(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • malai-mint-smoothie

    मलाई मिंट स्मूदी

    बर्फ घालुन थोडा वेळ फिरवा. ग्लास मध्ये घ्या. त्यावर आपली मस्त घरगुती दाट साय घाला. किंवा क्रीम घाला. एखाद्या पुदीन्याच्या पानाने मस्त गार्निश करा

      February 28, 2017


  • अनलिमिटेड बुफे मागचं अर्थशास्त्र व वैद्यकशास्त्र!

    काही ठराविक किंमतीत अनलिमिटेड बुफे लंच/डिनर हा प्रकार तुम्ही कित्येकदा अनुभवला असेल. जेवणाचा प्रकार (शाकाहारी, मांसाहारी इ.) कोणता आहे यावरून बुफेच्या किंमती थोड्याशा बदलतात, पण जास्त फरक नसतो. प्रत्येक बुफे हा अर्थशास्त्रीय भाषेत surplus साठीच छोटेखानी युद्ध असते. Consumer Surplus जितका कमी करता येईल तितका हॉटेलचा फायदा असतो; आणि मोजक्या पैशात जितके जास्त अन्न खाता येईल (थोडक्यात consumer surplus वाढवता येईल) तितका ग्राहकाचा फायदा असतो. आणि या सगळ्या अर्थशास्त्रीय युद्धाला वैद्यकाच्या काही नियमांची जोड असते. कसे ते पाहूया!

      June 22, 2026


  • दुधीची खीर

    आपण दुधीचा हलवा बर्‍याचवेळा खाल्ला असेल. फारच मस्त असतो. पण कधी दुधीची खीर खाऊन बघितलेय? ही पण एक सुंदर आणि चविष्ट पाककृती आहे. चला बघूया कशी करायची ते..

      January 23, 2016


  • रताळ्याचा शिरा

    प्रथम रताळे सोलून व किसून घ्यावे. रताळे किसून न घेता उकडून घेऊन कुस्करुन घेतले तरी चालतील. एका कढाईत तूप गरम करावे, त्यात किसलेले रताळे घालून नीट परतून घ्यावे. रताळ्याचा रंग जरा बदलल्यावर त्यात दूध घालावे व एक उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यावर त्यात साखर घालावी व नीट एकजीव करून घ्यावे. रताळी चांगली शिजून द्यावी. हा शिरा थोडा ओलसरच ठेवावा व लागल्यास दूध किंवा पाणी घालावे. यात खवलेला नारळ, वेलची पूड व बदामाचे काप घालावेत व गॅस बंद करावा.

      October 22, 2013


  • p-1738-rolled-sandiwch

    रोल्ड सॅन्डविच

    ब्रेडच्या कडा कापून घ्या. त्यावर जॅम किंवा मार्मलेडस लावून घ्या. त्यावर किसलेले चीज घाला. आता दुसऱ्या ब्रेडलाही जॅम लावून घ्या. हा ब्रेड पहिल्या ब्रेडच्या वर व्यवस्थीत ठेऊन घ्या

      March 6, 2017


  • rum cake

    रम केक

    केक बनविण्याच्या १ महिन्यापूर्वी ड्रायफ्रुट्स रममध्ये भिजवून ठेवावे. जेव्हा केक बनवायचा आहे तेव्हा मदा व बेकिंग पावडर एकत्र करून चाळणीने चाळून घेणे

      December 28, 2016


  • p-893-chicken-parsley-pesto-fruit-chat

    चिकन कोथिंबीर पेस्तो विथ फ्रुट चाट

    १ चिकन ब्रेस्ट (त्याचे ६ तुकडे करावेत), पेस्तो सॉस, अर्धी वाटी कोथिंबीर, २ चमचे ऑलिव्ह ऑइल/गोडं तेल, २ चमचे भाजलेले शेंगदाणे, ५० ग्रॅम पनीर, २ हिरव्या मिरच्या, १० लसणीच्या पाकळ्या, ३ पातीचे कांदे (पातीसह), अर्ध्या लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ.

      March 6, 2017


  • मटार उसळ

    साहित्य:- ४ वाट्या मटारचे दाणे, एक वाटी ओले खोबरे, अर्धी वाटी कोथिंबीर निवडून व स्वच्छ धुऊन, २ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गोडा मसाला, मीठ, तेल, फोडणीचे साहित्य, लिंबाएवढा गूळ, कढीपत्ताची १० ते १२ पाने.

    कृती : प्रथम चार वाट्या मटार उकळत्या पाण्यात घालून ५ ते ७ मिनिटे राहू द्यावेत. मिक्सारमध्ये ओले खोबरे, मिरच्या, कोथिंबीर घालावे मीठ, जिरे घालून व थोडे पाणी घालून वाटण करून घ्यावे. पातेल्यात तेल घालून जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालून खमंग फोडणी करावी. त्यावर वाटण घालून परतावे. 2 वाट्या पाणी व मटार घालून उसळ उकळू द्यावी. मीठ, गूळ, धने, जिरे पूड, गोडा मसाला घाला व मटार नीट शिजू द्या. हवी त्याप्रमाणे दाट वा पातळ करा. ब्रेड, पोळीबरोबर लिंबू पिळून सर्व्ह करा. 1) हीच उसळ कांदा आले लसूण खोबरे यांचे वाटण घालूनही करतात. आवडत असल्यास टोमॅटोही घाला. हे वाटण, उकडलेले बटाटे, मटार व गरम मसाला घालून, आलू मटार ही पंजाबी डिश करतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      December 26, 2016


  • पेरूबोट

    साहित्य:- मोठा पेरू १ नग, मिक्स फ्रुट जेली अर्धा वाटी, व्हॅनिला कस्टर्ड १ वाटी, मध २ चमचे.

    कृती:- व्हॅनिला कस्टर्ड : दोन चमचे कस्टर्ड दोन कप दुधात मिसळून चवीनुसार साखर घालावी व मंद आचेवर घट्ट करून घ्यावे किंवा एका भांडय़ात पाणी गरम करून गॅसवर ठेवावे. त्याच्या आतमध्ये बसणाऱ्या भांडय़ात कस्टर्डचे मिश्रण ठेवून ढवळावे. घट्ट झाल्यावर गॅसवरून उतरवावे. (याला डबल बॉयलिंग प्रोसेस म्हणतात, यामुळे कस्टर्ड जळत नाही.)

    कृती ग्वावाबोट:- पेरूचे लांबट भागाचे मधोमध दोन भाग करून बियांचा भाग काढून टाकावा व पेरूला थोडेसे वाफवून घ्यावे. थंड करून यामध्ये जेली घालून सर्व्हिंग प्लेटमध्ये पहिले कस्टर्ड ओतून त्यावर ही पेरूची फोड ठेवावी. वरून बदाम, पिस्त्याचे काप व मधाने सजवून थंड करून सव्‍‌र्ह करावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२०१७३३

      January 18, 2017


  • जगातील सर्वात जुनी भाजी – भरल्या वांग्याचा रस्सा

    भारतीय रेसीपीज इतर कोणत्याही रेसीपीज पेक्षा कलात्मक आहेत, चविष्ट आहेत आणि आरोग्यदायी सुद्धा आहेत यात शंकाच नाही, फक्त भारतीयांना स्वतःला प्रोजेक्ट करता येत नाही इतकेच.

      July 25, 2023