(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बालकुमार साहित्य संमेलनाचे जनक – अमरेंद्र गाडगीळ

    मुले हेच घराचे बहुमोल अलंकार ,मुले हीच राष्ट्राची खरी संपत्ती ,मुले म्हणजे देवाघरची फुले अशा अनेक घोषणा आपण आज पर्यंत एकात आलो आहोत. पण बालसाहित्य निर्माण करून मुलांच्या सर्वांगीण विकास होऊन वाचनाची गोडी निर्माण होण्याच्या दृष्टीकोनातून बालकुमार साहित्य चळवळ निर्माण करणारे थोर बालसाहित्यिक म्हणजे अमरेंद्र लक्ष्मण गाडगीळ !

      July 26, 2020


  • अभिप्राय

    घराची झालेली पडझड आणि आजूबाजूच्या परिसराची वाताहात बघून राजूलाही खूप वाईट वाटलं. दोघंही खचल्यासारखे वाटत होते . त्यांचे हताश चेहरे बघताच राजूच्या नजरेसमोर आली ती त्या काका-काकूंचा अनमोल खजिना असलेली “अभिप्राय” वही.

      February 4, 2026


  • वर्कलोड

    "सर,आज मै थोडा कन्फ्यूज्ड हूं !" मी एम.डीं ना म्हणालो.
    " क्यूं ?"
    "अपने एच.आर.मॅनेजरने एक असिस्टंट देने की रिक्वेस्ट डाली है ." मी माझे म्हणणे मांडले.
    " हमारे यहां 'पे रोल प्रोसेसिंग' तो अकाऊंट्स डिपार्टमेंट करता है, फिर भी एच.आर. इतना बिझी ?"
    " अब एच.आर.का वर्कलोड काफी बढा है. उसने एक टेबलमे, हर एक पाॅईंट लगनेवाला वक्त बताके जस्टीफाय किया है. मैंने डिसीजनके लिये एक हफ्ते की मोहलत मांगी है."
    " क्यूं ?"
    " क्यूं की हेड ऑफिस और फॅक्टरीका स्टाफ बढाना नही ऐसा रिझोल्युशन पास हूवा है !" मी म्हणालो.
    " फिर किसलिये रूके हो ? उसे बोल दो!"
    " सर प्राॅब्लेम तो हमे ही साॅल्व्ह करना पडेगा!"
    " ये बताओ अपने ऑफिसमे कौन कौनसे डिव्हीजन्स है?" एम.डीं.चा प्रश्न.
    "अकाऊंट्स, मार्केटींग, प्राॅडक्शन प्लॅनिंग और एच.आर," मी उत्तर दिले.
    " तुम्हारी वर्कलोड थियरी क्या कहती है? सभी मॅनेजर्स की अकाऊंटेबीलीटी मिल रही है ना? "
    मी होकारार्थी मान हलवली.
    " मगर ये सब तूमने सिर्फ मॅनेजरीयल स्टाफके लिये किया."
    " येस."
    " मतलब उसके निचे काम करनेवाला स्टाफ अकाउंटेबल नही?" एम.डीं.नी प्रश्न विचारला.
    " वो उनके मॅनेजरको अकाऊंटेबल है." मी उत्तर दिले.
    " तुम्हे ऐसा लगता है की ऑफिसके हर एमप्लाॅइ का वर्कलोड सही है ?"
    " शायद हां!" मी चाचरत म्हणालो.
    " व्हाॅट अ स्विट थिंकिंग!" एम.डीं.चा स्वर चेष्टेचा होता. " मै तुम्हे एक सलाह देता हूं."
    " बोलीये सर."
    " तुम एक दिन मेरे केबिनमे पांच घंटे बैठो और केवल CCTV वाॅच करो.
    " ???? " माझी नजर प्रश्नार्थक.
    " स्क्रीनपर तुम्हे हर व्यक्ति दिनभर क्या करती है वो मालूम पडेगा."
    "आय गाॅट इट. नो नीड टू सीट इन युवर केबिन." एवढे बोलून मी उठलो आणि माझ्या केबिनमधे येवून बसलो. तिथून मी अकाऊंट्स मॅनेजरला मेल टाकला," एक तासाच्या आत त्याच्या प्रत्येक असिस्टंटचे नाव आणि जाॅब डिस्क्रिप्शन मला हवे आहे."
    तासाभराने आलेल्या लिस्टमधे पहिलेच नाव मिसेस किर्थी पिल्लईंचे दिसले. तिचे जाॅब डिस्क्रिप्शन मी वाचू लागलो. कंपनीत गेली १६ वर्षे ती काम करत होती. तिने खालील कामे संगतवार दिली होती.
    १) दर महिन्याच्या दहा तारखे पर्यंत चार लोकेशन्सच्या (तीन फॅक्टरीज आणि हेड ऑफिस) सर्व स्टाफचे सॅलरी कॅलक्यूलेशन आणि डिस्ट्रीब्यूशन.
    २) स्टाफ आणि कामगारांचे पी.एफ कॅलक्यूलेशन करून ते तीन वेगवेगळ्या स्टेट्सच्या पी.एफ ऑफिसमधे भरणे.
    ३) स्टाफ आणि कामगारांचे प्रोफेशनल टॅक्स कॅलक्यूलेशन करून सरकारजमा करणे.
    ४) दर महिन्याच्या वीस तारखेला प्रत्येक कामगाराचा ॲडव्हान्स पे अगेन्स्ट सॅलरी त्यांच्या अकाऊंटमधे ट्रान्स्फर करणे.
    ५) क्वार्टरली परफॉर्मन्स रिवाॅर्ड डिस्ट्रीब्यूशन.
    ६) इयरली बोनस कॅलक्यूलेशन ॲण्ड डिस्ट्रीब्यूशन.
    मी इंटरकॉम वरून किर्थीला माझ्या केबिन मधे बोलावले. येताना तिला तिच्या जाॅब डिस्क्रिप्शनचा एक प्रिंट घेवून येण्यास सांगितले. पाच मिनीटात ती हजर झाली. मी बसण्याचा इशारा करताच ती बसली. तिच्या चेहर्‍यावर गोंधळलेले भाव होते. कारण यापूर्वी ती कधीही माझ्या केबिनमधे आली नव्हती.
    " किर्थी मला तुझ्या जाॅब प्रोफाईलचे वर्कलोड कॅलक्यूलेशन करायचे आहे." मी लगेच सुरवात केली. "आता मला तुझा पहिला पाॅईंट एक्सप्लेन कर."
    " म्हणजे नक्की काय सांगू मला कळत नाहीये." किर्थी अस्खलित मराठीत बोलली.
    "ठिक आहे, मी प्रश्न विचारतो, तू उत्तरे दे."
    किर्थीने मान डोलावली." तिन्ही फॅक्टरीज कडून सॅलरी स्टेटमेंट्स किती तारखेला येतात?" मी पहिला प्रश्न विचारला.
    " सात/आठ तारखेला."
    "आपल्या ऑफिसचे सॅलरी स्टेटमेंट किती तारखेला तयार होते?" माझा पुढचा प्रश्न.
    " सर हे साॅफ्टवेअरवर बेस्ड आहे. ते फिंगर टच अटेंडन्स रेकाॅर्डरशी कनेक्टेड आहे." किर्थीने सांगितले.
    " म्हणजे अटेंडन्स रेकाॅर्ड सॅलरी शिटमधे ॲटोमॅटीकली अपडेट होतो?"
    " होय सर." किर्थीने सांगितले.
    "बरं फॅक्टरी लेव्हलला हे रोज कोण अपडेट करतं?"
    " तिथेही हे कोणीच अपडेट करत नाही. हेच साॅफ्टवेअर तिथे आहे." किर्थीने सांगितले.
    " म्हणजे दर महिन्याच्या सात तारखेला फॅक्टरी मागच्या महिन्याचे सॅलरी स्टेटमेंट व्हेरिफाय करून आपल्याला इ काॅपी पाठवत असणार ?"
    "होय सर."
    "त्यानंतर तू काय करतेस?" मी विचारले.
    किर्थी उत्साहाने सांगू लागली,
    " फिल्टर लावून फक्त एमप्लाॅइ नंबर - एम्प्लाॅइ नेम - अर्न्ड सॅलरी - अकाऊंट नंबर " असे चार काॅलमचे स्टेटमेंट बॅन्केला मेल करते. तिथून मग सॅलरी थेट इंडिव्हिज्युअल बॅन्क अकाऊंटला जमा होते."
    " चार लोकेशन्स साठी हे चार वेळा करावे लागत असेल." मी खात्री करून घेण्यासाठी विचारले.
    " होय सर."
    "असे एक स्टेटमेंट बनवून बॅन्केला पाठवण्यासाठी किती वेळ लागतो?"
    " जास्तीत जास्त एक तास." किर्थी उत्तरली.
    " म्हणजे हे साधारण चार तासांचे काम आहे."
    " होय सर."
    "आता पी.एफ. कॅलक्यूलेशन संबंधी सांग."
    " सर पी.एफ.ची इंडिव्हिज्युअल आणि कन्साॅलिडेटेड फिगर सॅलरी स्टेटमेंट मधे आलेली असते. त्याचा फिल्टर लावून प्रिंट काढला जातो. मग चार लोकेशन्सचे चार चेक्स पी.एफ.ऑफिस साठी बनतात. ते आपल्या पी.एफ. कन्सल्टंटला भरण्यासाठी दिले जातात."
    " हे काम कोणत्या दिवशी केले जाते? आणि किती वेळ जातो?"
    " अकरा/बारा तारखेला. हेही चार तासांचे काम आहे." किर्थीने कन्फर्म केले.
    " वेळेचा हाच फाॅरमॅट प्रोफेशनल टॅक्स आणि ॲडव्हान्स सॅलरी पेमेंट करताना लागत असेल."
    " होय सर."
    " वर्षातून चारदा 'परफॉर्मन्स रिवाॅर्ड डिस्ट्रीब्यूशन'आणि एकदा 'बोनस' डिस्ट्रीब्यूशन करण्यासाठी इतकाच वेळ लागत असेल असे मी समजू?" मी तिच्याकडे उत्तराच्या अपेक्षेने पाहिले.
    " होय सर."
    " या व्यतिरिक्त अजून काही काम तू करतेस का?"
    " नाही सर."
    " तू सांगितल्यानुसार दर महिन्यात १०,११,१२ आणि २० तारखेला तू चार चार तास बिझी असतेस, म्हणजे एकूण १६ तास. तसेच वर्षातून ४ वेळा म्हणजे १६ तास तू रिवाॅर्ड डिस्ट्रीब्यूशनचे काम करतेस आणि एकदा ४ तास बोनस डिस्ट्रीब्यूशन साठीचे काम करतेस."
    पुढे मी विचारले,"किर्थी, दर दिवशी कामाचे लोडिंग हे तुझ्या ८ तासाच्या प्रेझन्स मधे ५.५० तासच असायला हवे हे तुला मान्य आहे का?"
    " होय सर."
    " आता आपण वर्षाचे ३०० वर्किंग डेज् धरू. तूला ३०० x ५.५ = १६५० तास काम करणे अभिप्रेत आहे."
    " सध्याचे तुझ्यावरचे लोडिंग
    १६ तास x १२ महीने = १९२ तास. अधिक १६ तास रिवाॅर्ड डिस्ट्रीब्यूशनचे, अधिक ४ तास बोनस डिस्ट्रीब्यूशनचे. म्हणजे एकूण २१२ तास कामाचा लोड तुझ्यावर आहे. जो (२१२÷१६५०)x१००, जेमतेम १३ टक्के आहे.
    " आता उरलेला ८७ टक्के वेळ हा तुला ॲडीशनल वर्कलोड घेवून पुरा करावा लागेल."
    " सर मी एवढेच काम सोळा वर्षे करते आहे.आठ वर्षांपूर्वी पर्यंत सर्व मॅन्युअल वर्क होते. तेव्हा मान वर करायला फुरसत नसे.आता ऑटोमेशन झाल्यामुळे प्रोफाईल लहान वाटू लागली आहे. मला आता आणखी काम झेपेल असे वाटत नाही."
    " किर्थी, करीअर हा एक प्रवास आहे जो सतत चालू असतो. ज्यात आपण पुढे जात असतो. कोणतीही पोस्ट हे डेस्टीनेशन नाही."
    " सर, तरीही मला ॲडीशनल वर्कलोड झेपेल असे वाटत नाही."
    " किर्थी तुला काही चाॅइस नाही. दोन दिवस विचार कर आणि 'यस' किंवा 'क्विट' चा मेल पाठव!"
    " किर्थी निघून गेल्यावर मी तिच्या मॅनेजरला आजचा अहवाल पाठवला आणि ह्या पद्धतीने उरलेल्या स्टाफचा वर्कलोड कॅलक्यूलेट करून आठवड्याभरात रिपोर्ट करण्यास सांगितले.
    यावरून मॅनेजर्स आपल्या स्टाफचा खरा वर्कलोड किती आहे हे टाॅप मॅनेजमेंट समोर आणायला कसे उदासीन असतात हेही दिसले.
    त्या मेल मधे मी एम.डीं. ना मार्क करायला विसरलो नाही कारण त्यांचे अनुमान बरोबर निघाले होते !
    --रविकिरण संत

      November 23, 2022


  • पेशन्स इज द की.. (‘मी आणि ती ‘)

    पेशन्स इज द की….

    तिचे वडील मला भेटले म्हणाले तू काहीतरी कर तिच्यासाठी . तिची अवस्था गेले वर्षभर तशीच होती. चांगले लग्न ठरले होते ,

      December 16, 2021


  • स्वप्नपंखांना आकाश थिटे – मनोगत

    स्वप्नांचे पंख लेऊन, सूर्यमंडळाला भेदू इच्छिणारी त्यांची गरुड झेप, आपल्या सर्वांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. मराठी शब्दांशी होणारी झटापट सुलभ करणाऱ्या मिलिंद सरवटे या माझ्या मित्रास आणि माझ्या कोणत्याही लेखनाला पॉलिश करण्याचं काम तत्परतेने आणि आवडीने करणारे डिमेलोसर यांच्या मी ऋणातच राहू इच्छिते.

      July 26, 2022


  • मला माणूस हवंय

    मोठ्या शहरातील मोठं हॉस्पिटल. त्यातील डायलिसिस विभाग. एकदा माझे तिथे जाणं झाले. रांगांमध्ये बरेच बेड्स व त्यावर आडवे पडलेले पेशण्ट्स. बाजूला डायलिसिसचं मशीन.कोणी शांत पडून होते, कुणी जवळच असलेल्या आपल्या सोबतीला आलेल्याशी थोडेफार बोलत होते.

      January 2, 2025


  • संधिप्रकाशातील सावल्या – ४ : तू भ्रमत आहासी वाया

    गेल्या काही दिवसातल्या संधिप्रकाशातल्या सावल्यांचा गोष्टी अनेकांच्या कानावर गेल्या होत्या. त्यामुळं सगळे उत्सुकतेनं आले होते. उत्सुकता नावालाच, प्रत्येकजण भलंमोठं प्रश्नचिन्ह घेऊन आला होता. पण सुरुवात कुठून करायची हे कुणाच्या लक्षात येत नव्हतं.

      July 25, 2021


  • हॅलिफॅक्स बंदरावरील गमती-जमती

    मी प्रथम समुद्र पाहिला तो..... अरबी समुद्र ! बी.एड्‌.च्या शिक्षणासाठी एक वर्ष कारवारला होतो. रोज सायंकाळी बीचवर जायचो. दिवसभर उष्णतेने हैराण झालेल्या जिवाला तिथे कांहीसा गारवा मिळायचा. पुढे गोवा, मुंबईला जायचा अनेकवेळा योग आला नि अरबी समुद्राचे दर्शन वारंवार घडत गेले. परंतु महासागराचं महाकाय रूप पहायला मिळालं ते कॅनडामध्येच!

    कॅनडाला जशी समुद्र किनारपट्टी लाभली आहे, तसेच सरोवरांचेही वरदान आहे. हॅलिफॅक्सला तर ‘सिटी ऑफ लेक्स' म्हणूनच ओळखले जाते. हॅलिफॅक्स बंदरावर अटलांटिक महासागराचं दर्शन घडलं नि एक अव्यक्त आनंद झाला. तसे महासागराचे महाकाय रूप इथे पहायला मिळाले नाही, कारण इथे महासागर जमिनीच्या अंतर्भागात शिरल्याने त्याला खाडीचे स्वरूप आले आहे. ही खाडी म्हणजे निसर्गरम्य परिसरात अवतरलेली जलपरीच जणू ! त्याच्या मध्यभागी असलेले छोटे बेट म्हणजे तारुण्यात सळसळणाऱ्या जलपरीच्या भाळावरचा टिळाच शोभावा ! त्यावरचा लाईटहाऊसचा सुंदर टॉवर तिच्या केशसंभारात माळलेला तुराच भासावा ! नाजुक, निळसर लाटांमुळे तिचं सळसळणारं लावण्य अधिक खुलून दिसत होतं.

    उसळणाऱ्या लाटा, चित्रपटात पाहिलेला वा पुस्तकात वाचलेला सागराचा रुद्रावतार यावेळी पहायला मिळाला नाही. सागराच्या पृष्ठभागावर सगळेच कसे संथ आणि शांत होते. छोट्याछोट्या लाटा पाठशिवणीचा खेळ खेळत होत्या. ते सुंदर दृश्य पाहून माझे मन आनंद सागरात डुबक्या घेत होते.

    ‘हारबर वाक' वरून मनसोक्तपणे फिरत निसर्ग निर्मित हे अद्‌भूत दृश्य आम्ही पहात होतो. समुद्र आज शांत होता; पण किनाऱ्यावर मात्र जनसागर उफाळला होता. नाना देशाचे, नाना वेशाचे, नाना भाषा बोलणारे,...... रंग़ीबेरंग़ी दृश्य मनाला मोहवित होते. त्यात नव्या ढंगात, नव्या रंगात, नव्या उमेदिने, नव्या संसारात पदार्पन केलेली नवी जोडपी अधिक ! विविध संस्कृत्यांच्या संगमात जणू सगळे एकरूप झालेले. बहूसंख्य इंग्रजी बोलणारे......मराठी किंवा हिंदी बोलणारे कुणी आढळतील या आशेने माझे कान वेध घेत होते नि डोळे धुंडाळीत होते. तशी एक-दोन कुटूंबे भेटली नि आपुलकीचा उबारा मिळाला. विदेशात स्वदेशी लोक अनोळखी असले तरी ते आपले वाटू लागतात. संस्कृतीच्या रेशीम धाग्याने त्यांची नाळ आपल्याशी जोडलेली असते. त्या गर्दीतही आम्ही त्यांच्याशी संवाद साधला. ते कुटूंब होते नागपूरचे. मुलगा सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला होता. त्याला भेटावे, नवं जग पहावं म्हणून ते आले होते. एवढ्या मोठ्या जनसमुदयात आपल्याशी मराठी बोलल्याचे ऐकून त्यांनाही आनंद झाला. पुढे तर त्यांचा मुलगाही माझ्या कन्येच्याच आयबीएम कंपनीत नोकरीला असल्याचे समजले.
    हॅलिफॅक्स बंदर भुगोलात वाचलं होतं, आज प्रत्यक्ष पहात होतो. किनारपट्टीशेजारी धक्यावर एक-दोन थांबलेली जहाजे, दूरवर समुद्रात पर्यटकांना फेरफटका मारून आनणाऱ्या होड्या, बंदराच्या किनारपट्टीवर हातात हात घालून मौज लूटणारी तरूण जोडपी, कॉफिचे घुटके घेत विविधांगी दृश्ये पहाणारे पर्यटक...... सगळच कस वेगळ, नव-नव वाटत होतं. प्रदेश वेगळा, लोक वेगळे, त्यांची भाषा वेगळी. संस्कृती वेगळी.........! सारं कस स्वप्नातल्यासारख ! लहानपणी प्रथमच बाबांच्या बरोबर बेळगावात आलो होतो नि शहरातलं दृश्य पाहून भांबावल्यागत झाल होतं. अगदी तसंच वाटलं ! एका वेगळ्या अनुभवाच्या नि विचाराच्या तंद्रीत असतांनाच कन्येने हाक मारली. माझे त्याकडे लक्ष नसल्याचे पाहून ती पुन्हा म्हणाली,

    ‘पप्पा ऽ'

    मी दचकून प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले. ती म्हणाली,

    ‘पाण्यावरून तरंगणारी ती ग्रीन बस पाहिलीत ?'

    ‘बस नि पाण्यात ?' मी प्रश्न केला.

    ‘हो, बस कम बोट !' तीने पाण्यावरून तरंगणाऱ्या बसकडे बोट करून दाखविले.

    बसच होती ती, पाण्यावरून तरंगणारी ! मी कौतुकाने पाहू लागलो.

    ‘तीच बस आता जमिनीवर येईल नि रस्त्यावरून धाऊ लागेल.' ती म्हणाली.

    सगळेच कसे नवलाईचे ! कांही वेळाने ती बस जमीनीवर आली नि प्रवाशी बसप्रमाणे रस्त्यावरून धाऊ लागली. हिरव्या रंगाच्या या अनोख्या बसने लोकांना समुद्रात होडी बनून जलविहार घडविला नि जमिनीवर बस बनून रस्त्यावरून फेरफटका मारून आनला. बहूरुप्याप्रमाणे पाण्यात नि जमीनीवर रूप बदलणाऱ्या या बसचं मला कौतूक वाटलं. अर्थात हा जादूटोना नव्हता तर विज्ञानाचा चमत्कार होता. या चमत्कारी बसमध्ये बसून एक वेगळा अनुभव घेण्याचा मोह आम्हालाही झाला; परंतु वेळे अभावी ही हौस पूर्ण करता आली नाही.

    काठाला लागूनच पाण्यात झुलणाऱ्या फ्लोटींग ट्रॅककडे माझं लक्ष गेलं. कांही पोरं नि थोरंही त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत गमतीने पळत होती. पाण्याच्या लहरीबरोबर झुलत्या पुलाप्रमाणे तो झुलत होता. त्यावरून फिरण्यात पर्यटकांना एक वेगळा अनुभव आणि आनंदही मिळत होता. फ्लोटींग ट्रॅक म्हणजे पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणारा लाकडी मार्ग ! लोखंडी साखळीने किनारपट्टीला त्याला बांधल्याने तो किनाऱ्यालगतच पाण्यावर तरंगत होता. त्याच्यावरून चालतांना झुलत्या पुलाप्रमाणे पर्यटकांना एक आगळा आनंद देत होता. आम्हीही त्यावर उतरलो नि त्याच्याबरोबर झुलण्याची मौज लुटली. एकिकडे दूरवर पसरलेला निळसर महासागर तर दुसरीकडे किनारपट्टीवर पसरलेला रंगीबेरंगी जनसागर ! फ्लोटींग ट्रॅक वरून हे अद्‌भूत चमत्कार आम्ही आळीपाळीने पहात होतो, त्यातून मन सुखावत होते.

    हॅलिफॅक्सच्या मध्यवस्तीतही मी कधी एवढी गर्दी पाहिली नव्हती. अर्थात पुणा-मुंबईची गर्दी पाहिलेल्यांना इथली शांतता अस्वस्थ करील, पण एका मोठ्या दगदगीतून बाहेर पडल्याचा आनंदही देईल. शहरे मोठी पण लोकवस्ती विरळ असेच कांहीसे चित्र ! सगळेच कसे आखीव, रेखीव नि नियोजनबद्ध ! किनारपट्टीवर ही निरव शांतता नव्हती. लोटलेल्या जनसागरातून वाट काढत आम्ही पुढेपुढे जात होतो. एका कोपऱ्यावर तंतूवाद्याच्या तालावर इंग्रजी गीत गाणारा एक तरुण गायक दिसला. त्याचे सुरेल गायन रशीकांना डोलावित होते, त्याच्या शेजारी असलेल्या पात्रात लोक खुश होऊन पैसे टाकीत होते. आपल्याकडे गर्दीच्या ठिकाणी भिक्षा मागणारे लोक हमखास असतात. इथे असला प्रकार मला कुठेच दिसला नाही. अर्थात हा गायक भिक्षा मागत होता, असे मला मुळीच म्हणायचे नाही. तो आपल्या कलेचे प्रदर्शन करीत होता नि लोक खुशीने त्याच्या कलेचे मोल देत होते. एक प्रकारे त्याच्या कलेचा हा गौरवच होता.

    आनखी कांहीसे पुढे गेल्यावर एका गोऱ्या युवकाची नाजूक बोटे हार्मोनियमवर लिलया नृत्य करीत होती. त्यातून उमटणाऱ्या स्वरानी साऱ्यांना बेधुंद केले होते. लोक अधूनमधून टाळ्या वाजवून त्याच्या कलेला दाद देत होते. या साऱ्या कलाविष्कारांचा आनंद घेऊन आम्ही पुढे गेलो, तोच मुला-मुलींचे कसरतीचे प्रयोग सुरू असलेले दिसले. लोक कुतूहलाने ते पहात होते. टाळ्या वाजवून त्यांच कौतूक करीत होते. आपल्याकडे यात्रातून असली दृश्ये पहायला मिळतात नि लोक त्याचा आनंद लुटतात; असाच कांहीसा प्रकार !

    गोव्याच्या बीचवर विदेशी पर्यटकांना मी पाहिले होते, तसे कांही असभ्य, असंस्कृत प्रकार गोऱ्या युवक-युवतींचे इथेही असतील, हा माझा समज मात्र इथे खोटा ठरला. आम्हा भारतीयांप्रमाणे अंगभर वस्त्रे घातलेले लोक तसे कमीच; पण गोव्याच्या बीचवर विवस्त्र स्थितीत पाहिलेले विदेशी पर्यटक इथे पहायलाही मिळाले नाहीत.

    कॅनडात अनेक स्थळांना भेटी दिल्या; परंतु हॅलिफॅक्स बंदराने मला एक वेगळीच मोहीनी घातली. त्यामुळे कधी विरंगुळा म्हणून, तर कधी स्वाभाविक ओढ म्हणून या बंदरावर आलो. प्रत्येक वेळी मला त्याचे वेगळेपण दिसले......कधी समुद्रात निसर्गाची विविध रूपं, तर कधी किनाऱ्यावर लोकांची कलाप्रदर्शनं !

    बंदराविषयी अधिक जाणून घेण्याची मनात ओढ होतीच. बंदरावरचे माहिती फलक वाचून थोडीफार माहिती मिळालीही; परंतु तेवढ्यावरून मनाचे समाधान झाले नाही. अटलांटिक महासागराच्या नोव्हास्कोशियाच्या किनारपट्टीवरील हे एक नैसर्गिक बंदर. गेल्या अडीचशे वर्षापासून या बंदरातून समुद्र वाहतूक चालू आहे. उत्तर अमेरिका खंडाचे मुख्य प्रवेशद्वार म्हणूनच त्याची ओळख ! जगातील 150 देश या बंदराने जोडले आहेत. ‘इंटरनॅशनल सी फेअरर्स वेल्फेअर अँड असिस्टन्स नेटवर्क' या अंतरराष्ट्रीय संस्थेने ‘2015 पोर्ट ऑफ दी ईयर' पुरस्कार देऊन बंदराचा गौरव केला आहे. यावरूनच या बंदराचे महत्व आमच्या लक्षात आले.

    बंदराच्या एका बाजूला ‘फार्मर्स मार्केट’ आहे. कॅनडातील शेती अद्याप पाहिली नव्हती; किमान इथले कृषी उत्पन्न तरी पहायला मिळेल या आशेने आत गेलो. दोन मजली भव्य इमारत. त्यात शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला, त्यावर प्रक्रीया करून तयार करण्यात आलेले पदार्थ, दूध, दुधापासूनच्या चीजवस्तूं, मासे, चिकन,......आदी. सारे स्टॉल्स व्यवस्थितपणे मांडले ! कांही तयार खाद्यपदार्थही विक्रीसाठी ठेवले होते. साधारनपणे आपल्याकडे असतो तसाच भाजीपाल्याचा प्रकार! कॅबेज, फ्लॉवर, नवलकोल, बिन्स, भेंडी, बटाटे, दोडकी, रताळी.....इत्यादी ! ढबु मिरची आपल्याकडे असते त्यापेक्षा बरीच मोठी नि विविध रंगी, कांदे नि टोमॅटो एवढाले मोठे, पहातच रहावे असे ! आपल्याकडची भाजी मंडई म्हणजे अस्वच्छता नि कुजलेल्या पाल्याचा दुर्गंध! इथे मात्र कमालीची स्वच्छता, शिवाय मार्केटची इमारतच वातानुकूलितत असल्याने भाजीपाला लवकर कुजण्याची शक्यता कमीच. इथे ग्राहकांचीही मोठी गर्दी होती. आम्ही भाजीपाला खरेदी केला, कांही खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला नि विदेशातील एक वेगळा अनुभव घेऊन बाहेर पडलो.

    ***
    कांही अंतरावरील बेडफोर्ड बेस हा सुद्धा हॅलिफॅक्स बंदराचाच एक भाग. दुसऱ्या दिवशी आम्ही फिरण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलो. विशेषत: सायंकाळच्या वेळी इथे पर्यटकांची गर्दी म्हणता येणार नाही; पण बऱ्यापैकी वर्दळ असते. कांही स्थानिक लोकांनी हौस म्हणून लहान नौका विकत घेतल्या आहेत. विशेषत: सुटी दिवशी संध्याकाळच्या वेळी कुटूंबासमवेत ते इथे येतात नि विरंगुळा म्हणून नौका विहार करतात.

    प्रतिवर्षी येथे 1 जुलैला ‘कॅनडा दिन' साजरा केला जातो. या दिवशी या बीचवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन असते. योगायोगाने हे कार्यक्रम पहाण्याची संधी मिळाली. त्यातून कॅनडाच्या संस्कृतीचे दर्शन घडले. त्याहीपेक्षा रात्रीच्या फटाक्यांच्या आतशबाजीने मन वेधून घेतले. स्थानिक लोक रात्रीच्यावेळी आपल्या होड्या घेऊन खाडीच्या मध्यभागी जातात व फटाके, हुक्के......आदींची एकाचवेळी आतशबाजी करतात. रात्रीच्या अंधाराला भेदून टाकणाऱ्या या आतशबाजीमुळे समुद्रावर आकाशगंगा अवतरल्याचा भास होतो.
    ***
    बंदरावरचं दृश्य मनाला आनंद देणारं, सुखविणारं आणि ज्ञानात भर टाकणारं होतं. अर्थात आपण जे पहातो, अनुभवतो त्यातून बरच कांही शिकून जातो; परंतु हॅलिफॅक्स बंदरांत वेगळ असं कांहीस आम्हाला मिळालं. त्यात होत ज्ञान आणि मनोरंजनही; परंतु टायटॅनिक जहाजाच्या दुर्घटनेची कथा ऐकून मन तेवढच भारावून गेलं. वाटलं, बुद्धी-कौशल्याच्या जोरावर माणसानं आकाशाला गवसणी घातली तरी त्याच्या कर्तुत्वालाही कुठेतरी मर्यादा ही आहेच. निसर्गाच्या शक्तीपुढे मानवी बुद्धीकौशल्य अपुरे आहे, हेच खरे !

    पहिल्या भेटीत बंदरावरील मेरिटाईम म्युझियम वेळेअभावी पहायला मिळाले नव्हते. दुसऱ्या वेळी खास यासाठीच आम्ही पुन्हा बंदरावर आलो. प्रवेशिका घेतल्या नि प्रथम खाडीत उभे असलेले जहाज पहावयास गेलो. जहाजाची बांधणी, इंज़ीन, अंतर्गत व्यवस्था पाहून मी थक्कच झालो. जहाज म्हणजे तरंग़ते घरच होते. स्वयंपाक खोली, डायनिंग हॉल, बेडरूम, स्वच्छतागृहे.....आदी व्यवस्था इथेही होती. जहाजाच्या आतील व्यवस्था व रचना पाहायची माझी ही पहिलीच वेळ. त्यामुळेच असेल कदाचित, या साऱ्या गोष्टींचे मला नवलच वाटले. त्यानंतर आम्ही मेरिटाईम म्युझियम पहायला गेलो.

    म्युझियमच्या प्रवेशद्वारावर ठेवलेला आकर्षक लाईट हाऊसचा मॉडेल मन वेधून घेणारा होता. विविध प्रकारची प्रवाशी व मालवाहू जहाजे, लढाऊ जहाजे, वाफेचे इंजिन, पानबुड्या, जुनी शिडाची जहाजे, होड्या, समुद्रप्रवासात वापरावयाचे साहित्य, महासागरात बुडालेल्या जहाजांचे सापडलेले अवशेष.....म्युझियममध्ये ठेवण्यात आले आहेत. सगळ्याच गोष्टी अभ्यासनीय आहेत. पण सर्वापेक्षाही मन हेलावलं ते याच ठिकाणी दाखविण्यात आलेला टायटॅनिक दुर्घटनेचा माहितीपट पाहून!

    हॅलिफॅक्स बंदरापासून कांही अंतरावरच आक्राळविक्राळ रूप धारण केलेल्या महासागरांनं हे मानवनिर्मित अजस्त्र जहाज गिळून टाकलं होतं. शेकडो निष्पाप जीवांना जलसमाधी मिळाली होती. वृत्तपत्रातील हे वृत्त वाचले होते. या दुर्घटनेवर आधारीत चित्रपटही पाहिला होता. त्यावेळी मनाची जशी अवस्था झाली होती, तशीच अवस्था माहितीपट पाहिल्यानंतरही झाली. हॅलिफॅक्स बंदर दुर्घटनाग्रस्तांचे मुख्य शोध केंद्र बनले. इथूनच दुर्घटनाग्रस्त जहाजाच्या शोधासाठी दुसरी दोन जहाजं रवाना करण्यात आली. ओळख न पटलेल्या दुर्घटनेतील सुमारे 200 जणांचा दफनविधी याच शहरात तीन ठिकाणी करण्यात आला. ती स्मशानभूमीही पहाण्याचा योग आला. तिथला माहिती फलक वाचून मनाचा पुन्हा थरकाप झाला. ‘पराधीन आहे जगती पूत्र मानवाचा' हेच खरे !

    -- मनोहर (बी. बी. देसाई)

      October 31, 2020


  • लेडी विथ द लॅम्प

    १८२० साली इटलीमध्ये फ्लाॅरेन्स येथे नाइटिंगेलचा जन्म झाला. वयाच्या ३३व्या वर्षी १८५३ मध्ये झालेल्या क्राइमियन युद्धात जखमी झालेल्या सैनिकांची तिने अहोरात्र शुश्रुषा केली. रात्री हातात दिवा घेऊन जखमी सैनिकांना शांत झोप लागली आहे का? हे ती प्रत्येक खाटेजवळ जाऊन पहात असे. इतकी तिने त्या जखमी सैनिकांची सेवाभावाने काळजी घेतली म्हणून तिला ‘लेडी विथ द लॅम्प’ असे संबोधले जाऊ लागले.

      May 12, 2021


  • एकांकिंका : मला काय त्याचे? (भाग ३)

    रामाने सीतेला सोडलं, रामाने सीतेला सोडलं हा एकच मंत्र आम्ही जपत आहोत. रामाने सीतेचा स्वीकार केला तर त्या युगातल्या लोकांना त्रास झाला आणि रामाने सीतेचा त्याग केला तर ह्या युगातल्या लोकांना त्रास होतोय. अरे मग रामाने करायचं काय? सीतेचा त्याग केल्यानंतर श्रीरामांनी परस्त्री सहवास धरला नाही. उलट रघूकुळातल्या पुरुषांच्या मनात सुद्धा परस्त्री येणार नाही असा आदर्श प्रभूरामचंद्रांनी घालून दिलाय, ह्याकडे कोण पाहत नाही. आणि न्यायाची भाषा न्यायाच्या दलालांनी करु नये.

      August 8, 2013