प्लेन टोमॅटो सूप

साहित्य: ८-१० चांगले लाल दळदार टोमॅटो, १ टी स्पून किसलेले आले, १ ਟੀ स्पून किसलेले लसूण, अर्धा टी स्पून दालचिनी पावडर, अर्धा टी स्पून हळद, १ कप दूध, २ टी स्पून कॉर्नफ्लोअर, १ टी स्पून अमूलबटर, २-३ ब्रेडचे स्लाईस, चवीप्रमाणे मीठ. : १५ मिनिटे

कृती: टोमॅटो बारीक चिरून तीन कप पाण्यात उकळत ठेवावे. त्यात आले, लसूण, मीठ, दालचिनी पावडर व हळद घालून चांगले शिजवावे. गार झाल्यावर मिक्सरमधून फिरवून गाळावे. पुन्हा मंद गॅसवर ठेवावे. एक कप दुधात कॉर्नफ्लोअरची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट वरील मिश्रणात घालून शिजवावी. सतत ढवळावे. उकळी आल्यावर गॅस बंद करावा.

ब्रेडच्या स्लाईसच्या कडा काढून टाकाव्यात आणि ब्रेडचे चौकोनी तुकडे करावे. तव्यावर थोड्याशा तुपावर परतून कुरकुरीत करून घ्यावेत.

गरम गरम सूप देताना त्यावर ५-६ ब्रेडचे तुकडे घालावेत.

Author