लेखसंग्रह

मदिरापुराण

Category:

 

… एकेकाळी रुढी-परंपरांचा आणि सामाजिक जीवनाचा भाग असलेली, सध्या… निषिद्ध समजली जाणारी ही दारू म्हणजे नेमके काय..? हेच बहुतेकांना माहिती नसते..! ऐकीव किंवा काही १-२ वाईट उदाहरणांवरून वेगेवेगळे मतप्रवाह बनलेली दारू म्हणजे नेमके काय..? चला तर आज तेच बघूयात…!

  November 19, 2019


अवर्गिकृत

कोल्हापूरी तांबडा रस्सा

Category:

 

पांढरा तांबडा रस्सा म्हणजे करवीरनगरी अर्थात कोल्हापूरची शान. कोणत्याही प्रकारच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर हा रस्सा उत्तम लागतो. बघूया कोल्हापूरी तांबडा रस्स्याची पाककृती..

  February 6, 2014


खाद्ययात्रा

आरोग्यदायी गाजराची भाकरी

Category:

 

गाजराचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. गाजर हे ‘अ’ जीवनसत्वाने समृद्ध असते. गाजर खाल्ल्याने आतडय़ांच्या तक्रारी दूर होतात. तसेच चेहर्‍यासाठीही गाजर उपयुक्त आहे. आयुर्वेदानुसार गाजर हे एक फळ किंवा भाजी नसून रक्तपित्त तथा कफ नष्ट करणारे गोड, रसदार, पोटातील जळजळ कमी करणारे व पाईल्स सारख्या रोगांवर उत्तम जडीबूटी असून ते हृदय रोगांवर रामबाण इलाज आहे. याने वीर्य विकार नष्ट होतो तसेच शारीरिक थकवा दूर होण्यास मदत मिळते. गाजरात रक्त अवरोधक शक्ती असल्यामुळे रक्तपित्त तयार होऊ देत नाही. तसे तर गाजर थंड प्रवृत्तीचे असते पण हे कफनाशक आहे. गाजरातील लोहतत्व कमजोरी दूर करून शरीरातील प्रत्येक तंतू व ग्रंथीला स्वस्थ ठेवतात. गाजराच्या हिरव्या पानांतही पौष्टीकता, खनिजे, जीवनसत्त्वे आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. शरीरात पाणी कमी झाल्यास गाजराच्या रसाने ती उणीव भरून काढली जाते. जेवणानंतर लगेच गाजर चाऊन खाल्ल्यास तोंडातील हानिकारक जंतू मारतात. दात स्वच्छ होतात. दातांतील फटीत अडकलेले अन्नकण बाहेर निघतात आणी हिरड्या व दात यांतून रक्त येणे बंद होते.

  January 22, 2014


खाद्ययात्रा

ब्रेडच्या सुरळीच्या वड्या

Category:

 

सर्वप्रथम बटाट्याचा किस, ताक व लालसर कडा काढलेल्या ब्रेडचा चुरा एकत्र करुन या मिश्रणात अंदाजानुसार आणि चवीप्रमाणे हिंग, हळद, तिखट, मीठ घालून गॅसवर मंद आचेवर शिजत ठेवावे. गोळा पातेल्यात फिरायला लागला की लगेच उतरवावे. ताटात कापड टाकून त्यावर वरील मिश्रण घाला व पातळ थापावे. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची, मीठ, ओले खोबरे, लिंबाचा रस व चिमूटभर साखर घालून याचे सारण तयार करावे. त्यात मोहरी, हिंग, हळद घालुन केलेली फोडणी घालावी. व हे सर्व थापलेल्या वड्यांवर पसरवावे. त्यावर सुरीने उभ्या चिरा पाडून गोल गुंडाळ्या कराव्यात. अशाप्रकारे ब्रेडच्या सुरळीच्या वड्या तयार. या वड्या आपण हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करु शकतो.

  September 28, 2013


खाद्ययात्रा

चिरोटे

Category:

 

मैदा, चिमूटभर मीठ घेऊन दुधात घट्ट भिजवा. दीड दोन तास ठेवा. मग खूप कुटून घ्या. त्याच्या लाडवाएवढ्या गोळ्या करा. त्या लाटा. व त्यावर तांदूळ पिठी पेरत जा. एका भांड्यात तूप कोमट करा. ते या लाटलेल्या पोळीवर पसरवा. त्यावर अशीच केलेली दुसरी पोळी उलटी घाला. याची घडी घाला. पुन्हा लाटा. ही पोळी थोडी जाडसर ठेवा. त्याची चौकोनी वळकटी करा. याचे आडवे, चौकोनी तुकडे कापा. ते थोडे लाटा. गरम तूप असताना, आच मंद करुन त्यात हे चिरोटे सोडा. तळा. झार्‍याने आजूबाजूचे तूप यावर घालत राहा. फुगल्यावर बाहेर काढा. हे चिरोटे थंड झाले की मध्ये थोडे फोडा व त्यात थोडा पाक घाला.

  September 23, 2013


खाद्ययात्रा

अळूची भाजी

Category:

 

पावसाळय़ात भाज्यांची पंचाईतच होते. त्यातही नेहमीच्याच भाज्या खाऊन तोंडाची चवही जाते. अशा वेळेस सहज उपलब्ध होणाऱ्या भाज्यांचा उपयोग करून काहीतरी नवीन केल्यास खाणाराही खुश आणि करणाराही, आणि विशेष म्हणजे हा काही नवा पदार्थ नाही, तर आजीच्या काळापासून चालत आलेला..

  September 13, 2013


खाद्ययात्रा

राजभोग

Category:

 

अनेक वेळा हॉटेलमध्ये पोटभर खाऊन झाल्यावर आपण स्वीट डिश मागवतो. या स्वीट डिश प्रकारात अनेक चमचमीत पदार्थ आपल्याला मोहून टाकतात. अशीच एक भारतीय मिठाई – राजभोग..जी आपण घरच्या घरी करु शकतो.

  August 27, 2013


खाद्ययात्रा

मिश्र डाळीच्या इडल्या

Category:

 

आपल्या जिभेचे कौतुक पुरवण्याचे काम आपण सर्वच जण करतो. आणि त्यात दाक्षिणात्य पदार्थ अतिशय उपयोगी ठरतात. ब्रेकफास्टला किंवा कधीतरी हलके अन्न म्हणून डोसा, इडली असे पदार्थ खातच असतो. यातही पौष्टीक असे दाक्षिणात्य पदार्थ आपण घरच्या घरी करु शकतो. त्यातील एक म्हणजे मिश्र डाळींच्या इडल्या. त्याचे साहित्य आणि कृती..

  August 8, 2013


खाद्ययात्रा

कटाची आमटी

Category:

 

पुर्वीच्या काळी स्वयंपाकघरात सर्व गोष्टींचा अगदी व्यवस्थित वापर केला जायचा. कोणत्याही गोष्टीची नासाडी होत नसे. पुरणपोळीच्या बेतामधील उरलेले जिन्नस वापरुन हमखास केलेला एक पदार्थ म्हणजे – कटाची आमटी. त्याचे साहित्य आणि कृती पुढीलप्रमाणे..

  August 8, 2013


खाद्ययात्रा

केशरी भात

Category:

 

श्रावण महिना म्हणजे सणासुदींचा महिना. सण आले म्हणजे गोडधोड पदार्थ हे आलेच. असाच एक भाताचा गोड प्रकार – केशरी भात. त्याचे साहित्य व कृती पुढीलप्रमाणे..

  August 7, 2013