नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
नवकथा लेखकामध्ये ज्यांनी पन्नाशीच्या दशकात मराठी कथेला वेगळ वळण दिलं त्या लेखकांच्या नामावलीत व्यंकटेश माडगुळकर याचं नाव अग्रस्थानी आहे. किंबहुना ना.सी. फडके यांच्या चाकोरीबद्ध प्रेमाच्या आणि वि.स.खांडेकर यांच्या ध्येयवादी नायकांच्या कथांमध्ये अडकलेल्या मराठी कथेला वेगळ रूप दिलं. मराठी कथेला सामान्याची कथा बनवली
June 27, 2021
मित्र अथवा मैत्री हा शब्द ऊच्चारताच आपल्या नजरेसमोर अनेक मित्र व त्यांची मैत्री ऊभी रहाते. मित्र किंवा मैत्री करताना कधीही ऊच्च निच, जात, धर्म स्त्री पुरुष असा विचार मनात येत नाही. किंबहूना मैत्री केली जाते म्हणण्यापेक्षा मैत्री होते असेच म्हणणे जास्त ऊचीत होईल.
August 8, 2018
(ब्रह्मदेशातली लोककथा )
आज आपण जगभरात जेवढी लोकसंख्या पाहातो, तेवढी एके काळी नव्हती. या जगात खूप कमी लोक राहत होते. तेव्हा आजच्यासारखी शहरे नव्हती. प्रत्येक जण उंच बर्फाच्छादित डोंगरांच्या दरीत राहत असत. डोंगरात रहाणाऱ्या या लोकांना ‘चीन्स’ म्हणत.
November 15, 2025
दिवाळी संपली की साधारणपणे तुळशीविवाह पार पडल्यानंतर आमच्या धंद्याची सुरुवात होते. लग्नांचा सिझन सुरु झाला की आमच्यासारख्या Contractor लोकांची नेहमीच धावपळ असते. आणि सिझनमध्ये धावपळ ही आमच्यासाठी काही नवीन गोष्ट नाही. लग्न घरी जितकी धावपळ असते त्याच्या दुप्पट पळापळ आम्हा लोकांची असते.
November 25, 2025

त्यांनी कार सिग्नलवर थांबवली आणि ते सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहू लागले. एका मागे एक गाड्या यंत्रवत उभ्या रहात गेल्या. नेहमीच हो काही क्षणांची प्रतीक्षा सतीश कुमार यांच्यासाठी विचित्र प्रकारची असते. अश्याच कुठेतरी बसलेल्या व्यक्तीशीच याची तुलना होऊ शकते. अशा व्यक्तीच्या मनात न कुठले विचार असतात… न समोर बघण्यासारखे एखादे दृश्य असते. ती व्यक्ती अचल, स्थिर असते. आपल्यातच मग्न असते. जगात काय घडते आहे याची त्या व्यक्तीला कल्पनाच नसते. जे काही घडते आहे त्याच्याशी तिला काही घेणे देणे नसते. सिग्नलवर देखील लाल, हिरवा दिवा बघण्याशिवाय त्या व्यक्तीच्या मनात इतर कोणताही विचार नसतो. कोणतीही कविता, कोणतेही गीत नसते. फक्त इतकेच लक्ष असते की, दिवा हिरवा होईल तेंव्हा एक्सीलेटर वरचा पाय दाबून कारला गती द्यायची आहे.
नऊ वाजले होते आणि सतीश कुमार यांना भूक लागली होती. ते घाईने घरी पोहोचण्यासाठी बेचैन होते. पण शहरातील ही गर्दी पंधरा मिनिटाचा रस्ता एक तासाचा करते.
July 3, 2025
तो मी नव्हेच’ नाटकामध्ये, ‘लखोबा लोखंडे’ची आपण अनेक रूपं पाहिली. त्यामध्ये व्यक्ती एकच होती, त्यानं बदलली होती ती, स्वतःची रूपं… तसंच आपल्याला आत्ताच्या पावसाबद्दल सांगता येईल.. पाऊस तोच, मात्र त्याचं पडण्याचं ठिकाण बदललं की, त्याची रूपंही बदलत जातात..
August 15, 2021
जीवनाचे अस्तित्व असणारी ब्रम्हांडातील आपली एकुलती एक सूर्यमाला. या सूर्यमालेची, त्यातील सर्व ग्रहांची आणि संबंधित अंतराळाची संपूर्ण माहिती आपली सूर्यमाला मध्ये कोणालाही सहज समजेल अशा सोप्या भाषेत लिहिली आहे प्रसिद्ध विज्ञान लेखक डॉ. मधुकर आपटे यांनी. हे पुस्तक वाचण्याकरिता तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी असण्याची गरज नाही.
आपली सूर्यमाला
डॉ. मधुकर आपटे
पाने : 96 ; किंमत : रू 90/-
नचिकेत प्रकाशन
September 29, 2012
आज आमच्या आईच्या कौतुक सोहळ्यासाठी तुम्ही आवर्जून आलात त्यासाठी सगळ्यांचे खूप आभार. तशी ती इथल्या प्रत्येकाची बहीण, मामी, मावशी, आत्या , मैत्रीण अशी कोणी ना कोणीतरी आहेच. तिच्यावरच्या प्रेमापोटीच तर तुम्ही इतक्या आयत्या वेळेस कळवून सुद्धा आला आहात पण तरीही सगळ्यांना प्रश्न पडला असेलच की आज हे तिचं कौतुक नेमकं कशासाठी आहे ??? …. ती काही कोणी मोठी उद्योजिका किंवा मोठ्या हुद्दयावर वगैरे नाही.
January 18, 2023
इन्स्पेक्टर शामराव साळुंकेनी वागळे इस्टेट पोलीस ठाणे, ठाणे याचा नुकताच चार्ज घेतला होता. पोलीस ठाण्याची, गुन्ह्यांची वगैरे जुजबी माहिती त्यांना मिळाली होतीच परंतु तेवढ्याने साळुकेचं समाधान झालं नव्हतं. सर्वसामान्यपणे ठोकपीट मेथडचा अवलंब करून गुन्ह्याची उकल करण्याकडे त्यांचा कल नव्हता. गुन्ह्याचे सूक्ष्म विश्लेषण करुन, बारीक सारीक धागे जुळवून बुध्दी कौशल्याने त्याची उकल करण्यात त्यांना रस होता. फारच क्वचित, ठोकपीट मेथड ते वापरीत. बहुधा नाहीच. आढावा घेता घेता ते दिनकर मोरेच्या केसकडे वळले. त्या दिनकरची बायको गायब झाली अशी त्याने आठवड्यापूर्वी तक्रार नोंदविली होती. पण आजपर्यंत तिचा शोध लागला नव्हता. त्यांनी त्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांना लगेच बोलावून घेतले.
March 22, 2022
पहाटे जाग आली की कधी कधी दिवसाची सुंदर सुरवात होते तुमच्या देखण्या , दैवी सुरांच्या सोबतीने !
आणि मग आपण जे प्रत्येक काम करतोय त्यात आनंद वाटू लागतो …. तुमच्या शाश्वत सुरांचे बोट धरून मन लांबवर डोंगरदऱ्यात खळाळणाऱ्या झऱ्याकाठी फिरूनही येतं .. ताजंतवानं होतं .!
पंचमहाभूतांवर विजय मिळवू शकणारी ही अद्भूत कला अवगत करण्यासाठी लहानपणापासूनच तुमची खडतर तपश्चर्या सुरू झाली … शब्दाशब्दांच्या गाभ्यापर्यंत तुमच्या सुराचा जादुई स्पर्श पोहोचला आणि ते शब्द मग सुरांची आभा लेवून आले … तेजल ,तेजस्वी प्रभेने निथळत … सारा आसमंत भारून टाकायला … सदैव … काळाच्या अंतापर्यंत !
October 2, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti