गाबीटो भेळ

गाजर व बीट स्वच्छ धुवून कच्चेच किसून घ्यावे. टोमॅटो व कांदा धुवून बारीक चिरून घ्यावा. एका भांड्यात गाजर, बीटचा किस आणि चिरलेला कांदा, टोमॅटो हलक्या हाताने एकत्र करून घ्यावे.



साहित्य:- २ मध्यम आकाराची लाल गाजरे (केशरी नकोत), १ मोठे बीट, २ मध्यम टोमॅटो, १ छोटा पांढरा कांदा, चवीप्रमाणे मीठ भेळेच्या चटण्या:- खजुर-चिंचेची चटणी, पुदिना-कोथिंबीरीची चटणी, लसूण-लाल सुक्या मिरच्यांची चटणी.

सजावटीसाठी:- मटकी शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती:- गाजर व बीट स्वच्छ धुवून कच्चेच किसून घ्यावे. टोमॅटो व कांदा धुवून बारीक चिरून घ्यावा. एका भांड्यात गाजर, बीटचा किस आणि चिरलेला कांदा, टोमॅटो हलक्या हाताने एकत्र करून घ्यावे. त्यात चवीनूसार मीठ व भेळेच्या चटण्या घालाव्यात. एका बोलमध्ये काढून घेऊन त्यावर मटकी शेव व कोथिंबीर भुरभुरवून खाण्यास द्यावे. भेळेच्या चटण्या तयार असतील आणि किसण्याचा व चिरण्याचा वेग जास्त असेल तर ५-७ मिनीटांपेक्षा अधिक वेळ लागत नाही. साध्या नायलॉन शेवेपेक्षा मटकी शेव वापरल्याने वेगळीच छान चव येते.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →