नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
भक्ती मग ती कोणावरही असो अगदी मनापासून केली की 'अर्पण' करण्याची वृत्ती दिवसेंदिवस वाढतच जाते. अशा अर्पण केलेल्या भक्तीचा महिमा अगाध असतो. या संदर्भात आचार्य विनोबा भावे यांना त्यांच्या लहानपणी त्यांच्या आईने सांगितलेली गमतीदार गोष्ट पुढीलप्रमाणे आहे... एका गावात एक स्त्री राहात होती. गावात श्रीकृष्णाचे मंदिर होते. त्या मंदिरातील कृष्णाच्या मूर्तीवर या स्त्रीची अपार भक्ती होती. तसे पाहिले तर ती स्त्री रोज मंदिरात जायची असेही नाही. कारण तिला घरातील इतकी कामे असायची की, मंदिरात जायला देखील वेळ मिळायचा नाही तरी पण कृष्णावर तिची फारच भक्ती होती आणि एकदा का तिच्या मनात आले की, ती कोणतीही गोष्ट 'कृष्णार्पण' म्हणून आपल्या लाडक्या देवाला अर्पण करीत असे. दुपारी जेवताना ती आपल्या ताटातील, चतकोर भाकरी घराबाहेर येऊन 'कृष्णार्पण' म्हणून दूर फेकत असे. इकडे त्या कृष्ण मंदिरातील पुजारी जेव्हा देवाला नेवैद्य दाखवीत असे त्यावेळी पंचपक्वान्नाने भरलेल्या ताटात ती चतकोर भाकरीही असे. घरातील सर्वांची जेवणे झाल्यानंतर उष्टे आवरताना ती स्त्री त्यावरून शेणाचा गोळा फिरवायची व घराबाहेर येऊन ' कृष्णार्पण' म्हणून उकिरड्यावर फेकून द्यायची. इकडे तो शेणगोळा नेमका कृष्णाच्या मूर्तीवर येऊन पडायचा. सुरुवातीला पुजाऱ्याला हा व तो नेवैद्याचा प्रकार 'चमत्कार' वाटायचा. मात्र जेव्हा त्याला त्या स्त्रीच्या भक्तीचा महिमा दिसला तेव्हा त्याचाही नाईलाज झाला. असे बरेच दिवस गेले. ती स्त्री एकदा आजारी पडली. आजार खूपच गंभीर झाला. मरण जवळ आले तेव्हा त्या स्त्रीने आपले मरणही 'कृष्णार्पण' केले. त्यासरशी इकडे मंदिरातील कृष्णाच्या मूर्तीचे तुकडे झाले व मूर्ती भंगून खाली पडली. ती स्त्री पुण्यवान होती म्हणून तिला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी विमान आले मात्र ते विमानही तिने 'कृष्णार्पण' केले. त्यासरशी ते विमान त्या कृष्ण मंदिराला जाऊन धडकले व त्याचेही तुकडे झाले. हा सगळा चमत्कार पुजाऱ्याबरोबर गावकरीही पाहात होते. भक्तीचा महिमा किती अगाध असतो हे त्या स्त्रीने त्या सर्वांना दाखवून दिले होते.
April 6, 2017
प्रचंड उलथापालथीतून पृथ्वी निर्माण झाली. पुढे पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली. अप्रगत आदिमानवाचे रुपांतर आज आधुनिक महामानवात झाले. देश, सत्ता, भूखंड इतकेच काय तर ग्रह, ताऱ्यांवरही अभ्यासपूर्ण बोलले जाऊ लागले. आपला देश, आपले राष्ट्र याविषयीचा जाज्वल्य अभिमान जोपासला जाऊ लागला…
May 16, 2024
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सुरेश भट यांच्या सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या या गाण्याबद्दल एक विशेष आठवण सांगितली!!
जरी "सुन्या सुन्या" हे गाणे "उंबरठा" चित्रपटातले असले तरी सुरेश भटांनी ते गाणे तो चित्रपट बनण्याआधीच ते लिहिले होते. जयश्री गडकर आणि बाळ धुरी हे एक चित्रपट बनवत होते आणि त्यांनी बाळासाहेबाना संगीतकार म्हणून निवडले होते. त्यांनीच बाळासाहेबाना सांगीतले कि गीतकार तुम्ही निवडा. बाळासाहेबांनी सुरेश भटांना मुंबईत बोलावून घेतले (ते मुळचे नागपूरचे). त्यांना कथा वगैरे सांगून ४-५ गाणी लिहा असे सांगितले. त्यांना हॉटेल मध्ये राहायला सांगून सगळे आपापल्या घरी गेले. १-२ दिवस गेले पण भट साहेबांनी एक हि गाणे लिहिले नाही. पंडितजींनी त्यांना विचारले तर ते म्हणाले "कुछ सुंझ नाही राहा है तो क्या लिखू!!!"( ते बाळासाहेबांशी नेहमी हिंदीत बोलत असत). ४ दिवस झाले पण नो चेंज !! जयश्री बाई थोड्या अस्वथ होवू लागल्या कारण हॉटेलचे बिल वाढतंय आणि चित्रपटाचे बझेट कमी. पण भट साहेब जैसे थे !! ७ दिवस झाल्यावर जयश्री बाई म्हणाल्या "मला नको तुमचे हे भट साहेब. जावू द्या त्यांना परत नागपूरला " बाळासाहेबांनी हे सांगितल्यावर भट साहेब थोडे नाराज झाले पण म्हणाले "ठीक है , मेरा रेल्वे का टिकट दो, मै निकलता हू "
बाळासाहेबांनी त्यांचे तिकीट काढून आणून दिले रूम खाली केली, जयश्री बाई हॉटेल चे बिल भरू लागल्या तेव्हा ते म्हणाले " आप मत भरो ये मेरा दोस्त है न बाळ, ये भरेगा मेरा बिल ". बाळासाहेबांनी हॉटेलचा बिल भरला आणि ट्याक्षि बोलाविली. टॅक्सीत बसल्यावर भट साहेबांनी अचानक पणे बाळासाहेबांकडे एक कागद मागितला. ते म्हणाले माझ्याकडे नाही. भट साहेब म्हणाले त्या हॉटेल वाल्याकडून एक कागद आण. बाळासाहेबांनी हॉटेलात परत जावून एक जुने बिल आणले त्या बिलाच्या मागे भट साहेबांनी फक्त १५ सेकंदात एक गाणे लिहिले अगदी झरझर … शब्द होते
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की
अजूनही चांद रात् आहे!!
सगळी कडवी लिहून झाल्यावर त्यांना थोडे शांत वाटले. त्यांनी तो कागद बाळासाहेबांकडे दिला. बाळासाहेब ती कविता वाचून स्तब्ध झाले. त्यांनी ती कविता लगेच जयश्री बाईना आणि धुरी साहेबाना दाखविली. जयश्री बाईंच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. त्यांनी १५००० रुपयांचा चेक फाडून भट साहेबांच्या हातात ठेवला पण भट साहेबांनी त्याचा स्वीकार केला नाही. ते म्हणाले "यह मेरी अमानत है और मै मेरी अमानत कभी बेचता नही, रखो आप इसे". भट साहेब तसेच निघून गेले. पुढे जयश्री बाईंचा तो चित्रपट काही बनला नाही आणि ते गाणे बाळासाहेबांकडे राहिले.
कालांतराने जब्बार पटेल यांनी "उंबरठा" हा चित्रपट बनवायला घेतला. त्याचे संगीत बाळासाहेबांकडे दिले आणि गीते दिली भटांना. बाळासाहेबांनी भटांना हे गाणे दाखवले आणि त्यांना विचारले "हे गाणे वापरू या का?" भट साहेब म्हणाले "तुम्हारी इच्छा". ते गाणे मग जब्बार पटेलांना ऐकवले आणि त्यांना पण आवडले. फक्त त्यांनी एका शब्दावर आक्षेप घेतला. शब्द होते...
कळे न मी पाहते कुणाला
कळे न हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
कुणीतरी आरश्यात आहे
पटेलांनी भटांना सांगितले की तो "कुणीतरी" शब्द नको मला कारण ती एक विवाहित स्त्री आहे (चित्रपटाची नायिका). लोक काय म्हणतील?
परत गाडी अडकली. बाळासाहेबांनी २-३ शब्द सुचविले पण त्यावर भट साहेब रागावून म्हणाले "तुम अपना काम करो. मेरे काम मे दखल अंदाजी न करो".
रेकॉर्डिंग ची वेळ आली. भट साहेबाना शब्द सुचेना आणि जब्बार पटेल तयार होईनात. चाल, सेटअप आणि लता दीदी सगळे तयार होते . इतक्यात शांता शेळके लता दीदींना भेटायला स्टुडिओ मध्ये आल्या त्यांनी थोडी चौकशी केल्यावर त्यांना कळले कि एका शब्दाची अडचण आहे. त्या लगेच म्हणाल्या "अरे काय कठीण आहे त्यात. "कुणीतरी " ऐंवजी "तुझे हसू" घल. त्या क्षणाला सुरेश भटांनी "वाह , शांता वाह " असे उदगार काढले. शांता बाईंचे ते शब्द गझलच्या त्या ठेक्यात एकदम चपलख बसले.
कळे न मी पाहते कुणाला
कळे न हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरश्यात आहे
एका टेक मध्ये बाळासाहेबांनी आणि लता दिदींनी ते गाणे रेकॉर्ड केले आणि अजरामर गाण्याचा जन्म झाला .
हे गाणे पहिल्यांदा ऐकल्यावर स्मिता पाटील लता दीदींच्या पायावर धाय मोकलून रड्ल्याची आठवण सुद्धा बाळासाहेबांनी सांगितली.
अशी उत्स्फूर्त कविता करणारा कवी महान, सहज शब्द सुचविणारी ती कवयित्री महान. अजरामर चाल आणि अजरामर आवाज. एका शब्दासाठी गाणे अडवून ठेवणारा तो दिग्दशर्क महान आणि पडदया वरची ती नायिका आणि तो नायक केवळ महान महान आणि महानच ……….
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या !!
https://youtu.be/QyXOuEF8wVw
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
April 17, 2017
एका पावसाळ्यात मी माझ्या घराच्या दारात उभा होतो, मुसळ्धार पाऊस कोसळ्त होता, एक सत्तरीच्या वयाचं वृध्द जोडप पावसात भिजत जात होतं तर पावसापासून वाचण्यासाठी ते आमच्या दारा समोरच्या आडोशाला थांबल, त्यातील आजीबाईना घरी जायची घाई होती त्या आजोबांना भिजत चलण्यासाठी आग्रह करीत होत्या, नेमकी त्याच दिवशी मी एक नवीन छत्री विकत घेतली होती.
July 13, 2014
भिवंडी, चेंबूर, सातारा, बडोदे येथे काही कार्यक्रम करून आयोजक दिनेश केळकर यांच्या रोटरी क्लबसाठी मी दिवाळी पहाटचा कार्यक्रम सादर केला. 'आनंद भारती' या संस्थेच्या शतकपूर्तीनिमित्त 'शंभर संगीतकारांची शंभर गाणी' असा अभिनव कार्यक्रम आखण्यात आला. संगीत संयोजन सुभाष मालेगावकर करणार होता. सलग आठ तास होणाऱ्या या कार्यक्रमाची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेतली जाणार होती. अनेक कलाकारांबरोबर या कार्यक्रमात मी नऊ गाणी गायली. यानंतर आयोजक किशोर कर्नावट यांच्यासाठी एक कार्यक्रम महाबळेश्वरला केला. ठाण्यातील ज्येष्ठ गायिका लीलाताई शेलार यांच्याकडे लहानपणी मी आईबरोबर गाणे शिकायला जात असे. त्यांच्या म्युझिक अॅकॅडमीला पन्नास वर्षे पूर्ण होत होती.
माझे जे दोन शिष्य आज अनेक कार्यक्रम करत आहेत, त्यांचाच कार्यक्रम मी यानिमित्ताने करणार, असे ठरवून लीलाताईंनी माझा आणि शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक सुरेश बापट यांचा कार्यक्रम आयोजित केला. तुमच्या गुरूने तुमचा सन्मान करणे यापेक्षा मोठे जगात काय असू शकते? सुरेश आणि माझ्यासाठी हा कार्यक्रम भावनिक आणि अविस्मरणीय ठरला. डिसेंबरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन ठाण्यामध्ये करण्यात आले. या संमेलनाच्या पूर्वसंध्येला ठाणेकर कलावंतांचा कार्यक्रम नरेन्द्र बेडेकर यांनी सादर केला. या कार्यक्रमात मी गायलो. या संमेलनामध्येच 'इंडियन मॅजिक आय' या कंपनीने झी मराठी चॅनलसाठी 'मराठी संगीत रजनी आयोजित केली. या कार्यक्रमातही मी गाणी सादर केली. माझ्याबरोबर मृदुला दाढे-जोशी, विनायक जोशी, नंदेश उमप, अनघा ढोमसे, अतुल परचुरे आणि सुबोध भावे हे कलाकार होते. माझा रेकॉर्डिस्ट मित्र प्रमोद कैलास या वेळी 'इंडियन मॅजिक आय' या कंपनीत काम करत होता. 'गाऊ विठोबाचे नाम' या माझ्या पहिल्या अल्बमपासून माझी अनेक गाणी त्याने रेकॉर्ड केली होती. या कार्यक्रमाच्या मध्यंतरात प्रमोदने माझी भेट घेतली. “अनिरुद्ध, माझे एक महत्त्वाचे काम तुझ्याकडे आहे. आम्ही लातूर फेस्टिव्हल- २०११ चे आयोजन करत आहोत. यामध्ये एक मोठी सुगम संगीत स्पर्धा घेतली जाणार आहे. यात अंतिम फेरीच्या स्पर्धकांची निवड झाल्यावर त्यांच्यासाठी आम्ही उत्तम गाणे सादर करण्यासाठी चार दिवसांची कार्यशाळा घेणार आहोत. तुझ्याकडे इंडियन आयडॉलसारख्या मोठ्या स्पर्धेचा अनुभव आहे. तेव्हा हे काम तू करावेस आणि या अंतिम स्पर्धेचा परीक्षक म्हणून देखील असावेस असे मला वाटते." प्रमोद म्हणाला. "मी हे काम नक्की करेन प्रमोद !” मी उत्तरलो. एकूण २०१० हे वर्ष मला एक नवीन काम देऊन जात होते.
लातूर फेस्टिव्हल २०११ साठी मी ४ जानेवारी २०११ रोजी लातूरला निघालो. मराठवाड्यात जाण्याची माझी पहिलीच वेळ होती. पण तेथील माणसे अत्यंत प्रेमळ होती. सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन अजय पांडे यांच्याकडे होते. हा माणूस हिंदू, उर्दू आणि मराठी गझलचा निस्सीम चाहता होता. स्वतः ते गझलच्या रचनाही करत. अंतिम फेरीत पोहोचलेल्या अनेक स्पर्धकांना सुगम संगीताचे शिक्षण मिळाले नव्हते. त्यांच्यासाठी ही कार्यशाळा गरजेची होती. सलग चार दिवस मी त्यांच्यावर मेहनत घेतली. त्यांच्यात खूपच फरक पडला आणि तो अंतिम स्पर्धेच्या त्यांच्या गायनातून दिसला. या स्पर्धेचे माझ्याबरोबरचे दुसरे परीक्षक संगीतकार मिलिंद जोशी होते. त्यांनी हा फरक बोलूनही दाखवला. ही सुगम संगीत स्पर्धा आणि एकूणच लातूर फेस्टिव्हल २०११ यशस्वीरीत्या पार पडले.
घरी परतल्यावर 'गीत जगमगाएँ रागोंके' हा शास्त्रीय रागांवर आधारित हिंदी व मराठी गाण्यांचा कार्यक्रम बेडेकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह थोरले बाजीराव पेशवे सभागृहात मी सादर केला. निवेदन भाऊ मराठे यांचे होते. या कार्यक्रमाला रसिकांची उत्तम दाद मिळाली.
यानंतर आमच्या स्वर - मंच म्युझिक अॅकॅडमीच्या सुशोभिकरणाचे काम आम्ही सुरू केले. आचार्य बिल्डींग येथे स्वर-मंचची दुसरी ॲकॅडमी उभी रहात होती. कुशल इंटिरिअर डेकोरेटर गणेश अंबिके यांनी हे काम केले. काही महिन्यातच या ॲकॅडमीचे उद्घाटन आमदार एकनाथ शिंदे आणि अरुण सोनाळकर यांच्या हस्ते झाले.
-अनिरुद्ध जोशी
August 15, 2022
आपण खरेदी केलेल्या प्रत्येक मालाच्या मागे एवढ्या लोकांचा सहभाग असतो आणि या लोकांवर त्यांचे कुटुंब अवलंबून असते. त्यामुळे असल्या मेसेजेस मुळे प्रभावित होऊन समोर दिसणाऱ्या एका गरिबाला मदत करण्याच्या नादात कमी खरेदी करून वरील एवढ्या लोकांच्या दिवाळीच्या सणा वरती आपण पाणी फिरवू शकतो.
September 6, 2022
सात अंकाचे उत्तररामचरितम् हे भवभूतीचे सर्वोत्कृष्ट नाटक आहे. यामध्ये रामराज्यमिषेक नंतरच्या जीवनातील लोकोत्तर चरित्राचे वर्णन केले आहे, जो महावीरचरिताचा उत्तर भाग मानला जातो.
June 11, 2026
लग्नपत्रिका जुळत नाहीत म्ह्णून हल्ली बरीच लग्ने जुळता – जुळता मोडताना दिसतात. इतकेच नव्हे तर प्रेम करून लग्न करण्याच्या निर्णय घेतलेली लग्ने ही लग्नपत्रिका न जुळ्ल्यामुळे मोडताना दिसतात तेंव्हा मनात एक विनोदी विचार न राहून येतो तो म्ह्णजे हल्लीच्या तरूण – तरूणींनी एकमेकांच्या लग्नपत्रिका पाहूनच प्रेमात पडायला हवं ! काही महाभागानी हा प्रयोग प्रत्यक्षात केल्याचे ही माझ्या पाहण्यात आहे. हल्ली समाजात घटस्फोटाचे आणि विवाहबाहय अनैतिक संबंध आणि कौटूंबिक कलहाचे प्रमाण वाढत आहे.
July 25, 2014
सुखी माणसाचा सदरा मिळणे म्हणजे परीस मिळण्यासारखंच असतं..सुखी माणसाचा सदरा ही एक सुंदर कल्पना असल्याचे सर्वांनीच मान्य केले असले तरी त्या सदऱ्याचा शोध सुरूच असतो, निरंतर सुरुच राहाणार..
September 6, 2016
एखाद्याच गोष्टीचा सतत विचार केला की बुद्धी म्हणजेच विचार कोंडतात, तिथेच घुटमळत रहातात.
October 3, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti