(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • झुरळाने काटा काढला! – भाग  4

    पुढे गोरे मॅनेजर झाला. मग तर माझ्या छळाला अंतच राहिला नाही. मांजर जसं उंदराला खेळवतं तसं सगळा गोरे कंपू मला खेळवत होता. प्रत्येक काळ्या ढगाला एक चंदेरी कडा असते असे म्हणतात. तशी माझ्या या काळ्याकुट्ट ढगांच्या कडेवर एक चंदेरी कडा मला एक दिवस दिसली आणि या रोजच्या यमयातनातून सुटण्याचा एक खात्रीशीर मार्ग मला दिसू लागला. अर्थात ह्या मार्गाचा विचार मनात येताच मी भयंकर चपापलो! असा विचार माझ्या मनात कसा काय आला याचे मला फार आश्चर्य वाटले.

      June 26, 2022


  • त्या डायरीतला बंदिस्त सैनिक……

    रागिणी ती डायरी पाहून विचारात पडली, नचिकेत ने यापूर्वी तिला कधीच या डायरी बद्दल सांगितले नव्हते वा तिनेही कधी त्याच्या जवळ ती पाहिली नव्हती. त्या डायरीत काय लिहिलं असणार या विचाराने तिचं कामात लक्षच लागत नव्हतं. मनात कल्लोळ सुरू होता. स्वतःशीच पुटपुटत ती विचारात गुंतली होती. कसेबसे तिने काम आटोपले आणि डायरी घेऊन ती बेडवर बसली.

      August 11, 2020


  • पद्मश्री लीला पूनावाला !

    त्यांची आणि माझी प्रथम भेट नक्की कुठे झाली आठवत नाही. बहुधा पुण्यातील एखाद्या HR कार्यक्रमात झाली असावी. visiting cards ची देवाण -घेवाण झाली. माझ्या सवयीनुसार त्यांच्या कार्डमागे तारीख /वेळ /प्रसंग वगैरे मी लिहिले. स्मृती लख्ख राहाव्यात आणि भविष्यकालीन संदर्भासाठी नोंद असावी म्हणून माझा मित्र रविशंकरने मला ही सवय लावली आहे.

      January 2, 2022


  • उगाच काहीतरी – २५

    बाईकवर असताना फोनची रिंग वाजते. आपण घेत नाही,
    परत वाजते काहीतरी महत्त्वाचे असेल म्हणून आपण गाडी बाजूला घेतो. रेनकोटच्या आत ट्राउझरच्या खिशात ठेवलेला मोबाइल बाहेर काढतो. घरून दोन मिस्ड कॉल्स आलेले असतात. लगोलग दोन कॉल्स म्हणून आपण थोडे धास्तावतो म्हणून मग हेल्मेट काढून किंवा वर करून फोन डायल करून कानाला लावतो. रींग वाजत असते आणि मग आवाज येतो.
    " कुठे आहात? "
    " रस्त्यात"
    " अहो रस्त्यात म्हणजे नक्की कुठे ? "
    " हायवे ला"
    " तुम्ही हायवेनेच येताना? मग हायवेवर कुठे ते सांगा ना? "
    तुम्ही विचारात पडता की आता ही ला एक्झॅक्टली कुठे आहे ते कसं सांगायचं? काही जरी सांगितले तरी तिला त्या रस्त्यावर काय काय लागतं ते माहीती नाही.
    तरीपण तुम्ही सांगता- "कुठल्यातरी ढाब्याजवळ"
    " कुठे आहे तो? "
    मग अचानक तुम्ही तिला माहिती असलेल्या एरीयाचे नाव सांगता.
    " बाणकोली च्या अलिकडे "
    वास्तविक तुम्ही त्याच्या पासून ५ किमी दुर असता पण तिला ओळखता येणारा तोच एक एरिया असतो.
    वरुन पावसाच्या सरी वर सर सुरू असते.
    " काय झालं? "
    " अहो आज ऑफिस मधुन घरी यायला पावसामुळे बराच वेळ लागला. त्यात त्या कुलकर्णी मॅडम भेटल्या. त्यामुळे अजून ऊशीर झाला. एकदम बारीक झाल्या आहेत. कुठलं डाएट करताहेत काय माहिती. तुम्ही केव्हापासून एक्सरसाइज सुरू करताय? ऐका न आमच्या गृप च्या सगळ्या रविवारी माळशेज ला जायचं म्हणताहेत. मी त्यांना हो सांगितलं. जाऊ न? "
    " आता जर तू हो सांगितलं तर मला का विचारते आहे?
    " तुम्ही म्हणाल तर नाही जाणार. असंही तुम्ही पण कुठे नेत नाही"
    " जाऊन ये, जाऊन ये"
    " तुम्ही वाटच बघा मी कुधी बाहेर जाते ते. म्हणजे तुम्हाला रान मोकळं"
    एव्हाना दहा मिनिटे होऊन गेलेली आणि सरींची साइज वाढलेली असते.
    "हे सांगण्यासाठी फोन केला का तू? घरी नव्हतं का सांगता येणार? ए बाबा तु फोन कशासाठी केला ते सांग. मी इथे भर पावसात रस्त्यावर उभा राहून बोलतोय"
    " अरे हो, मी कशासाठी फोन केला तेच आठवत नाहीये"
    " ठीक आहे ठेवतो. आठवले की घरी आल्यावर सांग"
    " थांबा थांबा, येताना दुध आणायला जमेल का? मी विसरले आणायला "
    " ओके आणतो"
    " ऐका न जमलं तर आणा उगाच भर पावसात इकडे तिकडे नका जाऊ. उद्या सकाळ पर्यंतचा चहा होईल. नाही आणलं तर मी उद्या येताना घेऊन येईल. "
    " ठीक आहे " - आता तुमच्या आवाजात चिडचिड असते. तुम्ही हेल्मेट घालायला हात उचलता
    " किती वेळ लागेल यायला? "
    " तू बोलणं थांबवलं तर पाऊण तासात पोचेन नाहीतर तू जेव्हा थांबतील त्याच्या पुढे पाऊण तासाने"
    " उशिरा निघाले का आज? "
    " अरे काय लावलय. रस्त्यावर मी एकटाच गाडी वाला आहे का? पावसामुळे ट्राफिक मरणाची आहे.वरून पाऊस पडतोय. त्यात परत तुझं काय नाटक चाललंय? "
    " तसं नाही हो. पिठलं भाकरी करायचा प्लान आहे. केव्हा पोहचाल ते कळलं तर त्या हिशोबाने बनवेल म्हणजे तुम्हाला गरमागरम खायला मिळेल. "
    तुमची चिडचिड जरा कमी होते.
    तुम्ही फोन ठेवता आणि तयार होऊन गाडी सुरू करता आणि रस्त्यावर पाहता. आतापर्यंत बर्यापैकी मोकळा असलेल्या रस्त्यावर गाड्यांची रांग लागलेली असते. कुठल्यातरी गाडीवान दादाने काहीतरी कांड केलेले असते त्यामुळे फुल्ल ट्राफिक जाम झालेले असते.
    तुम्हाला माहीती असते की आता आपल्याला पाऊण नाही तर दिड तास लागणार आहे, पिठलं भाकरी थंड झाल्याचे खापर तुमच्यावर फुटणार आहे आणि वरून पुन्हा " मला माहीती आहे, मी फोन केला तेव्हा तुम्ही ऑफिस मधून निघाले पण नव्हते" हे ही ऐकावं लागणार आहे.
    --अमोल पाटील

      December 5, 2022


  • मानसिक तणाव (क्रमशः पुढे ४ वर चालू )

     

      November 17, 2012


  • एका निवांत समयी’ व ‘साहित्य उपेक्षितांचे’ या पुस्तकाचे प्रकाशन

    कवी श्री. निलेश बामणे लिखीत " एका निवांत समयी " व " साहित्य उपेक्षितांचे " या पुस्तकाचे प्रकाशन करताना राजमाता प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ. आशाताई मामिडी, सरिता को.आॅप.क्रेडिट सोसायटी लि.चे अध्यक्ष श्री. सदाशिव मते, संचालक डॉ. शांताराम कारंडे, संचालक श्री विनोद निक्षे, सचिव श्री. प्रभाकर देसाई, श्री हरिशचंद्र झावरे, धगधगती मुंबई मराठी वृत्तपत्राचे उपसंपादक श्री जगदीश लाड.

    jagdishlad0022jagdishlad011

      January 11, 2016


  • डॉ. मोहंमद शकील जाफरी – एक देवमाणूस

    डॉ. मोहंमद शकील जाफरी आणि माझी पहिली प्रत्यक्ष भेट यंदाच्या दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या कार्यालयात झाली. त्यापूर्वी आम्ही भेटल्याचे आम्हा दोघांनाही फुसटसेच आठवत होते. मी आमच्या मासिक साहित्य उपेक्षितांचे दीपावली विशेषांक 2015 ची प्रत त्यांना दिली. तशा मी माझ्या मासिकाच्या प्रती मला नव्याने भेटणार्‍या व्यक्तींना देत असतो पण अंक वाचून झाल्यावर त्याबद्दल स्वतःहून प्रतिक्रिया देणारे क्वचितच भेटतात. डॉ. मोहंमद शकील जाफरी यांनी दूसर्‍याच दिवशी मला फोन करून आमच्या दिवाळी अंकाबद्दलचे त्यांचे विचार मांडले पण सुचना केल्या नाहीत. मी त्यांना आमच्या मासिकासाठी साहित्य पाठविण्याची विनंती केली ती त्यांनी आनंदाने मान्य केली. त्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून आमचा संवाद सुरू झाला आणि मला डॉ. मोहंमद शकील जाफरी हा देवमाणूस उलगडत गेला. सध्या ते पुण्यातील मंचर येथे वास्तव्यास असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष भेटणे शक्य होत नव्हते. पण आमच्या पहिल्याच भेटीत मी त्यांना कधी मुंबईला आल्यास आपण भेटू आणि चर्चा करू असं म्ह्टल होतं.

    काही दिवसापूर्वी मला त्यांचा अचानक फोन आला. ते मला म्हणाले मी घाटकोपरला आहे भेटूया का ? मी लगेच हो म्हणालो. मला भेटण्यासाठी म्हणून ते गोरेगांवला आले ठरल्या वेळेवर पण मलाच आर्धातास उशिर झाला माझ्या स्वभावानुसार त्याबद्दलची यकिंचितही चिडचिड मला त्यांच्या चेहर्‍यावर दिसली नाही. चहा पिता-पिता आमच्यात चर्चा रंगली आणि मला आपण एका देवमाणसासोबत चहा पित आहोत याचा आनंद झाला. सामाजिक कार्यासाठी त्यांना मिळालेले 150 हून अधिक पुरस्कार ही त्यांच्या सामाजिक कामाची पोचपावती होती. मनात असेल तर एक व्यक्तीही समाज कार्य करू शकते हे दाखविणारे ते एक जीवंत उदाहरण आहेत. हिंदी आणि उर्दू या भाषांवर प्रभूत्व असणार्‍या या अमराठी माणसाचे मराठी संत साहित्यावर असणारे प्रेम आणि मराठी साहित्याचे ज्ञान पाहून मी नतमस्तक झालो. डॉ. मोहंमद शकील जाफरी यांच्यासारखी स्वतःच्या व्यक्तीगत सुख-दुःखाचा विचार न करता इतरांसाठी जगणारी माणसे या जगात फार कमी असतात. त्यांनी आमच्या मासिकासाठी पाठविलेल्या कविता वाचूनच मला वाटले होते या माणसाला आपण पुन्हा भेटायला हवे शक्य होईल तेंव्हा ! त्यांच्या कविता समाजमनाच्या काळ्जात हात घालतात आणि आमच्या कविता काळजाला उब देतात. प्रत्येक कवीचं प्रतिबिंबच त्याच्या कवीतीतून छळकत असतं. डॉ. मोहंमद शकील जाफरी यांच्या कविता वाचता क्षणी हा माणूस समाजसेवक असणार याची जाणिव होते. मी कविता लिहतो पण त्यात रमत नाही म्हणूनच मी इतरांच्या कवीता मनापासून वाचून पचवू शकतो.

    आमच्या भेटीत डॉ. मोहंमद शकील जाफरी यांनी मला त्यांचा ‘हे प्रेषिता’ हा सनय प्रकाशनाने प्रकाशित केलेला कवितासंग्रह भेट म्हणून दिला. माझ्या सवयी प्रमाणे मी त्यांना म्ह्णालो हा वाचून मी याबद्दल नक्कीच लिहीण. कोणत्याही कवितासंग्रहातील मनोगत आणि प्रस्तावना मी शेवटी वाचतो. या कवितासंग्रहातील पहिलीच कविता होती ‘समुद्र’ ही कविता आपल्या समुद्रासारखं जीवन जगण्याची प्रेरणा देते. सोप्प्या भाषेत सांगायच तर एक समाजसेवक समुद्राचे जीवन जगत असतो हे पटवून देते. त्यानंतरच्या काही कविता देवाचं अस्तित्व मान्य करणार्‍या, ‘शुभरात्री’ या कवितेत कवीने एका समाजसेवकाची समाजाप्रतीची तळमळ दर्शविली आहे. उपदेश या कवीतेत कवी उपदेशा पेक्षा कर्माला महत्व देताना दिसतो. कविता या कवितेत कवी कवितेच्या ताकदीची जाणीव करून देताना दिसतो. स्वातंत्र्य, स्वेच्छा, मातीचा माणूस न्याय सारख्या कविता आपल्या देशातील सामाजिक समस्यांवर भाष्य करताना दिसतात. ‘मौन’ या कवितेतून कवी जगातील अशांततेला वाचा फोडताना दिसतो. ‘परमसत्य’ या कवितेतून कवीची आध्यात्मिक विषयाची जाण अधोरेखीत होते. भूक, गरीबी, अनाथपणा, ग्रामिण जीवनातील समस्या आणि व्यथा मांडताना कवी प्रत्येक गरीब आई – बाबाची आणि त्यांच्या मुलाची व्यथा मांडताना दिसतो. या कवितासंग्रहातील शेवटची कविता आहे ‘सज्दा’ ही माणसाने जीवन कसे जगायला हवे हे सांगणारी आणि मातीचे ऋण मानायला शिकविणारी कविता आहे... डॉ. मोहंमद शकील जाफरी यांचा हा कवितासंग्रह भरल्यापोटी वाचता कामा नयी तो रिकाम्या पोटीच वाचायला हवे या निशकर्षा पर्यंत मी येवून पोहचलो. त्यानंतर मी या पुस्तकातील डॉ. ज्ञानेश्वर ब. थोरात यांची प्रस्तावना वाचली आणि मी ती पहिली नाही वाचली याचा मला आनंद झाला. कारण ती जर मी पहिल्यांदा वाचली असती तर मी या कवितासंग्रहातील कविता तटस्थपणे समजून घेऊच शकलो नसतो आणि या कवितासंग्रहावर आणखी एक ओळही लिहिण्याची हिंमत माझ्याच्याने झाली नसती कारण डॉ. ज्ञानेश्वर ब. थोरात यांची या पुस्तकावरील प्रस्तावनाच प्रस्तावना कशी असावी याच जीवंत उदाहरण आहे. डॉ. मोहंमद शकील जाफरी यांचे या पुस्तकातील मनोगत हे एका कवीचे नाही तर समाजसेवकाचे मनगोत आहे. डॉ. मोहंमद शकील जाफरी यांच्या रूपात मला एक कवी, लेखक, समाजसेवक भेटला पण माझ्या डोळ्यांना दिसला तो त्यांच्यातील देवमाणूस...

    -- निलेश बामणे

      February 3, 2016


  • मन हृदय शरीर एक (सुमंत उवाच – ६०)

    सुमंत जयंत परचुरे. 

    कोण कुणा पेक्षा श्रेष्ठ? कोण किती प्रमाणात श्रेष्ठ? कोण कमी पडतंय? कोण कमकुवत आहे? या प्रकारची तुलना जेव्हा आपण उघड्या डोळ्यांनी जग बघतो तेव्हा होऊ लागते.

      October 21, 2021


  • झांझीबार डायरी…. एक अप्रतिम पुस्तक… क्रमशः

    झांझीबार डायरी हे एक प्रवासवर्णन नाही.  जागतिक बॅंकेच्या कामानिमित्त अरुण मोकाशींनी केलेल्या झांझीबार वारीमध्ये त्यांनी अनुभवलेले झांझीबारमधील जनजीवन, तिथल्या प्रथा-परंपरा, सोहोळे, वन्य-जीवन यासारख्या विषयांवरील अत्यंत सुंदर लेखांचे हे संकलन आहे. मोकाशी यांनी अत्यंत प्रभावी भाषेत, खेळीमेळीच्या शैलीत हे सर्व लेख लिहिलेले आहेत.

      August 19, 2021


  • तोचि पिता साक्षात मानावा…

    माझे वडील पूना हॉस्पिटलच्या आय सी यू त असतानाची, त्यांची शेवटची रात्र मी बाहेर जागवली तेव्हा ” तोच पिता साक्षात मानावा, जन्म देतो तो निमित्त केवळ ” असं मी का पुटपुटत होतो, माहीत नाही ! कदाचित वडील माझी समजूत घालत असतील त्यांच्या या आवडत्या ओळींमधून !

      December 23, 2020