(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अननसाचे सासव

    साहित्य : अननसाचे तुकडे, ओले खोबरे, सुक्या मिरच्या, साजूक तूप, हिंग, मोहरी, मेथी दाणे, गूळ व मीठ.

    कृती : २ चमचे ओले खोबरे व ४-५ सुक्या मिरच्यांचे जाडसर वाटण करावे. पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून त्यात हिंग, मोहरी व ५-६ मेथी दाणे घालून फोडणी करावी. नंतर फोडणीत अननसाचे तुकडे घालावेत. गूळ घालावा. खोबरं-मिरचीचे वाटप घालावे. मीठ घालावे. हा पदार्थ गोवा-कारवारकडे केला जातो.

    - पुष्पलता दळवी, वांद्रे, मुंबई.

      September 20, 2018


  • चिकन नूडल सूप

    साहित्य: वेळ: ४० मिनिटे अर्धा कप शिजलेले चिकन (बारीक तुकडे करावे), १ कप शिजलेल्या नूडल्स, ६ कप चिकन स्टॉक, अर्धा कप कोबी (चिरून उकडून घ्यावा), १ टी स्पून सोयासॉस, पाव टी अजिनोमोटो, १ टी स्पून स्पून कॉर्नफ्लोअर, १ टे.स्पून रिफाईंड तेल, पाव टी स्पून लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, मिरेपूड.

    कृती: एका जाड बुडाच्या भांड्यात रिफाईंड तेल घालावे. चिकनचे तुकडे त्यात परतून घ्यावेत. त्यातच कोबी परतावा. त्यावर स्टॉक घालून उकळवावे. मीठ, मिरेपूड, अजिनोमोटो, तिखट व सोयासॉस इत्यादी घालावे. शिजलेल्या नूडल्स घालाव्यात. पाव कप पाण्यात कॉर्नफ्लोअरची पेस्ट करावी. ती पेस्ट त्यात घालावी. सर्व सूप चांगले उकळवावे व गरम गरम वाढावे.

      September 10, 2026


  • आंबाडीची भाजी

    साहित्य- १ मध्यम जुडी आंबाडी, अर्धी वाटी तांदुळाच्या कण्या, अर्धी वाटी हरभरा डाळीचा भरडा, दोन डाव तेल, सुकी लाल मिरची (चवीनुसार) आवडत असल्यास लसूण, मीठ, फोडणीसाठी हळद, मोहरी, हिंग.

    कृती- तांदळाच्या कण्या आणि डाळीचा भरडा पुरेशा पाण्यात नरम शिजवून घ्यावा. आंबाडीच्या भाजीचे देठ काढून टाकून पाने चिरून वाफेवर मऊ शिजवून घ्यावीत. पळीने ही पाने घोटून एकजीव करून त्यात कण्या आणि शिजवलेला भरडा घालावा आणि परत एकदा घोटून घ्यावे. लोखंडी कढईत सुक्या मिरच्यांची खमंग फोडणी करावी. आवडत असल्यास त्यात ठेचलेली लसूण घालून परतून घ्यावे. मग त्यात शिजलेली अंबाडी, कण्या आणि भरडा घालून थोडं पाणी घालावे. मीठ घालून चांगले ढवळून एक-दोन उकळ्या आल्यावर गरमगरम भाकरीबरोबर खावी.

    पूर्वी वर्षांचे तांदूळ भरण्याची पद्धत होती. ते चांगले चाळून कण्या वेगळ्या काढून भरले जायचे. त्यामुळे कण्या प्रत्येकाच्या घरी असत. अनेकदा डाळीचे पीठदेखील जात्यावर भरडले जायचे. त्यामुळे भरडासुद्धा वारंवार घरात असायचाच, तो अनेक पालेभाज्यांमध्ये वापरला जाई. त्याची चव वेगळीच! डाळ आणि तांदूळ दोन्हींचा वापर केल्याने प्रथिने आणि जीवनसत्त्व याचा समतोल राखला जातो.

    - शुभदा गोवित्रीकर, पुणे.

      September 20, 2018


  • मटार -कांदे परांठा

    गेल्या रविवारी भाजी स्वस्त मिळत होती म्हणून चक्क ५ किलो मटार विकत घेतले. दिल्लीत सध्या थंडी असल्यामुळे निवडून ठेवल्यास ७-८ दिवस तरी खराब होण्याची शक्यता नाही. आठवडाभर मटार सोहळा साजरा केला. मटारच्या वरील सर्व भाज्या डब्यात नेल्या. आज सकाळी परांठा खाण्याची इच्छा झाली. साहजिकच आहे, सौने काही वेगळे म्हणून कांदे घालून मटार परांठा करायचा ठरविला. त्याचीच कृती खाली देत आहे.

      December 24, 2015


  • छोले भटुरे

    छोले भटुरे हा पंजाबमधील लोकप्रिय पदार्थ……

      February 2, 2022


  • Bhelpuri-300

    भेळपुरी

    साहित्य : ३ वाट्या चुरमुरे , १०० ग्राम बारीक १ नंबर शेव, लिंबू किंवा कैरी, ३ मोठे कांदे , २ मोठे बटाटे, २ टोमाटो, थोड्या कडक पुऱ्या, तिखट चटणी , गोड चटणी, मीठ चवीनुसार, बारीक चिरलेली कोथिंबीर.

    गोड चटणी साहित्य :
    ११ ग्राम खजूर, थोडी चिंच, गुळ व मीठ चवीनुसार

    कृती :

    खजुरातील बी काढून टाकावी ,नंतर गुळ बारीक चिरावा, व चिंचेचा कोळकाढून घ्यावा, खजूर मिक्सर मधे वाटून घ्यावे, त्यात गुळ, चिंचेला कोळ व मीठ टाकून चटणी पातळ करून घ्यावी.

    तिखट चटणी:
    ५-६ हिरव्या मिरच्या, थोडा पुदिना, थोडी कोथिंबीर, मीठ चवीनुसार

    कृती :
    मिरच्या ,पुदिना , कोथिंबीरहे सर्व एकत्र करून त्यात मीठ घालून मिक्सर मधे वाटावे.नंतर त्यात आणखी पाणी घालून पातळ चटणी करावी.

    भेळ कृती:
    एका भांड्यात चुरमुरे, बारीक चिरलेला बटाटा, कांदा, टोमाटो, कैरीचे बारीक तुकडे, मीठ , कुस्करलेल्या कडक पुऱ्या एकत्र घ्याव्यात, त्यात तिखट व गोड चटणी टाकावी, मग सगळे एकत्र करावे, मग त्यावर बारीक शेव व कोथिंबीर टाकावी. भेळ तयार !

      June 15, 2017


  • mozzarella-vegetable-toast-sandwich

    मोझ्झरेल्ला वेजिटेबल टोस्ट सॅन्डविच

    प्रथम तिन्ही प्रकारच्या भोपळी मिरच्या, ब्लॅक ऑलिव्ह्स, कॉर्न, मशरुम्स किसलेल्या मोझ्झरेल्ला चिझ मध्ये तेलावर मंद आचेवर परतून घ्यावे. नंतर त्यात चवीनुसार मीठ व चिली फ्लेक्स, ओरिगानो टाकावे.

      June 16, 2017


  • p-2876-jalichi sabudana papdi

    जाळीची साबुदाणा पापडी

    साहित्य :
    साबुदाणा एक वाटी
    जरुरीप्रमाणे रिफाईंड तेल
    मीठ
    पाणी

    कृती :
    साबुदाणा चार/पाच तास भिजत ठेवा. भिजल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालून कालवा. पत्र्याची झाकणे घ्या. त्याला वरून हलकासा तुपाचा हात लावा. या झाकणावर साबुदाणा पसरून घाला. इडलीपात्रात पाणी उकळायला ठेवा. त्यावर चाळणी ठेवा. आणि यावर साबुदाणा पसरून ठेवलेली झाकणे ठेवा. चांगली वाफवून घ्या. साबुदाणा शिजला की या पापड्या सुईच्या साहाय्याने अलगद उचलून काढाव्यात थाळीत/ताटात चांगल्या वाळवून घ्याव्यात. चवीसाठी यात जिरे सुद्धा घालता येते. जरुरीप्रमाणे तळून खाव्यात. चांगल्या कुरकुरीत लागतात.

      August 3, 2018


  • Kanakecha-Shira-300

    कणकेचा शिरा

    तुमावर कणीक भाजून घ्यावी. मंदाग्नीवर भाजावे. छान वास आला की त्यावर उकळीचे पाणी घालावे. मीठ घालावे. जरा वेळ ढवळावे. पाणी आटले की गूळ घालावा. ढवळावे. झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. नंतर वेलदोड्यांची पूड घालून उतरवावे

      November 9, 2016


  • p-958-Elaichi-biscuit

    इलायची बिस्किटस्‌

    तूप, साखर फेसावे. कणीक, बेकिंग पावडर चाळून मिसळावे. थोडं दूध वापरून हलक्याल हाताने, लाटून गोल किंवा चौकोनी कापावे. (लाटतानाच वेलदोड्याची पूड पेरा. म्हणजे नीट चिकटेल.) दहा-बारा मिनिटं मध्यम ओव्हनवर भाजावं. काश्मिूरी डोढा बर्फी साहित्य :- 1 कप कणीक, दीड कप खवा, दीड कप साखर, पाऊण कप दूध, पाऊण कप तूप, केशर, ड्रायफ्रूड, चिरून वर्ख इ. कृती :- तुपावर कणीक भाजावी. गार झाल्यावर दुधात कालवावी.

      March 6, 2017