मनोरंजन

न झालेले गुजराती नाटक

Category:

 

मोहन वाघला नानांनी नवीन नाटक दिलं नाही, पण यादरम्यान मोहन तोंडवळकर यांच्या कलावैभवला मात्र एक नवीन नाटक दिलं. विषय होता सत्यभामा आणि पारिजात. आणि नाव होतं ‘पारिजात फुलला’. ‘शिवाजी मंदिर’ला प्रयोग पहायला गेलो. प्रयोग संपल्यावर नानासाहेबांना भेटायला आत गेलो. इकडची तिकडची बोलणी झाल्यावर कसं काय चाललंय यावर एकमेकांच्या आगामी कार्यक्रमाविषयी बोलणं निघालं.

  July 11, 2026


युवा-विश्व

विजिगीषा

Category:

 

जीवनात विजय आहे, तसा पराजयही आहे. पानगळ झाली तरी झाड कुठे निराश होतं? पुन्हा नव्याने अंगाखांद्यावर पाने, फुले घेऊन बहरत असतं. नैराशाचे विचार, आत्महत्येचे विचारही पानगळच असते. काळे ढग निघून जातात तसे तेही जातात. जे धीर धरतात तेच जगतात.

  July 11, 2026


नाट्यतपस्वी भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त खास कार्यक्रम
पॉडकास्ट

नाट्यतपस्वी भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त खास कार्यक्रम

Category:

 

ललितकलादर्श चा संगीत सौभद्र या नाटकाचा पहिला प्रयोग ४ जानेवारी १९०८ रोजी झाला. या निमित्ताने आपण नाट्यतपस्वी भालचंद्र पेंढारकर म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके अण्णा यांची नातसून उमा पेंढारकर, शुभदा आणि श्रीकांत दादरकर ( विद्याधर गोखले यांची कन्या व जावई ) तसेच अण्णांचा मुलगा ज्ञानेश पेंढारकर यांची मुलाखत घेतली आहे.

  July 11, 2026


लेखसंग्रह

वस्तू आणि पैशांची भाषा

Category:

 

माझ्या व्यवस्थापकीय जीवनातील अजून एक अनुभव. एके दिवशी माझ्या विभागातील एक अधिकारी, निलयशी गप्पा मारत असताना त्याने मला एक फार इंटरेस्टिंग आणि मस्त प्रश्न विचारला. असा प्रश्न बहुतेक व्यवस्थापकांना कधीनाकधी पडतोच. तो प्रश्न असा “कनिष्ट अधिकाऱ्यांना बहुतेक वेळा एखादी गोष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांना पटवून द्यायला फार त्रास का होतो? त्यांच्या मते तर त्यांचा विचार सरळ सोपा आणि बहुतेक वेळा कंपनीच्या दृष्टीने अतीशय महत्वाचा असतो. तरी सुद्धा त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना एकतर हवे तसे यश येत नाही किंवा ते प्रयत्न पूर्णपणे दुर्लक्षित केले जातात. हा अनुभव खूप वेळा खरोखरच हताश करणारा असतो.”

  July 10, 2026


युवा-विश्व

कैद्यांच्या मुलांचे काय होते?

Category:

 

जी माणसे स्वतःला विसरून इतरांच्या साठी काम करतात ती प्रेरणेची स्त्रोत्र असतात. समाज दोषींच्या कुटुंबाकडे व मुलाकडे दोषी नजरेने पाहतो. दुःखाला असंख्य पदर असतात. दुसऱ्यांचे दुःख दूर करणारे नकळत एक पायवाट निर्माण करतात. बेंगळुरूचे जोडपे व्ही मणी आणि सरोजी यांनी दोषींच्या मुलांसाठी घर बांधण्यासाठी अनेक विलासी वस्तूंचा त्याग केला, ज्यांचे भविष्य अन्यथा अनिश्चित दिसेल. हे जोडपे गेल्यानंतरही त्यांची एनजीओ SOCARE काम करत आहे. कैद्यांच्या मुलांचे काय होते? जोडप्याने त्यांना सुरक्षित आश्रयस्थान तयार करण्यासाठी बचत वापरली 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस, बेंगळुरूमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये काम करत असताना, व्ही मणी प्रवासात मध्यवर्ती कारागृहातून जात असत. “आजीवन शिक्षा झालेल्यांची मुले सर्व व्यावहारिक हेतूंसाठी अनाथ झाली आहेत आणि त्यांना तुरुंगाबाहेर रडताना पाहणे खूप दुःखदायक आहे.”असे ते म्हणत.

  July 10, 2026


युवा-विश्व

फेसबुक

Category:

 

प्रिय फेसबुक
तुला फेस नसलेलं बुक म्हणावं का? कारण तुझा स्वतःचा असा फेस दिसतच नाही. अनेकांचे फेस तू जगाला दाखवतोस, खरे, खोटे. उठल्या उठल्या माणसं देवाआधी आता तुझं दर्शन घेऊ लागले आहेत. तुझ्याशिवाय लोकांना चैन पडत नाही. घरातले जेव्हा फटकारतात, सभोवताली निराशा असते तेव्हा तूच गोंजारतोस. लाईकमुळे आत्मविश्वास येतो.

  July 10, 2026