही एकच आहे ते सांगण्यासाठी ह्रींकारत्रय म्हटले.

    महता मन्त्रॆण संदीपितं- ॐ ह्रीं श्रीं या महान मंत्राने संपादित असणारे, युक्त असणारे.

    स्तोत्रं यः प्रतिवासरं तव पुरॊ मातर्जपॆन्मन्त्रवित् - हे स्तोत्र, हे आई जगदंबे ! जो रोज तुझ्यासमोर मंत्राप्रमाणे जपतो.
    त्याला मिळणारे दिव्यलाभ सांगताना आचार्यश्री म्हणतात,

    तस्य क्षॊणिभुजॊ भवन्ति वशगा- क्षोणी म्हणजे पृथ्वी तर भुज म्हणजे उपभोग घेणारा. अर्थात राजा. स्तोत्र वाचणाऱ्याला राजाही वश होतो. लक्ष्मीश्चिरस्थायिनी- स्थिर संपत्ती प्राप्त होते. संपत्ती इतरवेळा चंचल असते. पण आईचा कृपेने ती देखील स्थिर राहते. अर्थात लोकविलक्षण लाभ होतात.

    वाणी निर्मलसूक्तिभारभरिता- सुंदर सुभाषितानि अलंकृत असलेली वाणी प्राप्त होते.

    जागर्ति दीर्घं वयः- दीर्घकालिक आयुष्य प्राप्त होते.

    जय जगदंब !

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      April 27, 2020


  • सुप्रजनन – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

    गर्भावस्थेत किंवा प्रसूतीच्या दरम्यान माता-बालक मृत्यूचे प्रमाण अन्य देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक आहे. लोकसंख्येच्या मानाने अपुऱ्या वैद्यकीय सुविधा हे त्याचे एक महत्वाचे कारण नक्कीच आहे. त्याशिवाय मुलीचे लग्नाचे वय हा देखील दुसरा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे.

      March 24, 2015


  • मुंबईत घर मिळेल का घर?

    घर बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तूंच्या किमंती/भाव गगनाला भिडल्याने घराच्या किंमती वारेपाम वाढल्या आहेत. त्यामुळे भारतात कुठेही घर घेणे सोपे नाही. त्यातून प्रत्येकाचे स्वप्न असते की माझे मुंबईत घर असावे. घर विकत घेण्यासाठी लागणारे भांडवल किंवा स्वत:कडील पुंजी कमी पडते म्हणून बँकेतून कर्ज काढून घर घेण्याचेही धाडस होत नाही. कारण बँकांच्या व्याजाचे दर सर्व सामान्य माणसांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत. मुद्दल अधिक व्याज फेडण्यामध्ये उभ आयुष्य सरून जाईल.

      July 26, 2011