" ऐ , ऐक ना "
" त्यासाठी whatsapp वर काहीतरी पाठवावे लागते . "
" मी एक फोटो तुला पाठवला आहे . तो तू बघ . आणि लगेचच delete करून टाक . "
" ओके " .
" पाठवला . "
" बघितला . "
" Delete केलास "
" तू काय आहेस ? फोटो पाठवलेला आवडला का ते तरी निदान आधी विचारायचं ? "
" प्लीज़ सांग ना . delete केलास . "
" खरं म्हणजे अतिशय जीवावर आलं होतं . पण केला फोटो delete . काय अप्रतिम फोटो आहे !
ज्याचा आहे आणि ज्याने काढला आहे अशा दोघांनाही full marks . "
" खरंच आवडला ? "
" अगदी मनापासून . म्हणून तर delete करायच अगदी जीवावर आलं होतं . पण तू delete का
करायला सांगितले ? मधेही एकदा असंच एक फोटो delete करायला सांगितले होतेस . "
" कारण याआधी पाठवलेली selfi फक्त तुझ्यासाठी होती . तू पाहिल्यावर आणखी कोणी पाहायलेली
मला आवडले नसते . चाललेही नसते . "
" Selfi काही vulgar अवतारात नव्हती . "
" चावटपणा नको . तसा हा फोटोही काही vulgar नाहीये . आणि तसे फोटो पाठवायला ना आपले ते
वय आहे , ना आपली तशी व्रुत्ती . "
" धन्यवाद माताजी . पण हा फोटो का ? झकास फोटो . अगदी सालंकृत . छान भरजरी साडी आणि
मोजकेच पण ठसठशीत दागिने . "
" म्हणूनच delete करायला सांगितले . मला दागिने जरासुद्धा आवडत नाहीत . "
" नशिबवान आहे नवरा . माझ्यासारखा " .
" हा थट्टेने घ्यायचा विषय नाही . अक्षरशः सक्ती केल्यासारखे मागे लागून हा फोटो काढला
गेलाय . "
" ओहो हो . . . म्हणून पापड मोडलाय का बाईसाहेबांचा ! जबरद्स्तीचा पुरावा नाही उरता
कामा मागे . "
" प्लीज़ . तुला पाठवायलाच नको होता फोटो . कुठचाच . "
" मस्करी नाही करत . पण खरंच सुंदर . . . . मान अजून जरा इकडे केली असतीस तर कानातले
आणखी छान आले असते फोटोत . नाहीतरी एकच साइड आहे ना "
" अजून नाही का काही "
" रागावनार नसशील तर सांगतो . "
" सांगा महाराज . आता तुमची सक्ती . "
" स्वतचे कौतुक ऐकायचे असले तर तसं मोकळेपणाने सांगावे माणसाने . "
" तू म्हणजे ना . . "
" साडीला matching म्हणून लाल चंद्रकोर हे बरोबर . पण मग त्या लाल चंद्रकोरीत काळा छोटा
टीळा हवा . खरं म्हणजे काळी चंद्रकोर आणि त्यात लाल कुंकवाचा ठिपका . आणि त्या
चंद्रकोरीची रेषा ठसठशीत नको ; पण ठळक हवी . ती रेषा जाडी नको ; पण भरदार हवी . नजरेत
पटकन भरेल अशी . "
" अजून काही प्रिस्क्रिप्शन ? "
" चंद्रकोरीची रेषा भुवई खाली वळते तिथपासून दुसऱ्या भुवईच्या खाली वळते तिथपर्यंत
बेस सारखी हवी . आणि दोन भुवयान्च्या बरोबर मधे तौ लाल कुंकवाचा ठिपका . दोन
भुवयान्च्या मधे जिथे नाकाच वरचे टोक संपते तिथे हा ठिपका हवा . परातीत चंद्राचे
प्रतिबिंब पडाव तसा . नाहीतर कड़वा चौथ ला चाळणीत चंद्र दिसावा तसा . "
" आता हे काय ? "
" वेडाबाई , ही चंद्रकोर माझा पति किती प्रेमाने मला साथ देतो याचे प्रतीक आहे .
त्याच्या भावविश्वाच्या मध्यभागी मी आहे याचे स्म्रुतिचिन्ह म्हणून तो लाल कुंकवाचा
ठिपका . अगदी लांबून सुद्धा लक्ष वेधून घेईल असा . आणि चंद्रकोर म्हणजे माझ्या
भावविश्वाला त्याची साथ पुरवते ते कोंदण . चंद्रकोर आणि हा टीळा म्हणजे परस्पर प्रीतीचा
कळस आणि ध्वज असतो ग . "
" सॉलिड आहे हे . "
" तसं नाही ग . हे संकेत समजून घेणं फार छान असते ग . काय आहे ना आपण एकमेकांवर प्रेम
करतो हे लक्षात ठेवणे महत्वाचे असतेच ; पण ते कसे करतो , कशासाठी करतो हे नाजूकपने
सूचित करता येणं हेही तितकेच महत्वाचे असते . "
" म्हणजे ? "
" आपल्या पिढीत प्रेम वाटण्याची सुद्धा एक परिमीति असते . लगेचच delete केलेला फोटो
पाहताना मला ते सारखे आठवत होते . "
"हे काहीतरी वेगळेच सुरु आहे तुझे आज . "
" अलग होंगे ; मगर गलत नही "
" डायलॉगबाजी पूरे . जरा ढील द्यायचा अवकाश की झाले सुरु . वेगळी परिमीति म्हणजे तुला
काय म्हणायचे ते सांग . "
" आपल्या पिढीची प्रेमाची तर्हा जरा भिडस्त आहे आजच्या पिढीच्या मते . "
" म्हणजे ? "
" आपल्या पिढीच्या प्रेमाचे फोटोच वेगळे आहेत . एक तर ते श्रीमान योगी कादंबरीतल्या
शिवाजी महाराज - सईबाई सारखे आहे . . उमलत्या कर्तुत्वाच्या काळात उमलत गेलेले . नाहीतर
ते " इथे ओशाळला म्रुत्यु " नाटकातल्या संभाजी महाराज - येसूबाई सारखे . एकमेकांच्या
कर्तुत्वाचा आदर करत व्यक्त होणारे . . . . " स्वारीचे हे रूप , स्वारीचे हे तेज ,
स्वारीचा हा पराक्रम " अशा शब्दांत एकमेकांविषयी व्यक्त होणार . . . . आंधळी आपुलकी
नाही तर आदरयुक्त , अभिमानपूर्न खानदानी आत्मीयता . दोघांच्या एकत्रित प्रयत्नातून
विकसित होत जाणारे . एकमेकांविषयी कौतुक आणि आदर असणारे . गाण्यात कसे प्रत्येक
कडव्यां नंतर ध्रुवपद येते तसे . प्रत्येक टप्प्यावर ही आठवण काढणारं . उगाचच नाही "
इथे ओशाळला म्रुत्यु " नाटकाचा प्रत्येक अंक " स्वारीचे हे रूप , स्वारीची ही जिद्द . .
. . " या वाक्यानी संपत . एकाने पुढच्यासाठी शब्दांत घातले तर पुढच्याच्या भावना
पहिल्याविशयी कुठे वेगळ्या असतात ? "
" अगदी खरं आहे रे हे "
" तिसरा प्रकार म्हणजे " स्वामी " कादंबरी तल्या थोरले माधवराव पेशवे आणि रमाबाई सारखे
. अकाली करपलेल्या कर्तुत्ववान जीवनातील मोजक्या क्षणांची शिदोरी देणारे . आठवणही येऊ
नाही अशा अनेक क्षणांचे डाग इतरजण आयुष्याच्या अन्गरख्यावर उडवत असताना आठवणीने आठवणीत
ठेवावे असे काहीतरी क्षण पदरात घालत असे प्रेमाचे डाग मिरवावेत असे . "
" परत नाही म्हणणार उगीच पाठवले फोटो म्हणून् "
" तसं नाही ग . मला माझ्या पत्नीचा विचार करताना नेहमीच असं वाटत असत "
" पटलं मला "
" ती चंद्रकोर , तो ठिपका , तो नाकाच्या शेंडयावर बसलेला लटका राग हे वैवाहिक
आयुष्याचे फार छान फोटो आहेत . सहवासाच्या कमेर्याने काढलेले . फक्त एकमेकांनाच
दिसणारे . पॉज़िटिव फोटो आणि नेगेटिव रील एकांतात उलगडणरे आणि जनांत सुचवनारे . मैफीलीत
श्रोत्यांना नाही जाणवत तानपुर्याचे स्वर फारसे . पण गायक अस्वस्थ असतो त्यान्च्याशिवाय
. असे हे क्षण , श्रुंगार - संकेत आयुष्याचे तानपुरे असतात . ते सदैव सुरातच हवेत .
इतरांना दिसणयासाठी नाही तर आपल्याला जाणवण्यासाठी . "
" क्या बात हैं ? "
" अजून एक सांगू ? "
" विचारू नकोस . सांगत राहा . "
" असे फोटो हे न्रुत्यान्गनेच्या घुंगरू सारखे असतात . ते घालताना आणि काढताना घुंगरू
आणि नर्तिका दोघेही एकमेकांना सांगत असतील का की तू आहेस म्हणून मी आहे . या आणि अशा
फोटोतून आपण आपल्या आयुष्याच्या साथीदाराला दूसरे काय सांगत असतो ? प्रेम असते म्हणून
असाच फोटो हवा आहे अशी सक्ती असते आणि ते मान्य असते म्हणून तर रूकार असतो ना ग ! "
" तुला फोटो delete करायला लावले असले तरी हे संभाषण मात्र मी मनात कायमचे साठवून ठेवीन
. "
" त्याची royalty म्हणून् नाही . पण एक विनंती आहे . "
" मी हे delete करणार नाही . "
" मी काहीही delete करायला सांगत नाहीये . "
" मग ? "
" या फोटोच्या रंगीत प्रती काढल्या जातीलच . साहजिकच आहे ते . पण या फोटोची निदान एक
तरी Black - white अशी प्रत काढ . "
" का रे ? "
" रंगीत फोटो मधे सौंदर्याचे सौष्ठव आले तरी भावनेच मार्दव येत नाही . त्यासाठी कृष्ण -
धवल च फोटो हवा "
" I see ! आता लक्षात येतय माझ्या ! ! सोनचाफ्याचा , बकुलिचा सुवास आवडता असूनही
पहिल्यापासून प्राजक्त आणि मोगरा ही तुझी नम्बर एकची आवड का ? आणि मी एकदा तुला
वेड्यासारखे म्हणले होते की प्राजक्ताच्या ओलसर फुलांचा डाग पडतो . "
" तेंव्हा नाही सांगितले काहि . पण आज सांगतो . ओल्या प्राजक्ताचा डाग नाही पडत .
भावविभोर मनाने त्या क्षणाचा , त्या सहवासाचा तो काढलेला फोटो असतो . प्राजक्ताचा देठ
म्हणून लाल असतो . हिरवा नसतो . हिरवा रंग असोशीचा असतो ; लाल सन्त्रुप्तीचा . ज्या
व्यक्तीच्या सहवासाने आपण त्रुप्त होतो , त्याच्या आठवणीने गालावर , मनावर लाली येते .
त्या स्म्रुतीन्च्या उजळणीचा फोटो म्हणजे तो प्राजक्त . प्राजक्त ही ओलसर आणि भावना ही
. "
" किती वेडा आहेस रे "
" नाही . दिवसाची खरी यथार्थता तिन्हिसान्जेलाच कळते . आकाशात मावळतीचे रंग पखरलेले
असतानाच मनाच्या कॅमेरयात गवसलेल्या आणि निसटलेल्या क्षणांची सरमिसळ सुरु असते .
म्हणून् तर त्याला कातरवेळ म्हणतात . "
" हा फोटो नाही विसरू शकणार "
" अग , असे फोटो हे वैवाहिक आयुष्याच्या नाकातल्या नथी सारखे असतात . नाकाचा शेनडा
पुन्हा पुन्हा चिमटीत पकडावा अशा मोहात पाडनारा . नथीचा हेवा वाटतो असे मोकळेपणाने
सांगत राहतात हे फोटो "
" तूच एक . . . "
-- चंद्रशेखर टिळक
२ डिसेंबर २०१६