नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
खिडकीमधून बाहेर बघत होतो. झाडाच्या एका फांदीवर एक कबूतर बसले होते. त्याचे डोळे व चेहरा मला स्पष्ट दिसत होता. डोळे मिटून कसलीही हालचाल न करता ते बराच वेळपर्यन्त तेथे बसले होते. कबूतराचे शांत डोळे मिटून बसणे, मला त्याची त्याच्याच पद्घतीने केलेली ध्यान धारणा, वा समाधीयोग वाटला.
March 21, 2021
कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन कसा मारला गेला, बटला हाऊस एनकाउंटर का घडू शकले, उत्तर प्रदेशातील गुंड श्रीप्रकाश शुक्ला याला मारण्यात यश कसे मिळाले या तीनही प्रश्नांचे उत्तर एकच आहे ते म्हणजे फोन टॅपिंगमुळे हे शक्य झाले. दिल्लीत किमान सहा हजार लोकांचे फोन टॅप होतात, तर महानगरांमध्ये १० ते २० फोन गुप्तचरांच्या किंवा पोलिसांच्या नजरेखाली असतात असे आता स्पष्ट झाले आहे.
June 25, 2022
"अनिरुद्धजी, इंडियन आयडॉल सुरू होणार आहे. त्यांचा 'कास्टिंग प्रोड्यूसर' या पदासाठी शोध सुरू आहे. या संदर्भात मुलाखतीसाठी ताबडतोब अंधेरीला येऊ शकाल का?"
"मी येतो. पण माझे नक्की काम काय असणार आहे ते समजू शकेल का?" मी विचारले.
“सगळी माहिती तुम्हाला देते. तुम्ही लगेच अंधेरीला या." माधवी उत्तरली. या मुलाखतीसाठी मी व्हिजक्राफ्ट या कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. माझी प्रदीर्घ मुलाखत झाली. इंडियन आयडॉलसाठी दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या विभागात मला ऑडिशन्स घ्यायच्या होत्या. या विभागातील ऑडिशन्स गझल गायकाने कराव्या असा आग्रह या स्पर्धेचे पॅनल परीक्षक सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी केल्याने एक गजल गायक म्हणून मला बोलावण्यात आले होते. हे काम तीन महिने चालणार होते. त्यासाठी अनेक वेळा प्रवास करावा लागणार होता. मला हे काम अत्यंत आव्हानात्मक वाटले. यामुळे भारतातील या प्रांतातील उत्तम तरुण गायक-गायिकांची गाणी ऐकण्याची संधी मला मिळणार होती. माझी संमती मी कळवली. पण ते माझ्याबरोबरच इतरही काही जणांशी बोलत होते. त्यामुळे मुलाखतीच्या अनेक फेऱ्या झाल्या. कधी सोनी चॅनलच्या लोकांबरोबर, तर कधी फ्रीमेंटलच्या टीमबरोबर तर कधी व्हिजक्राफ्टच्या टीमबरोबर माझे भेटणे सुरूच होते.
अशा अनेक मुलाखतींनंतर २१ जानेवारी २०१० ला संध्याकाळी सात वाजता मी व्हिजक्राफ्टबरोबर कॉन्ट्रॅक्ट साईन केले आणि २२ जानेवारी २०१० रोजी सकाळी दहाच्या विमानाने मी दिल्लीला रवाना झालो. घटना अत्यंत वेगाने घडत गेल्या. माझ्या अनुपस्थितीत स्वर-मंच ॲकॅडमी प्रियांका आणि माझी विद्यार्थिनी अश्विनी चव्हाण यांनी सांभाळली. इंजिनियर झाल्यानंतर मी कुठेच नोकरी केली नव्हती. स्वतःचेच काम केले होते. 'इंडियन आयडॉल' ही पन्नास कोटी बजेटची मोठी स्पर्धा होती. त्यात सोनीबरोबर अजून दोन मोठ्या कंपन्या काम करत होत्या. त्यामुळे कॉर्पोरेट पद्धतीच्या कामाचा अनुभव मला मिळत होता. या तीन महिन्यात मी ५२ वेळा विमानप्रवास केला. दिल्ली, चंदीगड, कलकत्ता, लखनौ, अलाहाबाद या ठिकाणी अनेक वेळा गेलो. माधवी, पार्थ, पुनीत, परम आणि कॅमेरामन अमोल अशी आमची टीम होती. या काळात सहा हजार गायक-गायिकांच्या ऑडिशन्स मी केल्या. सुप्रसिद्ध संगीतकार अनु मलिक, ख्यातनाम गायिका सुनिधी चौहान यांची अनेकदा भेट झाली. चर्चा झाल्या. आघाडीचा गायक सोनू निगम याच्याबरोबर ऑडिशन घेण्याची संधी दिल्लीला मिळाली. रिऍलिटी शोची नवी दुनिया पहायला मिळाली. बरेच काही नवीन शिकायला मिळाले. आम्ही निवडलेले शंभर कलाकार मुंबईला आले आणि माझे काम संपले. या सर्व मंडळींबरोबरचे ऋणानुबंध मात्र अजूनही टिकून आहेत.
- अनिरुद्ध जोशी
August 13, 2022
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवूनिया ।।
तुळसीहार गळा कासे पितांबर ।
आवडे निरंतर हेचि रुप ।।
मकर कुंडले तळपती श्रवणी ।
कंठी कौस्तुभमणी विराजित ।।
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीने ।।
June 28, 2026
‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर….
March 15, 2018
कविकुलगुरू कालिदास यांचे हे तिसरे,वेगळ्या अर्थाने शेवटचे आणि विश्वातील सर्वात श्रेष्ठ नाटक. या नाटकाचे संविधानक थोडक्यात असे आहे. शिकारीच्या निमित्ताने अरण्यात आलेला राजा दुष्यंत कण्वाश्रमात येतो. इथे त्याला शकुंतला ही कण्व ऋषींची मानलेली कन्या भेटते. परस्परांवर अनुरक्त झालेले ते दोघे गंधर्व पद्धतीने विवाह करतात.
June 11, 2026

December 19, 2021
“माझं आयुष्यात काहीच चांगलं होणार नाहीये. माझं आयुष्य नेहमी असंच सुईच्या टोकावर असणार आहे. केवळ दुःख दुःख आणि दुःख एवढचं माझ्या आयुष्यात लिहिलंय बास दुसरं काही नाही.” हे असे विचार माणसाच्या मनात नेहमी येत असतात.
December 6, 2021
आज ऐन सनासुदीचं आभाळ आलं व्हतं, तळहाताच्या फाॅडावाणी जपलेलं आमच्या रानातलं ह्ये पिवळं सोनं उघड्यावरच व्हतं, आमच्या रानातला समदा कारभार हाकणारं आण्णा आन् दादा ह्येन्ला एकच चिंता पडली. आता सनासुदीमुळं लेबर मिळायचंबी आवघड झालतं मग काय तोंडातला घास पावसात भिजुनी म्हणुनशान घरातल्या समद्या पावण्या रावळ्यांसहीत मी आन माझं भाऊबंद निघालोकी रानात. आमचं दादा आन् आण्णा सकाळपसुनच रानात व्हतं, सोयाबिनिची रास लाल तळवटावर शिग लावुन बसली व्हती. सुतळी गोण्या, चार घमेली, रूपेश, सुजित, युवराज, स्वप्निल ही पोरं गवतावनी झटली आन् समदं सोयाबिन आवघ्या तासाभरात शिलपॅक करून टाकलं. ऊशिराची पेर आसल्यानं मधल्या पावसाच्या रपाट्यातुन आमचं सोयाबिन थोडक्यात वाचलं व्हतं. चार एकरात ईनबिन ईस किंटल सोयाबिन पदरात पडलंय, शेतकऱ्याचं ह्ये पिवळं सोनं बाजारात मातुर कवडीमोल किंमतीनं ईकलं जाणाराय ह्यजी खंत वाटतिया.
रानातलं ह्ये सोयाबिन ईकल्यावर ह्यज्यापसुन सोया दुध, सोया पनिर, सोया टिक्का, सोया चिल्ली, सोया ऑईल आसली डझनभर उत्पादनं तयार व्हत्याली पण ह्ये सोयाबिन मातीत पिरून त्याला कोरड्या आन् वल्या दुष्काळाच्या हाबाड्यातुन वाचवुन, घरातल्या समद्या माणसानी जे जिवाचं पाणी केलंय त्याचा दाम मातुर त्येन्ला मिळणार नाय ह्यजंच वाईट वाटतंय. माझ्या फिरस्तीमुळं मला शेताकडं जास्तीचं लक्ष देता येत नाय पण जितबी कुठं कोणत्याबी ईषयावर बोलायला जातो तवा शेतकऱ्याचं दुःख मांडल्याबिगीर माझं व्याख्यानच पुरं व्हत नाय. शिवटी समदं ईषय रानातल्या मातीत सुरू हुन मातीतच संपत्यात मग त्या मातीला माझ्या बोलण्यातुन आन् लिव्हण्यातुन जित्तं करणं ह्ये तर माझं कर्तव्यच हाय की.
ईस किंटल सोयाबिन पोत्यात भरणं म्हंजी माज्या सारख्या कधीतरी शेतात राबणाऱ्या माणसासाठी जरा ओव्हरलोडंच काम म्हणायचं. उद्या व्याख्यानाला उभा राहील्यावर आंगतला ह्यो दर्द शब्दांच्या रूपानं भाहीर पडलं हे नक्की. आज बऱ्याच दिसानं माझ्या आंगातुन कष्टाचा घाम आलता. गेल्या कित्येक दिसापासुन मोबाईल पेक्षा जास्त वजन कधी उचलण्यात आलं नाय पण आज साठ किलोच्या गोण्या दादांसोबत उचलताना माझ्यातला पैलवान जागा झालता. वडीलांच्या हातात हात दिऊन शेतात राबताना येगळाच आभिमान वाटत व्हता. खरं सांगतु आपल्या बापासोबत काम करण्यासारखा दुसरा आनंद नाय राव. दुपारपसुनचं ह्ये आमचं कष्टाचं काम सांच्याला समदी पुती शेडमदी टाकुनच संपलं. शेततळ्यावर हात पाय तोंड धुवुन आमच्या टॅक्टरवर बसुन ह्यो सगळा परसंग टाईपीत बसलोय. दिवस मावळलाय, रानातली पाखरं घराकडं निघाल्याती म्या बी फोर्डमधी बसलुय, पोटात मरणीची आग पडलीया; कधी एकदा आईच्या हातची चुलीवरची भाकरं म्हशीच्या घट्टबंड्या दुधात चुरून खातुय आसं झालंय.
लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : ३० ऑक्टोंबर २०१६
वेळ : सायंकाळी ५ ते ६:३० वाजता (रानात)
November 2, 2016
मिलिटरीमध्ये लास्ट पोस्ट नावाचा एक उपचार असतो. बिगुलची एक सुंदर धुन वाजते आणि तो दिवस संपतो. ही लास्ट पोस्ट सुरु कशी झाली याची एक हृदय कहाणी आहे.
May 1, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti