(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गोमु गुप्तधनाच्या शोधांत (गोमुच्या गोष्टी – भाग १२)

    एकदा गोमु माझ्या खोलीवर आला तेव्हां त्याच्या हातांत एक जुनाट गुंडाळी केलेला कागद होता. मी त्याला हे काय आहे म्हणून विचारणार होतो पण त्या आधीच तो म्हणाला, “इंग्रजीत चान्स ‘आॕफ लाईफ टाईम’ म्हणतात ना, तो आलाय माझ्या आयुष्यांत.”
    मी त्याच्या तोंडाकडे पहातच राहिलो.

      March 22, 2022


  • फोटो

    " ऐ , ऐक ना " 
    " त्यासाठी whatsapp वर काहीतरी पाठवावे लागते . " 
    " मी एक फोटो तुला पाठवला आहे . तो तू बघ . आणि लगेचच delete करून टाक . " 
    " ओके " . 
    " पाठवला . " 
    " बघितला . " 
    " Delete केलास " 
    " तू काय आहेस ? फोटो पाठवलेला आवडला का ते तरी निदान आधी विचारायचं ? " 
    " प्लीज़ सांग ना . delete केलास . " 
    " खरं म्हणजे अतिशय जीवावर आलं होतं . पण केला फोटो delete . काय अप्रतिम फोटो आहे !
    ज्याचा आहे आणि ज्याने काढला आहे अशा दोघांनाही full marks . " 
    " खरंच आवडला ? " 
    " अगदी मनापासून . म्हणून तर delete करायच अगदी जीवावर आलं होतं .  पण तू delete का
    करायला सांगितले ?  मधेही एकदा असंच एक फोटो delete करायला सांगितले होतेस . " 
    " कारण याआधी पाठवलेली selfi फक्त तुझ्यासाठी होती . तू पाहिल्यावर आणखी कोणी पाहायलेली
    मला आवडले नसते . चाललेही नसते . " 
    " Selfi काही vulgar अवतारात नव्हती . " 
    " चावटपणा नको . तसा हा फोटोही काही vulgar नाहीये . आणि तसे फोटो पाठवायला ना आपले ते
    वय आहे , ना आपली तशी व्रुत्ती . " 
    " धन्यवाद माताजी . पण हा फोटो का ?  झकास फोटो . अगदी सालंकृत . छान भरजरी साडी आणि
    मोजकेच पण ठसठशीत दागिने . " 
    " म्हणूनच delete करायला सांगितले . मला दागिने जरासुद्धा आवडत नाहीत . " 
    " नशिबवान आहे नवरा . माझ्यासारखा " . 
    " हा थट्टेने घ्यायचा विषय नाही . अक्षरशः सक्ती केल्यासारखे मागे लागून हा फोटो काढला
    गेलाय . " 
    " ओहो हो . . . म्हणून पापड मोडलाय का बाईसाहेबांचा !  जबरद्स्तीचा पुरावा नाही उरता
    कामा मागे . " 
    " प्लीज़ . तुला पाठवायलाच नको होता फोटो . कुठचाच . " 
    " मस्करी नाही करत . पण खरंच सुंदर . . . .  मान अजून जरा इकडे केली असतीस तर कानातले
    आणखी छान आले असते फोटोत .  नाहीतरी एकच साइड आहे ना " 
    " अजून नाही का काही " 
    " रागावनार नसशील तर सांगतो . " 
    " सांगा महाराज . आता तुमची सक्ती . " 
    " स्वतचे कौतुक ऐकायचे असले तर तसं मोकळेपणाने सांगावे माणसाने . " 
    " तू म्हणजे ना . . " 
    " साडीला matching म्हणून लाल चंद्रकोर हे बरोबर . पण मग त्या लाल चंद्रकोरीत काळा छोटा
    टीळा हवा . खरं म्हणजे काळी चंद्रकोर आणि त्यात लाल कुंकवाचा ठिपका . आणि त्या
    चंद्रकोरीची रेषा ठसठशीत नको ; पण ठळक हवी .  ती रेषा जाडी नको ; पण भरदार हवी . नजरेत
    पटकन भरेल अशी . " 
    " अजून काही प्रिस्क्रिप्शन ? " 
    " चंद्रकोरीची रेषा भुवई  खाली वळते तिथपासून दुसऱ्या भुवईच्या खाली वळते तिथपर्यंत
    बेस सारखी हवी . आणि दोन भुवयान्च्या बरोबर मधे तौ लाल कुंकवाचा ठिपका . दोन
    भुवयान्च्या मधे जिथे नाकाच वरचे टोक संपते तिथे हा ठिपका हवा . परातीत चंद्राचे
    प्रतिबिंब पडाव तसा . नाहीतर कड़वा चौथ ला चाळणीत चंद्र दिसावा तसा . " 
    " आता हे काय ? " 
    " वेडाबाई , ही चंद्रकोर माझा पति किती प्रेमाने मला साथ देतो याचे प्रतीक आहे . 
    त्याच्या भावविश्वाच्या मध्यभागी मी आहे याचे स्म्रुतिचिन्ह म्हणून तो लाल कुंकवाचा
    ठिपका . अगदी लांबून सुद्धा लक्ष वेधून घेईल असा . आणि चंद्रकोर म्हणजे माझ्या
    भावविश्वाला त्याची साथ पुरवते ते कोंदण . चंद्रकोर आणि हा टीळा म्हणजे परस्पर प्रीतीचा
    कळस आणि ध्वज असतो ग . " 
    " सॉलिड आहे हे . " 
    " तसं नाही ग . हे संकेत समजून घेणं फार छान असते ग . काय आहे ना आपण एकमेकांवर प्रेम
    करतो हे लक्षात ठेवणे महत्वाचे असतेच ; पण ते कसे करतो , कशासाठी करतो हे नाजूकपने
    सूचित करता येणं हेही तितकेच महत्वाचे असते . " 
    " म्हणजे ? " 
    " आपल्या पिढीत प्रेम वाटण्याची सुद्धा  एक परिमीति असते . लगेचच delete केलेला फोटो
    पाहताना मला ते सारखे आठवत होते . " 
    "हे काहीतरी वेगळेच सुरु आहे तुझे आज . " 
    " अलग होंगे ; मगर गलत नही " 
    " डायलॉगबाजी पूरे . जरा ढील द्यायचा अवकाश की झाले सुरु . वेगळी परिमीति म्हणजे तुला
    काय म्हणायचे ते सांग . " 
    " आपल्या पिढीची प्रेमाची तर्हा जरा भिडस्त आहे आजच्या पिढीच्या मते . " 
    " म्हणजे ? " 
    " आपल्या पिढीच्या प्रेमाचे फोटोच वेगळे आहेत . एक तर ते श्रीमान योगी कादंबरीतल्या
    शिवाजी महाराज - सईबाई सारखे आहे . . उमलत्या कर्तुत्वाच्या काळात उमलत गेलेले . नाहीतर
    ते " इथे ओशाळला म्रुत्यु " नाटकातल्या संभाजी महाराज - येसूबाई सारखे . एकमेकांच्या
    कर्तुत्वाचा आदर करत व्यक्त होणारे . . . . " स्वारीचे हे रूप , स्वारीचे हे तेज ,
    स्वारीचा हा पराक्रम " अशा शब्दांत एकमेकांविषयी व्यक्त होणार . . . . आंधळी आपुलकी
    नाही तर आदरयुक्त , अभिमानपूर्न खानदानी आत्मीयता . दोघांच्या एकत्रित प्रयत्नातून
    विकसित होत जाणारे .  एकमेकांविषयी कौतुक आणि आदर असणारे .  गाण्यात कसे प्रत्येक
    कडव्यां नंतर ध्रुवपद येते तसे . प्रत्येक टप्प्यावर ही आठवण काढणारं . उगाचच नाही "
    इथे ओशाळला म्रुत्यु " नाटकाचा प्रत्येक अंक " स्वारीचे हे रूप , स्वारीची ही जिद्द . .
    . . " या वाक्यानी संपत . एकाने पुढच्यासाठी शब्दांत घातले तर पुढच्याच्या भावना
    पहिल्याविशयी कुठे वेगळ्या असतात ? " 
    " अगदी खरं आहे रे हे " 
    "  तिसरा प्रकार म्हणजे " स्वामी " कादंबरी तल्या थोरले माधवराव पेशवे आणि रमाबाई सारखे
    . अकाली करपलेल्या कर्तुत्ववान जीवनातील मोजक्या क्षणांची शिदोरी देणारे . आठवणही येऊ
    नाही अशा अनेक क्षणांचे डाग इतरजण आयुष्याच्या अन्गरख्यावर उडवत असताना आठवणीने आठवणीत
    ठेवावे असे काहीतरी क्षण पदरात घालत असे प्रेमाचे डाग मिरवावेत असे . " 
    " परत नाही म्हणणार उगीच पाठवले फोटो म्हणून् " 
    " तसं नाही ग . मला माझ्या पत्नीचा विचार करताना नेहमीच असं वाटत असत " 
    " पटलं मला " 
    "  ती चंद्रकोर , तो ठिपका , तो नाकाच्या शेंडयावर बसलेला लटका राग हे वैवाहिक
    आयुष्याचे फार छान फोटो आहेत .  सहवासाच्या कमेर्याने काढलेले . फक्त एकमेकांनाच
    दिसणारे . पॉज़िटिव फोटो आणि नेगेटिव रील एकांतात उलगडणरे आणि जनांत सुचवनारे . मैफीलीत
    श्रोत्यांना नाही जाणवत तानपुर्याचे स्वर फारसे . पण गायक अस्वस्थ असतो त्यान्च्याशिवाय
    . असे हे क्षण , श्रुंगार - संकेत आयुष्याचे तानपुरे असतात .  ते सदैव सुरातच हवेत .
    इतरांना दिसणयासाठी नाही तर आपल्याला जाणवण्यासाठी . " 
    " क्या बात हैं ? " 
    " अजून एक सांगू ? " 
    " विचारू नकोस . सांगत राहा . " 
    " असे फोटो हे न्रुत्यान्गनेच्या घुंगरू सारखे असतात .  ते घालताना आणि काढताना घुंगरू
    आणि नर्तिका दोघेही एकमेकांना सांगत असतील का की तू आहेस म्हणून मी आहे .  या आणि अशा
    फोटोतून आपण आपल्या आयुष्याच्या साथीदाराला दूसरे काय सांगत असतो ?  प्रेम असते म्हणून
    असाच फोटो हवा आहे अशी सक्ती असते आणि ते मान्य असते म्हणून तर रूकार असतो ना ग ! " 
    " तुला फोटो delete करायला लावले असले तरी हे संभाषण मात्र मी मनात कायमचे साठवून ठेवीन
    . " 
    " त्याची royalty म्हणून् नाही . पण एक विनंती आहे . " 
    " मी हे delete करणार नाही . " 
    " मी काहीही delete करायला सांगत नाहीये . " 
    " मग ? " 
    " या फोटोच्या रंगीत प्रती काढल्या जातीलच . साहजिकच आहे ते .  पण या फोटोची निदान एक
    तरी Black - white अशी प्रत काढ . " 
    " का रे ? " 
    " रंगीत फोटो मधे सौंदर्याचे सौष्ठव आले तरी भावनेच मार्दव येत नाही . त्यासाठी कृष्ण -
    धवल च फोटो हवा " 
    " I see ! आता लक्षात येतय माझ्या ! ! सोनचाफ्याचा , बकुलिचा सुवास आवडता असूनही
    पहिल्यापासून  प्राजक्त आणि मोगरा ही  तुझी नम्बर एकची आवड का ?  आणि मी एकदा तुला
    वेड्यासारखे म्हणले होते की प्राजक्ताच्या ओलसर फुलांचा डाग पडतो . " 
    " तेंव्हा नाही सांगितले काहि . पण आज सांगतो . ओल्या प्राजक्ताचा डाग नाही पडत .
    भावविभोर मनाने त्या क्षणाचा , त्या सहवासाचा तो काढलेला फोटो असतो . प्राजक्ताचा देठ
    म्हणून लाल असतो .  हिरवा नसतो . हिरवा रंग असोशीचा असतो ; लाल सन्त्रुप्तीचा . ज्या
    व्यक्तीच्या सहवासाने आपण त्रुप्त होतो , त्याच्या आठवणीने गालावर , मनावर लाली येते .
    त्या स्म्रुतीन्च्या उजळणीचा फोटो म्हणजे तो प्राजक्त . प्राजक्त ही ओलसर आणि भावना ही
    . " 
    " किती वेडा आहेस रे " 
    " नाही . दिवसाची खरी यथार्थता तिन्हिसान्जेलाच कळते .  आकाशात मावळतीचे रंग पखरलेले
    असतानाच मनाच्या कॅमेरयात गवसलेल्या आणि निसटलेल्या क्षणांची सरमिसळ सुरु असते .
    म्हणून् तर त्याला कातरवेळ म्हणतात . " 
    " हा फोटो नाही विसरू शकणार " 
    " अग , असे फोटो हे वैवाहिक आयुष्याच्या नाकातल्या नथी सारखे असतात . नाकाचा शेनडा
    पुन्हा पुन्हा चिमटीत पकडावा अशा मोहात पाडनारा . नथीचा हेवा वाटतो असे मोकळेपणाने
    सांगत राहतात हे फोटो " 
    " तूच एक . . . " 
    
    -- चंद्रशेखर टिळक 
    २ डिसेंबर  २०१६
    

    9820292376
    Email: tilakc@nsdl.co.in

      December 18, 2016


  • सावंत ‘विकी’

    विकीमध्ये गेलं की, दोन पाठमोरे काॅम्प्युटर ऑपरेटर एकामागे एक बसलेले दिसतात. त्यातील पहिल्याकडे मी पेनड्राईव देतो. तो ‘स्माईल’ देऊन माझी फाईल ओपन करतो. डिझाईन मधील मजकूर वाचतो. कुठे शुद्धलेखन चुकलं असेल तर नजरेस आणून देतो. प्रिंट सोडतो. आत जाऊन प्रिंट आणून देतो. वेळ असेल तर त्याच्या कलेक्शनमधील, काही फोटो पेनड्राईव्हमध्ये लोड करुन देतो. हे सर्व आपुलकीने करणाऱ्या माझ्या मित्राचं नाव आहे. सावंत ‘विकी’!

      March 7, 2022


  • उपऱ्यांची माती !

    मुंबईच काय, महाराष्ट्रातील सर्वच महानगरे आता उपऱ्यांची वसतिस्थाने झालेली आहेत. मला मात्र अजूनही कोणी “पुणेरी किंवा पुणेकर” असं संबोधलं तर आवडत नाही. ताडकन माझा “खान्देशी बाणा ” उफाळून येतो.

      March 29, 2022


  • भाड्याने मिळतील

    हृदयाची नाती असणारी अनमोल माणसं हृदयाच्या कुपीत जपून ठेवावी लागतात. एक थेंब ही दुरावला जाऊ नये म्हणून खूप जपावी लागतात. त्यासाठी भाड्याने किंवा विकत मिळत नाहीत नाती. मौल्यवान असतात.

      December 26, 2021


  • महारथी तोरणे

    १९६३ साली प्रदर्शित झालेल्या ‘गरीबाघरची लेक’ या चित्रपटापासून कमलाकर तोरणे यांची कारकिर्द सुरु झाली. त्यांचं वाचन दांडगं होतं. पन्नासच्या दशकातील ‘वुई आर नो एंजल्स’ या गाजलेल्या इंग्रजी चित्रपटावरुन मराठी चित्रपट करण्याचे त्यांनी ठरविले. १९६८ साली त्यांचं ते स्वप्नं ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ द्वारे प्रत्यक्षात उतरलं..

      May 30, 2022


  • एक विचार

    दगड'

    'दगड' म्हणजे 'देव' असतो. कारण तो आपल्या आजूबाजूला सगळीकडे असतो. पाहीलं तर दिसतो.

    अनोळख्या गल्लीत तो कुत्र्यापासून आपल्याला वाचवतो.

    हायवे वर गाव केव्हा लागणार आहे ते दाखवतो.

    घराभोवती कुंपण बनून रक्षण करतो.

    स्वैयंपाक घरात आईला वाटण करून देतो.

    मुलांना झाडावरच्या कैऱ्या, चिंचा पाडून देतो.

    कधीतरी आपल्याच डोक्यावर बसून भळाभळा रक्त काढतो आणि आपल्या शत्रूची जाणीव करून देतो.

    माथेफिरू तरुणांच्या हाती लागला तर, काचा फोडून त्याचा राग शांत करतो.

    रस्त्यावरच्या मजुराचं पोट सांभाळण्यासाठी स्वत:ला फोडुन घेतो.

    शिल्पकाराच्या मनातलं सौंदर्य साकार करण्यासाठी छिन्निचे घाव सहन करतो.

    शेतकऱ्याला झाडाखाली क्षणभर विसावा देतो.

    बालपणी तर स्टंप, ठिकऱ्या, लगोरी अशी अनेक रूपं घेऊन आपल्याशी खेळतो.

    सतत आपल्या मदतीला धावून येतो, "देवा'सारखा.

    मला सांगा, " 'देव' सोडून कोणी करेल का आपल्यासाठी एवढं ??"

    बाई म्हणतात, "तू 'दगड' आहेस . तुला गणित येत नाही. आई म्हणते, "काही हरकत नाही, तू माझा लाडका 'दगड' आहेस. देवाला तरी कुठे गणित येतं? नाहीतर त्याने फायदा-तोटा बघितला असता. तो व्यापारी झाला असता."

    आई म्हणते , "दगडाला शेंदुर फासून त्यात भाव ठेवला की, त्याचा 'देव' होतो."

    म्हणजे, 'दगड'च 'देव' असतो.

    Moral :-

    "Be positive.
    Every one is good.
    But
    It's Position matters"

    -- वसंत चरमळ

      August 7, 2016


  • होळी

    घड्याळात साडे आठ वाजलेले पाहून जयश्री ताईंनी दोन्ही मुलांना झोपेतून उठवायला सुरुवात केली ” मनिष…..अरे बाळा उठा आता, बघ जरा घड्याळात .. साडे आठ झाले …मृण्मयी ..चला उठा …आज होळी साठी जायचंय ना तुम्हाला तयारी करायला? चौकात सगळी मुलं आली बरं का ! ” शेवटच्या वाक्याची मात्रा मात्र लगेच लागू पडली आणि दोघं ही ताडकन उठून बसली …

      December 8, 2024


  • पाॅंचवाॅं मौसम.. (काल्पनिक कथा)

    रविवारचा दिवस. संध्याकाळची वेळ. मुकुंदराव आज खूपच दिवसांनी फिरायला बाहेर पडले होते. वृद्धाश्रमाच्या नियमानुसार आठवड्यातून एकदाच, फक्त रविवारी त्यांना बाहेर पडता येत होतं. झब्बा, पायजमा आणि खांद्यावरील शबनम बॅग अशा नेहमीच्या पेहरावात ते बराच वेळ बागेत बसले होते.
    घड्याळात सात वाजलेले पाहून ते गडबडीने उठले व चालू लागले. कोणत्याही परिस्थितीत त्यांना आठ वाजेपर्यंत शिंदे मॅडमच्या वृद्धाश्रमात पोहोचायलाच हवं होतं..

      November 17, 2021


  • जिम कॉर्बेट – भाग ३

    जिम कॉर्बेटचे भारतावर व भारतीय लोकांवर अतिशय प्रेम होते. तो म्हणतो, 'माझ्या भारतातील बहुसंख्य लोक नि:संशय भुकेकंगाल आहेत, धनहीन आहेत. पण ते अतिशय साधे, भोळे, प्रामाणिक, निष्ठावान व कष्टाळू आहेत. माझे त्यांच्याशी प्रेमाचे नाते जडलेले आहे.' जिम बऱ्याच वेळा परदेशी गेला होता पण तो कुठेच रमू शकला नाही कारण त्याचे भारताविषयीचे प्रेम व ओढ! भारत हा त्याचा देश होता. भारताविषयी उल्लेख करताना तो नेहमी 'माझा भारत' असा करत असे. आपल्या आत्मचरित्रपर पुस्तकाला त्याने 'माझा भारत' नाव देऊन ते भारतीय जनतेला अर्पण केले आहे. त्याच्या शब्दा-शब्दात भारत व भारतीय लोकांच्याबद्दलचे प्रेम स्पष्ट होते.

    आज लोकांना पर्यावरण व पर्यावरणाच्या संरक्षणाचे महत्त्व कळू लागले आहे. पण जिम कॉर्बेटला हे महत्त्व त्याच वेळी कळले होते. जनजागृतीचे कार्य तेव्हाच त्याने सुरू केले होते. तो सभा घेऊन लोकांना पर्यावरणाचे व पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व सांगत असे. १९२६ पासून त्याने पर्यावरण रक्षणाच्या जागृतीसाठी आपली लेखणी उचलली. जंगलतोड, जंगलाच्या भूमीवर अतिक्रमण, पशुहत्त्या, जंगलात लावले जाणारे वणवे या विषयावर तो वृत्तपत्र, मासिकात लिहून जनजागृतीचे काम करत होता. विशेषत: तरूण पिढीला या विषयीचे महत्त्व पटवून देण्याकडे त्याचा जास्त कल असे. "The all India conference for preservation of Wild Life" या संस्थेने पर्यावरणाचे महत्त्व ओळखून त्याच्या रक्षणासाठी प्रयत्न सुरू केले. या संस्थेने जिमशी जवळीक साधली.आता जिमला पण एक चांगले व्यासपीठ मिळाले. या संस्थेच्या Indian Wild Life या मासिकाचा प्रकाशन समारंभ जिमच्या हस्ते झाला होता.

    जिमने अनेक लेख लिहिले व त्याला चांगली प्रसिद्धी पण मिळाली. त्याचा "Wild life in village. An appeal" हा लेख तर खूप गाजला. जंगलात लावल्या जाणाऱ्या वणव्याविषयीच्या लेखाची सुरुवात त्याने, "Stop! You fools. Stop." अशी केली होती. या लेखात त्याने अशा लावल्या जाणाऱ्या आगीबद्दल राग प्रगट केला होता. वनाधिकारी, ब्रिटिश अधिकारी तसेच राजे-रजवाडे यांच्याकडून होणारी वन्य प्राण्यांची हत्या व जंगलाचे नुकसान याबद्दल त्याने खूप नाराजी व राग व्यक्त केला होता. पर्यावरणाचे महत्त्व ओळखून त्याच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी प्रयत्न करणारी जिम कॉर्बेट ही भारतातील पहिली व्यक्ती असावी.

    जिम कॉर्बेट निसर्गवेडा होता. तो म्हणतो, "निसर्ग ग्रंथाला अंतही नाही व आरंभही नाही. निसर्गाचे ज्ञान निसर्गात राहून शोषले पाहिजे. माझ्या आनंदी जीवनाचे निसर्ग हेच कारण आहे." जिम पर्यावरण, वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी मनापासून प्रयत्न करीत होता. त्याच्या सामाजिक कार्यामुळे तो कुमाऊं भागात आदराने ओळखला जात होता.

    वन्य प्राण्यांना बंदुकीने शूट करण्यापेक्षा कॅमेराने शूट करणे त्याला जास्त पसंत होते. ही प्रेरणा त्याला फ्रेड चॅम्पियन व त्याच्या 'विथ ए कॅमेरा इन टायगर लँड' या पुस्तकाकडून मिळाली. फ्रेड चॅम्पियनने फ्लॅशलाईटचा वापर करून वाघाचे फोटो घेतले तर त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन जिम कॉर्बेटने दिवसाउजेडी फोटो घेतले. त्याच्या एका उदार दोस्ताने त्याला बेल अँड हॉवेल कंपनीचा सोळा मिलीमीटरचा कॅमेरा दिला. मग त्याने तो कॅमेरा घेऊन जंगलात मनसोक्त भटकंतीचा कार्यक्रम सुरू केला. काही वेळा आपल्या भक्ष्याजवळ, पिल्लाजवळ जिमला भटकताना पाहून वाघांनी नाराजी व्यक्त केली. काही वेळा तो वाघांजवळ पोहचला सुद्धा पण त्याला मनपसंत छायाचित्रीकरण करता आले नाही. कधी कमी जास्त प्रकाश तर कधी काचेवर पाने, धूळ, कोळीष्टके पडत. शेवटी त्याने एक जागा निवडली. दिडशे फूट रूंदीचे खोरं. दोन्ही बाजूला झाडे-झुडपे. मधूनच वाहणाऱ्या झऱ्याला कृत्रिम अडथळे निर्माण करून छोटे धबधबे तयार केले व या 'जंगल स्टुडिओ'त चित्रीकरणाची तयारी केली. मग जिम वाघांना आपल्या जंगल स्टुडिओत आणू शकला. दहा ते साठ फूट अंतरावरून सूर्यप्रकाशात त्याने ४ वाघ व २ वाघिणी आपल्या कॅमेऱ्याने टिपल्या. हे सर्व करायला त्याला साडे चार महिने लागले. आपल्या जंगल स्टुडिओत तो तासन् तास पडून असे आणि विशेष म्हणजे एकाही वाघाने त्याला पाहिले नाही. ६०० फूट लांबीचे सुरेख चित्रीकरण त्याने केले. दिवसाढवळ्या वाघांच्या इतके जवळ जाणे ही अशक्य कोटीतील गोष्ट म्हणून सकाळच्या पहिल्या प्रहरी दिवसाचा प्रकाश हळूहळू पसरत असताना त्याला वाघावर नजर ठेऊन बसावे लागले. जिमने काढलेले जंगलांचे, वन्य पशूंचे फोटो लंडनच्या 'नॅचरल हिस्टरी म्युझियम' मध्ये आजही जतन करून ठेवले आहेत. या फोटोवरून त्यावेळी भारतात वनसंपदा किती संपन्न होती हे लक्षात येते.

    १९२० साली जिम कॉर्बेट नैनिताल नगरपालिकेचा उपाध्यक्ष बनला. आपल्या कारकिर्दीत त्याने नैनितालमध्ये खूप सुधारणा केल्या. नैनितालच्या सरोवराकाठी बँड स्टँड बांधले. भूमिगत विद्युतवाहक तारा, आखीव रस्ते, पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा, ड्रेनेज सिस्टिम, झाडांची लागवड, व्यापारी लोकांकडून कर आकारणीचे नियम व त्या अनुषंगाने कायदे आणि या सर्वांच्या अंमलबजावणीसाठी नियमित बैठका! भविष्यात नैनिताल हे पर्यटन स्थळ बनावे हा सुद्धा त्या मागचा हेतू होता.

    नैनिताल नगर परिषदेचा तो सभासद असताना नैनिताल परिसरात वृक्षतोड व पशुहत्येला त्याने बंदी घातली. तसे कायदे केले व त्यांची कडक अंमलबजावणी सुरू केली. नैनितालच्या पायथ्याशी असलेल्या पाटलीदून परिसरातील जंगल व पशुधन वाचवण्यासाठी त्या परिसराला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्याचे त्याने प्रयत्न केले. त्याच्या प्रयत्नांना यश येऊन ६ ऑगस्ट १९३६ साली या परिसराला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा प्राप्त झाला व भारतातील पहिले व जगातील तिसरे राष्ट्रीय उद्यान 'हॅले नॅशनल पार्क' नावाने अस्तित्वात आले. आज हेच पार्क 'जिम कॉर्बेट नॅशनल पार्क' म्हणून जगात प्रसिद्ध आहे.

    नैनिताल परिसरात सुद्धा पक्ष्यांचे अभयारण्य त्याने स्थापन केले. पूर्वपरवानगीशिवाय कोणीही झाडे तोडू शकत नव्हते. आणि जर झाड तोडले तर तसलेच झाड लावून त्या झाडाचे संगोपन करण्याची जबाबदारी झाड तोडणाऱ्या व्यक्तीवर असे. एके दिवशी नैनितालच्यां चर्चचे प्रिस्ट एक झाड तोडण्याची परवानगी मागण्यासाठी जिमकडे आले. कारण त्या झाडामुळे क्लॉक टॉवरवरचे घड्याळ नीट दिसत नव्हते. पण जिमने त्या प्रिस्टनासुद्धा नियमातून कोणतीही सवलत दिली नाही.

    इतकेच नाहीतर त्यावेळी घोडे, गाढवे तसेच खेचरांचा कामासाठी वापर केला जात असे. या मुक्या जनावरांनासुद्धा आठवड्यात किमान एक दिवस तरी विश्रांती मिळेल याकडे सुद्धा जिमचा कटाक्ष होता. दुसऱ्या महायुद्धाच्या `समाप्तीपर्यंत नैनिताल व आजूबाजूचा परिसर जिमच्या नजरेखाली होता. त्यामुळे इथे वनश्री बहरली. पशु-पक्ष्यांची वर्दळ वाढली. आज मात्र हे काहीच उरलेले नाही.

    १९१४ साली पहिल्या महायुद्धाचा वणवा पेटला. त्यावेळी जिम मोकामा घाट या ठिकाणी रेल्वेत काम करीत होता व त्याचे वय होते ३९ वर्षे! लष्करात द्राखल होण्यासाठी तो कलकत्त्याला पोहोचला. पण त्याचे वय पाहून त्याला लष्करात प्रवेश दिला गेला नाही. १९१७ साली त्याने परत प्रयत्न केला तेव्हा मात्र त्याला लष्करात दाखल करून घेण्यात आले व कॅप्टन हा हुद्दा मिळाला. अल्पावधीतच त्याने कुमाऊंमधील ५०० तरुणांची तुकडी बनवली व सर्वजण १९१७ च्या मे-जूनमध्ये मुंबईमार्गे इंग्लंडला रवाना झाले. ही तुकडी लष्करात No 70 kumoan Company म्हणून ओळखली जाऊ लागली व या तुकडीची फ्रान्समध्ये रणभूमीवर रवानगी झाली. जिमला स्वत:पेक्षा या तरुणांच्या जीवाची जास्त काळजी होती. युद्धानंतर बक्षिसे, ट्रॉफिज मिळवून सर्वजण सुखरूप परत आले. जिम आता कॅप्टनचा मेजर बनला होता. त्याला 'व्हॉलेंटियर्स डेकोरेशन' हा बहुमान देण्यात आला.

    १९३९ साली हिटलरने सर्व जगाला महायुद्धाच्या वणव्यात ढकलले. १९४३ साली जपानी सेना ब्रह्मदेशात पोहोचून भारताचा दरवाजा ठोठावू लागली. हा सर्व प्रदेश पर्वतशिखरांनी, घनदाट जंगलांनी वेढलेला! दोस्त राष्ट्रातील तरुण सैनिकांना हे सर्वच अनोळखी होते व जपानी सैन्य याचा पुरेपूर फायदा उठवत होते आणि एके दिवशी जिम लष्करी कार्यालयात हजर झाला. लष्कराला अशा जाणकाराची गरजच होती आणि तसा माणूस मिळाला. जाणकार, सल्लागार, शिक्षक म्हणून जिम, फ्रँक मूर यांना भेटला. ते ३९ व्या ट्रेनिंग डिव्हिजनचे कमांडर होते. जिमची लेफ्टनंट कर्नल म्हणून नेमणूक झाली व छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथे नियुक्ती झाली. आता जिमवर जबाबदारी होती या तरुण जवानांना जंगलाचे ज्ञान देण्याची! वनस्पतींची, प्राण्यांची ओळख, त्यांच्या सवयी याविषयी माहिती करून देण्याची! तसेच आणिबाणीच्या प्रसंगी घेण्याची काळजी, दक्षता, कृती, अवघड प्रसंगी मार्ग कसे काढायचे हे सांगण्याची! हे सर्वकाही १४४/ हिमशिखरांच्या सहवासात जिम त्यांना सांगत होता, दाखवत होता, शिकवत होता, पारंगत करत होता. एक अनोखे ज्ञान तो देत होता की जे प्रत्यक्ष युद्धभूमीवर जरूरीचे होते, उपयोगी ठरणारे होते. जिमने काही काळ ब्रह्मदेशातही वास्तव्य केले. तेथील जंगले त्याने निरखली. त्या काळात अनेक अमेरिकन वैमानिक त्याचे मित्र झाले होते.

    --प्रकाश लेले

      September 30, 2022