साहित्य - ललित

डॉ. जयंत नारळीकर – परिपूर्ण विज्ञान कथाकार

Category:

 

वाचकाला कळायला सहजसुलभ, मानवकेंद्री, नव्या दमाची आणि नव्या मनूची विज्ञान कथा लिहिणारा लेखक म्हणून डॉ. नारळीकर यांची ओळख आहे. त्यांनी केवळ विज्ञान कथा लिहिल्या नाहीत, तर विज्ञान कथा कशी असावी, याचा वस्तुपाठ घालून दिला; आणि त्याचबरोबर तिची समीक्षा कशी करावी, याचे निकषही सांगितले. डॉ. नारळीकरांच्या ललित विज्ञान लेखनाचे पैलू उजेडात आणणारा हा लेख…

  May 15, 2021


लेखसंग्रह

सांग दर्पणा

Category:

 

’सांग दर्पणा कशी मी दिसते?’ आजवर अनेक तरुणींनी भिंतीवरच्या किंवा हातातल्या आरशाला हा सवाल केला असेल. साजशृंगार करण्यासाठी स्त्रियांनाच नव्हे तर पुरुषांनाही आरशाचा आधार लाभलेला आहे.

  June 24, 2011


लेखसंग्रह

किरणांची किमया

Category:

 

कोणत्याही वस्तूवर जेव्हा प्रकाशकिरण पडतात तेव्हा ते त्या वस्तूच्या आरपार निघून जाऊ शकतात. अशी वस्तू पारदर्शक असते. साहजिकच तिचा वापर आरशासाठी होणं शक्य नसतं. इतर काही वस्तू अशा असतात की त्यांच्यावर पडणारे प्रकाशकिरण त्यांच्याकडून संपूर्णतया शोषले जातात. अशा वस्तू संपूर्ण अपारदर्शक असतात. त्यांच्या पाठी त्या वस्तूंची छाया पडते. आपलं शरीर अशा वस्तूंमध्ये मोडतं. म्हणून तर सूर्यप्रकाशात किंवा रात्रीच्या वेळी दिव्याच्या प्रकाशात आपली छाया ठळकपणे पडते.

  June 24, 2011


लेखसंग्रह

कला आरसेनिर्मितीची

Category:

 

काचेतून आरपार निघून जाणार्‍या किरणांचं प्रमाण कमी करून तिच्यावरून परावर्तित होणार्‍या किरणांचं प्रमाण वाढवलं तर त्या काचेचा आरसा बनतो, हे ध्यानात आल्यावर मग काचेचं तसं रुपांतर करण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले. काचेच्या पाठी जर एखादा पदार्थ बसवला तर आरपार गेलेल्या किरणांना परत उलट्या दिशेनं वळवता येईल, हे तर स्पष्टच होतं.

  June 24, 2011


लेखसंग्रह

प्रतिमेचं उगमस्थान

Category:

 

जेव्हा एखादी वस्तू आरशासमोर उभी केली जाते तेव्हा त्या वस्तूपासून निघणारे असंख्य किरण त्या आरशाच्या पृष्ठभागावर जाऊन पडतात. प्रत्येक किरण त्या पृष्ठभागाशी वेगवेगळा कोन करत असतो. त्यामुळं अर्थातच तिथून परावर्तित होणारे किरणही वेगवेगळ्या कोनातून परत फिरतात. अर्थात ते सर्वच किरण एका विशिष्ट नियमाच्या चौकटीतच आपली दिशा ठरवतात.

  June 24, 2011


लेखसंग्रह

उलटापालट !

Category:

 

तुम्ही तुमच्या आरशातल्या प्रतिमेकडे निरखून पाहिलं आहेत का? म््हणजे पाहिलं नक्कीच असेल. पण ते आपलं सौंदर्य न्याहाळण्यासाठी त्या प्रतिमेची लक्षणं ध्यानात घेण्यासाठी पहा.

  June 24, 2011


लेखसंग्रह

प्रतिमाच प्रतिमा !

Category:

 

बच्चा भी खेले, बच्चेका बाप भी खेले अशी तोंडी जाहिरात करत खेळणी विकणारे अनेक जण चौपाटीवर, उपनगरी गाड्यांमध्ये, इतरत्र आपल्याला भेटत असतात. त्यातली किती खेळणी तशा प्रकारची असतात, हे सांगणं कठिण आहे. पण कॅलिडोस्कोप हे मात्र अशा प्रकारचं खेळणं आहे यात शंका नाही.

  June 24, 2011


लेखसंग्रह

अश्मयुगापासून आजपर्यंत

Category:

 

आरशांचा उल्लेख रामायण-महाभारतातही आढळतो. ग्रीक, रोमन, आपली सिंधु संस्कृती यांच्या भरभराटीच्या कालखंडातही आरशांचा उपयोग होत असल्याचे पुरावे मिळालेले आहेत. संथ जलाशयाच्या पाण्यात डोकावून पाहताना आपणच आपल्याकडे पाहत असल्याचं दिसल्यापासून ही जादू आपल्या घरच्या घरीच हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू झाले.

  June 24, 2011


लेखसंग्रह

प्रकार तशी प्रतिमा

Category:

 

आपला नेहमीचा ओळखीचा म्हणजे ज्यात पाहून आपण भांग पाडतो किंवा वेणी घालतो तो आरसा म्हणजे साधा सपाट आरसा. त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत आणि सपाट असतो.

  June 24, 2011