नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
लेखकांची व्यथा एक लेखकच बर्यापैकी मांडू शकतो पण त्यासाठी तो हाडाचा लेखक आणि किंचित साहित्य वेडाच असायला ह्वा ! श्रीमंतीत जन्माला येऊन चांदिच्या ताटात सोन्याच्या चमच्याने पंच पक्वान खाऊन लेखक झालेला लेखक लेखकांची व्यथा कशी मांडू शकणार ? लेखक म्ह्णून जन्माला आलेला आणि प्रसिद्धीसाठी लेखक झालेला यांची व्यथा वेगवेगळी असते. लेखकांच्या घरातील लोकांच्या नजरेत दारुड्या आणि तो लेखक यांच्यात काही फरक नसतो ही लेखकाची सर्वात मोठी व्यथा असते. बहुसंख्य लेखकांना आपण लेखक का झालो ? या प्रश्नाचे जगाल पटेल असे उत्तर देणे अवघड जाते ही दुसरी व्यथा. आजही तू काय करतोस ? हा प्रश्न आपल्या देशातील लेखकाला विचारला तर तो छाती फुगवून सांगत नाही की मी लेखक आहे, मग तो मी चित्रपटासाठी, नाटकासाठी, वर्तमानपत्रासाठी अथवा टेलिव्हिजनसाठी लिहतो असं उगाचच मनात नसतानाही जोडून सांगत असतो म्ह्णजे त्यांच्या लेखक असण्याला वजन प्राप्त होते. ही आणखी एक व्यथा.
एखादा तरूण लेखक आहे म्ह्णून त्याच्याशी लग्न करायला तयार असणारी स्त्री एक तर लेखक असायला हवी नाहीतर वेडी ! ही पुरूष लेखकांची आणखी एक व्यथा आहे. आपल्या देशात अनेक नामवंत लेखक आहेत ज्यांना आपलं पहिलं पुस्तक प्रकाशित होण्यासाठी दहा- बारा वर्षे वाट पाहावी लागली इतकी वाट पाहायला लागणे ही ही एक व्यथाच आहे. या व्यथे पासून सुटका करून घेण्यासाठी काही लेखक पै-पै गोळा करून, इतरांची मदत घेऊन प्रसंगी कर्ज काढून स्वःखर्चाने आपली पुस्तके प्रकाशित करून घेतात. त्यांचे आयुष्य संपले तरी त्या पुस्तकांच्या ह्जार प्रती काही संपत नाहीत आणि संपल्या तरी त्या फुकट वाटून संपलेल्या असतात. या सगळ्यात आपला वेळ आणि पैसा तर वाया गेलाच पण प्रसिद्धी ही मिळाली नाही ही व्यथा आयुष्यभर त्यांचा पिच्छा सोडत नाही. कित्येक लेखकांना आपण इतके चांगले लेखक असूनही आपल्याला प्रसिद्धी, मानसन्मान, पुरस्कार का मिळाले नाही ही व्यथा सतावत असते. प्रत्येक लेखकाला त्याच्या आयुष्यात एकदा तरी हा प्रश्न पडतोच की आपण लेखक होऊन काही चूक तर केली नाही ना ?
लेखकाची सर्वात मोठी व्यथा ही असते की प्रत्येक वेळी त्याला फक्त मानधनच स्वीकारावे लागते त्याचे मूल्य तो नाही तर इतर ठरवतात. लेखकांची ही बोली लागेल असा दिवस कधीतरी या देशात उजाडेल का ? हा प्रश्न प्रत्येक लेखक स्वतःला विचारत असतो आणि अधिक व्यथीत होत असतो. लेखकाचे मूल्य अमूल्य असते आणि ते अमूल्यच राहते देर्दैवाने ही एक व्यथाच आहे.
-- निलेश बामणे
February 20, 2016

आपल्याच नादात ती काही वेळ चालत राहिली आणि तिच्यापासून काही फर्लांगभर अंतरावर, ओढ्यावर जो पुल होता, त्या पुलाच्या टोकाशी काहीतरी हालचाल होत असल्याचं तिला जाणवलं….. परत निशाच्या मनात चऽऽऽऽर्र झालं. बापरे… आता हे काय नवीन संकट??…..
April 4, 2020
लवकरंच बाजारात येणारी नवीन पुस्तके. आजच आपली प्रत राखून ठेवा. यातील काही पुस्तके हातोहात खपतील तर काही कदाचित आंदोलकांकडून जाळली जातील...
छगन भुजबळ - अनुभव :- "बारामतीच्या करामती"
विजय मल्ल्या :- "विश्व कर्जाचे - कर्ज तुमचे सल्ला माझा"
शरदचंद्र पवार - व्यक्तिचित्रे :- "मी टिपलेली माणसे"
निखील वागळे - नाटक :- "मालकाची जात
अजित पवार - आत्मकथा- "स्वत:ची मोरी"
कुमार केतकर - लघुकथा :- "अर्णब - एक दुःस्वप्न आणि इतर"
राज ठाकरे -
1) "जाळाईदेवी माहात्म्य" (पोथी)
2) गगनभेदी थापा
उद्धव ठाकरे - रहस्यकथा :- "कमळाबाईचे प्रेम"
पंकजा मुंडे - "चिक्कित पडली मक्खी" (लहान मुलांच्या कविता)
नारायण राणे - "च्या राण्या ची कोंबडी"
किरीट सोमय्या - कादंबरी :- "छगनवेध"
देवेंद्र फडणवीस - मानसशास्त्र :- "शून्यातून विश्व"
एकनाथ खडसे - "आल अंगावर बेतलं शिंगावर"
पृथ्वीराज चव्हाण - लोकनाट्य अनुवाद (मूळ लेखिका: सोनिया गांधी) :- पोरान लावला घोर
आणि ...
विनोद तावडे - शिक्षणाच्या आयचा घो Part-II
रामदास आठवले - कवितासंग्रह (हिंदी) :- "ढाणेवाघ की बेडूक उडी"
October 10, 2016
मुंगीचे मिस्टर कोण आणि मुंंगळ्याची मिसेस कोण? या बालवयात निरागस जिज्ञासेपोटी विचारलेल्या माझ्या संयुक्त प्रश्णावर मास्तर खूपच कावले आणि निरुत्तर होउन उत्तरापोटी त्यांनी मला तास संपेपर्यंत वर्गाच्या दारात अंगठे धरुन उभे रहायची शिक्षा ठोठावली. शिक्षेच्या अम्मलबजावणीत केलेला माझा अगाउपणा माझ्या चांगलाच अंगाशी आला.
July 8, 2019
वैधानिक इशारा : ही कथा अश्लील नाही . भविष्यातील गंभीर संकटाची ही सुरुवात आहे . आपल्या मुलांची काळजी असेल तर पालकांनी ही कथा वाचायलाच हवी . ब्रेक तुटलेले आहेत . गाडी तीव्र उतारावर आहे . उद्ध्वस्त करणाऱ्या विचारसरणीची खोल गहिरी दरी आ वासून उभी आहे … म्हणून कथा वाचायला हवी
January 20, 2026
होम quarantine झाल्यापासून सगळेच आपण आपल्याला आजूबाजूच्या भौतिक सुखाचा प्रचंड loss झालाय नाही का?
September 26, 2021
चाणक्यांच्या राजनीती वर विशाखादत्तांनी लिहिलेल्या मुद्राराक्षसाच्या प्रारंभकात म्हटल्याप्रमाणे ते सामन्त वटेश्वरदत्ताचा नातू व महाराज भास्करदत्ताचे पुत्र होते. विशाखदत्ताचा काळ निश्चितपणे सांगता येत नाही. तथापि इ. स. च्या नवव्या शतकापर्यंत केव्हा तरी तो होऊन गेला, असे दिसते.
June 11, 2026
तो एक वाईट मुलगा होता . ‘आदर्श कथा ‘ मधल्या वाईट मुलाच्या गोष्टीतल्या सारखाच . गोष्टीतल्या मुलाचे नाव राम असते ,पण याचे नाव शाम होते . गोष्टीतल्या गोष्टी सारखी याची परिस्थिती कधीच नव्हती . म्हणजे गोष्टीतल्या रामाची आई , म्हातारी , थकलेली , अंथरुणाला खिळलेली . ‘ आता माझ मरण जवळ आलंय ! माझ्या माघारी तुझं कस होणार ?तुला कोण पहाणार ? तुझे लाड कोण करणार ? तू शाळेतून आल्यावर तुला -गाजर का हलवा -कोण करून देणार ? तुला झोपताना अंगाई कोण म्हणणार ? ‘असं म्हणून घळाघळा रडणारी असते . ( तशी ती लवकर मरत नाही म्हणा ! )
March 31, 2018
वाङ्मय जगतात ‘साहित्य’ आणि ‘ललित लेखन’ या दोन संज्ञा वारंवार वापरल्या जातात. वरवर पाहता त्या सारख्याच वाटत असल्या, तरी त्यांच्या व्याप्तीत आणि लेखनाच्या उद्देशात मोठा फरक आहे. साहित्य ही एक अत्यंत व्यापक संकल्पना आहे, तर ललित लेखन हा त्याचाच एक अत्यंत सुंदर आणि कलात्मक भाग आहे. थोडक्यात सांगायचे तर, ‘साहित्य’ हे जर एक विशाल उद्यान असेल, तर ‘ललित लेखन’ हे त्या उद्यानातील सुवासिक आणि सुंदर फुलांसारखे आहे. साहित्याने माणसाची बुद्धी प्रगल्भ होते, तर ललित लेखनाने माणसाचे मन समृद्ध होते. दोन्हीचेही मानवी जीवनात आणि समाजात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
August 12, 2026
डोळा ह्या अवयवाकडे आपण जरा डोळसपणे बघायलाच हव. काणा डोळा करण्या सारखा तो अवयव नाही. असतात दोन, पण एकमेकांकडे न बघता एकेच ठिकाणी एकाच वेळी बघतात. मोठे केले की भिती, विस्फारले की आश्चर्य, मिचकावले की खोट खोट आणि एकच मारला की मार खायची लक्षण! कधी काळे, कधी पिंगट, कधी घारे व कधी कधी राजकपूरसारखे निळे.
July 9, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti