(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • रंग अवकाशाचा मुक्तयात्री – अशोक साठे

    आमच्या मेंदूच्या एका कप्यात चक्रावर्तासारखा तू का भिरभिरत असतोस? काही निमित्तांनी (आता नाट्यसंमेलन) अंधारानंतर सायक्लोरामावर पडलेल्या लख्ख पहाट प्रकाशासारखा का आठवत राहतोस? जसाच्या तसा! तुझ्याबरोबर घालवलेला प्रत्यक्ष क्षण तळहातावर स्वातीच्या थेंबाचा मोती ठेवावा, तसा मनचक्षूसमोर सजीव होऊन उलगडत राहतोस (हे जरा शब्दबंबाळ वाटतंय ना?) नाटकाची संहिता वाचताना हळूहळू अस्पष्ट, पण मग साकार दिसणाऱ्या पात्रासारखा, प्रसंगासारखा (हे तुला जवळचं वाटेल).

      August 19, 2022


  • आग्यामव्हळाचा तडाखा अन वानरायचा भडका……!!!

    सोंडू पाटलाच्या शेतातं भैमूंग सोंगायची लगबग चालू व्हती.नव्हाळीच्या चार शेंगा लेकरायच्या तोंडी लागतील मणून सगळं गांव पाटलाच्या शेतात उलथलं व्हत.त्याल कारणबी तसच होतं.सोंडू पाटील गावातला दिलदार माणूस समजला जायचा,पण परतेक्षात मात्र त्यो लयचं बेरकी आन धुर्त व्हता.! त्याच्या हातून चार शेंगा जास्त सुटायच्या.त्यालं कुठं,कव्हा आण कसे हात मोकळे सोडायचे,ही कला अवगत व्हती.आवळा देऊन कोव्हळा काढण्याच्या बाबतीत तेव लय पटाईत व्हता.सोंडू पाटलाच्या घरी चोवीस घंटे लक्ष्मी पाणी भरायची.घरची गडगंज संपत्ती,दोन चार वेगळाले धंदे,शेतजमीन,चार पाच बैलगाड्या,दहा पंधरा दुभती जनावरं,संगटच शेतात ट्रॅक्टर,रोटाव्हेटर,थ्रेशर सारखे आधुनिक यंत्रबी दिमतीलं व्हतेच. दोन पोर्‍ह आणि जीव ववाळणारी पाटलीन हे त्याचं विश्व व्हतं. दिलदार मनाचा हा माणूस नावासारखाच रांगडा व्हता.उंच धिप्पाडं शरीर,तुर्रैबाज फेटा,आकडेदार लांब लांब जाड्या मिश्या अन भेदक नजरं असा पाटलाचा रूबाब व्हता.पाहताच क्षणी कोणालंबी जरब बसावी असा हा सोंडू पाटील…!! पंचक्रोशीत एक वजनदार आसामी म्हणून परसिध्द व्हता.तसं तरुणपणातं पाटीलं पंचक्रोशीतला एक नावाजलेला पैलवानं मनून वळखला जायचा.पाटलांनं लय गावचे आखाडे मारले व्हते.शंकरपट,कबड्डी, कुस्तीसारख्या अस्सलं मातीतल्या खेळायबरोबरचं पाटील तमाशाचाबी लयचं नांदिक व्हता.आजबी कुठंपण शंकरपट,कबड्डी,कुस्ती किंवा तमाशाचा फड पडल्याची जराशी जरी खबर कानावर आली की पाटलाची डमनी जुपलीच मनुन समजायचं….! तर आसा हा सोंडू पाटील जेवढा दिलदार तेवढाच बेरकीबी व्हता.

      January 20, 2026


  • सेलर्स वाईफ

    सेलर्स वाईफ म्हणून तिला काही नातेवाईक आणि इतरांकडून खूप वेगवेगळ्या आणि विचित्र असा वागण्याचा अनुभव येत असतो. बहुतेक जण तिच्याकडे सहानुभूतीने वागतात. सुरवातीला तिला सगळ्यांच्या वागण्याचा त्रास व्हायचा पण माझ्या आई बाबांच्या पाठींब्यामुळे ती कोणालाही सडेतोड उत्तरं द्यायला लागली.

      August 13, 2021


  • पालक बालक

    मातृत्व ही स्रीची एक नैसर्गिक देणगी आहे. त्यामुळे तिला खूप संयमाने आणि शांत पणे हे सगळे सहन करावे लागते. आणि मी आई होणार आहे म्हणून मलाच सगळ्या गोष्टी करायला लागतात.

      February 15, 2022


  • विश्वव्यापी परिपूर्णता

    अम्मांच्या अमृतमिठीत सामावण्याचे भाग्य ज्यांना लाभलंय ( मी सुदैवी- आजतागायत त्यांनी मला ९-१० वेळा कुशीत घेतलंय. माझी पत्नी त्याहून भाग्यवान – तिने तर अम्मांचे मराठीतील पहिले चरित्र लिहिलंय, जे खुद्द अम्मांच्या हस्ते पुण्यात आणि मुंबईतही प्रकाशित झालंय.) तेच त्याचं महत्व सांगू शकतात आणि लताचा कार्यक्रम प्रेक्षागृहातून “लाईव्ह ” ऐकलेले कृतकृत्य श्रोते तिच्या सुरांची आकाशझेप अनुभवू शकतात. (याही बाबतीत आम्ही पती-पत्नी भाग्यवान आहोत.)

      September 28, 2021


  • मला देव दिसला – भाग ४

    ईश्वर दर्शन जे सर्व प्रयत्नकरून भेटत नव्हते, दिसत नव्हते. त्याचे कारण आता लक्षात आले. असमाधानी, अशांत, लोभी, रागीट, अहंकारी, हेकेखोर, खोटे, दिशाहीन आणि अशाच दुर्गुनांनी घेरलेले, मन शांततेमध्ये राहण्याची सुतराम शक्यता नाही. ही दुर्गुणाची झाकणे प्रथम दूर व्हावयास हवीत. तरच मन शुद्ध व पवित्र स्थितीमध्ये राहील हे सत्य आहे. सत्यच फक्त ईश्वराशी एकरूप होवू शकते. इश्वरी सानिध्याच्या प्रयत्नामधील प्रमुख बाधा लक्षात आली. संकल्प तर दृढ होता, विश्वास अटळ होता. भावना ईश्वरी दर्शनासाठी प्रेरीत होत्या. त्यामुळे मनाच्या शुचिर्भूतेकडे, शुध्दतेकडे, पवित्रतेकडे जोमाने, तिवृतेने प्रयत्न करू लागलो. प्रश्न पडला केव्हा मिळणार दर्शन त्या ईश्वराचे? प्रयत्न करून आजपर्यत झाले नव्हते. जे कालचक्र भूतकाळांत गेले होते, ते कायमचे हातातून गेले होते. माझ्यासाठी तो ‘असत्य काळ’ होता.

    भविष्यकाळ अर्थात येणारा, भावी काळ. निसर्गचक्रामधला एक माहित असलेला काळ, परंतू तो येवू घातलेला असल्यामुळे मानवासाठी, जीवांसाठी त्याचा प्रत्येक क्षण अनिश्चीत व अतार्कीक असा असतो. भविष्याच्या कोणत्याही अंगाची मुळीच कल्पना करता येत नाही. त्यामुळे खऱ्या विचाराने भविष्यकाळ हा देखील ‘असत्य काळ’ ह्याच सदरात जातो.परमेश्वर मला उद्या दिसेल हे हास्यापद ठरणारे आहे. कारण भविष्यकाळच जर असत्य समजला गेला तर तेथे सत्य असा तो ईश्वर कसा दिसणार?

    सत्य फक्त वर्तमानकाळ हेच असते. भविष्यकाळ छलांग मारित येतो आणि क्षणातच भूतकाळामध्ये अदृष्य होतो. त्यामुळे वर्तमानकाळाचे स्वरूप क्षणाचेच भासते. येणे आणि जाणे ह्या सीमारेषांवर. मानवी विचारांच्या मोजमापांत (DIamention) ह्या वर्तमानकाळाचे अस्तित्व जाणणे ही अत्यंत कठीण बाब आहे. आश्चर्य म्हणजे फक्त हा क्षणीक वा समयशून्य वर्तमानकाळाच ‘एक सत्य’ समजला गेला. ह्याच काळांत जर झाले तर त्या ईश्वर शक्तीचे दर्शन होण्याची शक्यता असते.

    श्री. गुरूंचे मार्गदशन होते की “फक्त वर्तमान काळातच तुमच्या प्रयत्नानुसार तुम्हास ईश्वर दर्शन होवू शकते.”

    अध्यात्मज्ञान श्री गुरूमुळे मिळाले होते व वैद्यकीय ज्ञान जे मला संसारक्षेत्रात मिळाले त्या दोन्हींचा उपयोग घेण्याचे मनाने ठरविले. “क्षणयुक्त वर्तमानकाळ ईश्वर दर्शनासाठी फक्त मिळू शकेल” हे एक प्रचंड आवाहन होते. Challenge for my efforts and instinct desire. निसर्ग जसा मला वर्तमानकाळ देत आहे, जेवढा वेळ मला देत आहे तेवढाच वेळ स्वीकारण्याखेरीज मला गत्यंतर नव्हते. मी माझ्या इच्छेनुसार, गरजेनुसार तो काळ बदलू शकत नव्हतो. जो वेळ आहे जसा आहे, जेवढा वेळ मिळेल तेवढ्याच वेळात मला माझा इच्छीत संकल्प प्राप्त करायचा आहे.

    ह्यावर मी चिंता करू लागलो. मेंदू हा एक अवयव (इंद्रिय) आहे. शरिरातील मन व बुध्दी ही मेंदूशी निगडीत असते “विचार करणे” हे मेंदूचे कार्य. हे कार्य ,सतत आणि क्षणाचीही विश्रांती न घेता मेंदू करीत असतो. हे एक जीवंतपणाचे लक्षण आहे. जोपर्यत मेंदू जीवंत आहे, विचारकार्य चालू राहते. जागृत, निद्रेत, गाढ निद्रेत, बेशुध्दावस्तेत अथवा कोणत्याही स्थीतीत जीवंत मेंदूचे ‘विचार कार्य’ अविरत चालत असते. विचार लहरी लहान असोत वा मोठ्या ह्या उत्पन्न होत राहतात. एक मात्र सत्य आहे की एकावेळी फक्त एकच विचार आले त्यांची गर्दी झाली हे जरी वाटत असले तरी ‘विचार उत्पन्न’ होण्याची क्रिया आणि क्षमता एकावेळी फक्त एक विचार उत्पन्न होणे हेच असते. विचार उत्पन्न होण्याचा वेग हा मात्र कमी जास्त असू शकतो. एका मागून एक विचार चटकन येत राहणे हा निसर्ग असतो. शरीरात ‘वासना’ वा इच्छा (or Desire) हा शरीरामधला एक नैसर्गीक वा इश्वरी गुणधर्म असतो, विचार निर्मीती ही त्या वासना गुणाचाच परिणाम असतो.

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      March 20, 2016


  • साठवणीतील एक आठवण

    आषाढी एकादशीच्या दिवशी शाळेतील लहान मुले. मुली आणि पालखी सोहळा केला गेला होता. दरवर्षीच करते ती. छोटेसेच विठ्ठल रखुमाई. आणि वारकरी होते. त्यांनी वारकऱ्यांचा पोषाख केला होता. मुलींनी डोक्यावर तुळशीचे वृंदावन आणि मुलांनी हातात पताके व गळ्यात टाळ घालून ठेक्यात वाजवत नाचत अगदी तल्लीन होऊन परिसरात मोकळे पणाने जात होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला माणसं उभी होती. लहान पालखीला व वारकऱ्यांच्या पाया पडत होते. त्यांना पाहून मला वाटले होते की या छोट्यांना ना प्रपंचाची चिंता ना देवाजवळ काही मागणे. खरी तर हीच वारी व हीच खरी भावभक्ती.

      June 12, 2022


  • समुद्रतळीचा राजवाडा

    दोन भाऊ सख्खेच. पण दोघांच्या दोन तन्हा होत्या व्यवसायाच्या मोठा “होना” पाण्यात गळ टाकून मासे पकडून विकत असे, तर धाकटा “होकी” हा डोंगरदऱ्यात हिंडून धावून शिकार करणारा. पक्षी मारणारा फासेपारधी म्हणून लोक त्याला ओळखीत असत.

      October 5, 2025


  • आदिशक्तीची तीन रूपे आणि कौन बनेगा करोडपती

    सोफिया कुरेशी, व्योमिका सिंग, प्रेरणा देवस्थळी, ही तीन नावे आठवतात ? नाही ? मग , ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर तिन्ही सैन्य दलांच्या वतीने ज्यांनी पत्रकार परिषद घेतली , ती तरी आठवते का ?

      August 23, 2025


  • माझ्या मातीचे गायन !

    १९९६ साली माझ्या पत्नीचा दुसरा काव्यसंग्रह ” वाटेवरच्या कविता ” प्रकाशित करण्याचा विचार पुण्यातील नीहारा प्रकाशनाच्या सौ. स्नेहसुधा कुळकर्णी यांनी बोलून दाखविला. मुखपृष्ठाची संकल्पना आमच्या गणपतीपुळे ट्रीपच्या बागेतील एका छायाचित्रावरून सुचली. प्रस्तावनेसाठी सुधीर मोघेंशी संपर्क साधला आणि काहीशा झटापटीनंतर ती मिळाली. (वो कहानी फिर कभी !) प्रश्न उरला – आशीर्वादाचा! यासाठी साहित्य सृष्टीतील आजोबा ” कुसुमाग्रज ” यांच्यापेक्षा अधिक समर्थ व्यक्ती कोण असू शकेल?

      June 5, 2021