साहित्य - ललित

वळण…

Category:

 

सुरुवात जेव्हा सरळ रस्त्यावरुन होते तेव्हा फक्त भावी जीवन, आणि त्याच्या सुखसोयींच्या सुंदर कल्पनाच घोळत असतात मनात! त्या आनंदाला मग हव्या प्रसंगांचे नवे नवे धुमारे फुटतात. आणि मग डोळ्यांना मनाला तेच मनोहारी देखावे भुरळ घालीत राहतात. मनावर ही अशी सुखाची साय धरत असतांना, जीवन किती सुंदर आहे याचीच अनुभुती होत असते सतत. सगळंच कसं हवहवसं संपू नये असं वाटणारं असतं ना?

  November 17, 2019