रेल्वे कंपन्या …. बाजारगप्पा …
पॉडकास्ट

रेल्वे कंपन्या …. बाजारगप्पा …

Category:

 

भारतातील रेल्वेविषयक उत्पादने करणाऱ्या आणि सेवा देणाऱ्या कंपन्यांची माहिती देणारे पॉडकास्ट. चंद्रशेखर टिळक यांच्या बाजारगप्पांमधून…

  May 9, 2026


कथा

पथिकवा

Category:

 

” कुठे आहेस आत्ता ? ”

” Whatsapp चा असा दुरुपयोग नाही करायचा . ”

” दुरुपयोग कसला ? तू सेशन घ्यायला पुण्याला गेला आहेस आणि पाऊस खूप आहे म्हणून काळजीने विचारले . ”

” काळजीने की प्रेमाने ? ”

” प्रेम आहे म्हणून काळजी आहे , महाराज ” .

” वेडाबाई , मी इतका सतत फिरत असतो की आता खरंच अशी काही काळजी करावी असं काही उरलंय का ? आणि अशी इतकी माझी काळजी करायला लागलीस तर कसं व्हायचं ? ” .

  February 5, 2026


कथा

गुणकर विठलन राणी 

Category:

 

” मी लग्न जमवले आहे म्हणून त्यावेळी तुम्हांला सगळ्यांना घरी पार्टी दिली होती . तेंव्हा आपण सगळे आपल्या येई वो विठ्ठले नाटका बद्दल बोलत होतो . त्यावेळी तुझ्या शेजारच्या खुर्चीत बसत असताना फक्त तुला ऐकू जाईल अशा पध्दतीने माझी आई तूला काय म्हणाली होती हे मीही विसरलेले नाही . आणि तूही बिलकूल विसरलेला नाहीस , अगदी तू कधीच , कोणाकडेही त्याची वाच्यता केलेली नसलीस तरी , हेही मला चांगले माहीत आहे . ”

” मी तर ते तुलाही कधीच सांगितले नाही . आपण त्यानंतर इतके वेळा , इतक्या विषयांवर बोलत असतो तरीसुद्धा . त्यामुळे तुला हे कसे माहीत ? ”

” मी आईच्या मागेच होते . आणि मी तशी उभी आहे हे पाहूनच आई तेंव्हा तसं म्हणाली . काळाच्या ओघात माझी निवड आई ने मनापासून स्वीकारली तरी तिची माझ्या साठीची निवड नेहमीच . . . . . ”

” आता त्या हयात नसताना आणि आपल्या आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांच्या विषयी असं म्हणणं हे योग्य नाही “

  February 5, 2026


कथा

फोटो

Category:

 

असे फोटो हे न्रुत्यान्गनेच्या घुंगरू सारखे असतात . ते घालताना आणि काढताना घुंगरू आणि नर्तिका दोघेही एकमेकांना सांगत असतील का की तू आहेस म्हणून मी आहे . या आणि अशा फोटोतून आपण आपल्या आयुष्याच्या साथीदाराला दूसरे काय सांगत असतो ? प्रेम असते म्हणून असाच फोटो हवा आहे अशी सक्ती असते आणि ते मान्य असते म्हणून तर रूकार असतो ना ग ! ” ” तुला फोटो delete करायला लावले असले तरी हे संभाषण मात्र मी मनात कायमचे साठवून ठेवीन

  February 5, 2026


कथा

दिवेलागण

Category:

 

मी एकाच जागी एकाच चक्रात अडकलेली . पण कुठेही असलास तरी सकाळी मेसेज आणि दिवसभरात एक तरी फोन न चुकता करणारा तू . मी नवीन काहीही लिहिले तरी सगळ्यात पहिल्यांदा तुलाच वाचून दाखवणे . आधी whatsapp आणि मग दिवसभरातला voice call . कारण तुला skype download करायचा कंटाळा . ” जमलय ” अशी तुझी दिलखुलास दाद . . .आणि मग तू प्रत्यक्षात म्हणायच्या आधीच माझ्या काना – मनात घुमनार तुझे वाक्य . . . जवळ असतीस तर . . . ” हे वाक्य नाही रे पाठ सोडत . . .

  February 5, 2026


कथा

गेट टुगेदर 

Category:

 

शाळेच्या ग्रुप चे आधी रियूनियन आणि मग नियमित – अनियमितपणे होणारी गेट – टुगेदर हा दिलासा असतो , हुरहुर असते की अंतर्शोध – अंतर्नादाला निमंत्रण असते ? हा प्रश्न अलीकडे फार वेळा पडतो मला ….

तू गेट -टुगेदरला असलास तरी आणि नसलास तरीही …

  February 5, 2026


कथा

औदुंबर

Category:

 

मी मधेच तुला सांगितल्या प्रमाणे मी आता कायमची लंडनला जात आहे .आईला बरोबर घेऊन .

कायमचे घर सोडायचे म्हणून सगळी आवराआवर करत असताना जुन्या फोटोत तू , शिरीष आणि तुमचे भाटे सर ( माझे आजोबा ती .आप्पा ) अशा फोटोच्या २ कॉपी मिळाल्या . त्या तुझ्या घरी वहीनी कडे दिल्या आहेत….एक शिरीष साठी आणि दुसरी अर्थात तुझ्यासाठी . तुम्ही दोघे आप्पांचे अत्यंत लाडके विद्यार्थी ना ! ….नंतरच्या काळातले त्यांचे तरुण मित्र .

…हे फोटो वहिनीला दिले तेंव्हा तिला इतके भरून आले होते ना …आणि मलाही …एक तर आमच्या दोघींचे माहेरचे आडनाव एक …आणि दुसरे म्हणजे तू आणि शिरीष चे आप्पांशी असलेले भावबंध ! ! !

  February 5, 2026


लेखसंग्रह

अर्थ’ संकल्प 

Category:

 

१ फेब्रुवारी २०२० रोजी आपल्या संसदेत सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात आणि अर्थसंकल्पाला अर्थ निश्चितच आहे. अर्थाचे काय ? भाषाशास्त्र असं सांगते की शब्दाचा अर्थ लावावा तसा लागतो. दिल्या शब्दाचा दिल्या परिस्थितीत एक अर्थ असू शकतो आणि वेगळ्या परिस्थितीत वेगळाही असू शकतो. काही काही वेळा तर एकाचवेळी एकाच गोष्टीचे एकापेक्षा जास्त अर्थ लावता येतात ….

  February 18, 2020