(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वेशभूषा आगळी वेगळी (सुमंत उवाच – ६५)

    सुमंत जयंत परचुरे. 

    परकीय वेशभूषा आत्मसात करावी जरूर, पण त्याने आपल्या संस्कृतीला बाधा पोचत नाही ना याचा विचार व्हायला हवा.

      October 26, 2021


  • अमेरिकन गाठुडं – ७

    ऑस्टिनच्या वास्तव्यात मी मॉल आणि दुकान पहिली. पैकी वॉलमार्ट आणि कोस्टको हे मॉल भव्य. वॉलमार्ट तर जगातलं प्रथम क्रमांकावरील रिटेलर आणि कॉस्टको नंबर दोन वर! कॉस्टको हे होलसेल मल्टिनॅशनल चैन! यांचे टाचण्या पिना पासून पेट्रोल पम्पा पर्यंत प्रॉडक्ट आहेत. कॉस्टकोत किमती मला तरी कमी वाटल्या, पण लॉट्स मध्ये घेतले तर. व्हरायटी वॉलमार्टच्या मानाने कमीच होती.

      November 22, 2020


  • सर’ – हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो !!

    गुलज़ार महोदय “खामोशी” त म्हणून गेले- ” प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो I” लताने आपल्या तलम आवाजात त्याचं भरजरी सोनं केलं. पण हे आख्ख गाणं चक्क एक नितांतसुंदर, हळुवार चित्रपट बनून पडद्यावर येईल हे त्याकाळी गुलज़ार /लता /वहिदा /हेमंतकुमार यांच्या दूरवरच्या स्वप्नातही आलं नसावं.

      January 25, 2021


  • ई-साहित्य संमेलन – मनोगत

    रेणुका आर्ट खुले ई-साहित्य संमेलन ऑनलाईनचे हे तिसरे वर्ष आहे. पहिल्या साहित्य संमेलनात माझा सहभाग लक्षनिय होता पण दुसर्‍या साहित्य संमेलनात मनात असतानाही सहभागी होणे मला शक्य झाले नव्हते. पण तेंव्हाच तिसर्‍या साहित्य संमेलनात आपला सहभाग असायलाच हवा असं मी मनाशी पक्क ठरवलं होत. त्यामुळे या तिसर्‍या ई-साहित्य संमेलनातील काही उपक्रमात मी सहभागी झालो. खरं म्ह्णजे माझी व्यक्तीशः सर्वच उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा होती पण नाही शक्य झाले.

    ई-साहित्य संमेलन ऑनलाईन सारख्या संमेलनांची मराठी साहित्याची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आवश्यकता आहे. हे संमेलन आयोजित करणे हे खरं म्ह्णजे खूपच धाडसाच काम आहे ते धाडस आसावरीजी आणि आयोजक आनंदाने करतात म्ह्णून त्यांचे आभारच मानायला हवे. या ई-साहित्य संमेलन ऑनलाईनच्या माध्यमातून मराठी साहित्याची चळवळ वाढावी म्हणून मोलाचा हातभार लागत आहे. या ई-साहित्य संमेलन ऑनलाईन उपक्रमामुळे मला व्यक्तीशः माझा साहित्यिक दर्जा ठरविण्यासाठी मदतच होते कारण आपल्या साहित्यावरील नामवंत लेखक कवींनी केलेली समिक्षा आपल्याला वाचायला मिळते त्यसोबत आपल्या साहित्यातील त्रूटी ही आपल्या लक्षात येण्यास मदत होते.

    प्रत्यक्ष कोणत्याही साहित्य संमेलनाला उपस्थित राहणे मला कधीच शक्य झाले नाही पण या साहित्य संमेलनामुळे अप्रत्यक्ष का होईना तीन साहित्य संमेलनाला माझी हजेरी लागली. बर्‍याचदा कवी आणि लेखकांना तेच ते प्रकाराचे साहित्य लिहून बर्‍याचदा कंटाळा आलेला असतो या साहित्य संमेलनामुळे नवीन काही तरी लिहण्यास साहित्यिकांना प्रेरणा मिळते निदान तसा प्रयत्न तरी करण्याची इच्छा निर्माण होते.

    खरं म्ह्णजे ई-साहित्य संमेलन ऑनलाईनचे हे व्यासपीठ नवोदित साहित्यिकांसाठी फारच महत्वाचे व्यासपीठ ठरायला हवे होते पण दुदैवाने ते तसे ठरताना दिसत नाही कारण या ई-साहित्य संमेलन ऑनलाईन मध्ये सहभागी झालेले सारेच लेखक कवी बर्‍यापैकी नावाजलेलेच आहेत. या अशा साहित्य संमेलनातून नवोदितांचा सहभाग अपेक्षित असतो तो दिसला नाही याचा अर्थ या साहित्य संमेलनाची प्रसिद्धी कमी पडली असं म्ह्णता येईल पण त्यासाठी आयोजक नाहीत तर तांत्रिक आणि आर्थिक अडचणी जबाबदार आहेत हे लक्षात घ्यायलाच हवे. आयोजकांनी हे ई-साहित्य संमेलन ऑनलाईनचे आयोजन करून एक प्रकारे साहित्य सेवाच केलेली आहे. त्यामुळे सहभागी साहित्यिकांनी त्यांचे आभार मानायलाच हवेत पण यापुढेही हा उपक्रम सुरू राहावा म्ह्णून ज्याला जी मदत करणे शक्य आहे त्याने ती करायलाच हवी.

    या संमेलनात फक्त आपला सहभाग नोंदवला म्ह्णजे आपली जबाबदारी संपत नाही तर ती उलट वाढते कारण मराठी साहित्यासाठी काही तरी करण्यासाठी आपण तेंव्हा एक पाऊल पुढे टाकलेले असते. आजच्या आघाडीच्या लेखकांना ही संगणकाचा वापर तितकासा सफाईदापणे करता येत नाही त्यामुळे ही बरेच साहित्यिक या उपक्रमात सहभागी होण्याचे ठाळत असावेत तर मला व्यक्तीशः असं वाटत की त्यांच साहित्य इतर कोणाच्याही मदतीने या ई-साहित्य संमेलन ऑनलाईनच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहविणे शक्य असायला हवं होतं.

    या उपक्रमात साहभागी होणार्‍यांची संख्या वाढायला हवी होती खास करून वाचकांची पण ते होताना दिसत नाही. वाचकांपर्यत पोहचण्यासाठी या माध्यमातून एक स्वतंत्र संकेतस्थळ तयार केल्यास बर्‍याच गोष्टी सोप्प्या होतील. ते शक्य होईल तेंव्हा होईल पण तोपर्यत हा ई-साहित्य संमेलन ऑनलाईनचे चा उपक्रम सुरू राहायलाच हवा...

    -- निलेश बामणे

      February 25, 2016


  • वसुबारस’ची कहाणी

    आटपाट नगर होतं. तिथं एक कुणब्याची म्हातारी होती, तिला एक सून होती. गाई-गुरं होती. ढोरं म्हशी होत्या. गव्हाळी-मुगाळी वासरं होती. एके दिवशी काय झालं, आश्विनमास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी सकाळी म्हातारी उठली, शेतावर जाऊ लागली.

      November 25, 2025


  • एक परीस स्पर्श ( भाग – ३५ )

    विजय कोकणातील त्याच्या गावी जाऊन माघारी आला तरी त्याचा पाय काही दुखायला थांबला नव्हता. विजयला आता त्याच्या पायाची खूपच चिंता वाटू लागली होती. कारण अजूनही त्याला पाय खेचत चालावे लागत होते आणि पायऱ्या चढता उतरताना प्रचंड त्रास होत होता. त्याने इंटरनेटवर त्याच्या गुरूंचे त्याचे या महिन्याचे राशी भविष्य पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की येणारा काळ जरी त्याच्यासाठी संघर्षाचा असला तरी यश घेऊन येणारा आहे. त्यामुळे विजय थोडा आनंदातच होता. त्यात तो जो नवीन उद्योग सुरू करण्याच्या विचार करत होता म्हणजे! त्याची छोट्या तत्वावर त्याने सुरुवातही केली होती.

      July 29, 2022


  • अज्ञानात सुख असते…

    त्याच्या परिणाम स्वरूप आपल्यावर आपल्या क्षमतेपेक्षा अधिक काम करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यार विनाकारणच येऊन पडते त्या ओझ्याखाली दबल्यावर ही आपण नकळ्त म्ह्णून जातो अज्ञानात सुख असते. अज्ञानात सुख असतं हे किती ही खरं असल तरी अज्ञानात सुख मानणारे फक्त जन्माला येतात

      July 15, 2014


  • बंद दरवाजा

    फ्लैटमधे राहणाऱ्या शहरी उच्चमध्यम वर्गीय लोकांचे जीवन, खोटा देखावा, प्रेमाचा अभाव, खंडित परिवार व एकटेपण – प्रेमाचा वसंत फुलणार कसा???

      September 16, 2010


  • आई (कथा)

    वर्गात प्रतिभा अतिशय हुशार  असण्याबरोबरच वकृत्व आणि अभिनय याचीही तिला योग्य जाण होती. शाळेत होणाऱ्या वत्कृत्व  आणि नाटयस्पर्धेत ती नेहमीच भाग घेत असे त्यात तिला बक्षीसही मिळत असे आपल्या यशाचे श्रेय प्रतिभा नेहमीच आपल्या आईला देत असे . ते देताना  ती म्हणे ” माझ्या आईने मला नेहमीच मी मुलगी असूनही एखादया मुलाप्रमाणे स्वतंत्र दिलं !

      February 15, 2021


  • गर्भातून ज्ञान विकास

    मानसीने नुकतेच दोन वर्ष पूर्ण केले होते. तिच्या सर्व हालचाली मनास खूप प्रसन्नता देत होत्या. तिचे दुडु दुडु पळणे, पडणे, रडणे, हट्ट करणे, कोणत्याही वस्तूला बघणे, हाताळणे, तोडफोड करणे सारे काही तिच्या वाढीचा वेग दर्शवीत होते. मला मात्र एका गोष्टीचे सतत आश्चर्य वाटत होते. हे तिच्या बोबडे बोलण्याचे. ती पूर्ण वाक्ये उच्चारीत होती व भावना तोडक्या मोडक्या शब्दांत व्यक्त करीत होती. बरेच ज्ञान, माहितीही तिने सभोवतालचा परिसर, ह्याच्या संपर्कामधून ग्रहण केली होती. जे ती बघे, ऐके तेच ती पुनुरुच्चारीत असे. हे सारे सामान्य होत. मात्र एक गोष्ट तिव्रतेने जाणवली. ती म्हणजे तिचे टेबल टेनीस खेळावरील प्रेम, ज्ञान व आवड. ते ती सतत व्यक्त करीत असे. समजण्याच्याच काळात तिने त्या खेळाबद्दल बरीच माहिती संकलीत केल्याचे आढळून आले. तसा तीचा दर दिवशी टे.टे. चा संपर्क नव्हता तरी देखील. मात्र एक सत्य होते की तीची आई टे.टे. ची खेळाडू champion होती. तिने जिल्हा, प्रांत यातसुद्धा यश मिळवून देशस्थरावर गेली होती. टे.टे. हा विषय तिच्या रक्तात, मेंदूत पक्यापद्धतीने स्थित व स्थीर झालेला होता. मात्र आजकाल इतर कार्यबाहुल्यांमुळे तिचे टे.टे.कडे फारसे लक्ष नव्हते. तसा तो विषय बाजूस पडला होता. तरी त्याविषय बद्दल मानसीमध्ये निर्माण होणारी आवड attachment मन वेधून घेत होती.

    आज अचानक एका शास्त्रिय मासिकांत वाचण्यात आले. नुकत्याच डेन्मार्क येथील वैद्यकीय शास्त्रज्ञाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी सहा हजारपेक्षा जास्त गर्भवती स्त्रिया व नवजात बालके यांचा सखोल अभ्यास व सर्वेक्षण केले होते. बालकामध्ये गर्भात असताना, होणाऱ्या वाढीच्या वेळीच त्याच्या मेंदूची वाढ होत असते. मेंदूचे कार्य हे गर्भात असतानाच सुरु होते. आईकडून येणाऱ्या प्रत्येक चेतना, या त्या नव बालकाच्या मेंदूत देखील साठवणूक होत जातात. आईला बाह्यांगातून अर्थात सभोवताल परिसर येथून ज्या चेतना प्राप्त होतात, त्या जसे आई आपल्या मेंदूत साठविते, त्याचप्रमाणे त्याचवेळी आईच्या मेंदूतून परावर्तीत होत त्या चेतना नव बालकांच्या मेंदूतही साठवणूक करतात. कंप्यूटरच्या भाषेत बोलावयाचे, तर आईच्या कंप्यूटर मेंदूत डाऊनलोड झालेले सर्व विचार अर्थात चेतना बालकाच्याही मेंदूत transfer होऊन तेथेही डाऊनलोड होतात, फिक्स होतात. हे कायम स्वरुपी असतात. मुलाच्या जन्मानंतर त्याच्यात वाढत जाणाऱ्या समजानंतर, भाषेनंतर त्याला पुन्हा display करता येतात. व हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे.

    अनेक अनेक वर्षापूर्वी महाभारत काळातील अभिमन्यूची कथा जीला पुराण कथा म्हणून संबोधीले गेले होते. अभिमन्यू गर्भात असताना श्री कृष्णाकडून सुभेद्रेने ऐकलेले चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान, हे त्यालाही प्राप्त झाले होते. त्याच्या त्या ज्ञानाचा उपयोग त्याने युद्धासमयी केला. अर्थात ते ज्ञान त्याला पूर्णत: न प्राप्त झाल्याने, त्याचा अंत झाला. कितीतरी कथा ज्या भारतीय संस्कृतीत महाभारत, रामायण इत्यादी ग्रंथात नमुद केलेल्या आहेत व ज्यांना भाकड कथा म्हणून उपहासले गेले. त्याच कथांचे सूत्र, संकल्पना आज विज्ञान सत्त्यतेच्या इमारतीमध्ये प्रदर्शित करत आहे. त्याचा सन्मान, Credit घेत आहेत. पूर्वजांनी आपल्या ज्ञानाने मिळालेल्या अनेक गोष्टी, जसे अस्त्र, शस्त्र, विमान (पुष्पक) आकाशातील भ्रमण, दिव्यदृष्टी, दिव्य श्रवण दृष्टी, अदृश्य होण्याची संकल्पना इत्यादी या एकापाठोपाठ विज्ञान शास्त्राच्या परिभाषेत सत्याकडे झुकत आहेत. आपण आपणास विसरतो व परकिय आपणास सदा श्रेष्ठ वाटत गेले. हे सारे निराशामय वाटते. साठवणूक, विकास व उपयोगींना, असे त्रिकोणातील ही तीन अंगे आहेत. चेतना जर मिळाली तरच साठवणूकीला प्रारंभ होईल. त्यामुळे चेतना ही महत्त्वाची वाटते. वैद्यकीय शास्त्र त्याचमुळे चेतनेची महती गाते. त्याचवेळा शिक्षण क्षेत्रातील मानसशास्त्र त्या चेतनेचे तत्त्वज्ञान मान्य करीत, योग्य व अयोग्य चेतनेचा उहापोह करते. बालकाचा विकास हा नेहमी योग्य अशाच चेतनेमुळे झाला पाहिजे. ज्याला सुसंस्कार म्हणता येईल. चेतनेमुळे मानसिक तणाव ग्रस्तता त्याचवेळी निर्माण होईल, जेव्हा त्या चेतना अहितकारक, असंस्कारीकता किंवा विकसीत होणाऱ्या मेंदूला तो विचार ग्रहण शक्तीच्या मर्यादेबाहेरचा असेल. समजण्याच्या युक्तीच्या बाहेरचा असेल. बालक तो विचार साठवताना एक प्रकारे तणावग्रस्त होईल. त्याला समज येईपर्यंत त्याचे ग्रहण होणार नाही. याच कारणाने हे सर्व शिक्षण क्षेत्र सूचविते की मेंदूची काही अंगे विकसीत होईपर्यंत शिक्षण ही संकल्पना नको. साधारणपणे पाच वर्षे, मुलाना शालेय शिक्षण न देता, त्याच्या आपल्या बुद्धीला परिस्थिती व वातावरणात विकसीत होवू देते. केवळ बाह्य चेतनामय संस्कार त्याच्या पंचेद्रीयावर प्रक्रीया करीत राहतात. साठवणूक होते. हेच तर ज्ञानप्राप्तीचे प्राथमिक द्वार असते. त्याचा प्रथम मुळ असतो निसर्ग. तो मातृत्वाच्या माध्यमातून हे साध्य करतो. विकसीत करतो. बालकाला अवलंबीत्वाच्या धारणेपासून स्वतंत्र जीवन जगण्यासाठी, कला शिकवत असतो. जी पुढे उत्पतीपासून स्थितीकडे व शेवटी लय या संकल्पनेत अंत पावते. मानसीची प्रथम ज्ञान प्राप्ती जरी गर्भातून सुरु झालेली दिसली, तरी तिला तो मार्ग बदलावाच लागतो व ज्ञान वृद्धी तिची तिलाच करावी लागते. तेच तिचे भावी व्यक्तीमत्व ठरेल.

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      September 20, 2017