(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • p-978-paper-dosa

    पेपर डोसा

    १) प्रथम तांदूळ व डाळी धुऊन वेगवेगळे भिजत टाकावे . पोहेसुध्दा भिजत टाकावेत .
    २) आठ तासानंतर ते मिक्सरमधून बारीक करून घ्यावे व एकत्र करावे . त्यात मीठ व दही मिसळून ठेवावे व पीठ आंबण्यासाठी ठेवावे .

      March 6, 2017


  • भानोरे

    साहित्य: भाजलेल्या चण्याच्या डाळीचा भरडा (जाडसर रवा) १ वाटी, नारळाचे दूध, जाडसर दिड वाटी लांब कापलेली कोबी अन् बारीक चिरलेला फ्लॉवर, दोन्ही मिळून १ वाटी, हवे असल्यास भाजलेल्या सोड्यांचा भुगा पाव वाटी, आले लसूण, कोथिंबीर, मिरची पेस्ट, एक चहाचा चमचा मीठ, २ अंडी, तेल पाव वाटी, जिरा धणा पावडर, पाव चमचा (चहाचा) हिंग, मोहरी, जिरे, तीळ ( २ चमचे तेल मिश्रणात घालण्यासाठी)

    कृती : अंडी वगळून बाकी सर्व साहित्य एकत्रित करुन चांगले मिसळून घ्यावे. अंडी फेटून त्यातील पाव भाग मिश्रणात घालावा (सोडा घालू नये) पितळेचा किंवा तांब्याच्या जाड बुडाच्या भांड्यात तापवून तेल घालावे. तापवलेल्या तेलात फोडणीला हिंग, मोहरी, जिरे, तीळ घालावे. तडतडू लागले की मिश्रण ओतावे. मिश्रण ढवळू नये. मिश्रण घट्ट होत आले कि ते भांडे आधीच तापवून घेतलेल्या ओव्हनमध्ये ठेवावे (३५०° ते ३७५° ) ३० ते ४० मिनीटे साधारण निम्मा वेळ झाल्यावर (१५ ते २० मिनीटे) हळद, मीठ घालून फेलेले अंडे होत असलेल्या भानोऱ्यावर ओतावे व पुन्हा भानोरे १५ ते २० मिनीटे बेक करावे. छान फुगुन येते व हलके होते.

    हळदीमुळे अंड्याचा छान रंग येतो व भानोरे खुमासदार लागते.

    -वैशाली विनय राजे

    ५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

      September 10, 2026


  • p-2348-katachi-amti

    कटाची आमटी

    पुरणपोळी म्हटले की कटाची आमटी पाहिजेच. कट म्हणजे पुरण शिजल्यावर जास्तीचे काढलेले पाणी होय. कटाची आमटी ही एक अप्रतिम महाराष्ट्रातील लोकांची खास डिश आहे. कटाची आमटी ही आंबटगोड लागते. ती पुरणपोळीबरोबर किंवा गरमगरम भाताबरोबर सर्व्ह करतात. ही आमटी नुसती खायला पण सुंदर लागते. पुरणपोळी आणि कटाची आमटी खातात. पुरणपोळी चण्याच्या डाळीची, शिवाय गोड. चण्याच्या डाळीने काही जणांना पित्त होते, पोटात वायू धरतो, जडत्व येते. त्यात साखरही भरपूर असल्यामुळे कफ वाढून सुस्ती येऊ शकते. कटाच्या आमटीत मात्र मसाले भरपूर घातले जातात. तमालपत्र, काळे मिरे, दालचिनी या सर्व मसाल्यांमुळे पुरणपोळी पचायला सोपी होते.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    साहित्य. तयार कट आठ वाट्या, लिंबाएवढीच चिंच, अर्धी वाटी गूळ, दोन चमचे मीठ, एकपाव वाटी सुक्याय खोबऱ्याचा कीस, चार लवंगा, एक छोटा चमचा शहाजिरे, 2-3 दालचिनी तुकडे, 2 तमालपत्र, फोडणीकरिता छोटा डाव तेल, हिंग, मोहरी, हळद, छोटा चमचा लाल तिखट, कढीपत्ता, कोथिंबीर छोटा चमचा तयार पुरण.

    कृती. कटात चिंचेचा कोळ घालून तो शिजत ठेवावा. त्यात गूळ घालावा. तिखट मीठ घालावे. लवंग, दालचिनी, शहाजिरे व खोबरे तेलावर परतून घ्यावे व गार झाल्यावर त्याची मिक्सठरवर पूड करावी. ती शिजणाऱ्या कटात घालावी. कढल्यात फोडणी तेल मोहरी, हिंग, हळद घालून खमंगपणे फोडणी करावी. कढीपत्ता घालावा. तमालपत्र घालावीत. तयार पुरण एक चमचा घालून हलवावे. ही फोडणी आमटीत घालावी. आमटी चांगली उकळून शिजल्यावर गॅस बंद करून कोथिंबीर घालावी.
    टीप. या आमटीत शेवग्याच्या शेंगा घालण्याची पद्धत आहे. आवडत असल्यास हिंग हळद, मीठ घातलेल्या पाण्यात शेंगांचे बोटभर लांबीचे तुकडे शिजवून घ्यावेत व ते उकळत्या आमटीत घालावेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      April 17, 2017


  • अभ्यंग स्नान

    भारतातील सण हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. प्रत्येक सणाला जोडून काही परंपरा आहेत. अशीच एक परंपरा आहे उटणे लावणे. दीपावलीतील अभ्यंगस्नानात उटण्याला विशेष महत्त्व आहे. उटणे हे वनौषधींपासून बनवलेले असावे, असा संकेत आहे. दिवाळीच्या दिवसामध्ये भल्या पहाटे उठून अंगाला तेल लावून घातलेले स्नान म्हणजेच अभ्यंग स्नान होय.

    अभ्यंग स्नानासाठी जे सुवासिक तेल वापरले जाते ते केवळ सुवासिक न वापरता त्यासोबत कोमट तीळ तेलाने अभ्यंग करावा. शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यंग करताना सर्वागाला तेल लावून हलकेसे मालिश करणे आवश्यक असते. अभ्यंग करताना तो हातापायांच्या ठिकाणी खालून वरच्या दिशेने करावा तर सांध्याच्या व पोटाच्या ठिकाणी घडय़ाळाच्या काटय़ाच्या दिशेने गोलाकार करावा. आपल्याकडे फक्त दीपावलीच्या दिवसांमध्येच केला जातो. अनेक कुटुंबातील स्त्रिया सर्व घरातील सदस्यांना अभ्यंग करून स्नान घालतात; परंतु स्वत:साठी वेळ काढून अभ्यंग करीत नाहीत.

    अनेक जणींचा बाळंतपणानंतर अंगाला तेल लावून स्नान करणे एवढाच काय तो अभ्यंगाशी संबंध आलेला असतो. परंतु त्यामुळेच बऱ्याच स्त्रियांमध्ये नियमित अभ्यंग न झाल्याने वयाच्या तिशी-पस्तिशीनंतर कंबरदुखी, पाठदुखी, संधिवात, गुडघेदुखी, अंगदुखी अशा अनेक तक्रारी दिसून येतात. धावपळीच्या युगात बऱ्याचशा स्त्रिया डोक्यालादेखील तेल लावण्यास वेळ काढत नाही.

    त्यामुळे केस गळणे, अकाली केस पांढरे होणे, केस व डोक्याची त्वचा रूक्ष होणे, केसांमध्ये कोंडा होणे अशा तक्रारी अनेक जणींमध्ये आढळतात. या तक्रारी दूर करण्यासाठी पौष्टिक आहाराबरोबरच आठवडय़ातून दोन वेळा डोक्याला तेल लावून हलकीशी मालिश करणे गरजेचे आहे.

    नियमित अभ्यंग केल्याने रोजच्या रोज होणारे शारीरिक श्रम दूर होतात. शरीराला बल मिळते. शरीरातील वाढलेल्या वायूचे शमन होऊन दृढता प्राप्त होते. त्वचेचा कोरडेपणा जाऊन त्वचा कांतियुक्त होते. अभ्यंगामुळे आजच्या आधुनिक काळात प्रवासामुळे व हवेतील प्रदूषणामुळे होणारा वात प्रकोप व त्वचेवरील दुष्परिणाम टाळले जाऊ शकतात. नियमित अभ्यंग केल्याने भूक चांगली लागून मलबद्धतेचे विकार नाहीसे होतात. मानसिक थकवा दूर होऊन झोप चांगली लागते; मनाची एकाग्रता वाढून स्मरणशक्ती वाढते.

    एवढेच काय तर वृद्धत्व उशिरा येऊन चिरतारुण्य प्राप्त होते. म्हणून सर्वानीच दीपावलीच्या काळात तळपायापासून ते डोक्यापर्यंत सर्व अवयवांना अभ्यंग करावे व नंतरही आठवडय़ातून एकदा तरी सुटीच्या दिवशी अभ्यंग स्नान करावे.

    अभ्यंगानंतर स्नान करताना सुगंधी उटणे लावण्याची प्रथा आहे. शरीराला लावलेले तेल त्वचेमध्ये जिरून शिल्लक राहिलेले जास्तीचे तेल किंवा त्वचेचा तेलकटपणा जावा व शरीरातील रक्ताभिसरण सुधारून हालचालीमधला सहजपणा व चपळपणा कायम राहून शरीराला सुगंध यावा. हा यामागे उद्देश असतो. जसे अभ्यंग करताना आपण तेल लावतो अगदी त्याच दिशेने व पद्धतीने उटणेही शरीराला लावावे.

    जाहिरातीमध्ये आकर्षक वाटलेला परंतु रासायनिक प्रक्रियेने तयार केलेला साबण या अभ्यंगाच्या वेळी लावू नये. त्यामुळे त्वचा जास्तच रूक्ष होते. म्हणून कुठलाही साबण लावू नये. अशा पद्धतीने अभ्यंग करून उटणे लावून नंतर सोसवेल अशा गरम पाण्याने केलेले स्नान शरीर स्वच्छ करून मनाला तरतरीतपणा, प्रसन्नता आणते व एकूणच शरीराचे सर्व आजार बरे होऊन दीर्घायुष्य प्राप्त होते.

    अभ्यंगासाठी तेल अभ्यंग करण्यासाठी कोमट तीळ तेल वापरावे किंवा आपल्या प्रकृतीनुसार व एखादी व्याधी असेल तर त्या व्याधीनुसार वेगवेगळी तेले तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली वापरता येतात. उदाहरणार्थ वातशामक तेल, चंदन बलालाक्षादी तेल, सहचर तेल आदी.

    उटणे सहसा उटणे हे घरीच किंवा तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानुसार वापरावे. बाजारात मिळणाऱ्या उटण्यांमध्ये अनेक वेळा चूर्णाची भेसळ झालेली दिसून येते.

    उटणे बनविण्याची कृती.
    साहित्य:- पाव किलो मसूर डाळ पीठ, २५ ग्रॅम आवळकाठी, २५ ग्रॅम सरीवा, २५ ग्रॅम वाळा, २५ ग्रॅम नागर मोथा, २५ ग्रॅम जेष्टमध, २५ ग्रॅम सुगंधी कचोरा, ५ ग्रॅम आंबेहळद, २५ ग्रॅम तुलसी पावडर, २५ ग्रॅम मंजीस्ट, ५ ग्रॅम कापूर. ( हे सर्व साहित्य कास्टा औषधीच्या दुकानात मिळते.)
    कृती : वरील सर्व साहित्य चांगले मिक्स करून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावे.
    हे उटणे लावल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारून त्वचा कांतियुक्त होते.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      April 17, 2017


  • मावा मोदक

    साहित्य :

    पाव किलो मावा, ८५ ग्रॅम बारीक साखर, १ चमचा वेलची पूड ,केशर अगर केशरी रंग.
    मोदकात भरण्यासाठी काजू, बदाम, पिस्ता पूड अगर बेदाणे हे सारे आपल्या आवडीवर आहे.

    कृती :

    मावा मिळून घेवून त्यात साखर मिसळावी .कल्हई केलेले पितळेचे पातेले घेवून त्यात मावा घालून मंद गस वर ढवळत राहावे.मधून मधून गोळी होत आली का पहावी ,गोळी करताना मावा बोटाला चिकटता कामा नये.पटकन गोळी झाली कि गस बंद करून पातेले खाली उतरावे,मावा थंड होवू दयावा. वेलची पावडर व केशर घालावे.

    मोदक चार -पांच तासांनी मोदक वळले तरी चालतील.हे मोदक लहान करावेत व एखादा बेदाणा आत घालावा.

    संजीव वेलणकर, पुणे
    ९४२२३०१७३३

      September 4, 2016


  • फळापासून विविध पेये – १

    फळांपासून तयार केल्या जाणाऱ्या प्रक्रियायुक्त पदार्थांमध्ये पेयांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा पेयांचे आहारमूल्यसुध्दा चांगले असते. फळांच्या रसापासून सरबते, स्क्वॅश, सिरप, कॉर्डियल, भुकटी इत्यादी वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात.

      October 25, 2015


  • ओली भेळ

    ओली भेळ

    कांदा बारीक चिरून घ्यावा. त्यात आवडीप्रमाणे तिखट, मीठ व वरील सर्व साहित्य घालून कुरमुरे घालावेत व ओली भेळ करावी.

      December 26, 2016


  • नवलकोल (अलकोल) कोशिंबीर

    साहित्य : नवलकोल (अलकोल) २, हिरव्या मिरच्या ३ ते ४, शेंगदाण्याचे कूट २ चमचे भरुन, १ लिंबाचा रस, साखर, जिरे, तूप, हिंग फोडणीसाठी, खोबरे, कोथिंबीर

    कृती : नवलकोलच्या (अलकालच्या) साली काढून घ्यावात व किसून घ्यावे. एका बाऊलमध्ये मीठ, साखर, दाण्याचे कूट, ओले खोबरे, लिंबाचा रस घालावे व फोडणीच्या पळीत तूप, जिरे, हिंग पालावे व वरील मिश्रणाला फोडणी द्यावी. व एकत्र करावे वरुन कोथिंबीर घालावी.

    - सौ. शैला अरविंद खरे (खारकर)

    ५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

      September 10, 2026


  • शेपूचे वडे

    साहित्य:- 11/2 (दीड) वाटी बारीक चिरलेली शेपू, 1 वाटी बेसन, 2चमचे तांदुळाचे पीठ, 1 कांदा बारीक चिरलेला, प्रत्येकी 1 चमचा आले,लसूण पेस्ट, हळद, मिरची पावडर, मीठ चवीनुसार, 4चमचे तीळ, तळण्यासाठी तेल, इ.

    कृती:- एका मोठ्या बाऊलमध्ये चिरलेली शेपू, बेसन, तांदुळाचे पीठ, कांदा, आले-लसून पेस्ट, हळद, मीठ, मिरची पावडर आणि 3 चमचे तीळ एकत्र करून पाणी घालून मळावे.

    लहान गोळे करून वड्यांचा आकार देऊन वरून तीळ लावावे आणि खमंग तळून किंवा शॅलो फ्राय करून घ्यावे. साॅस, खजूर चटणीबरोबर गरम गरमच सर्व्ह करावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      December 6, 2016


  • p-2711-mix-kaddhanya-chivda

    मिश्र कडधान्यांचा चिवडा

    साहित्य - गव्हाच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या, धानलाह्या, मूग डाळ, मसूर डाळ, मटकी, हरभरा डाळ, हिरवे वाटाणे, काबुली चणे, शेंगदाणे, काजू, बेदाणे, खोबर्यावचे काप, तेल, मीठ, लाल तिखट, हळद, सायट्रिक अँसिड, साखर, गरम मसाला, हिंग, खसखस, कढीपत्ता आणि मोहरी.

    कृती - एक-एक वाटी तिन्ही प्रकारच्या लाह्या, इतर धान्य अर्धी अर्धी वाटी किंवा आपल्या आवडीप्रमाणे घेऊन भिजत घालावी, ८-१0 तासांनी पाण्यातून काढून कापडावर घालून कोरडे करावे, कढईत तेल तापवून डाळी आणि धान्यं तळून घ्यावी तसेच शेंगदाणे, काजू तळावे. तळलेले जिन्नस आणि लाह्या एकत्र करावे. एक वाटीभर तेल तापवून त्यात कढीपत्ता, मोहरी, हिंग, हळद, खसखस घालून जरा परतावं. त्यात वरील मिश्रण घालून मीठ, लाल तिखट, गरम मसाला, खोबर्या चे काप आणि बेदाणे घालून सर्व जिन्नस खाली-वर करावं. सायट्रिक अँसिड आणि साखर बारीक करून सर्वात शेवटी टाकावी. गॅस बंद करून सर्व जिन्नस चांगलं एकत्र करावं. हा चिवडा व्यवस्थित गार झाल्यावर डब्यात भरावा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      July 6, 2017