महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
नेहमीप्रमाणे उकडीचा मोदक करावा. पीठ जरा जास्त घ्यावे. मोदक बंद केल्यावर वर थोडे पीठ राहायला हवे. वरच्या पिठाला हाताने निरांजनाच्या वरच्या भागाचा आकार द्यावा व त्यात तूप व वात घालून दिवा लावावा.
September 5, 2016
साहित्य:- १ मोठे वांगे, १ झुकिनी, ३ मध्यम टोमॅटो, २ मध्यम कांदे, लाल, पिवळी, हिरवी ढोबळी मिरची लहान असल्यास प्रत्येकी एक मोठी असल्यास प्रत्येकी अर्धी, लसणीच्या पाकळ्या २ ते ३, १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल,१ टीस्पून विनेगर किवा लिंबाचा रस, २ टेबलस्पून हर्ब्ज दे प्रोविन्स. रोझमेरी, बेसललिव्ज पावडर, ओरेगानो, फेनेल (बडिशेप), दालचिनी पावडर असं सगळंकिवा ह्यातलं जे मिळेल ते थोडं थोडं घेऊन साधारण २ टेबलस्पून होतील एवढं घेऊन एकत्र करा आणि त्यात एक तमालपत्र घाला. मीठ आणि मिरपूड चवीनुसार.
कृती:- सर्व भाज्यांचे चौकोनी मोठे तुकडे करा. लसूण बारीक चिरा. एका पसरट पॅन किवा कढई मध्ये ऑलिव ऑइल गरम करा. त्यात वांगे, झुकिनी व बेल पेपर्सचे तुकडे घाला व साधारण ५ मिनिटे परता. तुकडे गोल्डन व्हायला हवेत पण पूर्ण शिजायला नकोत, क्रंची हवेत. मग हे वेगळ्या वाडग्यामध्ये काढून ठेवा. आता पॅनमध्ये कांदा, लसूण आणि हर्ब्ज दे प्रोविन्स घाला,तमालपत्र घाला आणि कांदा गोल्डन होईपर्यंत परता. मग त्यात टोमॅटो घाला आणि २-३ मिनिटे परता.
आता ह्यात वाडग्यात काढून ठेवलेले वांगे+झुकिनी+बेलपेपर्स घाला. मीठ व मिरपूड घाला. लिंबाचा रस किवा विनेगार घाला. आता एअर फ्रायर २०० अंश से वर प्रिहिट करा. सर्व भाज्या व मसाले एकत्र केलेले बास्केट त्यात ठेवा. १० मि. एअर फ्राय करा. मग बास्केट बाहेर काढून भाज्या ढवळून घ्या थोडेसे ऑलिव्ह ऑइल ब्रश करा व परत ५ ते ६ मिनिटे एअर फ्राय करा. २ ते ३ मिनिटे फ्रायर मध्येच भाजी राहू द्या. नंतर सर्व्ह करा. गरम रटाटौलीचा अस्वाद भात, ब्रेड, न्यूड्ल्स तुम्हाला हवे असेल त्याबरोबर घ्या. एअर फ्रायर मधील रटाटौली मस्त क्रंची होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
August 12, 2018
साहित्य:- मोठा पेरू १ नग, तेल, मोहरी, हिंग, लाल मिरच्यांचे तुकडे,हळद,मीठ, दाण्याचे कूट, मोहरीची डाळ,कोथिंबीर, मीठ.
कृती:- पेरूच्या फोडी कराव्यात. पातेलीत तेल तापवून त्यावर मोहरी, हिंग, लाल मिरच्यांचे तुकडे आणि हळद घालून फोडणी करावी. त्यावर पेरूचे तुकडे, मीठ, दाण्याचे कूट व पाणी घालून झाकण ठेवून एक वाफ द्यावी. नंतर सर्व ढवळून फोडी शिजवाव्यात. मिक्सरमध्ये मोहरीची डाळ थोडेसे पाणी घालून ‘‘चढवावी’’. ही फेसलेली मोहरी या भाजीला घालावी व पाणी आटत आले की भाजी उतरवावी. बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने सजवावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२०१७३३
January 20, 2017
साहित्य :- 2 वाट्या नाचणीचे पीठ, 2 वाट्या अगदी बारीक चिरलेला गूळ, 4-5 वेलदोड्यांची पूड, 1 मोठा चमचा देशी तीळ, 2 मोठे चमचे साजूक तूप.
कृती :- प्रथम तुपावर नाचणीचे पीठ भाजून घ्यावे. पीठ भाजत आले, की त्यातच तीळ टाकून जरा भाजावेत. मग पातेले खाली उतरवून मिश्रण गरम आहे, तोवरच त्यात गूळ व वेलची-पूड घालून हलवावे. तूप लावलेल्या "ट्रे'मध्ये हे गरमागरम मिश्रण ओतून लगेच 5 मिनिटांत वड्या कापाव्यात. या वड्या करताना पाक करण्याची जरुरी नाही. फक्त गूळ मात्र छान बारीक चिरलेला हवा. खूप दिवस टिकतात.
August 9, 2018
पालक पार्सल – Recipe
September 11, 2026
साहित्य : एक वाटी मोड आलेली मेथी, दोन मोठे कांदे बारीक चिरून, 7-8 लसूण पाकळ्या, 3-4 हिरव्या मिरच्या, फोडणीचे साहित्य, तेल, मीठ, गूळ, एक वाटी खवलेले ओले खोबरे, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : हिंग-मोहरीची फोडणी करून त्यात लसूण पाकळ्या घाला. लसूण लालसर झाला की त्यात मिरचीचे तुकडे, हळद व मोड आलेली मेथी घालून परता. नंतर बारीक चिरलेला कांदा घालून पुन्हा परता. कांदा छान गुलाबी झाला, की त्यात चवीनुसार मीठ, गूळ घाला. नंतर ओले खोबरे व कोथिंबीर घालून थोडेसे परता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
January 18, 2017
साहित्य: १ कप होल ग्रेन पेने पास्ता, १/४ कप लाल भोपळी मिरची, छोटे चौकोनी तुकडे, १/४ कप हिरवी भोपळी मिरची, छोटे चौकोनी तुकडे
१/४ टिस्पून लाल तिखट, ३ टेस्पून ऑलिव ऑईल, १ टेस्पून पार्मिजान चिझ, किसलेले, २ चिमूट ओरेगानो, आवडीप्रमाणे रेड चिली फ्लेक्स
पास्ता शिजवण्यासाठी मिठ, ३ टेस्पून पास्ता सॉस.
कृती:
१) एका मोठ्या खोल पातेल्यात ५ ते ६ कप पाणी उकळवावे. त्यात मीठ घालून ढवळावे. पाणी उकळायला लागले कि त्यात १ कप पास्ता घालून १५ ते २० मिनीटे किंवा पाकिटावर दिलेल्या वेळेनुसार शिजवून घ्यावा. शिजवताना झाकण ठेवू नये तसेच मोठ्या आचेवर शिजवावा. त्यामुळे पाणी उतू जाण्याची शक्यता असते म्हणून एकदम खोलगट आणि मोठे पातेले घ्या. तळाला चिकटू नये म्हणून मधेमधे तळापासून ढवळावे.
२) पास्ता शिजला कि एका चाळणीत काढून घ्यावा आणि त्यावर थंड पाणी घालावे. सर्व पाणी निघून जाऊ द्यावे.
३) पॅनमध्ये १ टिस्पून तेल गरम करावे, त्यात भोपळी मिरची घालून १/२ ते १ मिनीट परतावे (टीप २). चिमूटभर ओरेगानो, लाल तिखट आणि मिठ घालावे. लगेच ३ टेस्पून पास्ता सॉस घालून लगेच शिजलेला पास्ता घालावा. गॅस मंद ठेवून १/२ ते १ मिनीट निट मिक्स करावे. वाटल्यास पास्ता सॉस वाढवावा. लगेच सर्व्हींग बोलमध्ये काढावे.
सर्व्ह करताना १ चिमूटभर ड्राय ओरेगानो चुरून भुरभूरावा. तसेच पार्मिजान चिझ घालावे आणि पास्ता सर्व्ह करावा.
टीप:
१) रेड चिली फ्लेक्स गरज वाटल्यास तिखटपणासाठी आवडीप्रमाणे घ्यावे.
२) भोपळी मिरची ३० ते ४० % शिजवावी पूर्ण शिजवू नये. भोपळी मिरचीचे तुकडे थोडे करकरीत राहिलेलेच चांगले लागतात.
३) पास्ता शिजताना जर पाणी कमी खुप कमी झाले असेल तर गरजेपुरते पाणी वाढवावे.
July 19, 2018
चिकन स्वच्छ धुवुन अख्या चिकनला सुरीने चिरा द्याव्यात. लसुन आले वाटुन घ्यावे. त्यात लिंबाचा रस घालुन हलवावे. वाटण, दही व हळद, तिखट सर्व मसाला लावून चिकन चार तास तसेच मुरत ठेवावे. हे मुरलेले चिकन ओव्हनमध्ये किंवा गॅस तंदूरमध्ये भाजावे. कोळशाच्या शेगडीवरही सळईत चिकन घालुन भाजता येते. साधारणपणे २० मिनिटात चिकन सगळीकड़ुन बाजू बदलत भाजावे.
June 16, 2017
साहित्य : दोन वाटी साबुदाणा, २/३ उकडलेले बटाटे, तिखट, मीठ, शिंगाडा पीठ दीड वाटी, चहाचा दीड चमचा ओल्या मिरच्याचे वाटण,
जिरे भाजून कुटून दोन चिमटी, तूप.
कृती : साबुदाणा आधीच चार तास भिजवून ठेवा. मऊसर भिजवा. एका पसरट भांड्यात साबुदाणा, बटाटे, जिरेपुड, मिरची वाटण, मीठ घालून चांगले मळून मिश्रण एकजीव करा. शिंगाडा पिठात तिखट-मीठ घालून दाटसर (भज्यासाठी नेहमी भिजवतो तसे) भिजवून घ्या. कढईत तूप गरम करा. मळलेल्या गोळ्याचे लहान-लहान गोळे घेऊन कालवून ठेवलेल्या शिंगाडा पिठात बुडवा. गरम तुपात टाकून खरपूस तळा. उपवासाच्या चटणी बरोबर गरम असतानाच खा.
July 30, 2018
रवा आणि मैदा चाळणीने चाळून एकत्र करावा. आता २-३ चमचे गरम तूप आणि दुधाचे मोहन घालून एकत्र करून ५-६ तास किंवा रात्रभर तसाच झाकून ठेवावा. दुसऱ्या दिवशी हे मिश्रण बारीक चाळणीवर चाळून घ्यावे.
June 8, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti