युवा-विश्व

पुस्तकांच्या अलीकडे

Category:

 

आयुष्याच्या पूर्वार्धात ज्यांनी कष्ट केले, अभ्यास केला, शिस्त बाळगली त्यांच्या जीवनात यश पायघड्या घालतं. दुःखाचे, संघर्षाचे चटके बसलेल्यांनीही यशश्री खेचून आणलेली आहे. दुःख हा या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकालाच दुःखाला, संघर्षाला सामोरं जावंच लागतं. संघर्षाला सामोरे जाणारेच स्वतः स्वतःतून उमलतात. संघर्षाला हार मानणारे नैराश्याला व आत्महत्येला जवळ करतात.

  July 12, 2026


द्रौपदी : महाभारतातील स्त्री की आजच्या समाजाचे प्रतिबिंब?
पॉडकास्ट

द्रौपदी : महाभारतातील स्त्री की आजच्या समाजाचे प्रतिबिंब?

Category:

 

महाभारतातील द्रौपदीला अनेकजण केवळ पाच पांडवांची पत्नी म्हणून ओळखतात. पण ती यज्ञातून प्रकट झालेली *यज्ञसेनी’, राजा द्रुपदाची कन्या, विदुषी, न्यायप्रिय आणि स्वाभिमानी स्त्री होती. तिचे मूळ नाव ‘कृष्णा’ होते, आणि तिच्या विचारांनी व निर्णयक्षमतेने महाभारताच्या इतिहासाला निर्णायक वळण दिले.

लेखक अशोक समेळ यांनी आपल्या ‘द्रौपदी’ या कादंबरीत द्वापरयुगातील द्रौपदीला कलियुगातील असंख्य द्रौपदींच्या वास्तवाशी जोडत तिच्या संघर्षाचा, सामर्थ्याचा आणि स्त्रीत्वाच्या नव्या अर्थाचा वेध घेतला आहे.

  July 11, 2026


युवा-विश्व

समाज कार्याचा पॅटर्न

Category:

 

समाज कार्याचा पॅटर्न नसतो पण एखाद्या व्यक्तीच्या कर्तुत्वानेच एखादा पॅटर्न जनमानसात रूजतो.पायवाटेला नांव नसतं.ज्याचं कोणी नसतं त्यांच्यासाठी देवांने अनेकांना पाठवलं त्यापैकी एक म्हणजे शंकर बाबा पापळकर. “एकदा हॉस्पिटल मध्ये बेवारस प्रेत आलं होत. त्याला कुणी घ्यायला तयार नव्हत. बेवारस मृतदेहांसाठी महाराष्ट्र शासनाच धोरण आहे. मृतदेहाला पोलीस उचलतात आणि त्याच्यावर बेवारस लिहितात आणि टाकून देतात” या घटनेमुळे शंकर बाबा पापळकर यांनी अनाथांसाठी काम करण्याचा निर्णय घेतल्याचं ते सांगतात. अमरावतीच्या जिल्ह्यातील परतवाडा इथे मूकबधिर, दिव्यांग आणि रस्त्यावर बेवारस पडलेल्या मुलांना पितृछत्र देणाऱ्या शंकर बाबा पापळकर यांच ‘वझ्झर’ आश्रम आहे.

  July 11, 2026