(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नोव्हेंबर १३ : ग्रीक विद्वान आणि वॉर्नची ‘गाबा’गिरी

    नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारणार्‍या पहिल्यावहिल्या कसोटी कर्णधाराचा जन्म या दिवशी १८५८ मध्ये लंडनच्या केन्सिंग्टनमध्ये झाला. मैदान आणि एकेका खेळाडूचे ऋणानुबंध अत्यंत अनोखे असतात. शेन वॉर्न आणि गाबा मैदानाचा संबंधही असाच आहे.

      November 12, 2010


  • जब भी कोई कंगना बोले’

    जगात दोन प्रकारची माणसे सापडतात…
    पहिली असतात फक्त रडतखडतच जगणारी..
    अगदी बचपनसे बुढापे तक..
    ही लोक भरभरुन जगणं कधी समजूच शकत नाहीत..
    अगदी मरेपर्यंत..
    यांच्या अगदी विरुद्ध जगणारे लोकही असतात..आहेत..
    जिवनाच्या प्रत्येक स्टेजमधे ते जगाला फाट्यावर मारुन जगतात…अगदी..अर्धी लाकडं 'वैकुंठा'ला पोचली तरीसुद्धा..(विनोद पुण्या बाहेरच्या लोकांनाही कळेल म्हणून टाकलाय बरं..)
    तर या दुसऱ्या जातकुळीतल्या लोकांसाठी हे गाण बनलय..हे लोक आपलं आयुष्य उतारवयातही मजा करत घालवतात...म्हणजे 'गळ' टाकतात..फ्लर्ट करतात..प्रेमात पडतात..
    ही माणसं अगदी मुन्नाभाई एम बी बी एस मधल्या गाण्यासारखे..'बचे चार आणे..वेस्ट न करना यार..' असे ठणकावून सांगणारे..अन 'डंके की चोटपर' तसे वागणारेही..
    शौकीन मधले तीन म्हातारडे असलेच अवलिये आहेत..
    (होते म्हणवत नाही,तिघे काळाच्या पडद्याआड गेले तरी)
    अशोक कुमार, ए.के.हंगल आणि (अच्छाs)उत्पल दत्त..
    आपापल्या इलाक्यात गुलहौशीपणा करणारे तीन मित्र..
    ए के हंगल हा बिझनेसमन आहे आणि आपल्या सेक्रेटरीलाच पटवायचा प्रयत्न करतोय..
    उत्पल दत्त घरमालक आहे व विधवा भाडेकरु बाईवर जाळे टाकतोय..
    आणि आपले दादामुनी…
    रोज घरासमोरुन जाता येता दिसणाऱ्या फटाकडीला डोळे भरुन पाहतात.. दुरुनच.'चंदा को चकोर निहारे' हे गाण्यातले वाक्य या सिनसाठीच..
    तर असे हे तिघे शौकीन..खरं तर आंबट शौकीनच..
    जीवाचा गोवा करायला निघतात. एका गोड तरुण पोरीला पटवायसाठी (हाय..हाय...रती अग्निहोत्रीss) काय काय उद्योग करतात हे या सिनेमात दाखवलाय.
    अर्थात सिनेमाची सगळी स्टोरी सांगणार नाही कारण हा लेख यातल्या गाण्यावर आहे..पण नमनाला घडाभर तेल यासाठीच की पार्श्वभूमी माहित असेल तर गाणे बघताना पटकन रिलेट होईल..
    हे गाणे मी हा सिनेमा दूरदर्शनवर रात्री पाहिला तेंव्हा पहिल्यांदा ऐकले..अन त्याच्या प्रेमात पडलो..
    परदेशी गेलेल्या मैत्रीणी प्रमाणे अनेक वर्ष हे गाणे फक्त मनात राहिले..कारण रेडिओवर हे फार वाजत नाही..
    तेंव्हा युट्यूब आणि गाण्याला वाहिलेले साइट्स नव्हते..
    तीन चार वर्षापूर्वी परत गाणं शोधून काढलं..
    अन पुन्हा या गाण्याच्या प्रेमात पडलो..
    गीतकार योगेश हा माणूस दिग्दर्शक बासू चॅटर्जीचा आवडता..पण यात संगीतकार म्हणून सलीलदांऐवजी आर.डी..आणि गाणे गायला किशोरकुमार..
    आहाहा..
    मग काय म्हणता...अशी मस्त भट्टी जमलीय..
    की इथे पिउन उठणारा फुल्ल टाईटच..
    एकतर योगेशजींनी हे गाणं इतकल चपखल लिहिलय की बस्स..आंबटशोकीन म्हाताऱ्यांची मनोवस्था बरोबर पकडलीय त्यांनी. आर.डी.ने खरे तर वडिलांच्याच एका बंगाली गाण्यावरुन ही चाल बेतलीय म्हणे.. (मेरे बापका माल है..तेरेको क्या..?)पण या गाण्यासाठी चाल इतकी भारी जमलीय की यंव रे यंव..
    आणि त्यात त्याने मधला अंतऱ्यातला जो जिवघेणा म्युझीक पिस टाकलाय की प्रत्येकवेळेला मी ऐकताना मी मागे जाउन तो पुन्हा ऐकतो..आई.ग..ss
    आणि किशोरदानचे तर काय सांगावं…
    आमच्या सांगली कोल्हापूरच्या भाषेत 'जाळ आणि धुर संगाटच'..! एकतर किशोरच्या आवाजातल्या गाण्यात अशोककुमार डान्स करताहेत हा दुग्धशर्करा योग या गाण्यात आलाय..किशोरदाने इतक तब्येतीत गाणे गायलय की बस्स..आपण फक्त म्हणायचं..मजा आ गया..
    तर असे हे गाणे..
    किशोर-आर डी च्या 'बडव्यां'ना नक्कीच माहित असणारे..पण हा लेख प्रपंच इतर वारकऱ्यांसाठी आहे..
    बघा मग गाणं...लिंक देतोय..

    ता.क- हे गाणे ऐकून दादामुनी इस्टाईल नाचावेसे वाटल्यास ते काम घरात न करता बिल्डींगच्या टेरेसवर करावे.. लॉकडाउन मुळे घरीच असणाऱ्या बायका पोरांना (आणि शेजारणींना) फेफरं यायला नको..

    इत्यलम..!

    https://youtu.be/ZWkucLNdyKE

    -- सुनील गोबुरे.

      September 4, 2022


  • एक किंवा दोन बस्स

    एक किंवा दोन बस्स

    गेल्या काही दशकात आपण एकत्र कुटुंब पद्धती कडून अलिप्त कुटुंब पद्धतीकडे वळालो. आता अलिप्त कुटुंब पद्धतीत देखील छोटेखानी कुटुंबाला प्राधान्य आहे. काळानुसार हा बदल घडताना भौतिक सुख सोयी वाढत आहेत आणि घरातील माणसांचा संवाद कमी होत आहे. आई, वडील आणि मुल अशा तीन माणसांच्या छोटेखानी कुटुंबात जर आई आणि वडील सतत बाहेर व्यस्त असतील तर त्या मुलाने संवाद साधायचा कोणाशी?

      April 14, 2020


  • श्री मीनाक्षीस्तोत्रम् – ८

    शब्दब्रह्ममयी चराचरमयी ज्योतिर्मयी वाङ्मयी
    नित्यानन्दमयी निरञ्जनमयी तत्त्वंमयी चिन्मयी ।
    तत्त्वातीतमयी परात्परमयी मायामयी श्रीमयी
    सर्वैश्वर्यमयी सदाशिवमयी मां पाहि मीनाम्बिके ॥ ८ ॥

    आई मीनाक्षीच्या तात्त्विक स्वरूपाचे शास्त्रीय वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
    शब्दब्रह्ममयी- वेद शास्त्र यामध्ये असणाऱ्या शब्दांना शब्दब्रह्म असे म्हणतात. या सगळ्याच्या द्वारे जिचे वर्णन केल्या जाते अशी.
    चराचरमयी- चर म्हणजे सजीव तर अचर म्हणजे निर्जीव. या दोन्ही रूपात नटलेली.
    ज्योतिर्मयी- ज्योती अर्थात तेज स्वरूपिणी.
    वाङ्मयी- वाणी स्वरूप असलेली. मानवी विकासाचा महान बिंदू आहे वाणी. विचार तर पशूच्या मस्तकात देखील असतात. पण त्याचे सुयोग्य प्रगटीकरण केवळ बुद्धीमंताला करता येते. वाणी या स्वरूपात या विकासाचा श्रेष्ठबिंदू असणारी.
    नित्यानन्दमयी- अखंड आपल्याच आनंदात असणारी. निरञ्जनमयी- अंजन म्हणजे काजळी. मळ. घाण. याचा लवलेश देखील नसलेली. परम शुद्ध.
    तत्त्वंमयी - शास्त्रात परब्रह्मालाच तत्व असे म्हणतात. परब्रह्मस्वरूपिणी.
    चिन्मयी - चैतन्य अर्थात तेज, ज्ञान हेच जिचे स्वरूप आहे अशी.
    तत्त्वातीतमयी- शास्त्रात अन्न, प्राण आदी गोष्टींना देखील विवेचना पुरते ब्रह्म म्हणजे तत्व म्हटले जाते. अशा सर्व तत्त्वांच्या अतीत असणारी. परमतत्त्व स्वरूपिणी.
    परात्परमयी - पर म्हणजे श्रेष्ठ. सगळ्या श्रेष्ठ गोष्टींमध्ये देखील परमश्रेष्ठ.
    मायामयी - विश्वाला संचालित करणाऱ्या माया रूपात लीला करणारी.
    श्रीमयी- श्री म्हणजे वैभव. शास्त्रामध्ये ऐश्वर्य, वीर्य,यश,श्री, ज्ञान आणि वैराग्य या सहागोष्टींना षडैश्वर्य असे म्हणतात. या सगळ्या रूपात लीला करणारी.
    सर्वैश्वर्यमयी- सर्व प्रकारच्या वैभवांनी युक्त .
    सदाशिवमयी - भगवान सदाशिव यांची सहधर्मचारिणी. अतीव पवित्र.
    मां पाहि मीनाम्बिके - हे आई जगदंबे मीनाक्षी माझे रक्षण कर.
    जय श्री मीनाक्षी !

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      June 1, 2020


  • रामायणाचे महत्व !

     रामायण हा केवळ इतिहास नाही, तर जीवन जगण्याच्या दृष्टिने प्रत्येक प्रश्नाचे उपयुक्त उत्तर त्यात आहे. सध्यामाणसांची वृत्ती ही राक्षसाच्याही पलिकडचे झालेली आहे. राक्षसामध्ये तरी थोडी फार माणुसकी, दया, भिती होती. तेकधीही निशस्त्रावर वार करत नसत. झोपेत किंवा विश्वास घाताने किंवा पाठीवर वार करत नसत. परंतु आज माणूसया तत्वाप्रमाणे सुध्दा वागत नाही.

      August 17, 2018


  • नाट्य-चित्र कानोसा – इनव्हेस्टमेंट

    एकूणच चित्रपटाची कथा, ही दिग्दर्शकानं आजपासून पन्नास वर्षांपुढील चित्र कसं असेल हे दर्शवलेलं आहे, जर नितीमूल्य, संस्कार किंवा मुलांना “क्वालिटी टाईम” पालकांकडून मिळत नसेल तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात या सर्वांचं सुंदर आलेखन “इनव्हेस्टमेंट” च्या माध्यमातून मांडलेलं दिसतं.

      September 25, 2013


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकोणपन्नास

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 4

    कशासाठी हे अन्न मी सेवणार , हा संकल्प "आत" कळतो आणि तशी तयारी सुरू होते.

    देवपूजेमध्ये सोळा उपचार केले जातात.
    आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान-अभिषेक, वस्त्र-अलंकार, उपवस्त्र-यज्ञोपवित, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, प्रदक्षिणा, नमस्कार आणि मंत्रपुष्प.

    सोळा उपचार कोणते ते माहिती असावेत म्हणून ही पूरक माहिती दिली.
    या उपचारांचा मुख्य उद्देश देवाची आपल्यावर कृपा व्हावी असा आहे. असा भाव, अशी श्रद्धा मनात ठेवावी.
    मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव,
    देव अशानी पावायचा नाऽही रं
    देव बाजारचा भाजीपाला न्हाई रं !

    देवाला आमंत्रण देऊन बोलवावे. आपण एखाद्या पाहुण्यांना कसे एखाद्या कार्यक्रमाला बोलावतो, तसे बोलवावे. उगाच का कोणी कारणाशिवाय येतो ?
    कारण सांगितल्या शिवाय, न सांगता येतो, त्याला आपल्याकडे "अतिथी" म्हटलं आहे, म्हणजे ज्याची येण्याची (आणि जाण्याची सुद्धा ) तिथी निश्चित नाही तो ! देव हा अतिथी नाही. आपल्या शरीरात तो गर्भावस्थेपासूनच स्थापन झालेला आहे. पण आपण त्याच्याशी एवढे "युजर्स फ्रेंडली" होतो, की आपल्याला त्याची किंमतच कळत नाही, किंवा त्याचे तेवढे महत्त्वच वाटत नाही.

    अर्जुनाला कृष्ण सखाच वाटत होता. पण कृष्ण हे भगवंत आहेत, याची जाणीव विराट रूप दर्शन झाल्यावर झाली.

    श्वास आला काय गेला काय, त्याचे महत्त्वच कळत नाही, जेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो, तेव्हा या प्राणाचे महत्त्व समजते.

    पूजा करण्याच्या निमित्ताने,
    "हे परमात्म्या, तुझाच अंश असलेला हा आत्मा तुला भेटीला बोलवित आहे. (लग्न झालेल्या मुलीला, बरेच दिवसांनी आई भेटल्यावर जसा आनंद होईल, तशी अनुभुति यावेळी यावी.) तू आणि मी वेगळे नाहीत, मी माझे कर्तव्य करण्यासाठी, तुझ्याच आज्ञेने, या पृथ्वीलोकात आलो आहे. या पृथ्वीतलावरील रज तम गुणांमुळे माझे सत्त्व कमी होत आहे, तुझ्या भेटीमुळे माझे सत्त्व मला परत वाढवता येणार आहे, म्हणून तू मला भेटायला ये !"
    असा भाव या आवाहनामधे असावा. तर आपल्याला आवश्यक असलेला सत्व गुण ( शक्ती, उर्जा, अग्नि, एनर्जी) घेऊन "तो" येईल.

    माझ्यासाठी अमुक वस्तु घेऊन ये, असा निरोप दिल्याशिवाय, काय हवंय ते सांगितल्याशिवाय, नेमकी ती वस्तू कशी आणणार ना ? तसंच आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    29.05.2017

      May 29, 2017


  • लाळेतील औषधी – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

    “एक घास बत्तीसवेळा चावून खवा” हा वाक्प्रचार आपण बरेचदा वापरतो. पण त्यामागची शास्त्रीयता नेमकी काय आहे हे समजून सांगणारा छोटासा लेख.

      December 17, 2016


  • कोशिश’ – शब्देविणू संवादू !

    कोशिश’ – शब्देविणू संवादू !

    “कोशिश” हा हिंदी नव्हें तर भारतीय चित्रसृष्टीतील मैलाचा दगड आहे. हा एकच चित्रपट करून गुलजार ,संजीवकुमार ,जया भादुरी आणि असरानी थांबले असते तरी चिरकाल आपल्या स्मरणात राहिले असते .नाही म्हणायला आपले प्रेक्षक म्हणून अपरिमित नुकसान झाले असते हा भाग अलाहिदा . कारण कोशिश नंतरही त्यांनी आपल्याला एकाहून एक नजराणे बहाल करून श्रीमंत करून टाकलेले आहे.

      November 12, 2021


  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – टाकळा

    किचन क्लिनीक – पालेभाज्या – टाकळा

    हि वनस्पती प्रामुख्याने पावसाळयात उगवते.आमच्या गोव्यात देखील हि भाजी ह्या ऋतू मध्ये आवडीने अर्थात गोवेकरी घोस्ताने (कोकणी शब्द)खातात.

    हि भाजी शिजवल्यावर रूचीकर लागते मग तुम्ही तेलात परतून करा,मुग,चणा अथवा तूरडाळ घालून फक्त गुळ खोबरे घालून शिजवून करा किंवा मग त्यात फणसाच्या सुकवलेल्या आठळया घालून करा.अगदी लज्जतदार लागते हि भाजी.मला आता मी पाककृतीचेच सदर लिहित असल्या सारखे वाटले.

    हिचे वर्षायू उग्र गंधयुक्त क्षुप असते.
    हि चवीला तिखट,व उष्ण असते म्हणूनच शरीरातील कफ व वात दोष कमी करते.

    जशी खायला हि लज्जतदार लागते तशीच हि आपण घरगुती उपचारांमध्ये देखील हिचा उत्तम वापर करू शकतो.

    चला तर मग पहायचे ना हिचे औषधी उपयोग:

    १)गजकर्णा मध्ये टाकळ्याच्या रस कडुनिंबाच्या पाल्याचा रस एकत्र मिसळून त्यांवर लावावे.

    २)अंगावर पांढरे डाग पडत असल्यास व खाज येत असेल तर टाकळ्याची भाजी व भाजणीची भाकरी खावी.

    ३)त्वचा तेजवान व मुलायम दिसायला टाकळ्याच्या पाल्याचा रस बेसनात मिसळून नियमितपणे चेह-यांवर लावावा.

    ४)खरूजेवर रोगग्रस्त भागावर टाकळ्याचा रस चोळावा व नवीन पाल्याची चटणी तिथे बांधावी.ती सोडल्यावर त्या भागावर हळदपूड चोळावी चांगला फायदा होतो.

    ५)गळू फूटण्यासाठी टाकळ्याचा पाला वाटून केलेली चटणी बारीक वाटून त्याची गोळा गळूवर ठेवावी व दर बारा तासांनी हि गोळी बदलावी.

    हि भाजी अतिप्रमाणात खाल्ल्यास जुलाब होऊ शकतात.

    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      October 22, 2016