वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मराठीला आधुनिक ज्ञानाचे व व्यवहाराचे समर्थ माध्यम बनविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. म्हणूनच प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला त्याचा हा भाषिक स्वधर्म जपावाच लागेल, असे महाराष्ट्र राज्य मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर यांनी सांगितले.
February 13, 2011
ह्रींकारमॆव तव नाम गृणन्ति वॆदाःमातस्त्रिकॊणनिलयॆ त्रिपुरॆ त्रिनॆत्रॆ ।
त्वत्संस्मृतौ यमभटाभिभवं विहाय
दीव्यन्ति नन्दनवनॆ सह लॊकपालैः ॥ ५ ॥
कोणत्याही देवतेच्या उपासनेत तंत्र, मंत्र आणि यंत्र अशा तीन गोष्टी असतात. त्या उपासनेचे जे शास्त्रशुद्ध नियम, पद्धती, परंपरा त्यांना तंत्र असे म्हणतात.
या देवतेचे निर्गुण-निराकार स्वरूप ज्याच्या चिंतन-मननातून व्यवस्थित समजून घेता येते त्याला मंत्र असे म्हणतात.
तर त्या देवतेच्या अधिष्ठान स्वरूपात ज्या आकृती तयार केलेल्या असतात, त्यांना यंत्र असे म्हणतात.
आई जगदंबेच्या उपासनेत सर्व श्रेष्ठ यंत्र म्हणजे श्री यंत्र. त्यात सगळ्यात मध्यभागी असतो एक त्रिकोण. त्या त्रिकोणात असणारा जो बिंदू ते आदिशक्तीचे मूळ पीठ.
कोणत्याही देवतेच्या मंत्रात सर्वाधिक प्रभावशाली मंत्र म्हणजे बीजमंत्र. आई जगदंबेच्या महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन स्वरूपां करिता अनुक्रमे ऐं, ह्रीं आणि क्लीं हे बीजमंत्र शास्त्राने सांगितले आहेत.
येथे आचार्य श्री त्या यंत्र आणि बीजमंत्राचा विचार मांडत आहेत. ते म्हणतात,
ह्रींकारमॆव तव नाम गृणन्ति वॆदाः- हे आई जगदंबे वेद तुझे नाव म्हणून ह्रीं काराचेच कथन करतात. अर्थात तेच तुझे नाव आहे. तोच तुझा सर्वोच्च मंत्र आहे.
मातस्त्रिकॊणनिलयॆ- हे आई श्री यंत्राच्या मध्यभागी असणारा त्रिकोण हे तुझे निवासस्थान आहे.
त्रिपुरॆ- हे त्रि-कोण जणूकाही त्रि-पूर आहेत. अर्थात स्थूल, सूक्ष्म ,कारण आहेत. तू त्यांच्या आत राहून त्यांचे संचालन करणारी चैतन्य शक्ती आहेस.
त्रिनॆत्रॆ - महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन स्वरूपातील तीन गुणांनी काम करणे हे जणू तुझे तीन नेत्र आहेत.
त्वत्संस्मृतौ यमभटाभिभवं विहाय
दीव्यन्ति नन्दनवनॆ सह लॊकपालैः - अशा तुझ्या स्वरूपाचे स्मरण करतात, ते यमाचे भट अर्थात दूतांचे भय सोडून नंदनवनामध्ये लोकपाल अर्थात देवतांसह विहार करतात.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 16, 2020
यस्याः कुक्षौ लीनमखण्डं जगदण्डं
भूयो भूयः प्रादुरभूदुत्थितमेव ।
पत्या सार्धं तां रजताद्रौ विहरन्तीं
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ७॥
आई जगदंबा गौरीच्या विश्वजननी स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्रींनी या श्लोकाची रचना केली आहे.
कोणत्याही मानवी जीवाची रचना मातृगर्भात असणाऱ्या बीजांडा पासून होत असते. या बीजांडा पासून अनंत कोटी ब्रह्मांडांपर्यंत सर्वत्र विद्यमान चैतन्य शेवटी आई जगदंबेचे आहे हे सांगण्यासाठी आचार्यश्रींनी अशी रचना केलेली आहे.
आईचे हे जगज्जननी स्वरूप सांगताना ते म्हणतात,
यस्याः कुक्षौ लीनमखण्डं जगदण्डं- जिच्या कुशीमध्ये हे संपूर्ण जगत् रूपी अंड अखंड लीन असते.
यातील लीन शब्द मोठा सुंदर आहे. हे विश्व आईच्या उदरातून जन्माला येते. विलय होते तेव्हा देखील तेथेच असते. त्यातच विलीन होते. अर्थात ज्या वेळा ते दिसत नाही त्यावेळी देखील ते आईच्याच उदरात असते. विश्व दृश्य असो की नसो, ती विश्वजननी आहेच.
असा सुंदरतम अर्थ त्यातून प्रगट होतो.
भूयो भूयः प्रादुरभूदुत्थितमेव - त्या उदरातून हे विश्व भूयो भूय: अर्थात वारंवार, जागृत झाल्या प्रमाणे निर्माण होते. जसा एखादा माणूस झोपेत असताना त्याच्या संपूर्ण बाह्य विश्वाचा विलय होतो. मात्र उठल्या क्षणी पुन्हा जशाला तसे दिसते. तसे हे विश्व आईच्या उदरातून वारंवार प्रगट होते.
पत्या सार्धं तां रजताद्रौ विहरन्तीं- पतीचा सह रजत म्हणजे चांदीच्या पर्वतावर निवास करणाऱ्या त्या, येथील चांदीचा पांढरा रंग आणि चमक धारण करण्याच्या समानतेवरून कैलास पर्वताला चांदीचा पर्वत म्हटले आहे. त्यावर निवास करणाऱ्या,
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे- कमलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या आई गौरीचे मी स्तवन करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 5, 2020
विनायकानं स्वतःच्या मनाला बजावलं आणि पाठून ढकललं गेल्यानं जाणारा तोल सावरला आणि प्राणांतिक यातना हसत सहन करत कसाबसा बोटीतून होडक्यात आणि होडक्यातून हिंदुस्थानच्या दक्षिण भूमीवर उतरला .
कसंबसं स्वतःला सावरत ,खाली वाकून हिंदुस्थानच्या भूमीवरची माती भाळावर लावली .
June 5, 2023
“आज आसपास पाहता असे आढळून येते की बहुतांश लोक कुठल्याना कुठल्या तणावामुळे त्रस्त आहेत. या सततच्या तणावामुळे नाना प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक व्याधींचा प्रादुर्भाव वाढत आहे. अर्थात प्रत्येक जण आपापल्या परीने उपाय शोधीत असतो. काही वेळा हे उपाय व्यवहार्य वाटत नाहीत म्हणून सोडून दिले जातात. मी सुद्धा या अनुभवातून गेलो आहे. बरीच वर्षे असा त्रास मी पण सहन केला.
माझ्या सुदैवाने काही चांगली ज्ञानी माणसे मला भेटली. काही चांगले साहित्य वाचनात आले. मग मी “परिपूर्ण आणि तणावमुक्त जीवनासाठी” काय करावे लागेल याचा शोध सुरु केला. मी निश्चय केला की असाच मार्ग शोधायचा की नवीन तणाव न निर्माण होता, जो पूर्णपणे व्यवहार्य असेल. जो माझ्यासारख्या सर्व सामान्य गृहस्थाश्रमी माणसाला सहजपणे आचरणात आणता येईल. जो मला हळूहळू का होईना बऱ्यापैकी “परिपूर्ण, तणावमुक्त आणि आनंदी जीवनाकडे” घेउन जाईल.
January 31, 2026
लाहोरमध्ये ०२/११/२०१४ ला झालेल्या स्फोटात ६१ जण ठार, तर १०० जण जखमी झाले. वाघा सीमेपासून फक्त ५०० मीटर अंतरावर हा स्फोट झाला. पॅँगाँग लेक परिसरात चीनने अलीकडेच घुसखोरी ०२/११/२०१४ ला समोर आली. याच भागात खुष्कीच्या मार्गानेही पाच किलोमीटर अंतरापर्यंत आपले सैन्य घुसविले.भारताच्या तीव्र आक्षेपास न जुमानता चीनच्या आणखी एका पाणबुडीसाठी कोलंबो येथील बंदराची जागा देण्याचा निर्णय श्रीलंकेने घेतला आहे.
November 12, 2014
खरं तर मला भिक किंवा भिकारी हे शब्द, कोणत्याही, कोणच्याही आणि कशाच्याही संदर्भात उच्चारायला किंवा लिहायलाही आवडत नाही. त्या ऐवजी मी ‘दान’ किंवा ‘दान मागणारा’ असा शब्दप्रयोग करायचा प्रयत्न करतो, परंतू ‘दान’ देवळाच्या आत आणि बाहेर, ते व्हाया ‘सुटे गिराण’ निवडणूकप्रसंगी देशाच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत, असे सर्वच वेळप्रसंगी मागत असतात. पुन्हा या दानाला, ती भिकच असली तरी, प्रसंगानुरून वेगवेगळी भारदस्त नांवंही असतात. त्यामुळे मला जे पुढे सांगायचंय, त्याचं नीट आकलन तुम्हाला होणार नाही, म्हणून या लेखापुरता मी ‘भिक’ आणि ‘भिक मागणे’ असे दोन्ही शब्दप्रयोग करणार आहे.
November 29, 2017
हस्ताक्षराचा अंत जवळ आला आहे, हे कळूनसुद्धा अमेरिकेत पन्नास वर्षांपूर्वी एक चळवळ उभी राहिली. ही मंडळी दरवर्षी २३ जानेवारीला ‘जागतिक हस्ताक्षर दिन’ साजरा करतात. एकमेकाला स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेली कविता देतात, एकमेकाला एखादे पेन भेट म्हणून देतात, हस्ताक्षराची स्पर्धा लावतात.
January 23, 2022
मराठी सत्ता भारतव्यापी झाली ती १८व्या शतकात. याच शतकात बाजीराव, सदाशिवराव भाऊ व महादजी शिंदे यांनी दिल्लीला धडक दिली. या तीन पुरुषांच्या दिल्लीविषयक कामगिरीचे विश्लेषण करण्यापूर्वी आपण १८व्या शतकातील मराठी सत्तेचा थोडासा मागोवा घेऊ या.
March 6, 2019
माध्यम! माध्यम म्हणजे काय? तर आपल्या विचारांचे, भाव भावनांचे प्रकटीकरणच नव्हे तर सादरीकरण करणे ज्याद्वारे होते ते माध्यम. आत्ता मीसुद्धा माझे विचार या लेखाद्वारे सादर करत आहे व तो लेख अमुक अमुक प्रसिद्ध करत आहे म्हणजे ते जे आहे ते माध्यम ! हे जे मोठ्या प्रमाणावर अनेक लोकांपर्यंत पोचायला मदत करते ते मास मिडिया किंवा जनमाध्यम ! पुरातन ग्रीक संस्कृतीत रंगमंचावर अशी नाट्य सादरीकरण व्हायची. ८६८ ख्रिस्तपूर्व सालात चीनमध्ये डायमंड सूत्र म्हणून पहिले पुस्तक छापून प्रसिद्ध करण्यात आले.
December 3, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti