निघून जरी जाशी,---
मम आयुष्यातुनी तू ,
तरी सारखा मागे उरशी,
लपलेल्या अंत:करणी तू ,---
तीर जसा वेगे शिरतो,
घायाळ करत अचानक,
तसा तू बाण बनतो,
छेद आरपार देत,--!!!
तो जसा बंबाळ करी,
पर्वा ना त्याला कुठली,
कोण त्याला थोपवी,
न कुणी त्यावर मात करी,
तसेच तुझे घुसणे,--
मम हृदयी, आंत आंत,
कितीदा नव्याने पुन्हा जगावे मरणच पाहे अगदी वाट,--!!! मुखवटे सुखाचे घालून सगळे,
आता थकावयांस होते,-- मुखवट्यामागे काय दडले ते, कुणास काय ठाऊक असते,--? रात्रंदिन तुझे असे छळणे,
कुठवर मी आता सहावे,?
बरसात पोकळ सुखांची होता, त्यात किती कोरडे राहावे,--
तू स्वतःत नाहीस राहिला,
तितुका माझ्यात सामावला,---
दूर तरी कसे जावे,--
प्रश्न अनुत्तरीत राहिला,--!!!
हिमगौरी कर्वे ©
August 31, 2019
दुपारचे भोजन करूनी, आडवा झालो थोडासा
झोप लागूनी त्याच क्षणी, थंडावल्या साऱ्या नसा....१,
वाम कुक्षीच्या आधीन जाता, जग विसरलो सारे
स्वप्न पडूनी सुंदर मनी, वाटे आनंद देणारे.....२,
पाटी-पुस्तक हाती घेवूनी, पोषाख घाली शाळेचा
घेवूनी गेलो कन्येस माझ्या, नाद जिला शिकण्याचा....३,
खूप शिकूनी मोठी होईन, बाबा तुमच्या एवढी
खावू पुस्तक खेळणी आणा, बडबडीत तिच्या गोडी....४,
आई नको, परि तुम्हीच या, माझी शाळा सुटताना
टाटा करित गोड वदलि, शाळेमध्ये शिरताना....५,
येत असता घरि परत, दुकानी एका शिरलो
बराच खावू आणि खेळणी, घेवूनी मी परतलो....६,
उत्सुकतेने बघत असता, कुणीतरी हालविले
हाय वेड्या ! हे तर स्वप्न, तिनेच जे तोडले.....७,
क्षणभर आवक् झालो मनी, स्वप्न भंग पावतां
खंत वाटली उगाच एक, अपूरी इच्छा राहतां....८
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 23, 2017
October 20, 2018
नदिकाठच्या कपारीमध्ये, बेडूक बसला दबा धरूनी
उडणाऱ्या त्या माशी वरते, लक्ष सारे केंद्रीत करूनी...१,
नजीक येवूनी त्या माशीचे, भक्ष त्याने करूनी टाकले
परि दुर्दैव त्याचे बघा कसे, सर्पानेही त्यास पकडले...२,
बेडूक गिळूनी सर्प चालला, हलके हलके वनामधूनी
झेप मारूनी आकाशी नेले, घारीने त्याला चोचित धरूनी...३,
'भक्ष्य बनने' दुजा करिता, मृत्यूची ही चालते श्रृखंला
जनक असता तोच सर्वांचा, गमंत येई त्या खेळाला...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 10, 2019
सांगावीत कशी मी स्वप्ने
मज शब्द सुचेना काही
मौनातल्या अंधुक रेषा
हलकेच पुसते जाई
सांजवेळ की पहाट ही
रात्रीस उन्हाचे कोडे
दवबिंदूंची चांदण स्वप्ने
अलगद टिपती झाडे
नवीन जरी झाल्या वाटा
जुनाच तरी वाहील वारा
वळणावरती भेटेल तुला
आठवणींचा अंधुक तारा...
-- आनंद पाटणकर
August 1, 2021
March 6, 2022
जसे रंग फुलांफुलांचे
तसेच रंग मनामनांचे..
नित्य उमलुनी गंधाळावे
दरवळावे श्वास सुखाचे..
मनफुलांचे नाते आगळे
स्पर्श तयांचे मोरपीसांचे..
निर्माल्यातही सुख आगळे
जीवन हे, भाग्य भाळीचे..
जगण्याचे हे क्षण कृतार्थी
संचित सारे हे गतजन्मांचे..
-- वि.ग.सातपुते. (भावकवी )
9766544908
रचना क्र.२३७
१६ /९/२०२२
September 21, 2022
तू असा वाहता की,खळाळते पाणी,
जसा सागर उचंबळे,
गात जीवनगाणी,--!!!
तू असा निश्चल की,
जसा असतो पहाड,
किती स्थितप्रज्ञ राही,
वाऱ्या वादळी अटल--.!!!
तू असा ढगांसारखा,
अविरत ना चंचल,
संजीवन बरसले तरी,
शांत गंभीर अटळ,--!!!
तू असा किनाऱ्यासम,
भाससी किती तटस्थ,
लाटा सुखदुःखांच्या उफाळती तरीही अतिशय अचल,--!!!
तू असा हिंडता की,
वाऱ्याशी तुझी जोडी,
अखंड वाहशी रातदिनी,
पाय ठहरेना जागी,--!!!
कुठे जाऊन तू पोहोचशी,
तू असा फुलांगत,
जिथे तिथे उमलशी,
वसा आनंदाचा घेऊन,
जागोजागी फैलावशी,--!!!
तू असा वृक्षासारखा,
संसारी अन् संन्यस्त,
इतुके बहरूनही सारखे,
स्वतः मात्र निर्मोही--!!!
हिमगौरी कर्वे.©
April 4, 2019
चिंब भिजल्या आभाळातून
पाऊस अविरत रिमझीमतो
टपटपणाऱ्या थेंबांमधुनी
सुगंध मातीचा दरवरळतो
भिरभिरणाऱ्या वाऱ्यामधुनी
मेघांचे तोरण हलते
नितळ ओल्या क्षितिजावरती
वीज रुपेरी चमचमते
घनघोर भरुनी आभाळ असा
पाऊस कितीदा तरी कोसळतो
परी मनास भिजवून जाईल ऐसा
वळीव एकदाच येतो...
---आनंद
September 1, 2021
आभाळ दाटून आले चहूकडे अंधार झाला
तोडण्यास लचके कुणाचे लांडगा सिंह झाला
फुंकली हवा शिडात विषारी जातीयतेची
भिडवतात धर्मांधांना भरण्या तुंबडी स्वतःची।
भासवती निधर्मी स्वताला येथे तुम्हा आम्हास
ऊचलता तळी ऊपऱ्यांची यांचा जातो जन्म लयास
बहुसंख्य जातोय बळी ना अंत लांगुलचालनास
भावना पायदळी तुडवतात ना खंत कधी कुणास ।
टपलेत मदारी येथे रोज दाखवती नवीन खेळ
मिथ्या आरोप करुन ते रोज ऊडवतील राळ
परी पुरुन ऊरशील तू त्या ढोंगी मदाऱ्यांना
वेळ येताच तुझी तू लोळवशील खास त्यांना ।
लागलीय एकदा ठेच ना अक्कल अजुनी आली
का पडतोय आपण सतत ना जाणीव त्यांना झाली
आता पुन्हा एकदा आलेत ते खचीतच मस्तीत
होईल कपाळमोक्ष हे त्यांचे भविष्य आहे निश्चित ।
पाहून या काजव्यास मनी संतोष आज झाला
मुकाबला करण्यास रात्रीचा काजव्याचा जन्म झाला
आता एकची आधार तू हा अंधार मिटवण्याला
रुप घेऊन काजव्याचे साक्षात सुर्य धरतीवर आला ।
-- सुरेश काळे
सातारा.
मो.9860307752
दि. २३ आक्टोंबर २०१८
November 17, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti