(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • स्नेह… तुझा माझा 

    तुझ्या माझ्या भावनांतुन
    सदैव प्रेमानं आरवावं
    नव्या सुंदर कल्पनांनी
    घर आपल सारवावं

    तुझ्या सुंदर डोळ्यांनी
    तू मला भुलवावं
    प्रेमाच्या झोक्यावर
    मी तुला झुलवावं

    कोलमडलो कधी तर
    एकमेकांना सावरावं
    आपल्या क्रोधाला आपण
    संयमाने आवरावं

    गैरसमजाच्या खड्यांनी
    समंजसपणे बुजावं
    छोट्या छोट्या कुरबूरींना
    तू दूरवर फेकावं

    तुझ्या माझ्या स्नेहाला
    दोघांनी साचवावं
    नात्याच्या बंधांना
    तुटण्यापासून वाचवावं

    तू कधी खोटं खोटं
    माझ्यासाठी हरावं
    मी कधी तुझ्यासाठी
    जग सारं जिंकावं

    झालेल्या तुझ्या चूकांना
    मी अगदी सहज विसरावं
    कधी माझ्या कुशीत शिरून
    तू दूःखाला ओघळावं

    तुझ्या माझ्या प्रेमाला
    ह्रुदयात खोलवर रूजवावं
    दोघांच्या सहजीवनात
    प्रेमाचे सुंदर फुल उजवावं

    - डॉ.सुभाष कटकदौंड

      November 13, 2018


  • आर्जव

    तुझ्या अश्रुंच्या चांदण्यांना आवर....
    माझ्या ओंजळीतल्या उन्हात पाघळतील...
    तुझ्या अवखळ बटांना सावर...
    माझा हलकेच घात करतील...
    करू नकोस विषयांच्या शरांचा भडीमार...
    सावरता येणार नाही स्वतःला...
    मोहोर यौवनाचा सांभाळ
    भ्रमिष्ट व्हायचं नाहीये मला....
    स्ञीत्वाचा अंगार जपून ठेव थोडासा...
    आहुती होण्याचं भान राहील मला....
    मंञमुग्धतेची मशाल थोडीशीच पाजळ...
    भोवतालचा तुझ्याच नुसता
    आसमंत व्हायचं नाहीये मला...
    बेगडी सौंदर्या च्या
    सीमा पार कर जरा....
    आश्वस्त, आधाराचा हात देईन तुला...

    © लीना राजीव.

    -- सौ. लीना राजीव देशपांडे

      November 26, 2018


  • जागतीक दिव्यांग दिवस

    शारीरिक किंवा मानसिक त्रुटीद्वारे दिव्यांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेता याव्यात, व दिव्यांगाचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा दिवस पाळला जातो.

      December 3, 2021


  • इतरांतील लाचारी बघे

    शक्तीच्या जोरावरती, बघतो इतरांत लाचारी
    विसरून जातो वेड्या, स्वत:तील न्यूनता खरी ....।।धृ।।

    पैसे ओढती खोऱ्यानें, परि शरीर भरले रोगानें
    श्रीमंतीत वाढली कांहीं, गरिबाची लाचारी पाही
    विसरून देह दुर्बलता, धनाचा अहंकार धरी...१

    शक्तीच्या जोरवरती बघतो इतरांत लाचारी

    शरीर संपदा मिळे, परि अडते पैशामुळे
    देहाचा ताठा फार, इतरां तुच्छ लेखणार
    विवंचना ती पैशाची, विसरे शरिर सौख्यापरि....२

    शक्तीच्या जोरावरती बघतो इतरांत लाचारी

    ज्ञानीजन ते असती, अगाध त्यांची मति
    टीका करित राहूनी, विसरती ते अडचणी
    परिस्थितीचे वलय, निराश त्यांना करी....३

    शक्तीच्या जोरावरती, बघतो इतरांत लाचारी

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      June 17, 2019


  • प्रिये….

    p-4063

    -- विनोद

      July 19, 2010


  • वाढले आजार हल्ली (गझल)

    माणसें बेजार हल्ली
    वाढले आजार हल्ली .

    देव, गुरु, अध्यात्म, सिद्धी
    मांडला बाजार हल्ली .

    धर्म वेदी, माणसें अज
    म्हणुन हा गोंजार हल्ली .

    एक नुरला कार्यकर्ता
    मात्र, नेते फार हल्ली .

    लोपल्या पर्जन्यधारा
    आसवांची धार हल्ली .

    शत्रुची आतां न भीती
    दोस्त करतो वार हल्ली .

    माणसा माणूसकीचा
    सोसवेना भार हल्ली .

    ‘भक्त‘ म्हणवत, जन विठूचा
    टाळती शेजार हल्ली .

    करत दो गोष्टी शहाण्या
    मात्र जन दो-चार हल्ली .

    अज : बकरा

    -- सुभाष स. नाईक

      June 24, 2016


  • तू नसता….

    "तू नसता"
    कावरे बावरे होते
    मन येते...तुजपाशी ।।

    कधीकुठे कधीकुठे
    तुझ्यासवे वावरते ।
    बोलतुझे शब्द मुके
    काळजात साठवते ।
    तू नसता ना दिसता
    कोण धरे हृदयाशी ।।ध्रु।।

    अंधारी अजूनही
    मन माझे घाबरते ।
    अंगाई नसतांना
    नीज मला ना येते ।
    प्रेमाचा हात तुझा
    पाठीवर या नाही ।
    काळाचा घाव कसा
    जीव बिचारा साही ।
    तू नसता ना दिसता
    कोण धरे हृदयाशी ।।१।।

    होऊनी स्वप्न असे
    भास तुझे बघ येती ।
    एकांती मायेने
    जोजवून मज जाती ।
    भेटीने तुझ्या कसे
    शांतशांत मन होई ।
    ओठाने नाद धरे
    तुझाच आई आई ।
    तू नसता ना दिसता
    कोण धरे हृदयाशी ।।२।।
    कावरे बावरे होते
    मन येते... तुजपाशी तुजपाशी

    .... मी मानसी

      May 10, 2020


  • कळतंच नाही आजकाल

    कळतंच नाही आजकाल काय झालोय आपण, कसे झालोय आपण !! तेच तेच रहाटगाडगं ढकलत “रटाळ” झालोय आपण !!

      August 16, 2021


  • मोहरणाऱ्या मनात मी

    मोहरणाऱ्या मनात मी
    लाजून अलवार आहे
    सांडले अत्तर गंधित
    मी मोहक दरवळून आहे..
    लाजला मोगरा अलगद
    अंतरी गंध मिटून आहे
    चांदण्याचा गजरा माळीला मी
    चंद्र हसून मज पाहत आहे..
    स्वप्नांतल्या कळ्यांची कविता
    मी आल्हाद गुंफून आहे
    सागराची गुज हलकेच मी
    स्वातीचे मोती हृदयस्थ अबोल आहे..
    -- स्वाती ठोंबरे.

      November 18, 2021


  • श्रद्धांजलि

    सुळीं दिले येशूला वेडेपणाच्या भरांत
    खिळे ठोकले अंगाला रागाच्या ओघांत ।।१।।

    समर्पण केले देहाचे परि न सोडी ध्येय
    बलिदानाच्या मार्गाचे हेच महत्व होय ।।२।।

    सुळावरी तो जातांना वदला आकाशी बघूनी
    क्षमा कर प्रभू त्यांना ते आहेत अज्ञानी ।।३।।

    कळले नाहीं ज्ञान अज्ञान सागरांत
    जाणले तत्वज्ञान उशीर केला त्यांत ।।४।।

    उपयोग नाही आतां वेळ गेली निघूनी
    जाण मनां येता पक्षी गेला उडूनी ।।५।।

    हरकत नाहीं कांहीं उशीर झाला तरी
    तत्वामध्ये रस घेई हीच श्रद्धांजली खरी ।।६।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail- bknagapurkar@gmail.com

      May 20, 2013