नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
कधी कश्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल माहित नसते. तशी फारसी श्रीमंती नव्हती. पण खाऊन पिऊन तिचे कुटुंब सुखी होते. प्रेमळ नवरा, गोंडस मुलगा, समाधान घरात नांदत होत. आणि तो ‘काळा दिवस’ उगवला. क्षुल्लक आजाराचे कारण होऊन नवरा तिला आणि मुलाला अनाथ करून गेला. आभाळ कोसळ तिच्या डोक्यावर.
December 10, 2020
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाला आदर्शवत ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणजे नारायण माधव तथा नाना दुर्वे हे होय. वयाच्या ९४ व्या वर्षात यशस्वीपणे वाटचाल करीत असतांना त्यांनी गेल्या अनेक वर्षात पाहिलेले चढउतार स्वातंत्र्याआधीचा काळ आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळ यशापयशाची पर्वा न करता केलेले मार्गक्रमण या साऱ्यातून त्यांचा वेगळा इतिहास पहावयास मिळत आहे.
May 19, 2024
वापरता प्रवासात प्रवाशाने शक्कल हि बरवी………
July 13, 2014
बघता बघता आपले करमणुकीचे जग आक्रसत गेले. चित्रपटाची लांबी खुपायला लागली. दोन तासांपेक्षा जास्त वेळ चित्रपटगृहात बसणे म्हणजे वेस्ट ऑफ टाइम वाटू लागले. नाटके कापून “दोन अंकी” फ्लेवर मध्ये सर्व्ह व्हायला लागली. पुढे जाऊन दीर्घांक ( मध्यंतर विरहित सलग नाट्यानुभव देणारे) सादर व्हायला लागले. टीव्हीवरील मालिका २० मिनिटांमध्ये करमणुकीचा समर्थ डोस देऊ लागल्या. कादंबरीची कथा आणि नंतर “अलक ” ( अति लघु कथा ) झाली. महाकाव्यांच्या “चारोळ्या ” झाल्या.
June 23, 2021

खरे तर पुणे माझे जन्मस्थान (आजोळ) पण सातारा माझी कर्मभूमी. या दोन्हीही स्थळांची मला प्रचंड ओढ. माझी सारी जडणघडण सातारच्या मातीत झाली. पण पुढे वडिलोपार्जित व्यवसाय सातारला असून देखील पुणे, मुंबई येथे सुरू केला. १९८४ पुण्यात स्थिरावलो.
June 15, 2021
जीवनातील जरा ( वृद्धत्व ) अवस्था हा निसर्ग आहे. ती सर्वांना येत असते. पण तेंव्हा या अशा अत्यन्त नाजूक वृद्धावस्थेत आपले आरोग्य सुदृढ ठेवणे, आपली स्वतःची वैचारिक मानसिकता विवेकी सकारात्मक ठेवणे मात्र गरजेचे आहे.
March 27, 2022
वचनं की दरिद्रता' असे म्हणतात. माणूस कितीही गरीब वा दरिद्री असला तरी ही गरिबी वा दारिद्र्य प्रत्येक वेळी दाखवायलाच पाहिजे असे नाही. उलट कितीही दारिद्र्य असले तरी आपले बोलणे-चालणे, तसेच आचरणातून ' श्रीमंती' दाखविता येते. त्याचीच ही कथा.
एका चाळीतील एका खोलीत एक महिला व तिची चार लहान मुले राहात होती. त्यांची परिस्थिती फारच गरिबीची होती; परंतु त्या महिलेने आपल्या मुलांना अशी शिकवण दिली होती की, आपण फार गरीब आहोत हे ते नेहमीच विसरून जाऊन रोजचा दिवस आनंदाने जगत होती. कारण ते सर्वजण एकाच खोलीत राहात असले तरी खोलीचा वेगवेगळ्या भागांना त्यांनी दिवाणखाना, पाकशाळा, शयनगृह,
अभ्यासगृह अशी नावे दिली होती. म्हणजे पाकशाळेच्या भागात स्वयंपाक व भोजन करणे, अभ्यासगृहामध्ये मुलांनी अभ्यास करणे व शयनगृहात झोपणे. गरिबीमुळे त्यांच्या घरात फारशी भांडी नव्हती. रोज भोजन करायला ते पत्रावळी वापरत. मात्र त्यांना ते सोन्याच्या थाळ्या म्हणत. तसेच पदार्थांनाही त्यांनी वेगवेगळी नावे दिली होती. पिठलं- भाकरी केली असल्यास त्यांना ते श्रीखंड-पुरी म्हणत. गुळाला ते अमृतखंड म्हणत, तर मिरच्यांचा ठेचा असल्यास ते त्याला खमंग पक्वान्न असं म्हणत. जेवताना या शब्दावरून त्यांच्यात नेहमीच हास्यविनोद चालत. फाटक्या सतरंजीला ते काश्मिरी गालिचा म्हणत, तर मोडक्या खुर्चीला ते सिंहासन असे संबोधित. एकदा त्या चाळीत त्यांच्या खोलीच्या बाजूलाच एक नवीन बिर्हाडकरू आले. दिवसा तसेच रात्री मुलांचे ते वेगवेगळे शब्दप्रयोग त्यांच्या कानावर आले. त्यामुळे त्या बिन्हाडकरूला वाटले, आपल्या शेजारी फार श्रीमंत माणसे राहात आहेत.
मात्र इतके श्रीमंत कुटुंब चाळीत कसे काय राहाते, याबद्दल त्या बिर्हाडकरूला विलक्षण कुतूहल वाटत होते. काही दिवसांनी त्यांचा परिचय होत गेला व एके दिवशी तो नवीन बिऱ्हाडकरू त्या महिलेच्या घरात गेला. तेव्हा त्याला ती महिला सिंहासनावर बसून (मोडक्या खुर्चीवर) काश्मिरी गालिचावर (फाटकी सतरंजी) बसलेल्या आपल्या मुलांना शिकवित होती, असे दृश्य दिसले. खोलीत त्याने सर्वत्र नजर फिरवली, तेव्हा त्यांच्या शब्दप्रयोगाचा अर्थ कळायला त्याला फारसा वेळ लागला नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही आनंदाने व समाधानाने कसे जगायचे हे त्या कुटुंबाकडून तो शिकला होता.
त्याबद्दल त्या कुटुंबाचे कौतुक करून त्याने त्यांचा निरोप घेतला.
December 29, 2017
ही कथा शास्त्याने जेतवनात राहत असताना लालुदायी येराळा, ज्याला मठ्ठ असे म्हणत असत, त्याला उद्देशून सांगितली.
December 25, 2024
डोळ्यासमोर घड्याळातील काटे ‘आठ पंचवीस ‘ची वेळ दाखवत होते आणि डोक्यामध्ये ” आता ही नोकरी जर नाही मिळाली तर परत घरात पाऊल टाकू नकोस, तिकडेच तोंड काळं कर ” हे आप्पांचे शब्द घुमत होते, अश्या परिस्थितीत साडे आठची मुंबई ला जाणारी उद्यान एक्स्प्रेस पकडण्यासाठी जीवाच्या आकांताने संजीव प्लॅटफॉर्म क्रमांक दोन कडे पळत सुटला होता… तेव्हढ्यात ट्रेन चा भोंगा वाजला अन ट्रेन हलली, हातातली बॅग सांभाळत त्याने समोर दिसलेल्या दरवाज्यातून अक्षरशः स्वतःला आत झोकून दिलं.
December 12, 2024

एका सकाळी उंदीरमामा आपल्या बिळांतून चमकत्या डोळ्यांनी इकडे तिकडे पहात होता.
August 5, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti