(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मोड आलेली मेथी व भाज्यांचे सूप

    साहित्य : पाव वाटी मोड आलेली मेथी, एक वाटी गाजराचे तुकडे, एक वाटी दुधी भोपळ्याचे तुकडे, एक वाटी कॉर्न, एक चिरलेला कांदा, 3-4 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, 6-7 काळे मिरे.

    कृती : वरील सगळे साहित्य पाणी घालून कुकरमधून उकडून घ्या. नंतर मिक्सोरमधून काढून गाळून घ्या. गाळलेले सूप उकळा. त्यात चवीप्रमाणे मीठ, लिंबाचा रस व थोडीशी साखर घाला. सर्व्ह करताना त्यात आपल्या आवडीप्रमाणे किसलेले चीज किंवा फ्रेश क्रीम घाला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      January 21, 2017


  • वालाच्या डाळीचे तिखट वरण

    साहित्य: १ वाटी वालाची डाळ, १ मध्यम कांदा, ४ हिरव्या मिरच्या, १ चमचा जिरे, मुठभर कोथिंबीर, हिंग, चिमुटभर, पाव चमचा हळद, चवीपुरते मीठ

    कृती: वालाची डाळ धुवून थोड्या पाण्यात एक तास भिजत घालावी. त्यात हिंग, हळद घालून चांगली शिजवावी. शिजल्यावर डाळ मोडून घ्यावी. कांदा, मिरची, जिरे व कोथिंबीर यांचे वाटण डाळीला लावावे. वाटीभर पाणी घालावे व चवीपुरते मीठ घालून व्यवस्थित उकळवावे वरुन
    कोथिंबीर घालावी.

    • सौ. नीता अतुल गडकरी

    ५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

      September 10, 2026


  • साबुदाण्याची खीर :

    साहित्य :

    माप: १ कप = २५० मी. लि.

    ½ कप साबुदाणा - (जाड खिरे साठी ⅔ ते ¾ कप साबुदाणे)
    २ कप दुध.
    २ कप पाणी.
    ४ ते ५ चमचे ( टेबल स्पून) मध्यम जाड साखर.
    ४ ते ५ हिरव्या वेलचीचे दाणे
    २ चमचे (टेबल स्पून) काजू तुकडे
    १/२ चमचा (टेबल स्पून) किसमिस (raisin)
    ३ ते ४ केशर कांड्या (saffron strands)

    कृती :

    १. साबुदाणे साफ पाण्याने धुऊन घेणे जेणेकरून त्यांतील स्टार्च नष्ट / कमी होईल.
    २. धुतलेले साबुदाणे जड तळ्याच्या भांड्यात १५ ते २० मिनिटे भिजत ठेवणे. ते भांडे वरून झाकण लाऊन बंद ठेवावे.
    ३. नंतर ते गॅसच्या शेगडीवर शिजवावे.
    ४. दरम्यान बाजूला दुध तापवून घ्यावे. गरम झालेले दुध साबुदाण्याच्या भांड्यात घालून ते ४ ते ५ मिनिटे शिजवावे.
    ६. साखर, वेलचीची पूड घालून मिश्रण चांगले २० ते २५ मिनिटे मंद गॅसवर गरम होऊ द्यावे.
    ७. थोड्या- थोड्या वेळाने मिश्रण ढवळत राहावे.
    ८. गॅस बंद करून काजू व किसमिस घालावी. केशर घालावा.
    १०. थंड किंवा गरम, आपल्या आवडी प्रमाणे खिरीचा आस्वाद घ्यावा.

      August 13, 2015


  • चिकन व पालक सूप

    साहित्य: अर्धी जुडी पालक, पाव किलो चिकन मध्यम तुकडे करून, ५ कप पाणी, अर्धा टी स्पून मीठ, पाव टी स्पून मिरेपावडर, १ टी स्पून आल्याची पेस्ट, पाव टी स्पून लसूण पेस्ट, ३ टे.स्पून सोयासॉस, पाव टी स्पून आजिनोमोटो.

    कृती: वेळ: ३० मिनिटे पालक निवडून स्वच्छ धुवावा. पानांचे हातानेच मोठे मोठे तुकडे करावेत. सोयासॉसमध्ये मीठ, मिरे पावडर, आले-लसूण पेस्ट घालून त्या मिश्रणात चिकन एक तासभर भिजत ठेवावी. पाणी उकळत ठेवावे. त्यात सॉसमिश्रणासहित चिकन घालावे. झाकण ठेवून चिकन शिजू द्यावे. थंड झाल्यावर त्यातील चिकन बाहेर काढावे. चिकनचे मांस व हाडे वेगवेगळी करून उरलेले पाणी उकळत ठेवावे. त्यात पालकाची पाने आणि सुटे केलेले चिकन घालावे. पाने थोडी मऊसर झाली की गॅस बंद करावा. हे सूप वेगळ्या चवीचे पण छान लागते. गरमागरम सूप प्यायला देताना सजावटीसाठी अंड्याच्या ऑमलेटच्या पातळ बारीक बारीक पट्ट्या कापून वरून घालाव्यात.

      September 10, 2026


  • पालकाचे सूप

    साहित्य: १ जुडी पालक, ३ टोमॅटो, वेळ: २० मिनिटे १ लहान कांदा, २ टे. स्पून 'अमूल' बटर, अर्धा कप फेटलेले क्रीम (मलई), पाव टी स्पून मीठ, मिरे पावडर.

    कृती: पालक कोवळ्या देठासह निवडून, स्वच्छ धऊन बारीक चिरा. कांदा बारीक चिरा, टोमॅटोच्या फोडी करा. एका मोठ्या भांड्यात थोडेसे बटर घालून त्यात कांदा मऊ होईपर्यंत परता. नंतर त्यात पालक आणि टोमॅटो घाला व ३-४ कप पाणी घालून उकळत ठेवा. चांगल्या उकळ्या आल्या की गॅस बंद करून सर्व मिश्रण पाण्यासहित मिक्सरमध्ये फिरवून एकजीव करा. मोठ्या गाळणीने सर्व मिश्रण गाळा. जरूर वाटल्यास पुन्हा थोडे पाणी वापरा व बेताचे दाटसर सूप तयार करा. गॅसवर उकळत ठेवा. मीठ, मिरेपावडर घालून उकळत असताना त्यात उरलेले बटर घालावे. हे गरम-गरम सूप बाऊलमध्ये घातल्यावर त्यावर फेटलेले क्रीम १- १ टी स्पून घाला.

      September 10, 2026


  • policha-metkut-roll

    पोळीचा मेतकूट रोल

    मेतकूट+ मीठ+ तुप किंवा शेंगदाणा तेल एकत्र करुन लाटलेल्या पोळीवर पसरवणे व लच्छा पराठ्या सारखे लाटणे
    तुप लावून रोल करुन मुलांना देणे.

      November 29, 2016


  • p-2962-farsi puri

    लोणचे फारसी पुरी

    साहित्य-
    १वाटी बेसन
    १वाटी मैदा
    १ छोटा चमच जिरे पावडर
    १ छोटा चमच धणे पावडर
    १छोटा चमच मीठ
    १टेबलस्पून रामबंधू लोणचे मसाला
    तेल मोहनासाठी व तळण्यासाठी

    कृती-
    प्रथम मैदा व बेसन एकत्र करून घ्यावे. नंतर त्यात मोहन घालावे. हाताने चांगले मळून घ्यावे. मग वरील सर्व साहित्य त्यात घालून एकत्र करावे नंतर पाण्याने भिजवावे .
    त्या मिश्रणाच्या दोन मोठया पोळया लाटाव्या.
    त्या दोन पोळया एकमेकावर ठेवून रोल करावा . मग चाकूने त्या रोलचे तुकडे करावे . नंतर प्रत्येक तुकडा हाताने हलका दाबून थोडा पुरी इतका लाटून घ्यावा . नंतर तेलात तळून घ्यावे . वरून थोडा चाट मसाला भुरकावा . काहीजण लोणचे मसाला पण वरून घालतात .
    खूप कुरकुरीत आणि टेस्टी होतात .
    दिवाळीला काहीतरी मस्त आणि नवीन फराळाचा पदार्थ म्हणून नक्की करून बघा .

      July 21, 2018


  • वालाची उसळ

    वालाची उसळ

    साहित्य : पाव किलो वाल, १ चमच लाल तिखट, मीठ चवीनुसार, मोठ्या लिंबाएवढा गूळ, २ चमचे थोडा मसाला, १ वाटी ओले खोबरे, कोथिंबीर, २ पळ्या तेल, फोडणीचे साहित्य.

    कृती : तेलाच्या फोडणीत मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून मोड आलेले वाल घालून ते चांगले परतावे. नंतर त्यात २ भांडी पाणी घालून उकळावे. वाल अर्धवट शिजल्यावर त्यात लाल तिखट, मीठ, गोडा मसाला, गूळ घालावा. ही उसळ शिजतानाच ओले खोबरे घालावे. उसळ खाली उतरल्यावर कोथिंबीर घालावी.

    टीप : उसळ जर प्रेशर पॅनमध्ये केली तर पाणी २ भांडे घालावे. कारण त्यातील पाणी तेवढे आटत नाही. प्रेशर पॅनमध्ये १ शिटी झाली की उसळ उतरावी.

      August 22, 2018


  • Metkut-300

    मेतकूट

    ३-४ डाळी, तांदूळ. गहू आणि निवडक मसाले यांचे मिश्रण असलेले हे  चटकदार मेतकूट…

      January 11, 2017


  • p-958-Elaichi-biscuit

    इलायची बिस्किटस्‌

    तूप, साखर फेसावे. कणीक, बेकिंग पावडर चाळून मिसळावे. थोडं दूध वापरून हलक्याल हाताने, लाटून गोल किंवा चौकोनी कापावे. (लाटतानाच वेलदोड्याची पूड पेरा. म्हणजे नीट चिकटेल.) दहा-बारा मिनिटं मध्यम ओव्हनवर भाजावं. काश्मिूरी डोढा बर्फी साहित्य :- 1 कप कणीक, दीड कप खवा, दीड कप साखर, पाऊण कप दूध, पाऊण कप तूप, केशर, ड्रायफ्रूड, चिरून वर्ख इ. कृती :- तुपावर कणीक भाजावी. गार झाल्यावर दुधात कालवावी.

      March 6, 2017