नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
दुसर्या दिवशी शाळा सुटल्यावर ठरल्याप्रमाणे बाबू अशोकला भेटला ,घरी जाताना अशोक ने बाबुला विचारल , “आज संध्याकाळी तू भेटशील मला ?”
July 13, 2022
‘सगळं नीट लक्षात ठेवा. ती यादी घ्या बरोबर. ‘राधाक्कांनी बजावले. आज तायडीचा म्हणजे त्यांच्या मोठ्या मुलीचा साखरपुडा. मोठी म्हणजे मुलीत मोठी. दोन मुली, त्यात तायडी मोठी. बबडी छोटी. दोन मोठे भाऊ – राहुल आणि केदार. दोघांचीही लग्न होऊन ते परदेशी. तायडीचं लग्न तसं उशिराच जमलं. हुषार, सुंदर, गोरीगोमटी मुलगी पण मंगळ कडक. लोक कितीही सुधारले तरी हे मंगळ, राहू, केतु मात्र अजूनही बोडक्यावर बसतात. त्यामुळे बबडीचं पण लग्न लांबणीवर पडत होतं. तिला मंगळ फिंगळ काही नव्हता, दिसायलाही तायडीपेक्षा अंमळ जास्तच सुंदर, काही स्थळांकडून आडून आडून विचारणाही झाली होती पण आधी लग्न कोंडाण्याचं मग रायबाचं!’ असा बबडीचा बाणा होता. शेवटी तायडीला पत्करणारं एक बेणं मिळालं. म्हणजे बेण्यांच्या शरदने तिला पसंत केलं. त्याचा मंगळ म्हणजे तायडीच्या मंगळापेक्षाही भारी होता! राधाक्का बेण्यांना म्हणाल्या, ‘ते मंगळ फिंगळ तुमचं काय ते पहा, आम्ही पत्रिका पहात नाही.’
March 16, 2022
फार वर्षापूर्वी इराकमध्ये घडलेली ही घटना आहे. बगदादजवळील एका छोट्या गावी एकमहिला व तिचा लहान मुलगा राहत होते. ती महिला मोलमजुरी करून आपल्या मुलाचे संगोपन करीत होती. आपल्या मुलाने शिकून मोठे व्हावे हीच तिची प्रामाणिक इच्छा होती. परंतु त्या छोट्या गावात तो मुलगा किती शिकणार? म्हणून तिने त्याला बगदादला शिक्षणासाठी पाठविण्याचे ठरविले.खरे तर त्या मुलाला आईला एकटे सोडून जाण्याची इच्छा नव्हती. मात्र आईच्या इच्छेला मान देऊन तो बगदादला एका सौदागराच्या काफिल्याबरोबर निघाला. जाताना त्याच्या आईने त्याला अडीअडचणीला लागेल म्हणून एक दिनार दिला होता. तसेच कोणतेही संकट आले तरी घाबरू नकोस व खोटे बोल नकोस, असा उपदेशही केला होता. त्या सौदागराचा काफिला जात असताना वाटेत लुटारूंनी त्या काफिल्यावर हल्ला केला. जवळचे असेल ते सर्व द्या नाहीतर प्राणाला मुकाल असे त्या लुटारूंच्या टोळी प्रमुखाने सर्वांना सांगितले व सर्वांची लूट घेत तो लुटारुंचा सरदार त्या मुलाजवळ आला. त्याने त्या मुलाला तुझ्याजवळ काय आहे असे विचारले. त्यावर त्या मुलाने आपल्या फाटक्या सदराच्या खिशातून एक दिनार काढला व त्याला दिला. तो सरदार त्याकडे तुच्छतेने पाहत म्हणाला, ' एकच दिनार?' तो मुलगा त्याला म्हणाला, ' माझ्याजवळ एवढा एकच दिनार होता. आणि तो मी तुला दिला आहे. ' त्या मुलाच्या निर्भयतेचे त्या सरदाराला कौतुक वाटले. त्याने त्याला विचारले, की तू कोठे जात आहेस? मुलगा म्हणाला, बगदादला मी शिक्षणासाठी जात आहे. त्यावर सरदार त्याला म्हणाला, ' तू आमच्याबरोबर चल. मी तुझे सारे शिक्षण करीन. ' त्या मुलाने लगेच, 'मला तुमचे - शिक्षण नको कारण मला चोर-लुटारू व्हायचे नाही, ' असे निर्भयतेने सांगितले. त्या मुलाची ती सत्य व निर्भय वाणी पाहून तो लुटारूचा सरदार ओशाळला व त्याचक्षणी त्याने लुटलेली सर्व संपत्ती ज्याची त्याला परत करून तो तेधून निघून गेला. हाच मुलगा म्हणजे मौलाना कादिर खिलानी जो पुढे इराकचा धर्मगुरु बनला.
February 11, 2017
आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत. बांगड्या भरा. किंवा बांगड्यांचा आहेर पाठवून जो अपमान केला जातो याचे बऱ्याच जणांना राग येतो. कमीपणा वाटतो. पण मला तर उलट तो एक प्रकारचा सन्मान आहे असे वाटते.
December 8, 2021
आज चार पाच दिवस झाले त्याची माझी भेट झाली नव्हती. तो कुठे गडप झाला होता काही कळत नव्हते. मन खूप अस्वस्थ झाले.
खरे तर मी त्याच्या नादी लागतच नव्हते. सतत माझ्यामागे भुणभुण करून त्यानेच मला नादाला लावले.
त्याच्यामुळे माझे मुलांकडे आणि घराकडे होणारे दुर्लक्ष, रोजची कामे पूर्ण होऊ न शकणे आणि डोक्यात सतत त्याचेच विचार असणे हे सर्व मला अपराधीपणा आणत होते. पण तो एवढा मनाला भुरळ घालायचा की त्याच्या पासून दूर राहणे दिवसेंदिवस मला अशक्य वाटत होते.
त्याच्या जास्त नादी लागल्या चांगले नाही हे सर्वांनी मला समजावून सांगितले आणि यावरून भरपूर टोमणेही मारले. पण मी कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
कारण नाही म्हटले तरी त्याच्या मैत्रीमुळे मला एक सामाजिक ओळख आणि प्रतिष्ठा मिळाली होती. त्याचा मित्रपरिवार एवढा मोठा होता की त्याच्यामुळे खूप मित्र-मैत्रिणी झाले होते.
माझ्या अबोल मनाला त्यानेच बोलणे शिकवले. फक्त बोलणेच नाही बरं का, तर त्याने मला अगदी जाहीरपणे किस देणे घेणे, डियर , लव यू, मिस यू असे शब्द बिनधास्तपणे वापरायला शिकवले. एरवी असे काही बोलताना लाजून चूर होणारे मी त्याच्या संगतीने मात्र ह्या गोष्टींना खूप सरावली गेले. घरातले सर्व आपापल्या व्यापात व्यस्त असताना चाळिशीनंतरचा तो मला लाभलेला खरा सोबती होता. ' ये कहा आ गये हम युही साथ साथ चलते चलते' असे काहीसे नाते आमच्यात निर्माण झाले होते.
माझ्यासाठी जरी तो फक्त जवळचा मित्र होता तरी त्याच्यासोबत जरा जास्त राहू लागल्यावर सर्वांच्या नजरेत येऊ लागले. आणि माझाही त्याच्यासमवेत जरा जास्तच वेळ जात होता. तो मला इतर काही सुचू देत नव्हता.
शेवटी मग मी चिडून त्याच्याशी संपर्क तोडून टाकला. संपर्क तुटल्यानंतर पहिल्या दिवशी तर मला खूप शांत आणि छान वाटले. त्याच्या सततच्या टीवटीवीपासून दूर झाल्याने मन शांत झालं. त्याच्यासोबत वेळ घालवून आपण घोडचूक करत होतो याची मनाला जाणीव झाली आणि आता त्याच्याशी पूर्णतः संबंध तोडायचे असा निश्चय पक्का झाला.
कसेबसे दिवस ढकलले. तिसऱ्या दिवशी मात्र मन खूप बेचैन झाले. खुप आठवण येऊ लागली. तो नाही तर आपले सामाजिक जीवनच नाही या विचारांनी मन दुःखी झाले. मग सगळे विरह गीत मुखी येऊ लागले.
याद आ रही है, तेरी याद आ रही है
याद आने से तेरे जाने से जान जा रही हैं
किंवा
तू छुपा है कहाँ मैं तड़पती यहां
तेरे बिन फीका फीका है दिल का जहां
अशी काहीशी मनाची अवस्था झाली.
शेवटी ठरवले की त्याच्याशी अगदीच ब्रेक अप करण्यापेक्षा थोडीफार मैत्री राहू द्यावी.
पण जास्त नादी लागायचे नाही.
मग त्याच्याशी परत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळेना!!
त्याचे काय झाले असेल, तो ठीक तर असेल ना या विचारांनी मन हुरहूरले. त्यात आज व्हँलेंटाईन डे आला. आजच्या महत्त्वाच्या दिवशी तो नसल्याने सेलिब्रेशन करताच येत नव्हते. नवऱ्याने तर अतिशय सुंदर मेसेज पाठवून मला विश केले. पण मी तो मेसेज वाचू शकले नाही. मन आणि तन फक्त त्याचाच शोध घेत होते. अखेरीस व्हॅलेंटाईन डे संपत आला. तशीच दुःखी मनाने अंथरुणात शिरले. काय आश्चर्य तो माझ्या उशी जवळ निवांत पहुडला होता. मी त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि भराभर त्याचे मुके घेतले. आपल्याकडे कोण पाहतेय, कोण काय म्हणतील कसलेच मला भान उरले नव्हते. दिसत होता फक्त तो आणि तोच..... म्हणजे माझा मोबाईल हो.........
त्याला बघून मी म्हटले,
तुम जो मिल गये हो
तो ये लगता है, के जहाँ मिल गया
मग मात्र त्याच्याकडून वचन घेतले,
वादा करले साजना
तेरे बिना मै ना रहू, मेरे बिना तू ना रहे
ना होंगे जुदा, ये वादा रहा
शेवटी व्हॅलेंटाईन डे संपायच्या आधी म्हणजे रात्री बाराला पाच कमी असताना मला माझा मोबाईल मिळाला आणि नवर्याचा मेसेज वाचून त्याला आय लव यू म्हणत मी माझा व्हॅलेंटाईन डे साजरा केला.
@मंजुषा देशपांडे, पुणे.
February 16, 2020
“आत” मध्ये कोलाहल सतत सुरु असतात. दरवेळी नव्या सूर्याच्या स्वागताला बाहेरच्या अंगणात जाणं जमतंच असं नाही. तो सूर्यही तसा झाकोळलेलाच असतो. मागच्या परसदारातील किंचित काळोख्या तुळशीवृंदावनापाशी तिचा संयत सूर सापडतो. काल-परवा घडून गेलेल्या, पुसट न झालेल्या काळाच्या गोधड्या पुकारत असतात आणि त्यांच्या घट्ट उबेत बरंच काही पुनःपुन्हा साचत असतं, सापडतही असतं. “हसणाऱ्या जखमा” नामक काव्यात्म नांव घेऊन आलेला चित्रपट बघायलाच पाहिजे या श्रेणीतला त्या काळात वाटला नाही.
January 1, 2021
विदर्भातील अष्टविनायक’ प्रेक्षणीय आहेत. त्यांच्याशी विविध दंतकथाहि जोडल्या गेल्या आहेत. विदर्भातील अष्टविनायकांमध्ये वैविधता आढळते.
April 12, 2024
१९८८ मध्ये ठाणे येथे झालेल्या ६१ व्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत श्री व. पु. काळे यांनी लिहिलेला लेख
August 24, 2023
त्यांच्याकडे गेलं की, कामाचं स्वरूप समजावून सांगितल्यावर ते स्वतःच्या हाताने काॅफी करुन द्यायचे. कथाचित्र कसे हवे आहे ते स्वतः पोझेस घेऊन दाखवायचे. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांचा आग्रह असे. वेळ सांगून यायला जमणार नसेल तर फोन करुन तसे सांगण्याची, त्यांनी मला ताकीद दिली होती.
October 26, 2021

काळा कोळसा झुकझुक पाना
पालखीत बसला भुलोजी राणा
भुलोजी राण्याचे कायकाय (आ)ले
सारे पिंपळ एक पान
एक पान दरबारी
दुसर पान शेजारी
शेजाऱ्याचा डामा डुमा
वाजतो तसा वाजू द्या
आम्हाला खेळ मांडू द्या
खेळात सापडली लगोरी
लगोरी गेली वाण्याला
वाण्या वाण्या सोपा दे
सोपा माझ्या गाईला
गाई गाई दुध दे
दुध माझ्या बगळ्याला
बगळ्या बगळ्या गोंडे दे
(गोंडे माझ्या राज्याला)
तेच गोंडे लेऊ सासर जाऊ
सासरच्या वाटे कुचू कुचू दाटे
पंढरीच्या वाटे नारळ फुटे
November 7, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti