नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
बाहेरचे दिवे किती लखलखत असले तरी समयीतील मंद. पवित्र ज्योत एक वेगळाच आनंद देते. नुसताच आनंद नाही तर एक फार मोठे सत्य सांगते. सगळीकडे अंधार झाला की माणसाच्या मनात देखिल नको ते विचार येतात. अधांराची भिती वाटते मन अस्वस्थ होते. आणि एक छोटीशी मिणमिणता दिवा लावला तरी धैर्य येते. आत्मविश्वास वाढतो.
December 27, 2021
तालमी सुरु झाल्या पण म्हणावी अशी गती येत नव्हती. जसजसा गणेशोत्सव जवळ येऊ लागला. तसतसे वातावरण तापू लागले. शेवटी परीक्षा जवळ आल्या म्हणजे जसं आखलेलं वेळापत्रक बाजूला पडतं आणि दिवस रात्र अभ्यास चालू होतो तसंच झालं. आजपर्यंत हा नाही आला, तो नाही आला अशी टंगळमंगळ चालू होती. ती जाणवू लागली. ज्यांचे स्वतंत्र कार्यक्रम होते त्यांचा फारसा प्रश्न नव्हता. पण ज्यांचे सहकार्यक्रम होते. त्यांना एकत्र जमणे आवश्यक होते. नाटिका तयार करणाऱ्यांना तर आता एकत्र जमून तालमी करणे गरजेचे होते. आम्हाला आता वेळ कमी पडू लागला. तालमींची वेळ हळूहळू वाढत चालली होती. रात्री सात आठपर्यंत चालणाऱ्या तालमी आता दहा दहा बाराबारा वाजेपर्यंत आटपेनात. आता सगळ्यांनाच एक प्रकारची झिंग चढू लागली होती. अगदी झपाटून गेले होते सगळे.
March 25, 2022

संधिप्रकाशात उभी असणारी झाडे अचंबित होऊन खाली पहात होती. खाली पसरलेल्या सावल्यात , विविध वयोगटातील असंख्य मुलं , शांतपणानं बसली होती . कुणीच बोलत नव्हतं . एक प्रकारचा आत्मविश्वास आणि निर्धार त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता . त्यांच्या हातात घोषणा लिहिलेले बोर्ड दिसत होते . फारच वेगळ्या घोषणा होत्या .
August 18, 2021
काळ बदलला खूपच आणि आता आपली पूर्ण प्रतिमा दिसेल एवढे आरसे. शिवाय मोबाईल मध्ये. गाडीवर. कुठे कुठे नसतो आरसा. एवढे असूनही सेल्फीत सारखे बघायचे चालूच. आणि वरताण म्हणजे मी कशी दिसते? हा प्रश्न विचारला जातोच.
December 7, 2021
जे दिसत नाही, जाणवत नाही, दाखवता येत नाही त्या मनाला सावरणे, आवर घालणे, भक्कम बनवणे किती कठीण आहे.
October 1, 2021
आई-वडील दोघेही प्रख्यात वैज्ञानिक होते. त्यामुळे संशोधनाचे बाळकडू जणू तिला लहानपणापासून मिळाले होते. आई-वडिलांचा तिला सार्थ अभिमान होता. कारण दोघांनाही भौतिकशास्त्रातील संशोधनाबद्दल नोबेल पुरस्कार मिळाला होता. तिच्या आईने तर दोनदा नोबेल पुरस्कार मिळवून साऱ्या जगाला आश्चर्यचकित केले होते. अशा या थोर संशोधक आई-वडिलांचे नाव होते मेरी क्युरी व पिअरे क्युरी आणि त्यांच्या पोटी जन्म घेऊन स्वतःही नोबेल मिळविणारी ती संशोधिका होती आयरीन ज्युलिएट क्युरी. १९३५ मध्ये रसायनशास्त्रातील मौलिक शोधाबद्दल आयरीनला तिचे पती फ्रेडरिक ज्युलिएट यांच्याबरोबर संयुक्तपणे नोबेल पुरस्कार मिळाला. आयरीन क्युरीचा जन्म १२ सप्टेंबर १८९७ मध्ये पॅरिस येथे झाला. रात्रंदिवस संशोधनामध्ये गढून गेलेल्या आई-वडीलांमुळे आयरीनला संशोधनाचा जणू वारसाच मिळाला होता. आयरीनने आपल्या प्राथमिक शिक्षणानंतर 'रेडिओग्राफर नर्स' म्हणून काम सुरू केले. अल्का किरणांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल तिला १९२५ मध्ये डॉक्टरेट मिळाली. रेडियम इंस्टिट्यूटमध्ये काम करीत असताना ती फ्रेडरिक ज्युलिएटच्या संपर्कात आली. दोघांची कार्यक्षेत्रातील आवडनिवड सारखीच होती. त्यामुळे दोघांनी १९२६ मध्ये विवाह केला व नंतर मेरी क्युरी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनकार्य सुरू केले. आयरीनने अल्का किरणांसंदर्भात आधीच संशोधन केले होते. त्यानंतर तिने रेडिओधर्मी मूलतत्त्वांची कृत्रिम निर्मिती असा शोध लावला. याच शोधाबद्दल तिला फ्रेडरिकबरोबर संयुक्तपणे नोबेल पुरस्कार मिळाला. नंतर तिने न्यूट्रॉनच्या संदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन केले. काही काळ प्रोफेसर म्हणून काम केल्यानंतर १९४६ मध्ये ती आयरीन रेडियम इन्स्टिट्यूट या संस्थेची ती संचालिका झाली. वैज्ञानिक संशोधनाबरोबरच तिला सामाजिक कार्यातही रस होता. 'वर्ल्ड पीस कौन्सिल' या संस्थेची ती सदस्य होती. १९५६ मध्ये पॅरिसमध्ये तिचे निधन झाले. तिचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी तिचे पती फ्रेडरिक ज्युलिएट याने नंतर पार पाडली.
March 31, 2017
संवाद लेखन
हरिप्रिया
१)
प्रियकर:-तुला आठवते का?आपली पहिली भेट.
१)
प्रेयसी:-हो तर,का नाही आठवणार?
२)
प्रियकर:-मी तुला नेहमीच झाडाआडून बघायचो.
२)
प्रेयसी:- मला ते ठाऊक होतं रे
३)
प्रियकर:-अन् तो दिवस उगवला .
३)
प्रेयसी:-१५ऑगस्टचा
४)
प्रियकर:-हो.तुझी तारखही लक्षात आहे ना!!!!
४)
प्रेयसी:-मी कधीच विसणार नाही तो दिवस.
५)
प्रियकर:- मी घाबरतच गुलाब दिला होता तुला.
५)
प्रेयसी:-अरे,अजूनही जपून ठेवलाय मी माझ्या डायरीत.
६)
प्रियकर:-मी तर पाकळ्या सुद्धा मोजल्या होत्या त्याच्या.
६)
प्रेयसी:-तब्बल १६ होत्या,गंमत म्हणजे माझं वयही १६च होतं
७)
प्रियकर:-म्हणूनच मी ते फुल निवडलं होतं.
७)
प्रेयसी:- किती बारीक सारिक गोष्टींचा विचार करायचो नं आपण.
८)
प्रियकर:-तुला आठवतं,आपण एकाच ताटात जेवलो होतो.
८)
प्रेयसी:-आणि तो एकमेकांना भरवलेला घास.
९)
प्रियकर:-मी एफ.वाय ला होतो.
९)
प्रेयसी:- हो ना,आणि मी अकरावीला.
१०)
प्रियकर:-लास्ट इयरला मी कॉलेज सोडलं .
१०)
प्रेयसी:-आणि आपल्या भेटी-गाठी कमी झाल्या.
११)
प्रियकर:-नोकरी निमित्त मी परगावी गेलो.
११)
प्रेयसी:-आणि ,आणि फक्त विरह विरह आणि विरह...
१२)
प्रियकर:-अशातच तुझ्या बाबांनी तुझं लग्न लावून दिलं.
१२)
प्रेयसी:-हो!!!!!
त्या दिवशी माझं कशातच लक्ष नव्हतं.
१३)
प्रियकर:-तु तर एका पुतळ्यावत सगळ्या विधिंना पार पाडलस.
१३)
प्रेयसी:-पण तुला हे कसं काय कळलं
१४)
प्रियकर:-आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतो,हे सागण्यासाठी मी आलो होतो.
१४)
प्रेयसी:-पण,तुला उशीर झाला यायला असंच ना.
१५)
प्रियकर:-हो .हे खरच आहे.मी उशीरा पोचलो.
१५)
प्रेयसि:-आणि मी कायमची दुसऱ्याची झाले.
१६)
प्रियकर:-तुला आठवतं ,मी तुला एक पत्र पाठवलं होतं.
१६)
प्रेयसी:-जपून ठेवलं आहे मी ते पत्र.
१७)
प्रियकर:-मी तुला वचन दिलं होतं,ते आजतागायत पाळतोय.
१७)
प्रेयसी:-असं नको होतं तू करायला.
१८)
प्रियकर:-मी केलं ते बरोबरच.
१८)
प्रेयसी:-कसं काय?
१९)
प्रियकर:-कारण तुझं माझ्यावरचं प्रेम अजूनही तितकच अतूट आहे ,याची खात्री आहे मला.
१९)
प्रेयसी:-पण शरीराने मी तुझी कधीच नाही होऊ शकणार रे मी.
२०)
प्रियकर:- नाही तर नाही.
२०)
प्रेयसी:-असं का करतोस? तुही लग्न कर. तुझा संसार बघून मला बरं वाटेल.
२१)
प्रियकर:-नाही अगं!आता ते शक्य नाही.
२१)
प्रेयसी:-पण का?
२२)
प्रियकर:-कारण तुझ्या पतीला मी वचन दिलय.
२२)
प्रेयसी:-काय सांगतोस?आणि ते वचन तरी कोणतं
२३)
प्रियकर:-ते आजारी पडल्यानंतर त्यांनी मला एक दिवस भेटायला बोलवलं.आपलं प्रेम त्यांना ठाऊक होतं.अशातच ते आजारी झाले.आपल्या जगण्याची शाश्वती नाही ,हे बघून तु व तुझी मुलं ,ही जबाबदारी माझ्यावर सोपवली.
२३)
प्रेयसी:-आणि हे सगळं तू मला आज सांगतोय.
२४)
प्रियकर:-हो,कारण मी वचनबद्ध होतो
२४)
प्रेयसी:- किती मोठा हा त्याग. किती मोठं समर्पण.
२५)
प्रियकर:-तुझ्या सुखातच माझं सुख मी बघितलं प्रिये.
२५)
प्रेयसी:- निघते मी,घरी जायलाच हवं.मुलं वाट बघत असतील.
पण हे दिलवरा मी तुला वचन देते ,की ही प्रिया पुढील जन्मी निश्चितच
*हरिप्रिया* झाल्याविना रहायची नाही.ह्या प्रियेला हरी पासून साक्षात परमेश्वरही दूर करू शकणार नाही.
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
January 11, 2020
चारेकशे वर्षांपूर्वी स्पॅनिश लोकांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी ‘इंकापूर्व’ लोकांनी तलावाच्या पाण्यात तरंगती घरे बांधून अशा त-हेने आश्रय घेतला. पूर्वीची दोन-तीन हजार कुटुंबाची संख्या आता पाच सहाशे कुटुंबापर्यंत आली आहे. अशी अंदाजे साठ-पासष्ट तरंगती खेडी आहेत म्हणे लेक टिटिकाकामध्ये. सगळी दहा ते बारा फूट खोल पाण्यात. तोतोरा गवत वाळवून त्याचे भारे उलट सुलट एकमेकावर पसरून व भक्कम लाकडांच्या व दोरीच्या साहाय्याने बांधून तयार केलेल्या सहा ते आठ फूट जाडीच्या चटया म्हणजे ही तरंगती खेड्याची जमीन. ही खेडी साधारण तीस ते तीनशे चौ. मीटरपर्यंत कोणत्याही आकाराची.
August 1, 2019
अमेरिकेत ट्राफिकची शिस्त पाहून आपण अक्षरश: थक्क होऊन जातो. अमेरिकेतील सर्व शहरे परस्परांना हायवेनी जोडलेली आहेत. अनेकदा इप्सित ठिकाणी जाण्यासाठीही हायवेंचाच आधार घ्यावा लागतो. या हायवेंवर जाणाऱ्या आणि येणाऱ्या बाजूने प्रत्येकी किमान तीन लेन्स उपलब्ध असतात. सर्वात डावीकडची लेन वेगाने धावणाऱ्या वाहनांसाठी, मधली लेन कमी वेगाने जाणाऱ्या वाहनांसाठी, आणि उजवीकडची लेन हायवेवरुन बाहेर पडण्यासाठी अथवा पुन्हा हायवेवर येण्यासाठी व पोलिसांची गाडी, आगीचे बंब, रुग्णवाहिका यांच्यासाठी असते. त्या लेनवरुन विनाकारण कोणतीही गाडी जात नाही.
July 30, 2022
अनेक जन्मानंतर मानवी जन्म मिळतो असे म्हणतात. सृष्टितील सर्व जीवसृष्टित मानवी जन्म हा सर्वश्रेष्ठ बुद्धिजीवी जन्म मानला जातो परमेश्वराने माणसाला विवेकबुद्धी, वाचा, स्मरणशक्ती, श्रद्धा, भक्तिप्रीती, वात्सल्य, जिव्हाळा, निःस्पृहता, निर्मलता, विश्वास, त्याग, कृतज्ञता, नम्रता, परोपकार, साहस अशा अनेक सुसंस्कारी संस्कारशक्ती जन्मताच प्रदान केल्या आहेत.
त्याच संस्करण होण म्हणजे संस्कार!!
संस्कार हे करून होत नाहीत ते घडावे लागतात त्यासाठी जीवनात उत्तम विवेकी सहवास लाभावा लागतो.
जन्मता:च आपल्याला मातृपितृत्वाच्या वात्सल्याचा दैवी स्पर्श होतो ही ईश्वरीय लीला आहे आणि आपले जीवन सुरु होते हे वास्तव आहे. घरात आईवडिल तर बाहेरील जगगात गुरुजन, नातेवाईक,शेजारी, पाजारी, मित्रत्व यांचा नैसर्गिक सहवास लाभतो आणि आपल्याला शिशु, शैशव, बाल्य, पौगण्ड, तारुण्य, ग्रहस्थ, वृद्धत्व ही जीवनावस्था लाभते हे वास्तव आहे.
माझी ९० वर्षाची प्रसन्न वदनी सुंदर अशी सरस्वती नावाची पणजी होती. अगदी तरतरीत पहाटे ३।। लाच उठायची. आकाशाकड़े पाहुन नमस्कार करायची, बाजेवरुन खाली जमिनीवर पाय ठेवताना रोज ' पादस्पर्शम क्षमस्वमे ' म्हणायची, तळहात चोळून चेहरा उजळून ' कराग्रे वसते लक्ष्मी ' म्हणायची .
या तिच्या संस्कारी आचरणाने तीचं सारं आयुष्य सर्वार्थानं कृतार्थ झालं..! अगदी निरोगी, निरामय सुखानंदी झालेलं हे मी स्वतः पाहिले आहे. तिची लौकर उठण्याची व तो मंत्र म्हणण्याची सवय आजही मला तिच्याच संस्कारी सहवासामुळे लागली.
तो संस्कारी सहवास मला माझ्या शिशु अवस्थेत लाभला. आजही स्मरतो आहे. हे स्मरणीय, उदात्त अनुभव म्हणजेच संस्कार..!!
आजच्या वास्तव कलियुगात समृद्धी आहे, पण अपेक्षित मन:शांति, समाधान नाही. नाती, मैत्र, प्रेम, आस्था, जिव्हाळा काहीच उरले नाही. माणसातील माणुसपण, आज हरवले आहे. याला कारण एकच संस्कार आणि संस्कृतीचे अध:पतन, ह्रास झालेला आहे. त्यासाठी पारंपारिक संस्कारांचे बीजारोपण सर्वत्र होणे अनिवार्य आहे. मानवी जीवनात संस्कारांच महत्व अनन्य साधारण आहे. जीवनाच्या आदर्श नीतिमुल्यांचा बीजांकुर हा सुसंस्कारातच आहे हे निर्विवाद..!!!
जीवात्म्याच्या गर्भधारणेपासुनच संस्कारांच महत्व आहे. म्हणूनच संस्कारांचे संस्करण होणं ही आपल्या सुखी जीवनातील इतिकर्तव्यता आहे संसारत प्रत्येकाला आपलं कुटुंब, मुलं उत्तम, कर्तुत्वसंपन्न होवून सदैव सुखऐश्वर्यात रहावित असे वाटत असते. आणि असे सुंदर उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी त्या मुलांवर उत्तम संस्कार होणेही गरजेचे असते. पूर्वी हे घडतही असे कारण पूर्वी घरातील वातावरण किंवा सहवास देखील संस्काराला पोषक असा होता.एकत्र कुटुंब पद्धती नांदत होती निश्चिंतता होती.
आजकाल विज्ञानामुळे आकाशात उंच उड़णे, सातासमुद्रापार सहज जाणे सारे जग कवेत घेणे हे आता मानवाला जमले आहे. पण कल्पनेला सहेली बनवून विवेकाच्या वाटाडयाला सोबतीला घेवून जमिनीच्या मातीवर संयमाने तोल सांभाळून चालणे देखील जमणे गरजेचे आहे. त्यासाठीच मात्र उत्तम संस्कारांची आवश्यकता आहे.
भौतिक सुखानं सारं जग आज सुखाधिन समृद्ध झाले आहे. पण माणसातली परस्पर आत्मिक आनंद देणारी ओढ़, आत्मीयता, नाती, प्रेम, वात्सल्य, संवाद पूर्णत्वाने लयास गेल्याचे जाणवते आहे. याचा विचार सर्व सुजाण व्यक्तिन्नी केला पाहिजे.
केवळ संस्कारांच्या कथा, गोष्टी ऐकुन किंवा वाचून संस्कार होत नाहीत. तर संस्कार हे सहवासातूनच घडावे लागतात. त्यासाठी उत्तम सहवास लाभणे महत्वाचे असते. हे सुंदर सत्य आहे. भारतीय संस्कृतीमध्ये सोळा संस्कारांचे महत्व विशद केले आहे. मानवी जीव सर्वार्थाने आदर्शभूत कसा असावा त्या साठी साऱ्या जीवनात संस्कार कोणते असावेत याचे मूल्यमापन या सोळा संस्कारातून केलेले दिसून येते.
कुठलीही व्यक्ती कधीही घाणीच्या साम्रज्यात राहू इच्छित नाही. तिला सुंदर मोहक वातारणात, सुखात रहायला आवडते हा मानवी स्वभाव प्रकृती आहे. मग अशावेळी सर्वच दुर्गुणांचा तसेच दुष्प्रवृत्तीचा समूळ त्याग करून फक्त सगुण सदगुणांची कास धरणे हे उत्तम संस्कारांचे कल्याणकारी लक्षण आहे. द्योतक आहे. आणि असे उदात्त जीवन उत्तम सुसंस्कारित सहवासातूनच लाभते.
याचे उदाहरण देताना......
गुरुवर्य डॉ. न.म.जोशी सरांनी एका कार्यक्रमात सांगितलेली एक गोष्ट सांगून मी हा लेखांक थांबवीत आहे. एका गावात, एका मोठ्या वाड्यात एक सद्गृहस्थ रहात होते. आपल्या घरातील देवपूजा ते रोज करत असत. रोज प्रात:काळी उठायचे . स्नानग्रहात जाताना वाड्याच्याच अंगणात असलेल्या बागेतील फुले काढून आणण्यासाठी सुंदर फुलांची परडी घेवून जात असत.
शुचिर्भूत स्नान झाले की त्या परडीत पत्री, फुले,बेल, तुळस गोळा करून आपल्या वाडयातील माजघरात असलेल्या देवघरात येवून यथासांग मनोभावे देवपूजा करीत असत. ही त्यांची श्रद्धेय दिनचर्याच होती.पण एक दिवस ते अनावधानाने ते नित्याची फुलांची परडी घेवून जाण्यास विसरतात. वयस्कर असल्यामुळे पुन्हा स्नानगृहातून माजघरापर्यंत परत येवून ती फुलांची परडी घेवून येण्याचा कंटाळा करतात. पर्याय म्हणून नेहमी प्रमाणे स्नान झाल्यावर आपल्या अंगावरच्या उपरण्याचा सोगा करून त्यातच फुले, पत्री वगैरे गोळा करतात माजघरात देव्हाऱ्यापाशी येतात नेहमी प्रमाणे यथासांग पूजाही करतात. एव्हड्यात त्यांचे एक परमस्नेही घरात त्यांना भेटावयास येतात. ते मित्र दिवाणखान्यात बसलेले असतात. त्यांना सुंदर सुगंध येत असतो. तिथुनच ते त्यांच्या मित्राला विचारतात " अरे दत्ता केवढा सुंदर सुवास येतो आहे अरे कुठले अत्तर तू लावलेले आहेस ?
तेंव्हा दत्तोपंत म्हणतात नाही रे बाबा मी कुठलेच अत्तर लावलेले नाही. पण अरे मी आज सकाळी आंघोळीला जाताना फुलांची परडी नेण्यास विसरलो होतो. म्हणून आज या उपरण्यातच फुले गोळा करून आणली . त्या पारिजात, गुलाब, चाफा, मोगरा, बकूळ फुलांचाच सुगंध या उपरण्याला येतो आहे, मीही आज मोहरुन गेलो आहे.........
मित्रहो, त्या उपरण्यात काही क्षण फुले गोळा झाली तर त्या फुलांचा सहवास त्या उपरण्याला लागला आणि *ते उपरणं सुगंधित झालं !!!
सात्विक गंधित संस्कार त्या उपरण्यावर झाला. तेंव्हा जीवनात तुम्हाला लाभलेल्या सुंदर, विवेकी निर्मोही, निष्पाप, प्रेमळ, आणि वात्सल्यपूर्ण सहवासाचा संस्कार तुमचं जीवन सर्वार्थाने सुंदर कृतार्थ करीत असतो. म्हणून विवेकी, वैचारिक उत्तम सहवासात राहण्याचा प्रयतन मनुष्याने करावा.
हे मात्र खरं.!!
असा सहवास लाभणं देखील एक दैवयोग असतो
हेच संस्कारांचे महत्व आहे....
इति लेखन सीमा
– वि.ग.सातपुते. (साहित्यिक)
अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे
दिनांक : २५-७-२०२२
August 28, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti