वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भगवंताच्या मांड्यांच्या वर गेल्यानंतर कमरेपाशी भगवंताने धारण केलेल्या पीतांबरा चे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्यश्री करीत आहेत.
December 24, 2020
दद्याद्दयानुपवनो द्रविणाम्बुधाराम- स्मिन्नकिञ्चन विहङ्ग शिशौ विषण्णे।दुष्कर्मधर्ममपनीय चिराय दूरं
नारायणप्रणयिनीनयनाम्बुवाह:।।८।।
आई भगवतीच्या कृपादृष्टी वर्षावाचा विचार मनात आल्यानंतर पूज्यपाद आचार्यश्री त्या वर्षावाशी संबंधित अन्य गोष्टींचा विचार एकत्रित करून उपमासौंदर्य साधत आहेत.
नारायणप्रणयिनीनयनाम्बुवाह:- हा मेघ सामान्य नाही. आई जगदंबेच्या कृपादृष्टीचा हा मेघ. कशी आहे आई जगदंबा, तर नारायण प्रणयिनी. भगवान श्री विष्णूची प्रियतमा. त्यातही नारायण शब्द वापरणारी आचार्यश्रींची प्रतिभा अलौकिक.
नारा म्हणजे पाणी. त्यात जे अयन म्हणजे निवास करतात ते नारायण.
मेघ जरी जल वर्षाव करीत असला तरी ते जल मूलत: समुद्राचे.
त्या आदिमायेची कृपा मुळात मायापती परब्रह्माची. किती सहजरीत्या आचार्य हा सिद्धांत सांगताहेत.
दयानुपवनो- हा मेघ दया रुपी पवन म्हणजे वाऱ्याच्या मागोमाग येतो. अर्थात आधी आई जगदंबेच्या मनात भक्तांच्या प्रति दया भाव जागृत होतो आणि मग कृपादृष्टी रुपी मेघ अवतरित होतो.
अस्मिन्नकिञ्चन- आचार्य स्वतःला अकिंचन याचा अर्थ अन्य कोणताही मार्ग नसलेले म्हणत आहेत.
विहङ्ग शिशौ- मेघाचा विषय असल्यामुळे येथे विहंग म्हणजे पक्षी याचा संबंध चातकाशी आहे. त्यातही त्याचा शिशू अर्थात पूर्ण परावलंबी. विषण्णे- त्यामुळे दुःखी, हतबल झालेला.
दुष्कर्मधर्ममपनीय चिराय दूरं- मेघ नसला की प्रचंड गर्मी होते. त्याचा त्रास होतो. तसा आईच्या कृपे पासून दूर असलेला जीव दुष्कर्म करतो. त्याचा परिणाम म्हणून दुःख रूपी घर्म अर्थात घाम येतो. तो दूर करून आईची दृष्टी,
दद्याद् द्रविणाम्बुधाराम- मला कृपा रुपी धनाची, शांत करणारी जलधारा प्रदान करो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 17, 2020
ज्ञान म्हणजे अनेक प्रकारची माहिती, सूत्रे आणि सिद्धांत आत्मसात करणे. ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात योग्य वेळी, योग्य तऱ्हेने योग्य कारणांसाठी वापर करणे म्हणजे प्रज्ञा.
June 3, 2026
भगवान श्री शंकरांच्या आणि भगवान श्री विष्णूच्या अद्वितीय संबंधाचा विचार मांडणाऱ्या अनेक कथा पुराणांमध्ये पहावयास मिळतात.
August 31, 2020
खरा प्रश्न आहे तो, सचिन व सुनील यांच्या स्टेटमेंटस् च्या योग्यायोग्यतेचा. परंतु, पत्रकार ( किंवा, भूतपूर्व पत्रकार) आशुतोष यानें विनाकरण त्याला वेगळाच रंग देऊन आक्रस्ताळेपणा केला. तसा तो आक्रस्ताळाच आहे. पत्रकार म्हणून तो एका टी.व्ही. चॅनेलशी संबंधित होता, आणि मुलाखती घेत असे, तेव्हांही त्याची पत्रकारिता आक्रस्ताळीच होती . नंतर आम आदमी पार्टीचा स्पोक्समन म्हणून तो मुलाखती देत असे, तेव्हांही तो आक्रस्ताळाच होता. त्यामुळे कालच्या चर्चेत तो एक सहभागी पाहुणा म्हणून आक्रस्ताळेपणानें बोलला तर त्याचें नवल वाटायला नको.
February 23, 2019
नागपूर अधिवेशन आले, की ठराविक प्रश्नावर शेतकर्यांचे मोर्चे, विधिमंडळातील ठराविक गोंधळ, सरकारची तीच तात्पुरती मलमपट्टी आणि पुन्हा जैसे थे. गेल्या पंचवीस-तीस वर्षांपासून हेच चित्र दिसत आहे. त्यात कुठलाही बदल नाही कारण सरकार आणि विरोधातील राजकीय मंडळींना शेतकर्यांचे प्रश्न मुळातून सोडवायचेच नाहीत.
December 18, 2011
अनाद्यंतमाद्यं परं तत्त्वमर्थं
चिदाकारमेकं तुरीयं त्वमेयम् |
हरिब्रह्ममृग्यं परब्रह्मरूपं
मनोवागतीतं महःशैवमीडे ‖ २ ‖
कैलासनाथ भगवान शंकरांच्या या नितांत रमणीय स्तोत्रात त्यांच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करताना भगवान शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
अनाद्यंतम्- जे अनादि तत्त्व आहे. जे अनंत आहे. अर्थात ना ज्यांना आदी आहे ना अंत आहे. जे आहेतच आहेत. परम सनातन शाश्वत आहेत.
आद्यं - जे अनंत कोटी ब्रह्मांडाचे प्रथम तत्व आहेत. आदि तत्व आहेत.
परं तत्त्वम् - जे सर्वश्रेष्ठ तत्त्व आहे. अंतिम सत्ता आहेत.
अर्थं- जे खऱ्या अर्थाने प्राप्त करावी अशा प्रकारचे तत्व आहे. मिळवण्याचे अंतिम स्थान आहे. जीवाने शरण जाण्याचे परमश्रेष्ठ स्थान आहेत.
चिदाकारम्- ज्यांचे स्वरूप म्हणजेच काही चैतन्याचे प्रगटीकरण आहे. निर्गुण निराकार चैतन्याचा सगुण साकार अविष्कार आहेत.
एकं - ज्यांच्या समान अन्य कोणीही नाही. एकमेवाद्वितीय. अतुलनीय.
तुरीयं - तीन गुणांच्या अतीत असणारी चौथी समाधी अवस्था असणारे. सदैव त्याच अवस्थेत स्थिर असणारे.
त्वमेयम् -मेय म्हणजे मोजमाप. अमेय म्हणजे याचे मोजमाप करताच येत नाही असे. अपरंपार. अमर्याद.
हरिब्रह्ममृग्यं- हरी म्हणजे भगवान विष्णू आणि ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव यांच्याद्वारे मृग्य म्हणजे त्यांच्या स्वरूपाचा शोध घेतला जातो असे.
पुराणकथेनुसार ज्यावेळी भगवान शंकर ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रगट होतात त्यावेळी भगवान विष्णू कासवरूपात खाली तर भगवान ब्रह्मदेव हंसरूपात वर त्यांचा शोध घेतात. पण त्या दोघांनाही यांच्या स्वरूपाचा अंतपार लागत नाही.
परब्रह्मरूपं- परब्रह्मस्वरूप असणारे.
मनोवागतीतं- मन आणि वाइनच्या आतीत असणाऱ्या, महःशैवमीडे - भगवान शंकराची मी स्तुती करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 11, 2020
कपिलदेव हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला सर्वोत्कृष्ट महान अष्टपैलू खेळाडू मानला जातो, आणि त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली कामगिरी ही मान्यता सिद्धही करते. परंतु कपिलच्या ३० वर्षं आधी भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर असा एक तारा चमकून गेला, ज्याने काही काळ आपल्या जबरदस्त अष्टपैलू कामगिरीने क्रिकेटजगताला आपली नोंद घ्यायला लावली. हा मराठमोळा तारा म्हणजे १२ डिसेंबर १९२५ ला जन्मलेला कोल्हापूरचा रांगडा गडी ‘दत्तात्रय गजानन ‘उर्फ’ दत्तू फडकर’.
December 11, 2025
रुद्राक्ष ही भारत, नेपाळ, इंडोनेशिया ( बाली) आणि हिमालयाच्या परिसरातील अन्य प्रदेशात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. रुद्राक्ष हा मिश्र असा संस्कृत शब्द आहे, ज्यात रुद्र (शंकर) आणि अक्ष (“डोळ्यातील अश्रुचे थेंब”) हे सामील आहेत. याला रुधिरवृक्ष असेही म्हणतात. इलोकार्पस जेनिट्रस हे हिमालयाच्या पायथ्याशी गंगेच्या खोऱ्याच्या क्षेत्रात वाढते. तसेच ते दक्षिण पूर्व आशिया, नेपाळ, इंडोनेशिया, न्यू गिनी ते ऑस्ट्रेलिया, आणि हवाईमध्ये सुद्धा आढळते.
March 1, 2022
इष्टाविशिष्टमतयोऽपि यया दयार्द्र-दृष्टया त्रिविष्टपपदं सुलभं लभन्ते।
दृष्टि: प्रहृष्टकमलोदरदीप्तिरिष्टां
पुष्टिं कृषीष्ट मम पुष्करविष्टराया:।।९।।
इष्टाविशिष्टमतयोऽपि- इष्ट म्हणजे आवश्यक असलेली. विशिष्ट अर्थात योग्य प्रकारची.
त्याला अ उपसर्ग लावला. अर्थात विशिष्ट प्रकारची नसलेली.
मती म्हणजे बुद्धी.
अपि म्हणजे सुद्धा.
एकत्रित अर्थ केला तर 'आवश्यक असणारी विशिष्ट प्रकारची बुद्धी नसली तरीसुद्धा.'
यया दयार्द्रदृष्टया- जिच्या दयापूर्ण दृष्टीने.
त्रिविष्टपपदं - स्वर्गातील स्थान.
सुलभं लभन्ते- सहजतेने प्राप्त होते.
अर्थात आई महालक्ष्मीच्या दयापूर्ण दृष्टीने ज्यांच्याजवळ स्वर्गात जाण्यासाठी आवश्यक बुद्धी नाही. तितकी ज्यांची पुण्य कर्मे नाहीत त्यांनादेखील सहजपणे स्वर्गाचे स्थान प्राप्त होते.
स्वर्गात जाण्यासाठी पुण्य करणे आवश्यक आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारची बुद्धी असावी लागते. शास्त्राचे,यज्ञयागाचे ज्ञान असावे लागते. मात्र आईची कृपा झाली तर असे ज्ञान नसणाऱ्यांना सुद्धा, याच जगात धनसंपत्तीच्या आधारे स्वर्गीय आयुष्य जगता येते. हा भाव.
कशी आहे ती दृष्टी? तर प्रहृष्टकमलोदरदीप्तिरिष्टां- प्रहृष्ट अर्थात पूर्णपणे फुललेल्या,
कमलोदर म्हणजे कमळाच्या आतील गाभ्याप्रमाणे.
दीप्तिरिष्टां- म्हणजे सौंदर्याने युक्त असलेली.
अर्थात कमळाच्या आत असणाऱ्या गाभ्याप्रमाणे परम कोमल, आकर्षक, रसपूर्ण अशी आईची दृष्टी आहे.
पुष्करविष्टरा- पुष्कर म्हणजे कमळ. तर विष्टर म्हणजे आसन. अर्थात कमळावर बसलेल्या, त्या आई महालक्ष्मीची दृष्टी,
पुष्टिं कृषीष्ट मम - मम म्हणजे माझे, पुष्टी म्हणजे कल्याण, कृषीष्ट म्हणजे करो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 18, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti