साहित्य: १५० ग्रॅम बारीक खिमा, अर्धा कप पातीचा फक्त कांदा बारीक चिरून, (पात वेगळी चिरून ठेवावी), अर्धा टी स्पून किसलेले आले, २ टी स्पून सोयासॉस, २ टी स्पून शेरी, ६ कप चिकन स्टॉक, पाव टी स्पून आजिनोमोटो, कॉर्नफ्लोअर (कृतीप्रमाणे प्रमाण घ्यावे), मीठ, मिरेपूड चवीप्रमाणे.
कृती: वेळ: ४० मिनिटे खिमा स्वच्छ धुऊन घ्यावा, पाणी काढून कोरडा करावा. त्यात आले, एक टी स्पून शेरी, एक टी स्पून सोयासॉस व बारीक चिरलेला कांदा, मीठ, मिरेपूड घालून मळावे. मावेल इतका कॉर्नफ्लोअर घालून लहान लहान गोटीएवढे गोळे करावेत. गोळे करताना हाताला कॉर्नफ्लोअर लावावे.
चिकन स्टॉक उकळत ठेवावा. त्यात खिम्याचे गोळे सोडावेत व मंद गॅसवर १० मिनिटे शिजू द्यावे. नंतर मीठ, मिरेपूड, आजिनोमोटो, सोयासॉस व शेरी घालावी. पुन्हा १० मिनिटे मंद गॅसवर झाकण ठेऊन शिजत ठेवावे. एक टी स्पून कॉर्नफ्लोअरची पेस्ट करून लावावी. २-३ उकळ्या आणाव्यात. शेवटी चिरलेली कांद्याची पात घालावी आणि गॅस बंद करावा. गरमागरम सूप प्यायला द्यावे.