नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
सावरकर विज्ञाननिष्ठेचे कट्टर पुरस्कर्ते होते. कोणतीही गोष्ट विद्यानाच्या कसोटीवर पारखल्याशिवाय ती आचरणात आणायची नाही ही त्यांचे सांगणे होते. राष्ट्राची प्रगती व्हावी व ती विज्ञाननिष्ठेनेच होईल अशी त्यांची धारणा होती.
October 8, 2022
इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वडीलांकडून आणि आमच्या गुरुजींकडून मी जो मार खाल्लाय, तो मी कधी जन्मात विसरणार नाही. या माराने मला जीवन शिक्षणाचे पहिले धडे दिले. आमच्या मराठी शाळेचे नावच मुळी होते, ‘जीवन शिक्षण विद्यामंदिर.’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात फोंडाघाट या गावातली ही प्राथमिक शाळा अख्ख्या पंचक्रोशीत गाजलेली.
June 19, 2022

पण नरिमन पॉइंटवर पांढऱ्या शुभ्र झग्यातले, डोळ्याला पांढरं मुंडासं वर काळी फीत लावलेले अरबस्तानातील लोक जमायला लागले, की समजावं आता पावसाळा आला. वाळवंटात राहणारी ही मंडळी. त्यांना पावसाचं विलक्षण आकर्षण. पावसापेक्षा पावसाच्या आगमनाचं, पहिल्या पावसाचं.
May 26, 2022
तसं पाहिलं तर रभाजीच्या विहिरीला जेमतेमच पाणी होतं. यावर्षी बऱ्याच दिवस पावसानं दडी मारल्यामुळे गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांची पंचायत झाली होती. जून महिना संपत आला तरी काळे ढग तोंड दाखवायला तयार नव्हते. त्यानं अन् रखमीनं सगळं यावर्षीच बी भरान कधीच तयार करून ठेवलं होतं फक्त त्यांना पावसाची वाट होती.
January 19, 2024
वैधानिक इशारा : ही कथा अश्लील नाही . भविष्यातील गंभीर संकटाची ही सुरुवात आहे . आपल्या मुलांची काळजी असेल तर पालकांनी ही कथा वाचायलाच हवी . ब्रेक तुटलेले आहेत . गाडी तीव्र उतारावर आहे . उद्ध्वस्त करणाऱ्या विचारसरणीची खोल गहिरी दरी आ वासून उभी आहे … म्हणून कथा वाचायला हवी
January 20, 2026

आज जगात राजकारणी, विचारवंत, अभ्यासक, बुवा, बाबा, बापू आणि महाराज त्यासोबत लेखक कवी आणि पत्रकार. विचार तर खूप मांडतात पण प्रत्यक्ष जीवनात तेच त्याच्या विचारांची होळी करताना दिसतात. त्याला हातावर मोजण्याइतके अपवाद असतात. पण जे अपवाद असतात त्यांच्याच वाट्याला खडतर आयुष्य येते.
July 25, 2022
या चित्रपटाचं यश जातं, पटकथा-संवाद लिहिणाऱ्या अण्णा देऊळगावकरांना.. कथानक जरी उत्तम असलं तरी ते चुरचुरीत संवादांनी फुलवणं, हे काम अण्णांनी लीलया केलं. प्रेमा किरणचा हा पहिलाच चित्रपट होता.. तिला त्यांनी ‘अंबाक्का’ हे टिपिकल गावठी नाव दिलं.. तिच्या पहिल्याच एंट्रीला ‘काॅटन स्मिता’ असा लक्ष्याच्या तोंडी संवाद दिला.. सिल्क स्मिता ही दक्षिणेकडील हाॅट नायिका होती, ही महाराष्ट्रातील.. म्हणून ‘काॅटन स्मिता’! पहिल्याच चित्रपटात तिची व लक्ष्याची केमिस्ट्री जुळली व नंतर दोघांनी अनेक चित्रपटांतून धमाल कारकिर्द केली..
June 3, 2022
वडील आर्मीत नोकरीला होते. त्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत आमचे कॅम्पच्या शाळेत शिक्षण झाले. त्यांची शिस्त अंगी बाणली. ते जिवनच वेगळे होते. त्यामुळे बाहेरच्या जगाची काहीच कल्पना नव्हती.
June 14, 2022
जेव्हा ‘मुख-पुस्तकावरी'(याला हल्ली मराठीत फेसबुक म्हणण्याचा प्रघात आहे.) ‘लाईक’ न देऊन आमुची लायकी दाखवायला वाचकांनी सुरवात केली, तेव्हा आम्ही हबकलो. भिडे खातर येणारे बदाम सुद्धा बंद होऊ लागले! मग मात्र वाचकांना -तुला पाहतो रे -म्हणण्याची पाळी आली. मुळात ‘वाचक’ म्हणजे कोण?आणि काय? तसेच त्यांचे प्रकार कोणते? हे पहाणे आमच्या साठी अगत्याचे होऊन बसले.
February 28, 2019
बाप रे बाप, माझी यादी संपता संपत नाहीए. मी पाहिलेल्या चित्रपटांमधील “जिंदगी ” विषयक, “जिंदगी” च्या अनेकविध छटा दाखविणारी ही (फक्त) हिंदी गाणी ! आज “अंकुर अरोरा मर्डर केस ” मधील असेच हे नितांत सुंदर, जिवंत आणि “जिंदगी “ला प्रश्न विचारणारे गाणे !
June 15, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti